Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपुर में बारहवीं परीक्षा लीक: गणित का पेपर भी फूटा
AKAMAR KANE
Feb 27, 2026 03:47:23
Nagpur, Maharashtra
नागपूर ब्रेकिंग — बारावी पेपरफुटीत नवा धक्कादायक खुलासा, गणिताचा पेपर फुटला होता. अटकेतील आरोपींनी मोबाईल फॉरमॅट केल्यानं तो डेटा रिकव्हर करण्यात येय, यामध्ये आणखीच धक्कादायक बाब समोर आली.. बारावीचे फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन पेपर फोडल्यानंतर आरोपींनी गणिताचाही पेपर फोडला असल्याची माहिती तपासात पुढे येतेय. फिजिक्स आणि केमिस्ट्री चा पेपर फुटल्याच्या प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाला, काही आरोपीनी मोबाईल डेटा फॉरमॅट केला होता, मात्र मोबाईल डेटा रिकवरी करत असताना गणिताचा पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांना मिळाले असल्याची माहिती मिळत आहे. गणिताचा तिसरा पेपर त्यात प्रसारित डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती. सेंट उर्सुला शाळेत मिळालेल्या मोबाईलवरून 16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18 ला भौतिकशास्त्रचा पेपर फुटल्याच समोर आले होते.. या प्रकरणातील पाचवा आरोपी अजून अटक झालेली नाही... त्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर गणिताचा पेपर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फोडल्याचे तपासात पुढे येतेय. पाच सदस्यांचे विशेष तपास पथककडून शोध मोहिम सुरू असून डिलिट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यात येतोय
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Feb 27, 2026 06:17:22
Nanded, Maharashtra:नांदेड शहरात चैन स्नॅचिंगच्या घटनात वाढ होत असून काल गुरुवारी सायंकाळी एका महिलेच्या गळ्यातील चैन ओरबाडून चोरट्यानी दुचाकीवरून पळ काढला. चैन स्नॅचिंगची ही घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुनील नानवटे यांच्या पत्नी आणि मुलगा काल सायंकाळी आपल्या जय भवानी नगर मधील रोडवर सयंकाळी फिरत होते. त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवरून दोन चोरटे आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील चैन ओरबाडली. या महिलेने हिम्मत दाखवत चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण चोरटे दुचाकीवरून पसार झाले. पाच दिवसांपूर्वीच तरोडेकर शाळेसामोरील अत्यंत राहदारीच्या मुख्य रस्त्यावरून अश्याचप्रकारे चैन स्नॅचिंग झाली होती. पुन्हा एकदा भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ही घटना घडल्याने पोलीसांसमोर आव्हाण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 27, 2026 06:05:32
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात 27 व 28 फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन, आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शहरातून निघाली ग्रंथ दिंडी, ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे होत आहे आयोजन अँकर: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय चंद्रपूर व जिल्हा मराठी भाषा समितीद्वारे 27 व 28 फेब्रुवारी रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचलनालय, चंद्रपूर येथे ग्रंथोत्सव तसेच ग्रंथ प्रदर्शन, विक्री व विविध साहित्यीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयापासून जिल्हा ग्रंथालयापर्यंत एका ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. शहरातील ग्रंथप्रेमी वाचक, नागरिक आणि विद्यार्थी यात सहभागी झाले. या निमित्ताने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच्या संधी आणि आव्हाने , वाचन संस्कृतीच्या विकासात सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान या विषयावर परिसंवाद होणार है. याशिवाय ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने कवी संमेलन देखील आयोजित करण्यात आले आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 27, 2026 06:03:44
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे शिक्षकाला बेदम मारहाण; पॉस्को गुन्ह्याच्या आरोपांमुळे गावात तणावपूर्ण शांतता Anchor link-पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात श्री गुरुदेव दत्त विद्यालयातील शिक्षक नितीन चव्हाण यांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे. VO -मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून गावाबाहेर नेण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पुन्हा गावातील चौकात आणून जमावासमोर मारहाण करत धमकी देण्यात आल्याचे समजते. गंभीर मारहाणीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विद्यालयाची सहल महाबळेश्वर येथे गेली होती. त्या सहलीदरम्यान पाचवीतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप नितीन चव्हाण यांच्यावर करत टोळक्याने मारहाण केल्याचा समजते. या प्रकरणी संबंधित मुलीच्या पालकांनी शिरूर पोलीस ठाण्यात पॉस्को (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. Byte: सुलक्षणा दुसाणे (सहकारी शिक्षक) Byte: बी बी दौंडकर (प्राचार्य) VO...दुसरीकडे, मारहाण झाल्याप्रकरणी नितीन चव्हाण यांनी टाकळी हाजी येथे तक्रार दाखल केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल पोलीस सविंदणे गावात चौकशीसाठी आले असता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. “आमच्या शिक्षकांना वाचवा” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला. विद्यालय देखील काही काळ बंद ठेवण्यात आले.गावकरी मात्र शिक्षकांच्या बाजूने उभे असल्याचे चित्र दिसत आहे.एकीकडे शिक्षकाविरोधात पॉस्को अंतर्गत गंभीर आरोप असून दुसरीकडे त्यांच्यावर झालेल्या जमावाकडून मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या दोन्ही घटनांमुळे गावात वातावरण तापले असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. आजही काही पालक व विद्यार्थी शिरूर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.Byte: ग्रामस्थEnd Vo...या संपूर्ण प्रकरणात नेमके सत्य काय, आरोपांमध्ये किती तथ्य आहे, तसेच मारहाणीमागील कारणे काय याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दोन्ही बाजूंकडून दाखल तक्रारींच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.प्रतिनिधी हेमंत चापुडेझी मिडीया शिरूर पुणे...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 27, 2026 06:03:22
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 27, 2026 06:03:02
Nagpur, Maharashtra:नागपूर शिवलिंग पटवे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ नागपूर* 121 है... प्रश्नपत्रिका फुटने, भौतिकशास्त्र अंडरसायनशास्त्र पाठोपाठ गणित पेपर फुटला; बोर्डाच्या सीलबंद लिफाफ्यात बारावीची एक प्रश्नपत्रिका कमी कशी? - गणित पेपर फुटला - पोलिसांच्या तपासात अनेक मोबाईल हस्तगत करण्यात आले होते; त्यांच्या संशोधनानुसार याबाबी आढळून आले आहेत; कारवाई केली जाणार आहे; दोषी ज्या आहे ते पकडले जातील - मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे; तपासात काही बाबी आढळून आल्यात - प्रश्नपत्रिकांचा पूर्ण सीलबंद बंडल असतो; वर्गनिहाय 25-25 चे पॅकेट्स असतात; सील अत्यंत टिकून असते; कोणत्याही अवस्थेत फोडणे शक्य नसते; अकरा वाजता विद्यार्थ्यांच्या समोर स्वाक्षरी घेऊनच ते फोडलं जातं; प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसमोरच मोजल्या जातात; एखाद्या ठिकाणी 25 ऐवजी 24 प्रश्नपत्रिका निघाल्या असल्याची रिपोर्टिंग केली जाते; राज्य मंडळालाही तशी माहिती दिली जाते - हे गोपनीय प्रेसकडून आलेलं मटेरियल असून, पेपर कुठेही जाऊन गेलेला नसतो; पेपर मोजताना चूक होऊ शकते; बाहेर जाणे असंभव आहे - पेपर आपण अकरा वाजता उघडतो; गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने अकराच्या आधी कोणीतरी केला; विद्यार्थ्यांना कोणतेही मटेरियल आलेले नसते; घटना तपासण्यातल्या यंत्रणेने दोषी व्यक्तीला कंठशह ठोकले - प्रकरण तपासून पुढील पावलं उचलण्याची प्रक्रिया सुरू आहे - सेंट उर्सुला केंद्रावरील यंत्रणा आम्ही बदलीलेली आहे; केंद्र संचालक पर्यवेक्षक बदलले गेले आहेत - पोलिसांच्या रिपोर्टिंगनंतर आणखी कठोर पावलं उचलू
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 27, 2026 05:18:45
Bhandara, Maharashtra:एआय सर्चमुळे तरुणावर संशय.....पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप.... भंडाराच्या गोबरवाही परिसरातील घटना.... पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले.... भंडाऱ्याच्या गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत 15 फेब्रुवारी रोजी विजय भोरगडे यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी प्रमोद व कुणाल भोरगडे यांची नावे तक्रारीत नमूद झाली. स्वतःचे नाव संशयित म्हणून आल्यानंतर घाबरलेल्या कुणालने “संशयित आरोपी असल्यास बचाव कसा करावा?” असा प्रश्न गुगलवर शोधला. हा सर्च हिस्टरी पोलिसांच्या हाती लागल्याने संशय अधिकच बळावल्याचा आरोप आहे. चौकशीसाठी ताब्यात घेताना मोबाईल जप्त करण्यात आला. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कुणाल याला ताब्यात घेतले व भंडारा येथे आणून मारहाण केल्याने हात फ्रॅक्चर झाल्याचा दावा कुणालने पत्रकार परिषदेत केला असून, या प्रकरणी न्याय व निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात येत आहे. तर पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले आहे..
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 27, 2026 05:18:24
Ambernath, Maharashtra:बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरलंय. एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेच्या स्कूलबसमध्येच बस चालकानं विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडलीय. महत्वाची बाब म्हणजे या स्कूल बसमध्ये कोणतीही महिला मदतीस नव्हती. बदलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणारी ही स्कूल बस आहे. या विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडताना बस चालकानं बसमध्ये तिचा विनयभंग केला. यानंतर पीडित विद्यार्थिनीनं आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी थेट बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही दिवासांपूर्वी बदलापुरातल्या स्कूल व्हॅनमध्ये असाच प्रकार घडला होता. स्कूल व्हॅन चालकाने चार वर्षांच्या चिमुरडीचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक झाल्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार बदलापुरात घडलाय. महत्वाचं म्हणजे कालच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बदलापूरचा दौरा करत शाळांच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला होता.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 27, 2026 05:04:42
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 27, 2026 04:48:53
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट 20 मार्चची डेडलाईन जाहीर होताच सत्तेच्या समीकरणांना वेग आला आहे..सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी थेट सभेत जाहीर केलं.. “जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असा दावा देखील त्यांनी केला आहे.. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील एकदिलाने सोबत आहेत… त्यामुळे अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार.दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी या आधी भाजपचाच अध्यक्ष होईल असा दावा केला होता. यावर त्यांनी टीका केली आहे. असं कोण पण टीव्ही वर काय पण बोलतात असे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी सूचक विधान केल आहे बाईट: बाळासाहेब सोळसकर (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट)
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 27, 2026 04:45:35
Malegaon, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग बनावट नोटांच्या प्रेसवर मालेगाव पोलिसांचा छापा छत्रपती संभाजीनगर येथे कारवाई; मुख्य सूत्रधार अटकेत ५०० रुपयांच्या २०० बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त मालेगाव छावणी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधील बनावट चलनी नोटांच्या प्रेसवर छापा टाकून संतोष उत्तमराव केळसकर (रा. जय भवानीनगर) याला अटक केली. त्याच्याकडून २०० बनावट ५०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच विनायक ग्राफिक्स या दुकानातून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी सुमारे १.३६ लाखांची साधनसामुग्री जप्त करण्यात आली. बँकेत जमा करताना बनावट नोटा आढळल्यानंतर छावणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 27, 2026 04:45:24
Washim, Maharashtra:मोहरी पिकाच्या वाढीसाठी महाबीजकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे मोहरी पीक प्रात्यक्षिक तथा मोहरी शेतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अखिल भारतीय मोहरी संशोधन प्रकल्प आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. गावातील सलग ५० एकर क्षेत्रावर महाबीजच्या 'टॅम १०८-१' या मोहरी वाणाची पेरणी करण्यात आली असून त्यावर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कार्यक्रमात आयसीएआरचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.ए.के.झा आणि महाबीजचे महाव्यवस्थापक विजय देशमुख यांनी मोहरी लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
0
comment0
Report
Advertisement
Back to top