Back
संभाजी नगर में ड्रग रैकेट का पर्दाफाश, 12 गिरफ्तार, 2504 बोतलें जब्त
VKVISHAL KAROLE
Sept 14, 2025 08:21:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn drug pkg
Feed on 2 c and on what's app both
Anchor :. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तरुण-तरुणींना नशेसाठी 'कोडेन फॉस्फेट' या खोकल्याच्या औषधांचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिस आयुक्तांचे विशेष पथक, गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून, १२ जणांना अटक करून ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Vo 1...
नशेच्या औषधांचे मोठे रॅकेट संभाजी नगरात उघड
औषधांच्या 2504 बाटल्या केल्या जप्त
12 पेडलर्स ला अटक , 39 पेडलर्स रडारवर
औषधांच्या या बाटल्या उपचारासाठी नाही तर या सगळ्या नशेसाठी संभाजी नगरात आल्या होत्या मात्र येताच पोलिसांच्या कचाट्यात हे रॅकेट अडकले आणि मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला... गेल्या दोन वर्षांपासून अनेक एमआर, मेडिकल चालक शहरातील कुख्यात गुन्हेगार, अमली पदार्थांच्या संपर्कात आले. पन्नासपेक्षा अधिक जणांचे हे सिंडिकेट तयार होऊन त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात जाळे पसरविले. बनावट परवाने तयार करून औषधी कंपन्यांना वेदनानाशक, गुंगीकारक औषधांची ऑर्डर दिली जायची. नंतर महाविद्यालयीन विद्यार्थी, नशेखोरापर्यंत दहापट अधिक रकमेने पोहोचवून त्यांना नशेची लत लावली जाई, आणि या पद्धतीने हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू होता
पोलिसांचे पथक गेल्या ३ महिन्यांपासून या रॅकेटवर बारीक लक्ष ठेवून होते. पोलिसांनी एका पेडलरला पकडल्यानंतर चौकशीत आरोपी रुपेश पाटील याचा फोन नंबर मिळाला. त्याच्या माध्यमातून पोलिसांनी या टोळीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर, १२ सप्टेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश पाटील हा वाळूज येथील व्हीआरएल लॉजिस्टिक्सच्या गोदामातून औषधांचे पार्सल घेण्यासाठी येणार होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. १३ जिल्ह्यांमध्ये २०० हून अधिक पेडलर्सचे नेटवर्क चौकशीत समोर आले आहे...
Byte प्रवीण पवार, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी
Vo 2...
सिंडिकेटची कार्यपद्धती
पूर्वी एमआर असलेले अविनाश,
रूपेश व अमोल यांनी पगार पुरत नसल्याने मेडिकल दुकान सुरू केले. मात्र, त्यातही त्यांचे जीएसटी व औषधी परवाने रद्द झाले.
त्याच बंद जीएसटी व परवान्यावर ते औषधांची ऑर्डर देत होते. अमोलच्या मेडिकलच्या पत्त्यावर पोलिसांना वॉटर प्लांट आढळून आला. विविध औषधी दुकाने, एजन्सीचालक, डॉक्टरांच्या कागदपत्रांचा यासाठी वापर होई...एकमेकांच्या संपर्कासाठी अन्य चॅटिंग अॅप, दुसऱ्यांचे बँक खाते, वाहनांचा वापर केला जातो. यातून हे सगळे औषध नशेसाठी खरेदी केल्या जात होते आणि शहरातील पेडलर्सला विकला जात होते
आरोपी रूपेश गेली काही वर्षे हा व्यवसाय करत होता मात्र त्याच्या अतिघाईमुळे तो पोलिस जाळ्यात अडकला. उत्तराखंडहून औषधांचे एक मोठे कन्साइनमेंट त्याने वाळूज येथील व्हीआरएल कंपनीच्या गोदामात मागवले होते. साधारणपणे, ही औषधे गोदामातून नाशिकला पाठवली जातात, पण या वेळी तसे झाले नाही. अनेक दिवसांपासून डिलिव्हरीची वाट बघून वैतागलेल्या रूपेशने कंपनीच्या व्यवस्थापकाला फोन केला. अनेक पेडलर्सना औषधांची तातडीने डिलिव्हरी द्यायची असल्यामुळे त्याला धीर धरवला नाही. त्याने कंपनीच्या व्यवस्थापकाला सांगितले, याच घाईमुळे संशय बळावला आणि कारवाई झाली...
Byte प्रवीण पवार, पोलीस आयुक्त
Vo 3...
संभाजीनगर सध्या नशेच्या गोळ्यांचा नशेच्या औषधांचा सुळसुळाट झाला आहे, पोलिसांची कारवाई सुरू आहे मात्र तरीसुद्धा ही औषधं या गोळ्या राजरोसपणे मिळतात मात्र या कारवाईनंतर पेडलर्सचे एक रॅकेट उध्वस्त झाले , ही लोक औषधं नशेसाठी विकत होते सोबतच यातील काही लोक नशेच्या गोळ्या आणि आणखी काही साहित्य विकत होते असाही पोलिसांचा संशय आणि त्यातून आता सखोल चौकशी केली जाईल आणि त्यातून एक मोठा रॅकेट उद्ध्वस्त होईल यात शंका नाही
विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 10:32:400
Report
MAMILIND ANDE
FollowSept 14, 2025 10:21:091
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:03:443
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 14, 2025 10:00:580
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 14, 2025 10:00:420
Report
AKAMAR KANE
FollowSept 14, 2025 09:36:212
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 09:33:020
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 14, 2025 09:15:100
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 14, 2025 09:03:571
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 08:47:573
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 14, 2025 08:46:520
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 14, 2025 08:31:101
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 08:22:502
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 14, 2025 08:19:455
Report