Back
वन विभाग ने मोगरकसा-लेंडेजरी बछड़ा मृत्यु मामले में 6 सदस्यीय चौकशी समिति गठित
PTPRAVIN TANDEKAR
Jan 03, 2026 02:17:53
Bhandara, Maharashtra
मोगरकसा वाघ बछडा मृत्यु प्रकरणात अद्याप अटक नाही. मुख्य वनसंरक्षकांकडून ६ सदस्यीय चौकशी समिती गठीत. नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा संवर्धन राखीव क्षेत्र आणि भंडारा जिल्ह्यातील लेंडेझरी संवर्धन क्षेत्रात वाघिणीचा बछडा मृत अवस्थेत आढळून आल्याच्या घटनेने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पहिल्या दिवशी एका पर्यटकाला बछड्याचा मृतदेह आढळला, तर दुसऱ्या दिवशी त्याचा केवळ एक पाय सापडल्याने हे प्रकरण अधिकच संशयास्पद बनले आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षकांनी नागपूर मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेतीनच्या सुमारास प्रतिबंधित पर्यटन क्षेत्र असलेल्या लेंडेझरीच्या कक्ष क्रमांक ३६ मध्ये पर्यटक हार्दिक राठोड यांना वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. काही दिवसांपूर्वी या अल्पवयीन बछड्याचा त्याच्या आईसोबतचा व्हिडीओ व फोटो व्हायरल झाला होता. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी मृतदेह सापडला ते क्षेत्र पर्यटनासाठी पूर्णतः प्रतिबंधित आहे. अशा परिस्थितीत पर्यटक हार्दिक राठोड तेथे कसे पोहोचले, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हार्दिक राठोडांनी जिप्सी चालक व गाईड यांना या प्रकरणाची कोणतीही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊ नये, अशी ताकीद दिल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी स्थानिक टूर ऑपरेटर ऋतुराज जयस्वाल यांनी मृत बछड्याचे छायाचित्र मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवले. त्यानंतर वनविभाग हालचालीत आला, मात्र अद्यापही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणारे पर्यटक हार्दिक राठोड आणि ऋतुराज जयस्वाल यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच वाघ मृत्यूची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणालाही उशिरा देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वनविभाग कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे काय, अशी शंका व्यक्त होत आहे. वेळेत निष्पक्ष चौकशी न झाल्यास हे प्रकरण थंड्या बस्त्यात जाण्याची भीती व्यक्त केली जाते. आता चौकशी समिती सत्य बाहेर काढते की प्रकरण हातातून निसटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणातील दिरंगाईमुळे वनविभागाच्या भूमिकेवर बोट ठेवले जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJan 03, 2026 04:16:120
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 04:16:000
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 04:07:300
Report
AKAMAR KANE
FollowJan 03, 2026 04:03:250
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 04:01:500
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 03, 2026 02:51:510
Report
YKYOGESH KHARE
FollowJan 03, 2026 02:51:360
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 03, 2026 02:31:340
Report
AKAMAR KANE
FollowJan 02, 2026 12:05:120
Report
MKManoj Kulkarni
FollowJan 02, 2026 09:15:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 02, 2026 09:08:400
Report
SNSWATI NAIK
FollowJan 02, 2026 08:30:280
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 02, 2026 06:33:270
Report
AKAMAR KANE
FollowJan 02, 2026 05:51:300
Report