Back
पनवेल नगर पालिका: बीजेपी ने चुनाव से पहले तीन नगरसेवक बिनविरोध जीते
SNSWATI NAIK
Jan 02, 2026 08:30:28
Navi Mumbai, Maharashtra
anchor - पनवेल निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले असून, प्रभाग क्रमांक १८ नंतर आता प्रभाग क्रमांक १९ आणि २० मधूनही भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान होण्याआधीच पनवेल महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांची संख्या तीनवर पोहोचली आहे. या घडामोडीमुळे शेतकरी कामगार पक्षाच्या रणनीतीला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक १९ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी भाजपच्या स्टँडिंग नगरसेविका दर्शना भगवान भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाकडून तक्का येथील रहिवासी दिव्या चांगदेव बहिरा यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र गुरुवारी दिव्या बहिरा यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दर्शना भोईर यांचा मार्ग मोकळा झाला आणि त्या बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्याचप्रमाणे तसेच प्रभाग क्रमांक १९ मधून उबाटा अर्चना कुलकर्णी यांनी माघार घेतली यामुळे भाजप रुचिता लोंढे यांचा बिनवीरोध विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक २० अ नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी भाजपकडून अजय बहिरा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात शेकापचे चागंदेव चंदर बहिरा यांनी अर्ज भरला होता. याच प्रभागासाठी दिव्या चांगदेव बहिरा यांचाही अर्ज दाखल झाला होता. मात्र गुरुवारी वडील-लेकीने दोन्ही ठिकाणांहून आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजय बहिरा हे देखील बिनविरोध नगरसेवक झाले. दिव्या बहिरा यांनी प्रभाग १९ अ आणि प्रभाग २0 अ येथून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर त्यांच्या वडील चांगदेव बहिरा यांनीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. या अचानक माघारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. विशेषतः शेतकरी कामगार पक्षाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पक्षाची लढत देण्याची तयारी आणि अंतर्गत समन्वय यावर टीका होत आहे. प्रभाग क्रमांक १८ मध्ये रोहन गावंड यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आता १९ आणि २० या प्रभागांमध्येही शेकापकडून उमेदवार माघारी गेल्याने पक्षाला सलग धक्के बसले आहेत. यामुळे शेकापची निवडणूकपूर्व रणनीती कोलमडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात ठोस लढत उभी करण्यात अपयश आल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये सुरू आहे. निवडणूक होण्याआधीच चार नगरसेवक बिनविरोध मिळाल्याने भाजपला मानसिक आणि राजकीय आघाडी मिळाली आहे. प्रचार, संसाधने आणि संघटनात्मक ताकद यावर सकारात्मक परिणाम होणार असून, उर्वरित प्रभागांमध्येही भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे. एकूणच पनवेल महानगरपालिका निवडणूक लढतीच्या आधीच भाजपची बाजू भक्कम होत असून, विरोधी पक्षांसमोर आव्हाने वाढताना दिसत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowJan 02, 2026 09:15:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 02, 2026 09:08:400
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 02, 2026 06:33:270
Report
AKAMAR KANE
FollowJan 02, 2026 05:51:300
Report
KPKAILAS PURI
FollowJan 02, 2026 04:48:020
Report
KPKAILAS PURI
FollowJan 02, 2026 03:47:240
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJan 02, 2026 03:04:100
Report
PNPratap Naik1
FollowJan 02, 2026 02:01:270
Report
SNSWATI NAIK
FollowJan 02, 2026 01:46:390
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 01, 2026 14:06:020
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 01, 2026 10:45:140
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJan 01, 2026 08:39:210
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJan 01, 2026 08:31:340
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 01, 2026 06:00:170
Report