Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001
हाईकोर्ट की फटकार: नागपुर के किसान आंदोलन पर सख्त रुख
AKAMAR KANE
Nov 07, 2025 03:20:15
Nagpur, Maharashtra
नागपुरातील बच्चू कडू यांच्या आंदोलनाचे व्हिडिओ वापरावे नागपूर - बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर उच्च न्यायालयाने केली नाराजी व्यक्त - प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर भूमिका घेतली होती. - महामार्ग अडवल्याबद्दल तात्काळ मोकळा करण्याचे आदेश दिले...त्यानंतर न्यायालयावर बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेची दखल घेतली. - यावर “शेतकऱ्यांसाठी तुम्ही किती याचिका दाखल केल्या?” असा मौखिक प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. - शेतकऱ्यांच्या मुद्यांवर न्यायालयाने अनेक सकारात्मक आदेश दिले आहेत, त्यांचा अभ्यास करा आणि मग विधान करा असेही न्यायालयाने म्हटले. - शासनाच्या कारवाईवरही नाराजी व्यक्त करत प्रशासन आंदोलन हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याच न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. - अखेर आंदोलन थांबल्याने याचिका निकाली काढण्यात आली.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Nov 07, 2025 05:50:29
Chandrapur, Maharashtra:वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त चंद्रपूरात सामूहिक गायनाच्या आयोजनाची माहिती दिली गेली. चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलात आज वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त ‘सार्ध शताब्दी महोत्सवाची’ भव्य सुरुवात झाली. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी देशभक्तीच्या भावनेने ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन केले. या निमित्ताने कौशल्य विकास विभागाच्या वतीने राज्यभर विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशप्रेम जागवणारा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा हा महोत्सव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. राष्ट्रगीताच्या स्वरांनी आणि देशभक्तीच्या घोषांनी जिल्हा क्रीडा संकुल दुमदुमून गेले
2
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 07, 2025 05:50:00
Beed, Maharashtra:बीड: जे सरकारला जमले नाही ते झी 24 तास ने करून दाखवले....ऑल इंडिया पॅंथर सेना अध्यक्ष दीपक केदार यांनी मांडले zee 24 तास चे आभार • महार वतनाची चाळीस एकर जमीन लुटणे हा प्रकार धक्कादायक आहे. • राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा पोरगा जर महार वतनाच्या जमिनी लुटून त्यावर कंपन्या उभा करत असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. • आता महसूल मंत्री कारवाई करायचं सोडून माझ्याकडे तक्रार आल्यास मी कारवाईकरण असं म्हणतात. • काय ती महार वतनांची जमीन आहे दलितांची जमीन आहे म्हणून न्याय द्यायचा नाही का •अंजली दमानिया आम्हाला फाईल देतील आणि त्यानंतर आम्ही कारवाई करू असं बावनकुळे म्हणत असतील माझा त्यांना सल्ला आहे अंजली दमान यांना महसूल मंत्री करा. •तुम्हाला पार्थ पवारांवर कारवाई करायची नाही.गटबंधन मध्ये तुम्ही सोबत आहात म्हणून कारवाई करायची नाही हे जाहीर करा. *•पार्थ पवारांनीच नाही तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या पोरांनी महार वतनाच्या जमिनी लुटल्यात.* •महार वतनाच्या जमिनी लुटण हा गुन्हा आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करा. • सरकारने शेद पत्रिका जाहीर करावी. महार वतनाच्या जमिनीवर कुणाचे ताबे आहेत. •राज्यातील सर्व कलेक्टरांना या प्रकरणात सह आरोपी करावं. •सरकारच्या नाकाखाली महार वतण्याची पुण्यामध्ये जमीन लुटली जात होती काय करत होतं सरकार मी आभार मानतो झी 24 तास चे महार वतनाच्या जमिनीचा भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला. zee 24 तासच्या बातमीनंतर सरकारला जाग आली. जे सरकारला जमले नाही ते zee 24 तास ने करून दाखवले
4
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 07, 2025 05:48:19
Nagpur, Maharashtra:पुणे जमीन प्रकरण (हिंदी) नार्को टेस्टे सबकी होनी चाहिये.. सब रजिस्टर का भी होनी चाहिये ऐसे शेकडो प्रकरणे सरकारी और प्रायव्हेट जमीन धमकाके बिल्डरने खरेदी की है.... ये मामला निकल जायेगा तो ये एक लाख करोड के उपर का मामला हो जायेगा कुछ लोगो के उपर एफआयआर दाखिल किया गया है कुछ लोगो को छोड दिया गया है... 2008 मे पावर ऑफ अटरनी दिया गया था वो न्यूज पेपर मे छपावर cancel की गयी... ईडी सीबियाने इस प्रकरण की जाच करनी चाहिए... जो दोषी है उसके उपर कारवाई होनी चाहिये अजित पवार.. राजीनामा स्वाभाविक है जिसके घर मे ये घोटाला होगा ये तो मांग होगी.... छोटी छोटे कारण ओके वजह से इसके भी इसके पहिले लोगो ने राजीनामा दिया है... आदर्श मे अशोक चव्हाण राजिनामा दिया है.... विलासरावने घोटाला ना विलासरावने घोटाला नही की था तोभी राजीनामा दिया था.... जनता की भावना को देखकर राजीनामा दिया था.. कदर होगी तो देंगे नही होगी तो नही देंगे उनके घर मे घोटाला हुआ है उनके बचा पार्टनर हे इसीलिए जनता की मांग है उनका राजीनामा होना चाहिये
5
comment0
Report
SKShubham Koli
Nov 07, 2025 05:20:29
Thane, Maharashtra:मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; परिसरात संताप... संजय नगर, मुंब्रा परिसरात एका 19 वर्षीय तरुणीने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीचा वडील महिंद्रा पांडे हे ऑटो रिक्षा चालक असून परिसरातील काही युवकांकडून छेडछाड व मानसिक त्रास दिला जात असल्याचे परिवाराने सांगितले. या त्रासाला कंटाळून तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये काही व्यक्तींची-nावे नमूद असून पोलिस तपास सुरू आहे. तसेच सदर परिसरात रात्री युवकांची मोठी गर्दी जमते, असा स्थानिकांचा आरोप असून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तरुणीच्या अंत्यसंस्कारावेळी स्थानिक नागरिक, मित्रपरिवार आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन व रिक्षा युनियनकडून निवेदन देण्यात येणार आहे.
11
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 07, 2025 05:16:47
Beed, Maharashtra:बीड ब्रेक: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी शितल महेश दाभाडे यांच्या नावावर शिक्कामूर्त अधिकृत उमेदवारीची घोषणा. बातमी गेवराईच्या नगरपरिषद निवडणुकी संदर्भात आहे.. होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिलाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे.. बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदेमध्ये निवडणूक होत आहेत. त्यापैकी गेवराई नगर परिषदेमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्या गटाकडून माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्या पत्नी शितल महेश दाभाडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. काल कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्याकडून या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
11
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 07, 2025 05:00:14
Chendhare, Alibag, Maharashtra:म्हसळ्यातल्या ठाकरोली गावाबाहेर लक्ष्यवेधी पाट्या जमिन बचाव, गाव बचाव ग्रामस्थांचं अनोख अभियान जमिनी न विकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय जमिनी वाचवा, गाव वाचवा हे अभियान त्यांनी हाती घेतलं आहे. ठाकरोली ग्रामस्थानी आपल्या जमिनी न विकण्याचा निर्णय घेतला असून तसे फलक गावाच्या मुख्य रस्त्यावर लावले आहेत. महत्वाचं म्हणजे गावातील तरुणाईने यात पुढाकार घेतलाय. मागील काही वर्षांपासून मुंबई पुण्यातील व्यावसायिक, गुंतवणूकदार यांचं लक्ष रायगड जिल्ह्यातील जमिनींवर गेलं आहे. त्यांनी इथल्या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावलाय. अशावेळी ठाकरोली ग्रामस्थानी घेतलेला निर्णय लक्ष्यवेधी ठरतो आहे. गावाबाहेरील फलकांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
14
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 07, 2025 04:16:32
Kolhapur, Maharashtra:Kop Gurhal Feed:- 2C Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडा गावांमधील अनेक गुर्हाळ मालक गुऱ्हाळाला जळण म्हणून टायर, प्लास्टिक चपला, कुशनचा वापर करत आहेत, त्यामुळे या परिसरात मोठ्याप्रमाणात विषारी वायू पसरत आहे. गावातील ग्रामस्थांनी या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करून देखील हा प्रकार थांबलेला नाही, त्यामुळे प्रशासनाने तातडीने या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी गावातील ग्रामस्थ करत आहेत. ज्या ज्या वेळेला गुऱ्हाळ सुरू होतात त्यावेळेला आकाशात काळेकुट्ठ धुरांचे लोट आकाशात पाहायला मिळतात. इतकच नव्हे तर या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण झाले आहे. राधानगरी तालुक्यातील बहुसंख्य गुर्हाळ मालक जळण म्हणून अशा प्रकारे प्लास्टिकचे घटक वापरत आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानी तातडीने यामधे हस्तक्षेप करून संबधित यंत्रणेला कारवाईसाठी सूचना द्यावेत अशीही मागणी होत है.
13
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 07, 2025 03:47:30
14
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 07, 2025 03:45:50
14
comment0
Report
Advertisement
Back to top