Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
दिल्ली की बैठक के बाद चंद्रपुर कांग्रेस वडेट्टीवार गुट के नगरसेवक नागपुर पहुंचे
AKAMAR KANE
Feb 04, 2026 03:03:32
Nagpur, Maharashtra
नागपूर दिल्लीत बैठकीनंतर चंद्रपूरमधील काँग्रेस वडेट्टीवार गटाचे नगरसेवक नागपुरात दाखल, अज्ञात स्थळी रवाना. काल संध्याकाळी दिल्लीत काँग्रेसने नेते केसी वेणू गोपालराव यांच्यासोबत चंद्रपूर काँग्रेस मधील वादावरून वडेटीवार गट आणि धानोरकर गट यांची बैठक झाली होती
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Feb 07, 2026 12:07:26
Malegaon, Maharashtra:मालेगाव महापालिका में महापौर पद के चुनाव में इस्लाम पार्टी के नसरीन बानो शेख खालिद ने जीत हासिल की। उपमहापौर पद पर शान ए हिंद निहाल अहमद की नियुक्ति हुई। भाजपा व एमआयएम के नगरसेवक तटस्थ रहे। महापौर नसरीन शेख ने लता घोडके (शिवसेना) को 25 मतों से हराया, उनके पक्ष में इस्लाम पार्टी के 35 मत, समाजवादी पार्टी के 5 व कांग्रेस के 3 कुल 43 नगरसेवकों ने मतदान किया। उपमहापौर चुनाव में शान ए हिंद निहाल अहमद ने शिवसेना के निलेश काकडे को हराया। महापौर व उपमहापौर चुनाव के दो दिन पहले एमआईएम के मौलाना मुफ्ती इस्माईल ने शिवसेना के मंत्री दादा भुसे से मुलाकात की चर्चा बनी थी। भक्तिपरक उत्साह में समर्थकों ने आतिशबतियां फूटीं और इस्लाम व समाजवादी पार्टी के ध्वज लहराकर जश्न मनाया। उद्घाटन के बाद नवनिर्वाचित महापौर नसरीन बानो ने भावुक होकर अपने ससुर, पूर्व विधायक व पूर्व महापौर रशीद शेख की यादें साझा कीं और सेक्युलर फ्रंट समेत सभी दलों के प्रति आभार व्यक्त किया। लिफ्ट दुर्घटना में इस्लाम पार्टी के नेता आज़िफ शेख समेत कुछ नगरसेवक और अधिकारी बाल-बाल बचे। पूरे राज्य में इस्लाम पार्टी का विस्तार व प्रदर्शन चर्चा का विषय बना रहा।
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 07, 2026 11:36:33
Nashik, Maharashtra:कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक विमानतळाचा विस्तार केला जात असून या संदर्भातील सामंजस्य करारावर उद्या रविवारी विमानतळावरच स्वाक्षरी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य सरकार आणि एचएएल प्रशासनामध्ये हा करार होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत एचएएलला कराराचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. नव्याने उभारण्यात येणारी नवी टर्मिनस इमारत व सुविधा एचएएलकडे हस्तांतरित करण्याची तरतूद यात असणार आहे ओझर विमान तळाच्या विस्तारीकरणासाठी ५५६ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला कुंभमेळा विकास प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.....
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 07, 2026 11:17:28
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खेळ आणि व्यायामाचे धडे दिले.. महापूर आला तर मी स्वतः उडी मारतो, बिबट्या आला तर मी जाळी घेऊन उभा राहतो.. नियमित व्यायामामुळे माझ्या मनगटात जोर आहे, त्यामुळे मला संकटमोचक म्हणतात असं वक्तव्य महाजन यांनी केलंय.. जलसंपदा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खेळ आणि व्यायामाचे महत्व सांगताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, प्रत्येकाने दररोज व्यायाम केला पाहिजे..शरीरयष्टी चांगली ठेवली पाहिजे.. मी सुरुवातीपासून खेळाडू असून आजही एक तास व्यायाम करूनच कार्यक्रमाला उपस्थित झालोय.. व्यायाम करा, आवडेल तो खेळ खेळा.. व्यायामासोबत व्यसनमुक्त रहा.. मी लहानपणापासून कुस्तीसह विविध खेळ खेळायचो.. तेंव्हापासून मला दूध प्यायची सवय आहे.. मला आयुष्यात अजूनही चहा, कॉफीची चव माहित नाही.. दारूला तर मी कधी शिवलोही नाही.. तंबाखू, पान, बिडी, सिगारेट, काहीच व्यसन नाही.. टेन्शन कमी करण्यासाठी कुठलेही व्यसन करण्याची गरज नसते.. मनगटामध्ये जोर असला पाहिजे.. मला संकटमोचन म्हणतात, कुठेही काही झालं की चाललो.. कुठे महापूर आला की मी उड्या मारतो.. नाशिकला बिबट्या निघाला, मी जाळी घेऊन त्याच्या समोर उभा राहिलो.. पोलिसवाले परेशान झाले, पण मी घाबरतच नाही.. खोपोलीला दरड कोसळली होती, तेंव्हा रात्री 2 वाजता भर पावसात एकटा आठ किलोमीटर वर चढून गेलो.. हजारोंचा मोर्चा असूद्या, नाहीत लाखोंचा, मी सामोरे जातो.. हे कशामुळे होतं?.. तर व्यायामामुळे.. खेळ तुम्हाला पराभव पचवायला शिकवतो.. विजय तुमच्या अंगी नम्रता आणतो.. संघभावना स्वतःचा अहंकार बाजूला ठेवते.. खेळ शेवटपर्यंत झुंज देण्याची मानसिकता तयार करतो.. अशा स्पर्धांमधून आपल्याला प्रेरणा मिळणार आहे.. खेळ आणि व्यायामातून आपल्याला चांगले प्रशासन मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 07, 2026 11:16:44
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीचा खात्मा होण्याच्या दृष्टीने मोठी घडामोड, जिल्ह्यात आजवर झालेल्या चकमकीत सर्वात दीर्घकाळ चालणारी चकमक ठरली नारायणपूरची चकमक, तब्बल तीन दिवस चाललेल्या नारायणपूर चकमकीत आतापर्यंत सात नक्षलवाद्यांचा झालाय मृत्यू, नव्यानेच छत्तीसगड सीमेवर उघडण्यात आलेल्या बिनागुंडा पोलीस मदत केंद्राचा अभियानात झाला मोठा फायदा अंतर्गत माहिती: गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीचा खात्मा होण्याच्या दृष्टीने मोठी घडामोड पुढे आली आहे. भामरागड तालुक्यातील छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूरशी जुळलेल्या जंगलात झालेली चकमक जिल्ह्यात आजवर झालेल्या चकमकीत सर्वात दीर्घकाळ चालणारी चकमक ठरली. तब्बल तीन दिवस चाललेल्या नारायणपूर चकमकीत आतापर्यंत सात नक्षलवाद्यांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या चकमकीत गडचिरोली नक्षल विभागाचा प्रभारी प्रभाकर याच्यासह सात सदस्यांना टिपले. या सर्वांवर होते एकूण 71 लाखांचे बक्षीस होते. या चकमकीत एक पोलीस जवान शहीद झालाय तर अन्य एक जवान जखमी आहे. नव्यानेच छत्तीसगड सीमेवर उघडण्यात आलेल्या बिनागुंडा पोलीस मदत केंद्राचा अभियानात मोठा फायदा झाला. तीन दिवस – तीन रात्र चाललेल्या अभियानादरम्यान घटनास्थळावरुन 03 एके-47 रायफल, 01 एसएलआर व 01 .303 रायफल अशा 05 अग्निशस्त्रांसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा व नक्षल साहित्य जप्त झाले आहे. बाईट १) निलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 07, 2026 10:49:12
Beed, Maharashtra:बीड : आनंदावर शोकाची छाया; अजित पवारांना अभिवादन करत माजलगावात पार पडला अनोखा विवाह सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात असताना, माजलगावमध्ये पार पडलेल्या एका विवाह सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लखन थावरे यांच्या विवाहात वधू-वरांनी मंगलाष्टका सुरू होण्यापूर्वी दिवंगत अजित पवारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. आनंदाच्या क्षणीही आपले नेते विसरले नाहीत, अशा शब्दांत उपस्थितांनी भावना व्यक्त केल्या. शोक आणि संस्कार यांची सांगड घालणारा हा विवाह सोहळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 07, 2026 09:31:46
Nanded, Maharashtra:परभणीमें कांग्रेस और शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या राड्यात एकजण जखमी झाला असून चाकू मारल्याचा आरोप आहे. पाथरी तालुक्यातील देवनांद्रा जिल्हा परिषद गटातील गुलशन नगर मतदान केंद्रावर काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पाथरी नगरपालिकेचे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष आसिफ खान आणि त्यांच्या कार्यकर्ते बूथ वरील परिस्थिती पाहण्यासाठी गुलशननगर येथील बुथवर गेले होते. शिवसेनेचे कार्यकर्ते अन्वर अली आणि काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते गुलाब पठाण यांच्यात मतदान केंद्रा बाहेर कुठल्या तरी कारणाने बाचाबाची झाली. त्याचे परिवर्तन हाणामारीत झाले. काँग्रेसचे गुलाब पठाण आणि शिवसेनेचे अन्वर अली यांच्यात झटापट सुरू असताना वाहन चालक वशिम शेख मध्ये पडल्याने त्यांना चाकू लागल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटा कडून केला जातोय. यामध्ये वशिम शेख जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यामुळे काही वेळ मतदान केंद्रवार तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणात सध्या कुठलाही गुन्हा दाखल झाला नाहीये.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 07, 2026 09:18:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आज मतदानावेळी घडलेल्या घटनेने चर्चना उधाण आलाय, शिवसेनेचे आमदार विलास भुमरे हे पाचोड मध्ये मतदानाला गेले असताना त्यांचं लहान मुलगा सोबत होता आमदाराला मतदानानंतर शाई लावताना मजा म्हणून त्यांच्या मुलालाही मतदान अधिकाऱ्याने शाई लावली यामुळं मतदान म्हणजे पोरखेळ आहे का अशा चर्चा सुरू झाल्यात, मतदानाची शाई 8 वर्षाच्या मुलाच्या हाताला मजा म्हणून आमदार पुत्राचा बाळ हट्ट पूर्ण, आमदारकडून मात्र कृत्याचे समर्थन. मतदान म्हणजे पोरखेळ नाही आणि बाळ हट्ट पूर्ण करण्याचा खेळ ही नाही मात्र संभाजी नगरात पाचोड मध्ये असे काहीसे चित्र दिसले, शिवसेनेचे आमदार विलास भुमरे हे आपल्या कुटुंबासह मतदानाला गेले, सोबत त्यांची लहान मूल ही सोबत होते मतदान वेळी आमदार विलास भुमरे यांना मतदान अधिकाऱ्याने शाई लावली, त्यामुळं भुमरेच्या मुलानेही शाई लावण्याचा हट्ट धरला, आता आमदारांचा मुलगा म्हणून मतदान अधिकारीने ही बाळ हट्ट पूर्ण करत मुलाला शाई लावली, मग काय याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच चर्चा सुरू झाली, मतदान हा पोरखेळ आहे का अशा टीका सुरू झाल्या यावर विलास भूमरे यांच्या वडील खासदार संदीपण भुमरे यांनी कानावर हात ठेवत मला काही माहिती नाही अशी भूमिका घेतली, संदीपान भुमरे, खासदार. आमदार विलास भुमरे यांनी मात्र या प्रकाराची पाठराखण केली, माझा छोटा मुलगा माझ्या सोबत आला मुलाने हट्ट केला म्हणून अधिकाऱ्याने शाई लावली, मुलगा येणे गैर नाही, मुलाचा हट्ट मी पूर्ण केला तिथं नियमांची पायमल्ली झाली नाही असे स्पष्टीकरण विलास भूमरे यांनी दिलाय, विलास भुमरे, आमदार शिवसेना. यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मात्र टीका केलीय, आणि कारवाईची मागणी केलीय. याबाबत आता कारवाई होईल मात्र ती फक्त मतदान अधिकाऱ्यांवर होईल असे चित्र दिसतंय, मात्र नियम मोडून मुलाला नेणाऱ्या आमदारांचे काय असा प्रश्न आहे, निवडणूक ही पोरखेळ नाही हे आमदारांनी समजून घेणे गरजेचे आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 07, 2026 09:05:36
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बजावला मतदानाचा अधिकार अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बजावला मतदानाचा अधिकार पत्नी शांभवी आणि भाऊ सागर कल्याणशेट्टी यांच्यासह सचिन कल्याणशेट्टी यांनी केलं मतदान अक्कलकोट तालुक्यात आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी या चपळगाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार आहेत तर सागर कल्याणशेट्टी हे चपळगाव पंचायत समिती गणातून भाजपचे उमेदवार आहेत तर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा मुलगा शिवराज म्हेत्रे हा सलगर जिल्हा परिषद गट तर मुलगी शीतल म्हेत्रे ही तोळनूर पंचायत गणातून रिंगणात आहेत त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि शिवसेना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे
0
comment0
Report
Advertisement
Back to top