Back
शिंदे के नाशिक मेळावे में खड्डे मुद्दे पर सख्त इशारा, निलंबन के संकेत
YKYOGESH KHARE
Oct 06, 2025 04:30:41
Nashik, Maharashtra
अँकर - आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना ऍक्शन मोडवर आली असून रविवारी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मेळावाही पार पडला. दरम्यान या मेळाव्यात नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डयांचा मुद्दाही चांगलाच गाजला. नाशिक शहर तात्काळ खड्डेमुक्त करू असे आश्वासन शिंदेंनी तर दिलेच मात्र महापालिका आयुक्तांशी मी बोलतो आणि खड्डयांना जबाबदार अधिकाऱ्याचे निलंबन करतो असा ईशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे महापालिका या नगरविकास खात्याच्याच अंतर्गत येतात हे देखिल सांगायला शिंदे विसरले नसून एकनाथ शिंदेंनी हा भाजपला खास करून गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या प्रत्येक विषयात लक्ष घालणाऱ्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनाच हा ईशारा दिला आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील खड्डयांची पाहणी करत पाऊस थांबताच खड्डे तात्काळ बुजवले जातील असं स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान नाशिकला पालकमंत्री अद्याप मिळाले नसून त्यावरून महायुतीतील शीतयुद्ध मात्र अजून सुरूच असल्याचं बघायला मिळतंय..
भाषण - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowOct 06, 2025 07:02:010
Report
KPKAILAS PURI
FollowOct 06, 2025 07:01:480
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 06, 2025 06:52:120
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 06, 2025 06:49:514
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 06, 2025 06:47:220
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 06, 2025 06:47:000
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 06, 2025 06:37:042
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 06, 2025 06:19:561
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 06, 2025 06:19:502
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 06, 2025 06:04:554
Report
ABATISH BHOIR
FollowOct 06, 2025 05:56:250
Report
ABATISH BHOIR
FollowOct 06, 2025 05:55:500
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 06, 2025 05:34:000
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 06, 2025 05:15:130
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 06, 2025 05:03:280
Report