Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक SIT प्रमुख तेजस्वी सातपुते की बैठक, क्राइम ब्रांच यूनिट साथ
SGSagar Gaikwad
Mar 20, 2026 06:53:24
Nashik, Maharashtra
नाशिक ब्रेकिंग नाशिक कॅप्टन खरात प्रकरणी SIT प्रमुख तेजस्वि सातपुते यांची नाशिक पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, क्राईम ब्रँच युनिट एक आणि दोन यांच्यासोबत बैठक सुरू. अशोक उर्फ कॅप्टन खरात प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करत इतर संशयितांचा शोध सुरू. बैठकीत च्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 20, 2026 08:16:14
Solapur, Maharashtra:सोलापूरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा द्राक्ष पिकांवर मोठा परिणाम अवकाळी पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी येथील शेतकरी अंकुश सिरसट यांची तब्बल तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. या घटनेत जवळपास 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. यंदा द्राक्षाला चांगला बाजारभाव मिळत असताना शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांची जोपासना केली होती; परंतु सणासुदीच्या दिवशी आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांच्या आशा उद्ध्वस्त झाल्या आहेत. रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळीसह वांगी, रानमसले, कळमण, बीबी दारफळ, वडाळा, बाणेगाव आणि मार्डी परिसरांनाही पाडला आहे. अंकुश सिरसट यांच्या बेदाणा रॅकचेही मोठे नुकसान झाले असून, त्यावर ठेवलेला माल 50 ते 60 लाख रुपयांचा खराब झाला आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 08:15:57
Dhule, Maharashtra:धुळे तालुक्यात आधीच शेतकरी अवकाळी पाऊसाने उध्वस्त होत असतांना आता धुळे तालुक्यातील साजोरी या गावी रात्री हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यामध्ये सात बकऱ्या ठार झाल्या असून, शेतकरी दीड लाख रुपयांचा नुकसान झाले आहे. शेतकरी दीपक मोतीराम ठाकरे यांच्या शेतात गोठ्यामध्ये बांधलेल्या बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात सात बकऱ्या ठार झाल्या असून शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरला आहे. सकाळी शेतात गेल्यानंतर हा प्रकार दीपक ठाकरे यांच्या लक्षात आला. गेल्या काही दिवसापासून सांजोरी गावाकडे बिबट्याच दर्शन गावकऱ्यांना झालं होतं. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात या बकऱ्या ठार झाल्या असून पंचनामा करून आम्हाला मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गावकाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरला आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 20, 2026 08:15:34
Washim, Maharashtra:वाशीम: अंतर्गत धुमका ते बोराळा या वाशीमला जोडणाऱ्या सुमारे सहा ते सात किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताच्या घटना घडत आहेत. या जीवघेण्या खड्यामुळं वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून वाशीमला जाणाऱ्या स्थानिक नागरिक, प्रवासी आणिशाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या पाच वर्षांपासून जड वाहतुकीमुळे रस्त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांकडून तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली जासत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांशी बातचीत केली आमचे वाशिम प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी …
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 08:04:15
Dhule, Maharashtra:धुळे तालुक्यात वादळी वाऱ्याने काढणीला आलेले पीक जमीनदोस्त झाली आहेत. तालुक्यातील जापी, शिरढाने, कुंडाणे शिवारात बहुसंख्य क्षेत्रात मक्याचे पीक भुईसपाट झाले आहे. जिल्ह्यात बहुसंख्य भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात सर्वाधिक नुकसान साक्री तालुक्याचे झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिरावला. साक्री तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट पेरेजपूर, कावठे आणि अष्टानेसह बहुसंख्य क्षेत्रात काढणीला आलेले पीक जमीनदोस्त. तर धुळे तालुक्यात देखील मक्का पिकासह गव्हाचे नुकसान झाले आहे. बहुसंख्य मक्याचे पीक जमीनदोस्त झाले आहे. जापी शिवारात मक्याचे पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
173
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 20, 2026 08:03:57
232
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 20, 2026 08:02:42
247
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 20, 2026 08:02:00
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेवर नामुष्कीची वेळ ओढवली असून पाटबंधारे विभागाने थकीत बिलांमुळे थेट कारवाई करत शहराचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. या कारवाईमुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाने नागदेववाडी, शिंगणापूर, बालिंगा आणि काळम्मावाडी येथील उपसा केंद्रांवर धडक कारवाई करत संबंधित पंपिंग स्टेशन सील केली आहेत. अचानक झाल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाटबंधारे विभागाचे तब्बल 166 कोटी रुपये थकीत असल्याचे उघड झाले आहे. वारंवार सूचना देऊनही थकीत रक्कम न भरल्याने ही कारवाई केल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. थकीत रक्कम भरल्याशिवाय सील हटविण्यात येणार नाही, अशी ठाम भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली असून, या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनावर आता मोठा दबाव निर्माण झाला आहे.
97
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 08:01:46
Dhule, Maharashtra:भीषण आरोग्य सुधाराच्या शक्यतेसाठी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी शनिदेवाच्या चरणी साकडे घातले आहे. नंदुरबार तालुक्यातील शनिमंडळ येथे जाऊन त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करत डॉ. गावित यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी केवळ डॉ. गावित यांच्या प्रकृतीसाठीच नव्हे, तर जिल्ह्यावर आलेली संकटेही लवकर दूर व्हावीत, अशीही शनिदेवाकडे प्रार्थना केली. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, यासाठी हिना गावित यांनी विशेष पूजा केली. शनिमंदिरात पार पडलेल्या या पूजेदरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विजयकुमार गावित यांच्या आरोग्यासाठी जिल्हाभरातून प्रार्थना व्यक्त केली जात असून, त्यांच्या लवकर बरे होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
93
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 07:48:54
864
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 07:48:13
Dhule, Maharashtra:धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाला मातीमोल दर दिले जातं आहेत. गेल्या वर्षी 2700 रुपये प्रति क्विंटल विकला जाणारा गहू आता केवळ 2200 रुपये प्रति क्विंटल विकला जातं आहे. युद्धाचा गहू बाजारावर परिणाम झाला असून, बिस्किट कारखाने गहू खरेदी करत नसल्याने गव्हाचे दर कमी झाल्याचे व्यापारी सांगून न परवडणाऱ्या दरात गहू खरेदी करीत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. रक्ताचे पाणी करून वाढवळेलता पिकाला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सपाडाला आहे. गव्हाची उचल नसल्याने कमी भाव आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे बिस्कीट बनवणाऱ्या कंपन्या गहू खरेदी करत नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात गहू आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या गावाला क्विंटल मागे शंभर ते दीडशे रुपयांचा तोटा सहन करावा लागतो आहे. सध्या गहू 2200 ते 2400 रुपये क्विंटल दर कृषी उत्पन्न बाजार समितीने मिळतो आहे.
908
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 20, 2026 07:40:05
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर काही अधिकारी, कर्मचारी व शिक्षक सेवाविषयक विविध प्रकारचे लाभ घेत आहेत. या प्रकारामुळे खर्‍या दिव्यांग लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अश्या 490 दिव्यांगाची तपासणी आरोग्य विभागाचे उपसंचालक अकोला यांच्याकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिकारी आणि कर्मचारी यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविली अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी झालेल्या कागदपत्रांच्या तपासणीत 21 शिक्षक, कर्मचार्‍यांकडे युडीआयडी कार्ड आढळून आले नाही. अशा कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु इतरही विभागातील लाभ घेणार्‍या शिक्षक, कर्मचार्‍यांची तपासणी करावी, अशी मागणी सुरू होती. त्यामुळे 490 दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची लाक्षणिक तपासणी करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी घेतला आहे.
1039
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 20, 2026 07:39:00
980
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 20, 2026 07:31:17
933
comment0
Report
Advertisement
Back to top