Back
शरद पवार की पत्रकार परिषद: मोदी पर किसने उछाला सवाल?
PNPratap Naik1
Sept 18, 2025 05:02:11
Kolhapur, Maharashtra
शरद पवार, पत्रकार परिषद मुद्दे
*ऑन पंतप्रधान*
75 वा वाढदिवस हा त्यांच्या सहकाऱ्यांसाठी महत्वाचा असतो
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 75 वा वाढदिवस साजरा करताना मी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या
कोणतंही राजकारण न आणता सुसंकृत राजकारण दाखवलं पाहिजे
देशाबाहेरील नेतृत्वानी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या
अवतार पुरुष का म्हटले हे मला समजलं नाही
75 व्या वर्षी मी थांबलो नाही त्यामुळे त्यांनी थांबावं असं मला म्हणता येणार नाही
*ऑन पंतप्रधान मोदी जाहिरात*
जाहिरातीचं प्रस्थ इतकं मी कधी पाहिलं नव्हतं
शिंदेंना त्यांना आनंद द्यायचा असेल
त्यावर मी काही बोलणार नाही
*ऑन देवा भाऊ जाहिरात*
देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतात हे पहिले
छत्रपती यांच्याकडे आशीर्वाद मागायचा अधिकार आहे
जनतेनं त्यांच्याकडे राज्य दिलं
राज्यात अनेक समस्या आहेत त्या समस्या त्यासाठी काय केलं
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रजेसाठी, शेतकऱ्यांसाठी केलेलं काम सगळ्यांना महिती आहे
देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याचे प्रश्न सोडवावे ही विनंती
शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी
*ऑन राज आणि उद्धव*
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे
महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही
दोघांचीही मुंबईत ताकद आहे त्याचा आम्हाला फायदा होईल
*ऑन मराठा हैदराबाद गॅझेट*
हैद्राबाद गॅजेट एक दिशा दाखवत आहे
मला याची कॉपी मिळाली आहे
सामंजस्य राहावं, एकीची वीण कायम रहावं हे सगळ्यांनाच वाटतं
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावं यासाठी प्रयत्न करावेत
कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे, हे घातक आहे
विखेंची समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत
मात्र बावनकुळे यांच्या समितीत सगळे ओबीसी सदस्य आहेत
अशात सामाजिक कटुता कशी कमी होईल
राज्याच्या हितासाठी असलेल्या मार्गाने जावं लागेल
हाके किंवा आणखी लोक काही बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कटुता निर्माण झाली आहे
कटुता इतकी निर्माण झाली आहे की एकमेकांच्या व्यवसायाकडे जात नाहीत
हे चित्र महाराष्ट्रात कधीही नव्हती
या देशात आरक्षणाच्या बाबतीत आदेश कोल्हापुरातून निघाला
शाहू महाराज यांनी 50 टक्क्यांपर्यंत आरक्षण दिलं होतं
जे गरीब आहेत ती शिक्षणापासून दूर राहू नये हा हेतू शाहू महाराज यांचा होता
*ऑन निवडणूक आयोग*
निवडणूक आयोगविरोधात 300 खासदार रस्त्यावर येतात हे काही साधी गोष्ट नव्हती
आम्ही चर्चेसाठी बैठक बोलावण्याची विनंती केली
पण नियम अटी घालून 5 खासदारांना बोलावले
पण 300 खासदार रस्त्यावर आले हे नाकारता येत नाही
लोक याबाबत बोलतात याची दखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे
लोकांची शंका तयार होईल असे काम निवडणूक आयोगाने केले तर हे किती दिवस लोक सहन करतील हे माहीत नाही
Vvpat बाबत प्रात्यक्षिक दाखवलं त्यावेळी मत एकाला आणि जी चिठ्ठी पडली त्यामध्ये दुसऱ्याला मत पडलं
लोकसभेला 48 मधल्या 10 जागा मिळाल्या पण विधानसभेला आम्ही साधारण 110 जागा लढवल्या त्यापैकी 10 जागा आम्हाला मिळाल्या
आमचा एक उमेदवार गेली 25 वर्षे निवडून येतो त्याचा पराभव होतो
या सगळ्यांमुळे शंका निर्माण होते, पण याबाबत माझ्याकडे पुरावा नाही
उत्तम जानकर यांच्या गावात गेलो होतो
पण सरकारने त्याठिकाणी आक्षेप घेतला
लोकांनी मतपेटी ठेवून मतदान करण्याचा प्रयत्न केला तर काय चुकलं होत
छोटी राज्य आहेत त्याठिकाणी काय करायचं ते करा
आणि मोठ्या राज्यात हे उद्योग करतात
त्यामुळे लोकसभेवरून आमच्यावर टीका करणं योग्य नाही.
*ऑन परराष्ट्र धोरण*
पाकिस्तान हा कायम आपला शत्रू आहे
नेपाळ हा आपला नेहमीचा मित्र आहे, पण आज तिथं काय परिस्थिती आहे
चीनबद्दल काय नवीन सांगायची गरज नाही
बांगलादेश बद्दल आपण किती त्याग केला?
श्रीलंका हा आमचा मित्र होता तो आज राहिला नाही
आपण सभोवताली देश दुखावून ठेवले आहेत
रशिया हा भारताचा जुना मित्र होता, पण तोच रशिया कमी किमतीत तेल देत असेल तर घ्यायचे नाही का?
त्याला अमेरिका विरोध करतो
आपण आपल्या हिताचा विचार केलाच पाहिजे, त्यामुळे दुसऱ्या देशाचं ऐकायची काय गरज
ते त्यांच्या देशाचे हित बघतील आम्ही आमचं हित बघू
भारतातील वस्तू निर्यातीबाबत त्यावेळी माझ्यावर अमेरिकेबरोबर चर्चा करण्याची जबाबदारी होती
पाच दिवस चर्चा झाली त्यावेळी शेती आणि दूध उत्पादक वस्तू घेतल्याचं पाहिजे अशी भूमिका मांडली
त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं की आमचं पशुखाद्य घ्यावं
पण आपल्याकडे पशुखाद्य धान्यापासून बनते तर अमेरिकेत गाय, म्हैस, बैल यांच्या मासांपासून पशुखाद्य बनवले जाते
त्यावेळी आम्ही त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही
आज देखील अमेरिका तसेच पशुखाद्य घ्यायला भाग पाडत आहेत
पण मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो की त्यांनी हे मान्य केलं नाही
राज्य सरकारने 600 कोटी रुपये सहकार साखर मंडळांचे थकवले आहेत
*ऑन साखर कारखानदार*
खाजगी साखर कारखाने चांगल्या पद्धतीने चालवले जातात
कामगारांच्या हितासाठी निर्णय घेतला जातो
आज पन्हाळ्यावर या कामगारांचा मेळावा आहे त्याठिकाणी काय मार्ग काढता येतो ते पाहूया
चेहरे बघून साखर कारखान्यांना सरकारने मदत करणे हे धोरण चुकीचे
एनसीडीच्या मदतीवरून सरकारला टोला
*ऑन इथेनॉल*
वीज, इथेनॉल, साखर असे वेगवेगळे उत्पादन घेतले तर साखरेचा व्यवसाय परवडणारा आहे अन्यथा नाही
त्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावा
नितीन गडकरी यांचा दृष्टीकोन चांगला आहे
इथेनॉल बाबत जे निर्णय घेतात ते शेतकऱ्यांसाठी हिताचे आहेत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 18, 2025 06:47:290
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 06:36:520
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 18, 2025 06:35:300
Report
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 18, 2025 06:30:420
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 18, 2025 06:30:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 18, 2025 06:30:170
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 06:06:080
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 18, 2025 06:04:030
Report
1
Report
UPUmesh Parab
FollowSept 18, 2025 05:48:202
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 18, 2025 05:34:314
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 05:33:434
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 18, 2025 05:33:041
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 05:32:410
Report