Back
अजित पवार गट ने सचिन सातव को बारामती नगराध्यक्ष उम्मीदवार घोषित किया
JMJAVED MULANI
Nov 17, 2025 16:17:38
Baramati, Maharashtra
बारामती नगरपरिषदेसाठी अजित पवार गटाकडून सचिन सातव यांच्या नावाची घोषणा.... राष्ट्रवादीकडून घड्याळाच्या चिन्हावर सचिन सातव यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी....
Anchor_ बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सचिन सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. सचिन सातव यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस कडून घड्याळाच्या चिन्हावरती देण्यात आली आहे.अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा सस्पेन ठेवण्यात आला होता आता तो दूर झाला असून सचिन सातव हे बारामती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.शिवाय यापूर्वी सचिन सातव हे बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक देखील राहिले आहेत.
बारामती नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नगराध्यक्ष पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावल्याने चुरस निर्माण झाली होती. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सदाशिव सातव यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सचिन सातव यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
संपूर्ण राज्यात विकासाचा पॅटर्न म्हणून ओळख असलेल्या बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची धुरा अजित पवार कोणाकडे देणार याची चर्चा निवडणूक जाहीर झाल्यापासून रंगली होती. राष्ट्रवादीकडून आपणाला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी शक्ती पणाला लावली होती. नगराध्यक्ष पदासाठी आपण कसे लायक आहोत हे सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू होती. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर सचिन सातव यांना उमेदवारी जाहीर करत सातव यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. सचिन सातव यांनी यापूर्वी बारामती नगर परिषदेचे गटनेते म्हणून काम पाहिले आहे .
भाजपकडून ३२ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष ४ तर अपक्ष दोन असे पॅनल भाजपने तयार केले आहे. नगराध्यक्ष पदासाठी ॲड गोविंद देवकाते यांना उमेदवारी देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी .. दोघा तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यामध्ये विचार करून निर्णय घेणार असल्याचे युगेंद्र पवारांनी स्पष्ट केले आहे.
बसपाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी काळूराम चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादीची अजित पवार गट उमेदवार यादी :
नगराध्यक्षपद : सचिन सदाशिव सातव
प्रभाग क्र. १ : मनीषा समीर चव्हाण, अविनाश हनुमंत निकाळजे, प्रभाग क्र. २ : जय नानासो पाटील, अनुप्रिता रामलिंग डांगे -ताबे, प्रभाग क्र. ३ : प्रवीण दत्तू माने, रुपाली नवनाथ मलगुंडे, प्रभाग क्र. ४ : संपदा सुमित चौधर, विष्णूपंत तुळशीदास चौधर, प्रभाग ५ ः किशोर आप्पासाहेब मासाळ, ऋतुजा प्रताप पागळे, प्रभाग क्र. ६ : धनश्री अविनाश बांदल, अभिजित भानुदास जाधव, प्रभाग क्र. ७ : प्रसाद भगवान खारतुडे, भारती विश्वास शेळके, प्रभाग क्र. ८ : श्वेता योगेश नाळे, अमर बाबाजी धुमाळ प्रभाग क्र. ९ : विशाल भानुदास हिंगणे, पूनम ज्योतीबा चव्हाण, प्रभाग क्र. १० : अनिता सुरेश गायकवाड, जयसिंग अशोक देशमुख, प्रभाग क्र. ११ :सविता सुजित जाधव, संजय वालचंद संघवी प्रभाग क्र. १२ : सारीका अमोल वाघमारे, अभिजित यशवंत चव्हाण, प्रभाग क्र. १३ : बिरजू भाऊसाहेब मांढरे, सुनीता अरविंद बगाडे, बिरजू भाऊसाहेब मांढरे, प्रभाग क्र. १४ : स्वाती आप्पासो अहिवळे, नवनाथ सदाशिव बल्लाळ, प्रभाग क्र. १५ : मंगला जयप्रकाश किर्वे, जितेंद्र बबनराव गुजर, प्रभाग क्र. १६ : गोरख ज्ञानदेव पारसे, मंगल शिवाजीराव जगताप, प्रभाग क्र. १७ : अलताफ सय्यद, शर्मिला शिवाजीराव ढवाण, प्रभाग क्र. १८ : राजेंद्र बाबुराव सोनवणे, अश्विनी सूरज सातव, प्रभाग क्र. १९ : सुनील दादासाहेब सस्ते, प्रतिभा विजय खरात, प्रभाग क्र. २० : प्रथमेश प्रवीण गालिंदे, दर्शना विक्रांत तांबे, आफरीन फिरोज बागवान
151
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 17, 2025 17:52:34181
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 16:32:4987
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 16:17:49150
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 16:17:18160
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 16:17:06139
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 15:16:01142
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 17, 2025 15:15:45104
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 17, 2025 14:36:27172
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 14:34:18142
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 17, 2025 14:33:28108
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 14:33:01176
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 17, 2025 13:38:5490
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 17, 2025 13:34:46146
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 17, 2025 13:20:35159
Report