Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

शिराळा नगरपंचायती में काका-पुतना के बीच नगराध्यक्ष पद के लिए भिड़ंत

SMSarfaraj Musa
Nov 17, 2025 13:38:54
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - शिराळा नगरपंचायतीसाठी काका- पुतण्या मध्ये होणार लढत.. अँकर - सांगलीच्या शिराळा नगर नगरपंचायतीसाठी काका-पुतण्या मध्ये नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत होणार आहे. भाजपा- शिवसेना शिंदे आघाडी विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी आघाडी,अशी लढत होत आहे.भाजप- शिंदे शिवसेना आघाडी कडून शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते पृथ्वीसिंग नाईक यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी एकत्रित येत,आघाडी केली आहे. राष्ट्रवादी आघाडीकडून अभिजीत नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणारे अभिजीत नाईक आणि भाजप-शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणारे पृथ्वीसिंग नाईक हे दोघेही काका पुतण्या आहेत त्यामुळे आता शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळणार आहे.
90
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Nov 17, 2025 14:36:27
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्हा 11 नगरपरिषद - नगराध्यक्ष उमेदवार (सदस्य + नगराध्यक्ष) 1. भगूर - एकूण जागा 20+1 1. अनिता करंजकर, शिवसेना शिंदे गट 2. प्रेरणा बलकवडे, अजित पवार गट आणि भाजप युती 3. जयश्री काकासाहेब देशमुख, महाविकास आघाडी *(भगूर नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेला एकट पाडत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांनी एकत्र येत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून प्रेरणा बलकवडे यांना उमेदवारी दिली आहे तर शिंदे यांच्या शिवसेनेने उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांना उमेदवारी दिली आहे भगूर नगर परिषदेवर करंजकर कुटुंबाची दहा वर्षांपासून एक हाती सत्ता राहिली आहे.)* 2. सिन्नर - एकूण जागा 30+1 1. हेमंत वाजे, भाजप 2. प्रमोद चोथवे, महाविकास आघाडी 3. विठ्ठलराजे उगले, अजित पवार गट 4. नामदेव लोंढे, शिवसेना शिंदे गट *(सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने ऐनवेळी ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे यांना भाजपमध्ये घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे तरी या मतदारसंघात माणिकराव कोकाटे यांनी विठ्ठल उगले यांना उमेदवारी देत भाजपच्या खेळीला शह देण्याचा प्रयत्न केला आहे तर महाविकास आघाडीने ऐनवेळी प्रमोद चोथवे यांना उमेदवारी दिली आहे शिंदेंच्या शिवसेनेनेदेखील नामदेव लोंढे यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत चौरंगी लढत होणार आहे.)* 3. त्र्यंबकेश्वर - एकूण जागा 20+1 1. कैलास घुले, भाजप 2. सुरेश गंगापुत्रे, अजित पवार गट 3. त्रिवेणी तुंगार सोनवणे, शिवसेना शिंदे गट 4. दिलीप पवार, महाविकास आघाडी *(त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने माजी नगराध्यक्ष घुले यांना उमेदवारी दिली आहे कैलास घुले हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहे तर सुरेश गंगापुत्रे यांनी ऐनवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी घेत कैलास खुले यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे तर त्रिवेणी सोनवणे यांनी शिंदे गटाची तर दिलीप पवार यांनी महाविकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीत चौरंगी सामना रंगणार आहे कुंभमेळा मुळे ही नगरपरिषद सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे)* 4. इगतपुरी - एकूण जागा 21+1 1. मधू मालती मेंधरे, अलका चौधरी, भाजप 2. शालिनी खताळे आणि जनाबाई खताळे, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट युती 3. शुभांगी दळवी, काँग्रेस आणि उबाठा युती *(नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या इगतपुरी नगर परिषदेत भाजपने ऐनवेळी ठाकरेंच्या सेनेला खिंडार पाडत संजय इंदुलकर यांना भाजपमध्ये घेत त्यांच्या सहकारी मधुमालती बेंद्रे यांना उमेदवारी दिली आहे तरी या निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेने शुभांगी दळवी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिंदे यांच्या शिवसेनेने एकत्र येत या निवडणुकीत शालिनी खताळे यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत तिरंगी सामना पाहायला मिळेल मात्र येथे भाजपाच पारडं जड आहे.)* 5. ओझर - एकूण जागा 27+1 1. भारती घेगडमल, अनिता घेगडमल, दुर्गा थोरात - भाजप 2. श्वेता प्रदीप आहिरे, शिवसेना शिंदे गट 3. प्रज्ञा हेमंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 4. जयश्री धर्मा जाधव, ठाकरेंची शिवसेना 5. मालती पाटील, काँग्रेस *(ओझर नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांनी सगळ्या प्रभागात स्वतंत्र उमेदवार देत नगराध्यक्ष पदासाठी प्रज्ञा जाधव यांना उमेदवारी दिली आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी जयश्री जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे तर त्यांचेच बंधू भाजपाचे युवा नेते यतीन कदम यांनी ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय घेगडमल यांना उमेदवारी दिली आहे या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर भाजपाच्या माजी मंत्री भारती पवार भाजपचे युवा नेते नितीन कदम आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.)* 6. पिंपळगाव बसवंत - एकूण जागा 25+1 1. गोपाळ गायकवाड, राष्ट्रवादी अजित पवार गट 2. मनोज बर्डे, भाजप आणि शिंदे गट युती 3. संतोष गांगुर्डे, काँग्रेस *(पिंपळगाव बसवंत नगर परिषदेत देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यातील हा थेट सामना मानला जातो आहे तर याच निवडणुकीमध्ये भाजपने शिंदे गटाच्या मदतीने मनोज बर्डे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे माजी मंत्री भारती पवार आणि भाजपचे युवा नेते नितीन कदम यांनी अनिल कदम आणि दिलीप बनकर यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.)* 7. चांदवड - एकूण जागा 20+1 1. वैभव बागुल, भाजप 2. विकी जाधव, शरद पवार गट 3. शंभू खैरे, ठाकरे शिवसेना 4. सुनिल बागुल, अजित पवार राष्ट्रवादी *(भाजपचे आमदार राहुल आहेर यांनी ऐनवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिरीष कोतवाल यांना भाजपमध्ये घेत या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी वैभव बागुल यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत सुनील बागुल यांना उमेदवारी दिली आहे ठाकरेंच्या सेनेने शंभू खैरे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विकी जाधव यांना उमेदवारी दिली आहे या निवडणुकीत भाजपचे आमदार राहुल आहेर आणि नुकताच भाजप प्रवेश केलेले शिरीष कोतवाल यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे) 8. सटाणा - एकूण जागा 24+1 1. योगिता सुनिल मोरे, भाजप 2. अर्चना दिनेश सोनवणे, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट 3. हर्षदा राहुल पाटील, शिंदे शिवसेना *(सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे भाजपने विश्वासात न घेता उमेदवार दिल्याचा आरोप करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ घेत या ठिकाणी भाजपाच्या योगिता मोरे यांच्यासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना शिंदे यांच्या रूपाने आव्हान उभे केले आहे त्यामुळे या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे तर याच निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेनेदेखील एकलाचलो चा नारा देत हर्षदा राहुल पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीतही तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे.)* 9. येवला - एकूण जागा 26+1 1. राजेंद्र लोणारी, भाजप आणि अजित पवार गट युती 2. रुपेश दराडे, शिवसेना शिंदे गट आणि शरद पवार गट *(छगन भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवलामध्ये महाविकास आघाडी आणि शिंदे गटाची अनोखी युती.. सुहास कांदेंची छगन भुजबळांविरोधात खेळी)* 10. मनमाड - एकूण जागा 33+1 1. योगेश पाटील, भाजप आणि शिंदे शिवसेना 2. प्रविण नाईक, उबाठा 3. गणेश धात्रक, अपक्ष *(मनमाडमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ वाद बघायला मिळत असतांनाच अजित पवार गटाने उमेदवारच न दिल्याने चर्चेचा विषय. अपक्ष उमेदवार गणेश धात्रक यांना अजित पवार गटाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता)* 11. नांदगाव - एकूण जागा 20+1 1. राजेश कवडे, शिंदे शिवसेना आणि भाजप युती 2. राजेश बनकर, राष्ट्रवादी अजित पवार (भाजप बंडखोर) 3. संतोष गुप्ता, ठाकरे शिवसेना *(नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांडे आमने-सामने आले आहे शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपसोबत युती करत राजेश कवडे यांना उमेदवारी दिली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने म्हणजेच समीर भुजबळांनी भाजपचे बंडखोर राजेश बनकर यांना उमेदवारी देत सुहास कांद्याच्या राजेश कवडे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे त्यात डळमळीत झालेल्या ठाकरेंच्या सेनेने संतोष गुप्ता यांना उमेदवारी देत गड राखण्याचा प्रयत्न केला आहे.)
116
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 17, 2025 14:34:18
Chakan, Maharashtra:पुण्याच्या चाकण नगरपरिषद मध्ये महायुती मध्ये बिघडी झाली असून महायुती मधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपापले वेगवेगळे पॅनल तयार केले आहे... महाविकास आघाडी मधील ठाकरे शिवसेना पक्षाचा आमदार असूनही नगरपरिषदेमध्ये पॅनल करणासाठी उमेदवारच मिळाले नसल्याने मोजक्याच जागांवर महाविकास आघाडीने शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय... चाकण नगरपरिषद नगराध्यक्ष पद हे महिले साठी आरक्षित असल्याने या ठिकाणी महायुती मध्येच मोठी चुरस पाहायला मिळते...
100
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 17, 2025 14:33:28
Chendhare, Alibag, Maharashtra:शिवसेनेच्या आमदारांना सुनील तटकरे यांचा टोला. मी रायगडचा सर्वाधिक काळ पालकमंत्री राहिलो आहे. शेवटच्या श्वासापर्यंत रायगडचा विकास, संस्कृती आणि इतिहास याचाच ध्यास. रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना राष्ट्रवादीत संघर्ष सुरू आहे. सुनील तटकरे यांनी शिंदे सेनेच्या आमदारांना टोला लगावलाय. कोण काय बोलतं आहे यामुळे मला काही फरक पडत नाही. मी प्रदीर्घ काळ पालकमंत्री होतो. रायगड जिल्ह्याचा मी सर्वाधिक काळ पालकमंत्री होतो त्यामुळे कोण मला कुठल्या मुद्द्यावरून बोलतं हा माझ्यासाठी गौण मुद्दा असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना आमदारांकडून तटकरे यांच्यावर वारंवार टीका होत असते त्यावर ते बोलत होते. मी काय काम केलं आहे ते रायगडकरांना माहिती आहे. रायगडचा इतिहास, संस्कृती आणि विकास याच भावनांशी मी आयुष्यभर जोडला गेलो आहे आणि श्वास असेपर्यंत त्याच भावना मनाशी घेऊन आपण काम करणार असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय.
69
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 17, 2025 14:33:01
114
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 17, 2025 13:34:46
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर मंगळवेढा सांगोला करमाळा कुर्डूवाडी अकलूज येथील नगराध्यक्षपद उमेदवारी वर भाजपच्या उमेदवारांचे वर्चस्व, करमाळा कुर्डूवाडी वगळता भाजपने इतर ठिकाणी नगरसेवकांच्या जागा वाटपात मित्र पक्षांना सोडले वाऱ्यावर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत सर्वसाधारण महिला नगरपालिका पद साठी भाजपकडून सौ शामल शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून सौ प्रणिता भालके यांना उमेदवारी मिळाली आहे. मंगळवेढ्यात सर्वसाधारण महिला नगरपालिका पद साठी भाजपा कडून सौ सुप्रिया जगताप यांना उमेदवारी दिली आहे समविचारी आघाडीकडून सौ सुनंदा अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर सौ तेजस्विनी कदम यांनी भाजपत बंडखोरी करत आपला अर्ज भरलेला आहे. सांगोला नगरपालिका मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला नगरपालिका पद साठी भाजपकडून शेकाप राष्ट्रवादी उभाठा या सगळ्याांना एकत्र करून ऐनवेळी शेकापचे उमेदवारी मारुती बनकर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून आनंदा माने यांना उमेदवारी दिली आहे करमाळा सर्वसाधारण महिला नगरपालिका पद साठी नगरपालिका मध्ये भाजपने सुनीता देवी यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेना शिंदे गटाने नंदिनीदेवी जगताप यांना उमेदवारी दिली आहे स्थानिक करमाळा विकास आघाडीकडून मोहिनी सावंत यांना उमेदवारी दिली आहे कुर्डूवाडी मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नगरपालिका पदा साठी उबाठा गटाच्या जयश्री भिसे, भाजपच्या माधवी गोरे आणि शिंदे शिवसेनेच्या समीरुनिसा मुलानी यांनी आव्हान उभे केले आहे. येथे राष्ट्रवादी शरद पवार आणि शिंदे सेना एकत्र आली आहे.
146
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Nov 17, 2025 13:20:35
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकींग.. हरषवर्धन सपकाळ, बाईट्स .. On राज्यात काँग्रेस उमेदवारांना ab फॉर्म नाही, काँग्रेसची स्थिती. राज्यात सगळीकडे ab फॉर्म पोहचले आहे. कुठेही गोंधळ नाही. ज्याठिकाणी एकमतं होऊ शकले नाही द्या 11 वाजेपर्यंत AB फॉर्म वाटप होईल. On उद्धव ठाकरे, त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. प्रत्येक पक्ष हा स्वतंत्र असतो. त्यांना ध्येय धोरणे ठरवण्याची मोकळीक असते. त्यांनी केलेले ते विधान आहे. तरी निवडणुकी नंतर आम्ही एकत्र राहू. 1.2 सेकंद On अजित पवार , 500 कोटी हॉस्पिटल नातेवाइकांना दिले. अनेक स्कँडल महाराष्ट्रात चालले आहे. एकेक कडून पर्दा फास होणार आहे. शासकीय जमिनी व वादग्रस्त जमिनी गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. यात भाजप मोठा चॅम्पियन पक्ष आहे. सरकारने याची श्वेत पत्रिका काढावी. हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात एक दिवस चर्चा करावी अशी आमची मागणी. 59 सेकंद On काँग्रेसची आजची परिस्थिती. स्थानिक पातळीवर आम्ही युती आघाडी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच पातळीवर आमही पुढे जात आहोत. On देवेंद्र फडणवीस, जो जिता वही सिकंदर, काँग्रेसची माती होणार. अहंकार भारतीय संस्कृतीला अशोभनीय आहे. बिहार मतांच्या चोरीतून त्यांना यश मिळाले आहे. महाराष्ट्रात बिहार आणि हरियणा मधे एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून आले, यात काहीतरी गौडबंगाल. नितीश कुमारांचा जनता दल लोहिया यांना संविधानाला गांधीना मानणारा पक्ष आहे. दुसरीकडे rss चा कट्टर विरोधक आहे. ज्यांना rss चे वावडे आहे त्यांनाच सोबत घेऊन निवडणूक लढावी लागली. भाजपच्या विचारांच्या विरोधात निवडून आलेल्यांचे बहुमत आहे. On शताब्दी हॉस्पिटल जमिनी ताब्यात..
159
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 17, 2025 13:20:10
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधात शिवसेना शिंदे गट उभा ठाकला आहे. रीतीने नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात प्रथमच महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. 27 नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या पत्नी ज्योती मत्ते या शिंदे गटाच्या वतीने मैदानात उतरल्या असून त्यांच्या विरोधात भाजपने ज्येष्ठ भाजप नेते रमेश राजूरकर यांच्या पत्नी माया राजूरकर यांना मैदानात उतरविले आहे. दरम्यान भाजप बंडखोर वरघाने यांनीही वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीसाठी मैदानात उडी मारल्याने आता हा संघर्ष त्रिकोणी होण्याची चिन्हे आहेत. हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचा बालेकिल्ला असल्याने आम्हाला भाजपशी युती नको अशी भूमिका शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यानुसार आता महायुतीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात लढणार आहेत.
185
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 17, 2025 13:11:01
131
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 17, 2025 12:37:37
Dharashiv, Maharashtra:अजित पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या 60 आमदारा विरोधात काम केलं. शिवसेना नेते माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा नवा गौप्यस्फोट माझ्याही मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादी मिळून महायुतीत असताना एकत्र लढले त्यामुळे मी टीका केल्यावर त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेवर सावंत ठाम साठ आमदारांनी या गोष्टी वरिष्ठ नेत्याकडे सांगितल्या धाराशिव विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून एकत्र लढत असताना देखील शिवसेनेचा 60 आमदारा विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी व शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी एकत्र येत विरोधात काम केल्या असल्याचा गोफेस्फोट माजी मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे त्यामुळे मी राष्ट्रवादी सत्य शिवाय राहू शकत नाही या केलेल्या टीकेवर आज देखील ठाम असून त्यांनी माझ्या मतदार संघात देखील एकत्रितपणे मला विरोध केला असल्याने मी टीका केल्यानंतर त्यांना उत्तर देण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही सावंत म्हणाले आहेत या घडलेल्या विरोधातील गोष्टी साठ आमदारांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितल्या का माहित नाहीत पण मी माझी तक्रार मात्र माझ्या नेत्याकडे केली असल्याचे देखील सावंत म्हणाले आहेत
107
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 17, 2025 12:36:20
Satara, Maharashtra:सातारा - फलटणच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी अखेर धनुष्यबाणाच्या चिन्हावरून निवडणूक अर्ज दाखल केला आहे. रामराजे राष्ट्रवादीत असताना त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेना (शिंदे गट) कडून मैदानात उतरल्यानं राजकीय वर्तुळात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. याचवेळी भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली असून त्यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे.यामुळे यंदा फलटणमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी थेट आणि रोमहर्षक लढत पाहायला मिळणार आहे. भाजप विरुद्ध शिवसेना अशी सरळ टक्कर रंगणार असून या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
206
comment0
Report
Advertisement
Back to top