Back
फडणवीस का दावा: प्रचार की अहमियत; चुनावी जंग में मेहनत से ही जीत संभव
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 06:19:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया
ऑन प्रचार सभा
निवडणुकीमध्ये प्रत्येकाचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायला पाहिजे तसा माझा प्रयत्न आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणुक आहे... आपल्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते मेहनत करतात, धावपळ करतात त्यांची अपेक्षा असते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यामुळे मी प्रयत्न करतो आहे.
ऑन महायुती सभा टीका
मी मित्रांवर टीका केलेली नाही आमच्यात एकमेकांमध्ये टीका नाही.... मित्र पक्षांवर तर सोडा मी विरोधकांवर देखील टीका केली नाही. एकही माझं वाक्य सांगा की मी एखाद्या नेत्याच्या आणि पक्षाचे विरोधात बोललो... सकारात्मक मत मी माझे मांडत आलो आहे त्यामुळे कुणावर टीका करत नाही. मी कुणावर बोलत नाही बोलण्याचे कारण नाही.
ऑन निवडणूक आयोग रेड
मला निवडणूक आयोगाच्या छाप्या बद्दल माहिती नाही पण कुणी सत्तेत आहे कुणी सत्तेत नाही यावरून रेड ठरत नसते, आमच्याही कार्यकर्त्यांच्या बाबतीत तक्रार आली तर चौकशी होते, अनेक वेळा माझी ही गाडी तपासण्यात आली. सत्ता विरोधक अशा कुठल्या गोष्टी चौकशीसाठी नसतात.
ऑन शिंदे भेट
आम्ही दोघे भेटले नाही हे दिवसभरासाठी तुम्हाला खाद्य भेटले आहे. मी रात्री उशिरा आलो आणि त्यांच्यापेक्षा लवकर निघालो आहे त्यांची सभा माझ्या एक तास नंतर आहे त्यामुळे भेट झाली नाही आम्ही उद्या भेटू.... दोघेही प्रचारात मग्न आहोत फोनवर आमचे दररोज बोलणे होते. मी लवकर जात असल्यामुळे भेट झाली नाही एवढेच.
ऑन निवडणük रद्द
माझ्या मते निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा वेळी कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल असे आजपर्यंत कधीच झाले नाही. निवडणूक आयोग कोणता कायदा काढत आहे कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. जेवढा मी कायदा बघितला माझा अभ्यास आहे वकिलांसोबत बोललो त्या सगळ्यांच्या मतानुसार असे कुणीही न्यायालयात गेले तर निवडणुका रद्द होत नाही. निलंग्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, आणि ज्याचे नामनिर्देशन रद्द झाले होते तो न्यायालयात गेला, त्याचे नामनिर्देशन रद्द झाले, मग अशावेळी ज्यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले त्यांना प्रचाराचा वेळ मिळाला, अर्ज परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, कुणीतरी पार्टी केली म्हणून निवडणूक पुढे ढकलणे हे अत्यंत चुकीचे आहे. निवडणूक आयोग स्वायुक्त आहे त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. कायदेशीर रित्या या निवडणुका पुढे ढकलले आहेत त्या पूर्णपणे चुकीचे आहे. त्या उमेदवारांवर मोठा अन्याय आहे ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी निवडणुकीसाठी केल्या. त्यांची मेहनत त्यांनी घेतलेले कष्ट निवडणुकीच्या एक दिवस अगोदर वाया गेले पुन्हा पंधरा दिवस त्यांनी त्या सगळ्या गोष्टी करायच्या हे अतिशय चुकीचे आहे. या निवडणुकीनंतर आम्ही निवडणूक आयोगाला एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला देऊ. अशा पद्धतीने निवडणुका पुढे ढकलने चुकीचे आहे. जिल्लााऱ्यांनी देखील निवडणूक आयोगाला आपले मत कळवले मात्र त्यांनी त्यांचा निर्णय घेतला ते स्वायुक्त आहे त्यामुळे तो निर्णय मान्य करावा लागेल.
ऑन भाजपा सर्वे
असा कुठला सर्वे मला माहित नाही. पण नंबर एकचा पक्ष भाजप राहील आणि दोन्ही मित्र पक्ष त्याच्या खालोखाल राहील. या निवडणुकीत महायुतीचे तीनही पक्ष मिळून 70 ते 75 टक्के जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील हा माझा विश्वास आहे.
ऑन संजय राऊत
संजय राऊत बरे झाले ही आनंदाची गोष्ट आहे. ते त्यांचे काम करतात आम्ही आमचे काम करतो, पण कुणीही आमचा शत्रू नाही ते राजकीय विरोधक आहे. कुठलाही राजकीय विरोधक आजारी पडला तर तो लवकर बरा झाला पाहिजे ही आमची अशी आहे. ते रोज काही काही बोलतात त्यावर मी उत्तर देत नाही त्यांच्या आरोप उत्तर देण्याच्या लायकीचे मी समजत नाही.
ऑन राणे बंधू भांडण
मी सगळ्यांच्या पाठीशी आहे जो चांगला वगैरे त्याच्या पाठीशी मी आहे. कोणी चुकला तर त्याला मी सांगेल मग तो माझा पक्षातला असला तरी त्याला मी सांगेल, खरंतर दोन्ही बंधूंमधील ती परिस्थिती चांगली नाही राणे विरुद्ध राणे हे चांगले नाही या निवडणुकीनंतर आम्ही सर्वांनी आत्मचिंतन करायला पाहिजे.
ऑन विरोधक प्रचार
ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जे कार्यकर्ते आपल्यासाठी राबराब राबतात हाडाचे पाणी करतात त्यांच्या निवडणुकीत आपण फिरायचे नाही त्यांना मदत करायचे नाही ही गोष्ट योग्य नाही. पण याचे मुख्य कारण अशी आहे की, ते या निवडणुकीत हारणार आहे विरोधकांचा पराभव होणार आहे. त्यामुळे पराभवाचा शिक्का माथी लावून घ्यायचा नाही. कारण उद्या माध्यमे दाखवतील की पवार ठाकरे फिरले तरी हरले हा शिक्का त्यांच्या माथी लावून घ्यायचा नाही....... आपण कधी जिंकतो कधी हारतो त्यामुळे निवडणुकीच्या मैदानातून निघून जायचे, निवडणुकीतून माघार घ्यायची, प्रचाराला पाठ दाखवायची हे योग्य नाही. कार्यकर्ते शेवटी लक्षात ठेवतात जेव्हा आमची वेळ होती तेव्हा आमच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 07:00:500
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 01, 2025 06:47:4341
Report
MAMILIND ANDE
FollowDec 01, 2025 06:47:2228
Report
SNSWATI NAIK
FollowDec 01, 2025 06:46:5833
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 06:46:4057
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 06:46:28101
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 06:20:16160
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 06:19:34148
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 01, 2025 05:48:10167
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 05:47:09138
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 05:46:47163
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 01, 2025 05:32:32149
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 01, 2025 05:30:22167
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 01, 2025 05:16:58155
Report