Back
दाभोळखाडी प्रदूषण पर अध्ययन शुरू, केंद्रीय दल नमूने लेकर प्रभाव जांच रहा
PPPRANAV POLEKAR
Dec 05, 2025 05:48:55
Ratnagiri, Maharashtra
दाभोळखाडीतील प्रदूषणाचा पुन्हा अभ्यास सुरू
अभ्यासासाठी केंद्रीय पथक दाखल
वाघिवरे ते तुंबाड दरम्यान घेण्यात आले पाण्याचे नमुने
सांडपाण्याचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम तपासणार
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील सीईटीपीमधून प्रक्रिया करून खाडीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मासे तसेच इतर सागरी जीवसृष्टीवर नेमका काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी भारत सरकारच्या सेंट्रल इनलॅण्ड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटकडून संशोधन केलं जात आहे. पावसाळ्यानंतर संस्थेच्या पथकाने गेल्या आठवडाभरापासून दाभोळखाडी संघर्ष समितीबरोबर वाघिवरे ते थेट तुंबाडपर्यंतच्या दरम्यान खाडीत ठिकठिकाणी वेगवेगळे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे.
संस्थेने पावसाळ्यादरम्यान दाभोळ खाडीतील एकूण सहा ठिकाणांवरून पाणी नमुने गोळा करून प्राथमिक तपासणी केली आहे. आता पावसाळ्यानंतर गेल्या आठवडाभरात खाडीतील वाघिवरे, कारूळ, धोपावेनंतर करंबवणे येथील दिवा बेट ते तुंबाडपर्यंत मृत मासे, पाणी, चिखलाचे नमुने घेतले. या नमुन्यांतून तुलनात्मक विश्लेषण केलं जाणार असून या अभ्यासातून पाण्यातील रासायनिक घटक, विरघळलेल्या ऑक्सिजनची मात्रा, जड धातूंची उपस्थिती तसेच त्याचा माशांच्या आरोग्यावर होणारा प्रभाव तपासण्यात येणार आहे.
चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली अशा चार तालुक्यांत सामावलेल्या या दाभोळखाडीवर नदीकाठच्या मच्छीमारांचा उदरनिर्वाह अनेक वर्षापासून चालत आला आहे. मात्र लोटे औद्योगिक वसाहतीतून होणाऱ्या रासायनिक प्रदूषणामुळे भोई समाजाने निकराचा लढा देऊनही आजतागायत प्रदूषणाचा प्रश्न पूर्णपणे निकालात निघालेला नाही. खाडीत अधूनमधून मासे मरतुक ही होतच असते. त्यामुळे या खाडीचा शास्त्रोक्त सर्व्हे करण्याचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सरकारच्या भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत असलेली सेंट्रल इनलॅण्ड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटवर ही जबाबदारी सोपवली. ही एक प्रमुख मासेमारी संशोधन संस्था असून ती देशातील अंतर्गत मासेमारीच्या विविध पैलूंवर संशोधन करत असल्याने या खाडीच्या अभ्यासाची जबाबदारी सोपवली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowDec 05, 2025 06:18:5722
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 05, 2025 06:02:4431
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 05:49:30101
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 05, 2025 05:35:1373
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 05:33:4957
Report
MAMILIND ANDE
FollowDec 05, 2025 05:21:49149
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 05, 2025 05:21:01135
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 05, 2025 05:17:23104
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 05:05:42137
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 05:05:08137
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 05, 2025 04:48:38172
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 05, 2025 04:39:52110
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 05, 2025 04:39:21108
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 05, 2025 04:34:3388
Report