Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

हळदी के दाम वाशिम में बढ़े, प्रतिक्विंटल 14,200 रुपये

GMGANESH MOHALE
Nov 07, 2025 05:01:27
Washim, Maharashtra
वाशिम: वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला प्रतिक्विंटल १३,४०० रुपयांचा दर मिळाला होता. तर काल रिसोड बाजार समितीत हा दर वाढून तब्बल १४,२०० रुपये प्रतिक्विंटल झाला. केवळ पाच दिवसांत हळदीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKShubham Koli
Nov 07, 2025 07:23:45
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 07, 2025 07:22:42
Thane, Maharashtra:ठाण्यातील विकासकामांच्या निधीवर प्रश्नचिन्ह? भाजप नगरसेवक नारायण पवार यांची फडणवीस यांना चौकशीची मागणी ठाणे महानगरपालिकेतील विकासकामांकरिता 2022 नंतर तब्बल 3900 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असूनही नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने ठाण्यातील भाजप नगरसेवक नारायण शंकर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, केंद्र व राज्य सरकारकडून ठाणे महानगरपालिकेला मिळालेल्या निधीतून रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सेवांचा दर्जा अजूनही समाधानकारक नाही. नागरिकांना अनेक ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागत असून, मोठा निधी खर्च झाल्याचे सांगितले जात असले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळत नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. नगरसेवक पवार यांनी पुढे स्पष्ट केले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत 2022 पासून ठाणे महानगरपालिकेला एकूण 3900 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, या निधीचा वापर पारदर्शकतेने झाला आहे काय, याबाबत शंका निर्माण झाली असून, त्यावर सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सत्तेत जरी महायुती असली तरी ठाणे महानगरपालिकेत मात्र फक्त शिवसेनेच्या नगरसेवकांनाच निधी दिला जातो, तर भाजपच्या नगरसेवकांना निधी मिळत नाही, अशी चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी कंटाळूनच हे पत्र लिहिलं की काय, असा सवालही स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे. भाजपच्या नगरसेवकाकडून आलेल्या या पत्रामुळे ठाणे महापालिकेतील निधीवाटप आणि विकासकामांच्या पारदर्शकतेबाबत नव्याने चर्चेला उधाण आले आहे..
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 07, 2025 07:21:33
Thane, Maharashtra:ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या अनधिकृत इमारतींवर गेल्या आणि दिवसांपासून न्यायालयांच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जेसीबीच्या साह्याने कारवाई करण्यात येत आहे.. या कारवाईला रहिवाशांनी कडाडून विरोध दर्शवला होता मात्र सलग तीन ते चार दिवस ही धडक कारवाई सुरू होती.. या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी आता ठाणे महानगरपालिके बाहेर एक मोर्चा काढला आहे घरांच्या बदल्यात घरे द्या अशी मागणी हे रहिवासी करत आहेत मोठा पोलिसांचा फौज फाटा सध्या ठाणे महानगरपालिके बाहेर पोलिसांचा तैनात करण्यात आला आहे त्यामुळे आता महापालिका या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा प्रश्न कशाप्रकारे मार्गी लागेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल..
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 07, 2025 07:02:39
Nagpur, Maharashtra:आणि Ngp Pwd byte या स्लगने पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा बाईट पाठवला आहे — नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर कमीत कमी खर्च करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना - मुख्यमंत्री काल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली - रवि भवन परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यावर अतिरिक्त खर्च होणार नाही - सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांची माहिती - काही बंगल्यांचं स्ट्रक्चरल ॲाडीट नंतर सुचविलेल्या दुरुस्त्यानुसार बंगल्यांची कामं सुरु सुरु - देवगिरी बंगला दोन माळ्यांचा आहे, तिथे लिफ्ट लागणार - हिवाळी अधिवेशनापर्यंत बंगले सज्ज केले जाणार
4
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 07, 2025 07:00:56
1
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 07, 2025 06:32:58
7
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 07, 2025 06:19:36
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर मध्ये मराठा समाजाचे पदाधिकारी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके समोरासमोर आल्यानंतर मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या यानंतर हाके यांनी पोलीस प्रोटेक्शन मागवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांची लक्ष्मण हाके यांना एलर्जी आहे का असावा मराठा पदाधिकारी उपस्थित केला यानंतर लक्ष्मण हाके आणि मराठा पदाधिकारी एकमेकांना जोरदार भिडले यावेळी दोघांनीही एकमेकांची लाज काढत एकमेकांचा बाप सुद्धा काढला सार्वजनिक जागेमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊ शकत नाही का असा प्रश्न मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसां समोर उपस्थित केला यावेळी काही वेळ लक्ष्मण हाके यांची बोलती बंद झाली होती
10
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 07, 2025 06:19:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष कुंदन लाटे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री, म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजून ४३ मिनिटांनी घडली. कुंदन लाटे हे जालना येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीहून परतत असताना, सिडको परिसरातील साउथ सिटी महानगर क्रमांक २च्या गेटवर त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असा आरोप करण्यात आला आहे. हल्ल्याच्या वेळी गाडीत जिल्हाध्यक्ष बालकृष्ण इंगळे हे देखील उपस्थित होते. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघांचा जीव थोडक्यात बचावला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, हल्लेखोरांविरोधात तपास सुरू आहे.
8
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 07, 2025 06:18:01
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामात यंदा पहिल्यांदाच दोन लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी; पाणी प्रकल्पात मुबलक पाणी साठा असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय यावर्षी जमीनीत पुरेशी आद्रता व पाणी प्रकल्पात मुबलक पाणी असल्याने रब्बी हंगामाच्या पथ्यावर पडला आहे. अमरावती जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात दोन लाख हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी 1.60 लाख हेक्टरवर रब्बीचा हंगाम आटोपला होता. मात्र त्या तुलनेत यावर्षी रब्बी हंगामात जिरायती हरभऱ्याची उच्चांक क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात पावसाची रिप रिप सुरूच आहे. त्यामुळे जमिनीचे पुनर्भरण झाले असून जिल्ह्यातील पाणी प्रकल्पामध्ये सुद्धा पाण्याचे मोठ्या प्रमाणात संचयन झाले आहे. त्यामुळे जमिनीत आधीच आद्रता व पिकांना देण्यासाठी मुबलक पाणी असल्याने यावर्षी शेतकरी रब्बी हंगामाकडे वळताना दिसून येत आहे.
13
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 07, 2025 06:15:45
Pandharpur, Maharashtra:Anchor - ज्या पद्धतीने एकनाथ खडसे, अशोक चव्हाण, महादेव शिवणकर, धनंजय मुंडे यांना नियम लावला तोच न्याय अजित पवारांना लावावा, अजित पवार यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून हा जमीन घोटाळा पार्थ पवार यांनी केल्याचा आरोप प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे त्यामुळे अजित पवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये घेतला पाहिजे त्याशिवाय या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी होणार नाही अशी मागणी ही हाके यांनी केली आहे. रोहित पवार यांचा सुद्धा एक घोटाळा लवकरच आम्ही समोर आणणार आहोत याबाबतची कागदपत्र आमच्याकडे आलेल्या बारामती त्यांनी केलेला घोटाळा लवकरच समोर येईल असा गौप्यस्फोट सुद्धा हाके यांनी केला आहे
8
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 07, 2025 05:50:29
Chandrapur, Maharashtra:वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त चंद्रपूरात सामूहिक गायनाच्या आयोजनाची माहिती दिली गेली. चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलात आज वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त ‘सार्ध शताब्दी महोत्सवाची’ भव्य सुरुवात झाली. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी देशभक्तीच्या भावनेने ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन केले. या निमित्ताने कौशल्य विकास विभागाच्या वतीने राज्यभर विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशप्रेम जागवणारा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा हा महोत्सव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. राष्ट्रगीताच्या स्वरांनी आणि देशभक्तीच्या घोषांनी जिल्हा क्रीडा संकुल दुमदुमून गेले
14
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 07, 2025 05:50:00
Beed, Maharashtra:बीड: जे सरकारला जमले नाही ते झी 24 तास ने करून दाखवले....ऑल इंडिया पॅंथर सेना अध्यक्ष दीपक केदार यांनी मांडले zee 24 तास चे आभार • महार वतनाची चाळीस एकर जमीन लुटणे हा प्रकार धक्कादायक आहे. • राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा पोरगा जर महार वतनाच्या जमिनी लुटून त्यावर कंपन्या उभा करत असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. • आता महसूल मंत्री कारवाई करायचं सोडून माझ्याकडे तक्रार आल्यास मी कारवाईकरण असं म्हणतात. • काय ती महार वतनांची जमीन आहे दलितांची जमीन आहे म्हणून न्याय द्यायचा नाही का •अंजली दमानिया आम्हाला फाईल देतील आणि त्यानंतर आम्ही कारवाई करू असं बावनकुळे म्हणत असतील माझा त्यांना सल्ला आहे अंजली दमान यांना महसूल मंत्री करा. •तुम्हाला पार्थ पवारांवर कारवाई करायची नाही.गटबंधन मध्ये तुम्ही सोबत आहात म्हणून कारवाई करायची नाही हे जाहीर करा. *•पार्थ पवारांनीच नाही तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या पोरांनी महार वतनाच्या जमिनी लुटल्यात.* •महार वतनाच्या जमिनी लुटण हा गुन्हा आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करा. • सरकारने शेद पत्रिका जाहीर करावी. महार वतनाच्या जमिनीवर कुणाचे ताबे आहेत. •राज्यातील सर्व कलेक्टरांना या प्रकरणात सह आरोपी करावं. •सरकारच्या नाकाखाली महार वतण्याची पुण्यामध्ये जमीन लुटली जात होती काय करत होतं सरकार मी आभार मानतो झी 24 तास चे महार वतनाच्या जमिनीचा भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला. zee 24 तासच्या बातमीनंतर सरकारला जाग आली. जे सरकारला जमले नाही ते zee 24 तास ने करून दाखवले
14
comment0
Report
Advertisement
Back to top