Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001
पायलटों की कमी से IndiGo की नागपुर उड़ानें रद्द, यात्रियों को भारी परेशानी
AKAMAR KANE
Dec 05, 2025 08:32:54
Nagpur, Maharashtra
इंडिगो विमान कंपनीला पायलटांच्या कमतरतेचा सामना करावा लागत असल्यामुळे, नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या दोन दिवसांत दहा पेक्षाही जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. हज यात्रेससाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मुंबईला पोहोचण्यासाठी उड्डाण उपलब्ध न झाल्याने, त्यांनी खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मुंबई गाठावी लागत आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 05, 2025 09:28:04
Nagpur, Maharashtra:नागपूरातील प्रवाशांना इंडिगो च्या विमानाने पुण्याला जायचे होते.. मात्र इंडिगो ने काल प्रवाशांना मध्यरात्री नागपुरातून घेऊन पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. काल रात्री 11 वाजून 40 मिनिटांना नागपूर - पुणे अशी इंडिगो ची फ्लाईट नियोजित होती.. मात्र ती फ्लाइट एक वाजेपर्यंत नागपुरातून उडालीच नव्हती.. एक वाजता नंतर फ्लाइटने उड्डाण घेतले.. मात्र अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर आपल्या विमानाला पुण्यात लँड होण्याची परवानगी मिळत नाही, त्या ठिकाणी लँड होण्यासाठी जागा नाही, असं कारण सांगून इंडिगो crew आणि व्यवस्थापनाने फ्लाईट पुण्या ऐवजी हैदराबादला लँड करवली... हैदराबादला लँड झाल्यानंतरही प्रवाशांना सुमारे एक तास विमानाच्या बाहेर येऊ दिले नाही.. अखेरीस काही प्रवाशांनी विमानाचे आत गोंधळ घातले, त्यानंतर त्यांनी हैदराबाद टर्मिनल वर बाहेर निघू दिले.. अजूनही नागपूरचे बरेचशे प्रवाशी पुण्याला जाण्यासाठी हैदराबादला अडकून आहेत.. नागपूरातील प्रवाशांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हैदराबाद विमानतळावर सध्या वाराणसी वरून पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या विमानाचे प्रवासीही पुण्याला न पोहोचता हैदराबादला अडकून पडले आहे.. हैदराबाद विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे....
56
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 05, 2025 09:15:42
Virar, Maharashtra:वसई विरार के वादग्रस्त सहाय्यक आयुक्त गील्सन गोन्साल्विस को गिरफ्तार किया गया है। विरार नारिंगी स्थित रमाबाई इमारत दुर्घटना प्रकरण में यह कार्रवाई की गई है। गोन्साल्विस के 31 जनवरी को सेवानिवृत्ति होने से पालिका वर्तुळ में खलबली मच गई है। सरकारी कामकाज में निष्काळजीपन के कारण गिरफ्तारी हुई है। विरार पूर्वी नारंगी विजय नगर स्थित रमाबाई इमारत दुर्घटना प्रकरण में महत्त्वपूर्ण कारवाई हुई। त्रिमाहिने पहले ढह गई इमारत में 17 लोगों की मौत और 9 लोग गम्भीर रूप से घायल हुए थे। इस प्रकरण में मीरा-भाईंदर वसई-विरार पुलिस आयुक्तालय की अपराध शाखा 3 ने गिनती से सात व्यक्तियों को गिरफ्तार किया है।
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 05, 2025 08:30:20
111
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 05, 2025 07:17:43
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग- रवींद्र चव्हाण प्रेस मुद्दे- नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एन डी ए. देशात आहे राज्यात युतीचं सरकार आहे एक विचाराच सरकार असलं कि काय होत ते stateाला माहित आहे महायुतीच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालंय.. महायुतीने या राज्यातील जनतेसाठी काय केल त्यासाठी ही पत्रकार परिषद आहे पावसाने जो कहर केल्या त्यासाठी 32 हजार कोटींच पॅकेज सरकारने जाहीर केल खरडून गेलेल्या जमिनीसाठी_sौर विषयासाठी वेगळ्या पद्धतीने काम केल मासेमारी व्यवसायाला कृषिचा दर्जा देण्यात आलाय शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व बाबी आमच्या सरकारने केल्या.. जलसंवर्धन बाबत सरकारने काम केल अनेक प्रलंबित प्रकल्पना चालणा मिळाली 37 हजार पेक्षा जास्त काम. सरकारने केली.. वाढवण पोर्ट निर्मितीत पालघर जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता येईल सौर ग्राम योजना सुरु झालेली आहे गतिमान महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्राला एक नंबर करण्यासाठी आमचं सरकार काम करतय लाडकी बहीण योजना बंद होईल असं विरोधक सांगत आहेत मात्र जो पर्यंत देवा देवा भाऊ आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही राज्यभरात 45 हजार लोकांची पोलीस भरती झालीय शासकीय भरती सूरु झाल्या दूरदृष्ठी असलेला नेता कसा असतो ते देवेंद्रजिंनी आपल्या कामातून दाखवून दिलंय.. वाढवण पोर्ट निर्मितीत पालघर जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता येईल सौर ग्राम योजना सुरु झालेली आहे गतिमान महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्राला एक नंबर करण्यासाठी आमचं सरकार काम करतय लाडकी बहीण योजना बंद होईल असं विरोधक सांगत आहेत मात्र जो पर्यंत देवा देवा भाऊ आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही राज्यभरात 45 हजार लोकांची पोलीस भरती झालीय शासकीय भरती सूरु झाल्या दूरदृष्ठी असलेला नेता कसा असतो ते देवेंद्रजिंनी आपल्या कामातून दाखवून दिलंय.. नागरिकांचा विकास व्हावा यासाठी सरकार कटीबद्द आहे गतिमान पद्धतीने काम करणाऱ्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय राज्याला एक नंबर करण्यासाठी आमचे नेते राबत आहेत. ऑन निवडणुका --- अतिशय जोमात निवडणुका झाल्या काही तांत्रिक करणामुळे प्रलंबित आहेत आरोप प्रतरोप होणं स्वाभाविक असत आम्ही महायुतीत सत्तेत एकत्र पणे काम केल राज्यातील आणि केंद्रातील सरकार 2029 पर्यंत सुरळीत चालला पाहिजे ही आमची धरणा आहे काही दिवसांपूर्वी जे घडलं एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा झाली त्यावर विषय अधिक वाढवू नये जे घडलय त्यावर पडदा टाकावा कल्याण डोंबिवली मध्ये जे प्रवेश झाले त्यावर आक्षेप घेतले गेले त्याबाबत वरिष्ठ मंडळी एकत्र बसून निर्णय घेतील आणि त्यावर पडदा टाकला जाईल येणाऱ्या काळात राज्याला गतिमान करण्यासाठी आम्ही काम करू केंद्रातलं सरकार राज्य सरकार सोबत आहे त्यामुळे सर्व योजना प्रकल्प सुरु राहतील ऑन सावंतवाडी राडा --- निवडणुका झाल्या कि सर्व विसरले आहेत महाराष्ट्राला शक्तिपीठ किती आवश्यक आहे ते आम्हाला माहित आहे feed live link
161
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 05, 2025 06:18:57
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील 3 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवत महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्ह्यातील एकूण 73,561 महिला मतदारांपैकी 45,996 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे महिला मतदानाचा टक्का 62.52 टक्क्यांवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लाडक्या बहिणींचा’ कौल कोणत्या राजकीय पक्षाच्या किंवा आघाडीच्या बाजूने जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. जिल्ह्यात या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र मैदानात उतरली होती, तर महायुतीचे घटक पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात होते. महिला मतांनी कोणाच्या पारड्यात भर घातली आणि एकूण निकालाची दिशा कोणती ठरणार, हे आता 21 डिसेंबरला निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
176
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 05, 2025 06:02:44
Amravati, Maharashtra:तीन प्रधान सचिवांची समिती आज मेळघाट दौऱ्यावर; वाढत्या बालमृत्यूवर न्यायालयाने कान टोचल्याने प्रधान सचिवांना आली जाग, प्रधान सचिवांच्या स्वागतासाठी मेळघाट होतंय चकाचक तीन प्रधान सचिवांची समिती अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर जाणार आहे. ही समिती मेळघाटची झाडाझडती घेणार असून दौऱ्यावर निघण्याआधी समितीची अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आहे. वाढत्या बालमृत्यूवर न्यायालयाने सरकार आणि प्रशासनाचे कान टोचल्यानंतर पहिल्यांदाच तीन प्रधान सचिवांची समिती मेळघाट दौऱ्यावर जाणार आहे. सचिवांच्या दौऱ्यासाठी मेळघाटातील सहा मार्ग निश्चित करण्यात आले असून त्याआधी प्रधान सचिवांच्या स्वागतासाठी रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रधान सचिवांच्या स्वागतासाठी मेळघाट चकाचक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या समितीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास विभाग या विभागांच्या सचिवांचा दौऱ्यात समावेश आहे. दौऱ्याआधी बैठक स्थानिक अधिकाऱ्यांसोबत प्रधान सचिवांनी बैठक घेतल्याने चर्चांना उधाण आले असून दौऱ्याआधी अधिकाऱ्यांसोबत बैठक का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.
176
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 05, 2025 05:49:30
Khed, Maharashtra:कुलदैवत खंडोबाच्या गडावर चोरी केल्या, रोख रकमेसह ४१ लाखांचा ऐवज लंपास. खेड तालुक्यातील कुलदैवत खरपुडी खंडोबा गडाच्या मंदिरात रात्रीच्या सुमारास मोठी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडालीय. खंडोबा मंदिरातील दोन दरवाजांची लॉक तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करुन खंडोबा देवाच्या अंगावरील २१ किलो चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रोकड असा तब्बल ४१ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे रेकॉर्डिंगवर नसल्यामुळे चोरट्यांचा चेहरा कैद होऊ शकला नाही. स्थानिक भक्त वर्ग आणि ग्रामस्थ या चोरीच्या घटनेमुळे आक्रोशित आणि संतप्त आहेत. राजगुरुनगर पोलिसांकडून तपास सुरु असून चोरट्यांचा शोध सुरु आहे.
101
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 05, 2025 05:48:55
Ratnagiri, Maharashtra:दाभोळखाडीतील प्रदूषणाचा पुन्हा अभ्यास सुरू अभ्यासासाठी केंद्रीय पथक दाखल वाघिवरे ते तुंबाड दरम्यान घेण्यात आले पाण्याचे नमुने सांडपाण्याचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम तपासणार खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील सीईटीपीमधून प्रक्रिया करून खाडीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मासे तसेच इतर सागरी जीवसृष्टीवर नेमका काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी भारत सरकारच्या सेंट्रल इनलॅण्ड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटकडून संशोधन केलं जात आहे. पावसाळ्यानंतर संस्थेच्या पथकाने गेल्या आठवडाभरापासून दाभोळखाडी संघर्ष समितीबरोबर वाघिवरे ते थेट तुंबाडपर्यंतच्या दरम्यान खाडीत ठिकठिकाणी वेगवेगळे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. संस्थेने पावसाळ्यादरम्यान दाभोळ खाडीतील एकूण सहा ठिकाणांवरून पाणी नमुने गोळा करून प्राथमिक तपासणी केली आहे. आता पावसाळ्यानंतर गेल्या आठवडाभरात खाडीतील वाघिवरे, कारूळ, धोपावेनंतर करंबवणे येथील दिवा बेट ते तुंबाडपर्यंत मृत मासे, पाणी, चिखलाचे नमुने घेतले. या नमुन्यांतून तुलनात्मक विश्लेषण केलं जाणार असून या अभ्यासातून पाण्यातील रासायनिक घटक, विरघळलेल्या ऑक्सिजनची मात्रा, जड धातूंची उपस्थिती तसेच त्याचा माशांच्या आरोग्यावर होणारा प्रभाव तपासण्यात येणार आहे. चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली अशा चार तालुक्यांत सामावलेल्या या दाभोळखाडीवर नदीकाठच्या मच्छीमारांचा उदरनिर्वाह अनेक वर्षापासून चालत आला आहे. मात्र लोटे औद्योगिक वसाहतीतून होणाऱ्या रासायनिक प्रदूषणामुळे भोई समाजाने निकराचा लढा देऊनही आजतागायत प्रदूषणाचा प्रश्न पूर्णपणे निकालात निघालेला नाही. खाडीत अधूनमधून मासे मरतुक ही होतच असते. त्यामुळे या खाडीचा शास्त्रोक्त सर्व्हे करण्याचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सरकारच्या भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत असलेली सेंट्रल इनलॅण्ड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटवर ही जबाबदारी सोपवली. ही एक प्रमुख मासेमारी संशोधन संस्था असून ती देशातील अंतर्गत मासेमारीच्या विविध पैलूंवर संशोधन करत असल्याने या खाडीच्या अभ्यासाची जबाबदारी सोपवली आहे.
107
comment0
Report
Advertisement
Back to top