Back
नाशिक के 11 नगरपरिषदों में चौरंगी टकराव: अजित पवार बनाम शिंदे गुट
YKYOGESH KHARE
Nov 17, 2025 14:36:27
Nashik, Maharashtra
नाशिक जिल्हा 11 नगरपरिषद - नगराध्यक्ष उमेदवार (सदस्य + नगराध्यक्ष) 1. भगूर - एकूण जागा 20+1 1. अनिता करंजकर, शिवसेना शिंदे गट 2. प्रेरणा बलकवडे, अजित पवार गट आणि भाजप युती 3. जयश्री काकासाहेब देशमुख, महाविकास आघाडी *(भगूर नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेला एकट पाडत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांनी एकत्र येत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून प्रेरणा बलकवडे यांना उमेदवारी दिली आहे तर शिंदे यांच्या शिवसेनेने उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांना उमेदवारी दिली आहे भगूर नगर परिषदेवर करंजकर कुटुंबाची दहा वर्षांपासून एक हाती सत्ता राहिली आहे.)* 2. सिन्नर - एकूण जागा 30+1 1. हेमंत वाजे, भाजप 2. प्रमोद चोथवे, महाविकास आघाडी 3. विठ्ठलराजे उगले, अजित पवार गट 4. नामदेव लोंढे, शिवसेना शिंदे गट *(सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने ऐनवेळी ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे यांना भाजपमध्ये घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे तरी या मतदारसंघात माणिकराव कोकाटे यांनी विठ्ठल उगले यांना उमेदवारी देत भाजपच्या खेळीला शह देण्याचा प्रयत्न केला आहे तर महाविकास आघाडीने ऐनवेळी प्रमोद चोथवे यांना उमेदवारी दिली आहे शिंदेंच्या शिवसेनेनेदेखील नामदेव लोंढे यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत चौरंगी लढत होणार आहे.)* 3. त्र्यंबकेश्वर - एकूण जागा 20+1 1. कैलास घुले, भाजप 2. सुरेश गंगापुत्रे, अजित पवार गट 3. त्रिवेणी तुंगार सोनवणे, शिवसेना शिंदे गट 4. दिलीप पवार, महाविकास आघाडी *(त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने माजी नगराध्यक्ष घुले यांना उमेदवारी दिली आहे कैलास घुले हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहे तर सुरेश गंगापुत्रे यांनी ऐनवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी घेत कैलास खुले यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे तर त्रिवेणी सोनवणे यांनी शिंदे गटाची तर दिलीप पवार यांनी महाविकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीत चौरंगी सामना रंगणार आहे कुंभमेळा मुळे ही नगरपरिषद सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे)* 4. इगतपुरी - एकूण जागा 21+1 1. मधू मालती मेंधरे, अलका चौधरी, भाजप 2. शालिनी खताळे आणि जनाबाई खताळे, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट युती 3. शुभांगी दळवी, काँग्रेस आणि उबाठा युती *(नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या इगतपुरी नगर परिषदेत भाजपने ऐनवेळी ठाकरेंच्या सेनेला खिंडार पाडत संजय इंदुलकर यांना भाजपमध्ये घेत त्यांच्या सहकारी मधुमालती बेंद्रे यांना उमेदवारी दिली आहे तरी या निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेने शुभांगी दळवी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिंदे यांच्या शिवसेनेने एकत्र येत या निवडणुकीत शालिनी खताळे यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत तिरंगी सामना पाहायला मिळेल मात्र येथे भाजपाच पारडं जड आहे.)* 5. ओझर - एकूण जागा 27+1 1. भारती घेगडमल, अनिता घेगडमल, दुर्गा थोरात - भाजप 2. श्वेता प्रदीप आहिरे, शिवसेना शिंदे गट 3. प्रज्ञा हेमंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 4. जयश्री धर्मा जाधव, ठाकरेंची शिवसेना 5. मालती पाटील, काँग्रेस *(ओझर नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांनी सगळ्या प्रभागात स्वतंत्र उमेदवार देत नगराध्यक्ष पदासाठी प्रज्ञा जाधव यांना उमेदवारी दिली आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी जयश्री जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे तर त्यांचेच बंधू भाजपाचे युवा नेते यतीन कदम यांनी ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय घेगडमल यांना उमेदवारी दिली आहे या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर भाजपाच्या माजी मंत्री भारती पवार भाजपचे युवा नेते नितीन कदम आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.)* 6. पिंपळगाव बसवंत - एकूण जागा 25+1 1. गोपाळ गायकवाड, राष्ट्रवादी अजित पवार गट 2. मनोज बर्डे, भाजप आणि शिंदे गट युती 3. संतोष गांगुर्डे, काँग्रेस *(पिंपळगाव बसवंत नगर परिषदेत देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यातील हा थेट सामना मानला जातो आहे तर याच निवडणुकीमध्ये भाजपने शिंदे गटाच्या मदतीने मनोज बर्डे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे माजी मंत्री भारती पवार आणि भाजपचे युवा नेते नितीन कदम यांनी अनिल कदम आणि दिलीप बनकर यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.)* 7. चांदवड - एकूण जागा 20+1 1. वैभव बागुल, भाजप 2. विकी जाधव, शरद पवार गट 3. शंभू खैरे, ठाकरे शिवसेना 4. सुनिल बागुल, अजित पवार राष्ट्रवादी *(भाजपचे आमदार राहुल आहेर यांनी ऐनवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिरीष कोतवाल यांना भाजपमध्ये घेत या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी वैभव बागुल यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत सुनील बागुल यांना उमेदवारी दिली आहे ठाकरेंच्या सेनेने शंभू खैरे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विकी जाधव यांना उमेदवारी दिली आहे या निवडणुकीत भाजपचे आमदार राहुल आहेर आणि नुकताच भाजप प्रवेश केलेले शिरीष कोतवाल यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे) 8. सटाणा - एकूण जागा 24+1 1. योगिता सुनिल मोरे, भाजप 2. अर्चना दिनेश सोनवणे, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट 3. हर्षदा राहुल पाटील, शिंदे शिवसेना *(सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे भाजपने विश्वासात न घेता उमेदवार दिल्याचा आरोप करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ घेत या ठिकाणी भाजपाच्या योगिता मोरे यांच्यासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना शिंदे यांच्या रूपाने आव्हान उभे केले आहे त्यामुळे या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे तर याच निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेनेदेखील एकलाचलो चा नारा देत हर्षदा राहुल पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीतही तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे.)* 9. येवला - एकूण जागा 26+1 1. राजेंद्र लोणारी, भाजप आणि अजित पवार गट युती 2. रुपेश दराडे, शिवसेना शिंदे गट आणि शरद पवार गट *(छगन भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवलामध्ये महाविकास आघाडी आणि शिंदे गटाची अनोखी युती.. सुहास कांदेंची छगन भुजबळांविरोधात खेळी)* 10. मनमाड - एकूण जागा 33+1 1. योगेश पाटील, भाजप आणि शिंदे शिवसेना 2. प्रविण नाईक, उबाठा 3. गणेश धात्रक, अपक्ष *(मनमाडमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ वाद बघायला मिळत असतांनाच अजित पवार गटाने उमेदवारच न दिल्याने चर्चेचा विषय. अपक्ष उमेदवार गणेश धात्रक यांना अजित पवार गटाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता)* 11. नांदगाव - एकूण जागा 20+1 1. राजेश कवडे, शिंदे शिवसेना आणि भाजप युती 2. राजेश बनकर, राष्ट्रवादी अजित पवार (भाजप बंडखोर) 3. संतोष गुप्ता, ठाकरे शिवसेना *(नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांडे आमने-सामने आले आहे शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपसोबत युती करत राजेश कवडे यांना उमेदवारी दिली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने म्हणजेच समीर भुजबळांनी भाजपचे बंडखोर राजेश बनकर यांना उमेदवारी देत सुहास कांद्याच्या राजेश कवडे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे त्यात डळमळीत झालेल्या ठाकरेंच्या सेनेने संतोष गुप्ता यांना उमेदवारी देत गड राखण्याचा प्रयत्न केला आहे.)
172
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 16:32:4975
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 16:17:4957
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 16:17:38141
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 16:17:18160
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 16:17:06123
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 15:16:01142
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 17, 2025 15:15:45104
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 14:34:18142
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 17, 2025 14:33:28108
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 14:33:01176
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 17, 2025 13:38:5490
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 17, 2025 13:34:46146
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 17, 2025 13:20:35159
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 17, 2025 13:20:10185
Report