Back
बिहार चुनाव में पैसे के दावों سے उठे सवाल: आयोग क्या करेगा?
JMJAVED MULANI
Nov 15, 2025 08:49:48
Baramati, Maharashtra
बारामती शरद पवार पॉईंटर..
*ऑन_बिहार निवडणूक मुख्यमंत्री कोण ?*
तिथे घवघवीत यश आहे.बीजेपी आणि नितीशकुमार ते बसून निकाल घेतील
या निवडणुकीमध्ये त्या जे प्रेझेंटेशन केलं ते नीतिशच्या नावाने होतं.
त्यामुळे वेगळा निकाल होईल असं वाटत नाही.
मला अधिकृत माहिती नाही
*ऑन_ बिहार निवडणूक निकाल*
दोन तीन गोष्टी आहेत.
मतदानानंतर मी काही लोकांशी बोललो होतो.
काही लोकांकडून मला फीडबॅक असे मिळाला की या निवडणुकीचा मतदान महिलांनी हातात घेतलं होतं.
*मला एक अशी शंका होती,ज्याअर्थी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला याचा अर्थ सर्व महिलांच्या खात्यात १० हजार रुपये पडले त्याचा परिणाम असावा*
पण त्यावेळीला मतदान झालं होत आता निकाल आले आहेत.
*महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या अगोदर पैसे वाटले*
*सरकारच्या वतीने वाटले. महाराष्ट्रात लाडके बहीण*
तसंच आता बिहारमध्ये झालं आहे.
*प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या अगोदर अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे.*
याचा विचार इलेक्शन कमिशनने केला पाहिजे.
*ऑन_स्थानिक स्वराज्य संस्था चंदगड मध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती पुणे जिल्ह्यात काय*
मला कुठल्या जिल्ह्यात काय आहे माहित नाही
माझ्या पक्ष पुरतं एवढंच सांगतो चर्चा आमच्यात झाली, या स्थानिक निवडणुका जिल्हा परिषदेचे आहेत यानंतर पंचायत समितीचे येथील या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण तिथे असणं.
याच्या अगोदरच्या निवडणुका आम्ही पार्टी म्हणून लढवल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने आम्ही चार जिल्ह्यात पक्षाचे जे सहकार्य स्थानिक स्थिती बघून त्यांनी निर्णय घ्यावा.
*ऑन_मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा स्वबळाचा नारा*
घेतील.... घेणार का नाही मला माहित नाही.
यात काय आश्चर्य नाही.
*मुंबई महानगरपालिका आत्ता जाहीर झालेले नाही*
*ऑन_मुंबईत शिवसेनेचा महापौर झाला आहे परंतु आता भाजपमधून महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जातंय*
याच्यात नवीन काय.
*ऑन_निवडणूक आयोग भूमिका*
प्रत्येकी दहा हजार रुपये वाटणे
निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वाटप झालं.
त्यानुसार ॲक्शन घेता येत नाही.
पण हे योग्य आहे का.
हा पैसा कुठला.सरकारी खजिण्यातला.
सरकारी खजिना मतदान करा यासाठी वापरणार का ?
*याचा अर्थ सरळसरळ निवडणुका गैरमार्गाने लढवायची भूमिका आहे*
*ऑन_आगामी निवडणुकीत या गोष्टीला पायबंध कसा घालणार*
आम्हाला बसून चर्चा करावी लागेल.
अधिवेशन सुरू होईल तेव्हा आम्ही दिल्लीत सर्वजण आहोत एकत्र बसून आम्हाला याचा विचार करावा लागेल
*ऑन_केळीचे दर घसरले*
लोकांचं लक्ष साहजिकच निवडणुकीकडे असणार.
मी या देशातील केळी एक्सपोर्ट करणार आहेत त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.
कायमस्वरूपी काय व्यवस्था करता येईल का.
मागे तीन-चार वर्षांपूर्वी असा प्रश्न आला होता.
त्यावेळी एका मोठ्या एक्सपोर्टला मी तिथे पाठवलं, तिच्यामार्फत केळी निर्यात केली.
आता अनेक लोकांना सहभागी करणे आवश्यक आहे.
*ऑन_ऊस दर कोंडी कोल्हापूर आंदोलन*
ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर अडवणे म्हणजे नुकसान कोणाच आहे ?
हा रस्ता नाही.
किंमत वाढवून देण्यासंदर्भातील जी मागणी आहे, तुम्ही किंमत उसाची वाढवता पण साखरेची वाढवत नाही. मग ती द्यायची कुठून?
त्यासाठी लोकांच्यात अस्वस्थता आहे.
हा प्रश्न लवकर सोडावा हा आग्रह केंद्र सरकारकडे आम्हा लोकांचा आहे
*ऑन_मोदी भाषण निवडणूक आयोग आभार*
मी भाषण ऐकलं.
*जर हे पैसे वाटत आहेत वगैरे या सगळ्याकडे निवडणूक आयोगाने बग्याची भूमिका घेतली याचा त्यांना होणारच*
*ऑन_शिवसेना चिन्ह निकाल तारीख वाढवली जात आहे*
एक तर त्यांच्यावर अन्याय आहे.
त्यांची कायदेशीर ही मागणी आहे जितका उशीर होईल त्या पक्षाला त्याची झळ बसते.
तीसऱ्यांदा हे पुढे ढकलले.याचा अर्थ...
आपण भाष्य करू शकत नाही पण दिसतंय ते ठीक दिसत नाही.
*ऑन_पिपाणी गोठवले*
फायदा होईल.
मागे सर्व्हे केला होता पिपाणी आणि तुतारी यामुळे आमच्या अनेक जागा पडल्या
मी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचे आभार मानतो त्यांनी आमची जी ताकत आहे त्याचा स्वीकार केला आणि त्याच्या दुरुस्ती केली.
*ऑन_अतिवृष्टी मदत नाही, सरकारकडून कृष्णा माती आणि मोफत दिली जाईल*
आज माझ्याकडे सोलापूर भागातील शेतकरी आले होते.
माती कुठे आहे ? माती कुठून आणायची? दुसऱ्याच्या शेतातून कसे देणार कोण ?
मी सोलापूरला जाणार आहे त्यावेळी चर्चा करणार आहे
*ऑन_ 30 जून कर्जमाफी*
बघू सरकार काय करतेय
*ऑन_स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा न्याय व्यवस्थेवर काय वाटतं?*
आम्हा सर्वांचे जबाबदारी आहे इन्स्टिट्यूटेशन ची प्रतिष्ठा जपली पाहिजे.
अशी भूमिका गेली अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी घेतली.
पहिल्यांदा इन्स्टिट्यूटेशनचे काही निर्णय चौकटीच्या बाहेर होताहेत अस लोकांना वाटायला लागल आहे.
इन्स्टिट्यूटेशन संबंधीची शंका लोकांच्या मनातल्या निघत आहे.
तरी याचे इन्स्टिट्यूटेशन ची प्रतिष्ठा त्यांनी जपली पाहिजे, आम्ही लोकांनी त्याच्यात राजकारण आणता कामा नये.
तिची स्वायत्तता टिकवली पाहिजे
74
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 15, 2025 11:00:350
Report
SNSWATI NAIK
FollowNov 15, 2025 11:00:140
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 15, 2025 10:53:270
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 15, 2025 10:53:150
Report
KJKunal Jamdade
FollowNov 15, 2025 10:40:130
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 15, 2025 10:39:5337
Report
ABATISH BHOIR
FollowNov 15, 2025 10:18:48109
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 15, 2025 10:03:3542
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 10:02:55190
Report
AKAMAR KANE
FollowNov 15, 2025 09:57:5997
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 15, 2025 09:57:43123
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 15, 2025 09:53:33164
Report
ABATISH BHOIR
FollowNov 15, 2025 09:51:32111
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 15, 2025 09:37:25143
Report
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 09:21:07127
Report