Back

शेलोडी-बोरी रस्त्यावर महावितरणच्या ठेकेदाराकडून अनधिकृत वृक्षतोड कारवाईची मागणी
Shelodi, Maharashtra:
दारव्हा तालुक्यातील शेलोडी-बोरी या महामार्गावर सध्या महावितरण कंपनीमार्फत नवीन विद्युत खांब व तार टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी नियुक्त ठेकेदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रस्त्यालगत उभे असलेले वृक्ष सर्रासपणे तोडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
एकीकडे शासन लाखो रुपये खर्चून वृक्ष लागवड मोहिमा राबवते, तर दुसरीकडे शासनच्याच अखत्यारीतील महावितरणच्या कामासाठी वृक्षांची तोड केल्या जात आहे.याकडे वन विभागाने तातडीने लक्ष वेधून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
0
Report
शेलोडी ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहारां विरोधात सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला स्थगिती
Shelodi, Darwha, Maharashtra:
गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा उपविभागच्या अभियंत्यांनी दिले लेखी आश्वासन
शेलोडी ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहारासह पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते ईश्वर राठोड हे १६ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आज बिडीओ शिंदे व अभियंता पटेल यांच्या लेखी आश्वासनाने अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.या आंदोलनाला ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता.
4
Report