Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

ओवरलोड डंपर की चपेट में बाइक सवार 25 वर्षीय युवक की मौत, कल्याण–मुरबाड में भीषण हादसा

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 24, 2026 09:21:44
Ambernath, Maharashtra
कल्याण–मुरबाड रोडवर भीषण अपघात ओव्हरलोड डंपरखाली दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू कल्याण-मुरबाड रोडवरील म्हारळ पाडा येथे डंपर आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक होऊन २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वैभव साहेबराव भामरे असे मृत तरुणाचे नाव असून तो मालेगावहून आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी वरप गावी आला होता. अपघातावेळी दुचाकी ओव्हरलोड डंपर खाली आल्याने हा दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या महामार्गावर अनधिकृत आणि ओव्हरलोड डंपर दिवसभर धावत असल्याने वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. संबंधित डंपर चालकांवर आणि मालकांवर कडक कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Feb 24, 2026 10:24:35
Akola, Maharashtra:भारताचे कृषी भविष्य, लवचिकता, शाश्वतता आणि सर्वसमावेशक विकासाचे मार्ग या महत्त्वपूर्ण विषयावर अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सोसायटी ऑफ एग्रीकल्चर इकॉनॉमिक्स आणि कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.कृषीप्रधान असलेल्या भारतातील मोठ्या लोकसंख्येचा उदरनिर्वाह शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. मात्र हवामान बदल, तंत्रज्ञानातील वेगवान प्रगती, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा आणि सामाजिक बदल यांच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रासमोर नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्र अधिक सक्षम, टिकाऊ आणि लवचिक कसे बनविता येईल, यावर या परिसंवादात सखोल चर्चा करण्यात येत आहे.राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील तज्ञ, देशातील नामवंत कृषी अर्थतज्ञ तसेच महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोग चे अध्यक्ष पाशा पटेल हे या परिषदेत प्रमुख उपस्थित होते.दोन दिवसीय या चर्चासत्रातून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध शिफारशी तयार करून त्या राज्य व केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 24, 2026 10:19:52
Bhandara, Maharashtra:भंडाराच्या साकोली मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस...तब्बल चौदा जणांचा घेतला चावा ...नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.. भंडारा जिल्ह्यातील साकोली व जांभळी येथे सकाळी भटक्या कुत्र्यांनी चक्क 14 जणांवर जीव घेणा हल्ला करत जखमी केले आहे. या हल्ल्यामध्ये वयोवृद्ध नागरिक व तरुणांचाही समावेश आहे. आज सकाळी भटक्या कुत्र्यांच्या चाव्याने जखमी झालेल्या नागरिकांना उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण साकोली परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत नागरिकांमध्ये निर्माण झाली असून नागरिक घराबाहेर निघायला घाबरत आहेत सकाळी घडलेल्या घटनेमुळे शाळेकरी विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिक यांना जास्त धोका निर्माण झालेला असून. नगरपरिषद साकोली प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांडून होत आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 24, 2026 10:03:29
Chendhare, Maharashtra:स्‍लग – रायगड जिल्‍हा परीषदेतील सत्‍तेसाठी हालचाली शिवसेनेला डावलून भाजप – राष्‍ट्रवादीची सत्‍ता अॅड. आस्वाद पाटील यांचे स्‍पष्‍ट संकेत वरिष्‍ठांचा आदेश आल्‍यास शिवसेनेचाही सहभाग अँकर – रायगड जिल्‍हा परीषदेतील सत्‍तेत सहभागी होण्याची शिवसेनेची स्‍वप्न हवेत विरण्‍याची शक्‍यता आहे. भाजप आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येवून सत्‍ता स्‍थापन करतील त्‍याचवेळी शिवसेना शिंदे गटाला सहभागी करून घेतले जाणार नसल्‍याचे संकेत भाजप नेते अॅड. आस्‍वाद पाटील यांनी दिले आहेत. अलिबाग येथे भाजप पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसची निवडणूक पूर्व युती होती. आणि आम्‍ही बहुमताचा आकडा गाठला असल्‍याने आम्‍ही सत्‍तेत बसू अशी सध्‍या तरी परीस्थिती आहे. मात्र वरिष्‍ठांकडून आदेश आल्‍यास शिवसेनेलाही सत्‍तेत सहभागी करून घेतले जाईल, असं आस्‍वाद पाटील यांनी स्‍पष्‍ट केलं.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 24, 2026 10:01:04
Nala Sopara, Maharashtra:वसई-विरार शहरात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपारा पूर्व येथील टाकीपाडा परिसरातील सर्वोदय वसाहतीत मंगळवारी पहाटे मनोरुग्ण भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली. आई आजारी असताना मुलगी बघायला येत नसल्याचा राग तसेच कौटुंबिक वादातून भावाने ही हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.. सुप्रिया कानडे (३५) हिचा भाऊ अजित मालुष्टे (४०) याच्याशी भांडण झाले असता त्याने तिच्या मानेवर व छातीवर वार केले. भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या आईवरही हल्ला करण्यात आला. भावाने केलेला हा हल्ला इतका भयानक होता की त्याने तिचे मुंडकेच धडापासून वेगळे केले आहे.. सुप्रियाचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी आईवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसई-विरार शहरातील एका आठवड्यातील ही चौथी हत्या आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 24, 2026 09:52:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor गोदावरी नदी काठी वसलेल्या पैठण शहरालगतच्या दशक्रिया घाट परिसरात सध्या गोरगरीब नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. भाविकांनी गोदामाईला अर्पण केलेले सोन्याचांदीचे दागिने आणि नाणी शोधण्यासाठी शेकडो महिला-पुरुष तळपत्या उन्हात नदीपात्रात उतरलेले दिसत आहेत. सोन चांदीच्या शोधत ही मंडळी पूर्ण दिवस नदीपात्रात घालवत आहेत पाहुयात काय आहे प्रकार... सोन चांदी शोधण्यासाठी अनेकांच्या नदीत उड्या! पूर्ण दिवस नदी पात्रात चालते शोध मोहीम.. दिवसाला 700 ते 800 रुपयासाठी जीव धोक्यात... धार्मिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण ला ‘दक्षिण काशी’ असेही म्हटले जाते. इथेच गोदावरीच्या पात्रात सध्या अशी झुंबड उडालेली आहे, नाथ षष्ठी निमित्त पात्रात पाणी कमी करण्यात आले आहे, त्यामुळं पाणी कमी झाले आणि त्यातील मौल्यवान वस्तू शोधण्यासाठी ही चढाओढ सुरू आहे... येथे मृत व्यक्तीच्या अस्थी गोदावरी नदी पात्रात विसर्जित केल्यास मोक्षप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे दशक्रिया घाटावर दररोज शंभराहून अधिक विधी पार पडतात. राख विसर्जन करताना राखे सोबत मृतांच्या अंगावरील सोने चांदी ही विसर्जित होते तर विधीनंतर मोक्ष प्राप्ती साठी नातेवाईकही पवित्र नदीत सोन्या-चांदीचे दागिने व नाणी अर्पण करतात. आणि ते शोधण्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे.. अनेक कुटुंबांचा उपजीविकेचा हे साधन बनले आहे. एरव्ही वर्षभर सुमारे पाच पन्नास जण ही शोधमोहीम राबवतात. मात्र दरवर्षी मार्च महिन्यात भरत असलेल्या नाथषष्ठी यात्रा निमित्ताने नदीतील पाणी कमी केले जाते. यावेळी उघड्या पडलेल्या नदीपात्रातील वाळूत दडलेले दागिने आणि नाणी शोधण्यासाठी मोठी गर्दी होते, लोखंडी चाळणीच्या साहाय्याने पाण्यात डुबक्या मारून शोध घेतला जातो. काहींच्या हाती दान लागते, तर काहीजण रिकाम्या हाताने परततात. या माध्यमातून मिळालेले दागिने शहरातील केवळ दोन सोनार दुकानदार खरेदी करतात. मिळालेल्या पैशावर शहरातील शंभर ते दोनशेहून अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू असल्याचे स्थानिक सांगतात. शोधमोहीम करणारे तळपत्या उन्हात हा प्रकार सध्या सुरू आहे, यातून एकाला दिवसातून हजारावर रुपये मिळतात, मात्र त्यासाठी जीव धोक्यात घालून नदीच्या पात्रात दिवस घालवावा लागतो, आता यात कुणाला भरपूर सापडले तर नाथ पावतो तर इतर जण किमान उद्या नाथ आपल्याला पावेल या आशेने पुन्हा दुसऱ्या दिवशी ही शोध मोहीम सुरू करतात...
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 24, 2026 09:36:08
0
comment0
Report
Advertisement
Back to top