Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
पैठण में एकनाथ शिंदे की सभा: शिवसेना का गढ़ बनाकर विकास योजनाओं का वादा
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 09:37:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ पैठणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सभा झाली, यावेळी पैठण हा शिवसेनेचा गड असल्याचा सांगत ही नगरपरिषद शिवसेना जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विरोधकांचा इथं डिपॉझिट जप्त होईल असं म्हणत भाजपाला टोला लगावला... एकनाथ शिंदे यांचे पैठण येथील सभेतील भाषण... ही विधानसभेची निवडणुकीआ आहे की नगरपरिसदेचे (गर्दी पाहून विधान) एव्हढे लोक रस्त्यावर उतरले तर पुढच्याच डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलो, वारकरी ज्या ओढीने पंढरपूरला जातो तसं मी पैठणला आलो एकीकडे एकनाथ सागर, दुसरीकडे नाथसागर, आणि समोर बसलेला जणसागर आहे. इथे सगळे माणसं, प्रेमामुळे आहे आहे, भाड्याने आणलेली माणसं नाही, दहशٽيमुळे आलेली माणसं नाही, ताई आज तुमचा विजय झालेला आहे आपल्याला धनुष्याबानासमोरील बटण दाबायचा आहे, मराठवाडा शिवसेना बालेकिल्ला आहे आणि पैठण तर आपला गड आहे त्यामुळे नगराध्यक्ष जर आपला झाला तर ट्रिपल इंजिन होईल उद्याच मतदान म्हणजे पैठणचा विकास घडवायचं मतदान आहे, इथे विरोधकांची शिजणार नाही डाळ...शिवसेना राष्ट्रावादी फोडणार विजयाची ढाल मला अनुभव आहे,ज्याच्यामागे महिला तो उमेदवार पहीला लाडक्या बहिणी उपस्थित आहे, मुख्यमंत्री असताना पायाला भिंगरी लावून फिरलो, अनेक योजना आणल्या माझी सगळ्यात आवडती योजना म्हणजे लडकी बहीण योजना कोणीही मयिका लाल आलं तर लडकी बहीण योजना बंद होणार नाही. तुम्ही विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवला. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी काय करता येईल तर लडकी बहीण योजना आणली लाडक्या बहिणींन या योजनापुरते मर्यादित ठरवणार नाही लखपती कराचा आहे मी शब्द दिला तर मागेच ठेवत नाही, मैने एकबार कमिटमेन्ट की तो मै खुदकी भी नही सुनता एकदा धनुष्यातून बाण गेला तर वापस येतं नाही, एका मुलीने पैसे नसल्याने आत्महत्या केली त्यावेळी माझ्या मनाला वेदना झाल्या त्यामुळे मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर सत्तेचा् काही उपयोग नाही त्यामुळे त्यांच्यासाठी योजना आणली किती पैसा कमावला हे नाहीतर किती माणसं कामावली हे माझ्यासाठी महत्वाचा आहे ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून दिला त्यांना निवडून आणण्यासाठी आज महाराष्ट्रात मी फिरत आहे काही लोक बोलत असतात त्यांच्याकडे बघू नका इलाखा किसीका भी होगा धमाका तो इनका होंगा इथे भुमरे मामाशिवाय काहीच चालत नाही, कोणीही टिव टिव करून फायदा नाही पैठण ने कधीही शिवसेनाची साथ सोडली नाहीय याचा अनुभव आणि अभिमान आहे.. लडकी बहीण यावेळी धनुष्यबाना च्या पाठीमागे उभं राहणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही ओळख माझ्यासाठी मोठी नाही मला सगल्यात मोठी ओळख कोणती असेल तर ती म्हणजे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ मी तुम्हाला पाणी पुरवठा्यातून पाणी देणार, तुम्ही विरोधकांना पाणी पाजणार का? मुख्यमंत्री असताना किती लोक माझ्याकडे आले मी किती सह्या केल्या आस्तिल हे सुद्धा मला माहित नाही, आतापर्यंत सगळ्या मुख्यमंत्र्याचं रेकॉर्ड मोडलं असेल 3 डिसेंबर ला एकच आवाज घुमला पाहिजे तो म्हणजे भूम.... भूम.... भुमरे आम्ही उठाव केला तेव्हा तेव्हा सिरसाठ आणि भुमरे मामा माझ्यासोबत होते भुमरे मामानी जनतेचं प्रेम कामावला त्यामुळे हे लोक इथे आले आहे. भुमरे मामा भोळा माणूस आहे, मी त्यांना कधी कधी रागावतो मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि पुढेही करणार आहे... सगळ्यांनी उद्या धनुष्य बाण चिन्ह समोरील बटण दाबा
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Dec 01, 2025 10:05:14
Akola, Maharashtra:अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंजिरे वाजवत अनोखे आंदोलन उभारले. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पारंपरिक ग्रामीण पद्धतीने मंजिरे वाजवत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी परिसरात घोषणांचा आवाज घुमत होता. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांना सर्वसमावेशक कर्जमाफी द्यावी, तसेच यंदाच्या हंगामातील प्रमुख पिकांना योग्य व हमीभाव द्यावा. सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 रुपये तर कापसाला 10,000 रुपये भाव देण्याची मागणी आंदोलकांनी जोरदारपणे केली. सध्याच्या बाजारभावातील घसरण, नैसर्गिक आपत्तींचे सततचे संकट आणि वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर या मागण्या अधिक तीव्र झाल्या असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या आंदोलनात विविध शेतकरी कार्यकर्ते, तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारींचे फलक हातात धरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. योग्य दर न मिळाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारादेखील शेतकरी संघटनांनी दिला आहे.
119
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 01, 2025 09:49:40
36
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 01, 2025 09:48:58
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तवाढ़ मध्ये मगरीच्या हल्ल्यात लक्ष्मण कलगी यांचा मृत्यू झालाय. लक्ष्मण कलंगी हे गेल्या पंचवीस वर्षापासून दूधगंगा नदीत पोहायला जात होते. आज सकाळी देखील ते नदीत पोहायला गेल्यानंतर मगरीने त्यांच्यावर हल्ला केला, हल्ला केल्यानंतर कलगी यांना मगर जवळपास अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवली, त्यामुळे लक्ष्मण कलगी यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर देखील मगरीने जवळपास तीन तासांमध्ये अनेक वेळेला कलगी यांच्यावर हल्ला केला.. या हल्ल्यानंतर घटनास्थळी वनविभाग पोहोचले, त्यानंतर कलगी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. कृष्णा नदीच्या पात्रात अनेक वेळेला मगरीचा वावर दिसून आला होता, पण आता दूधगंगा नदीत देखील मगरीचा वावर असल्याचे सिद्ध झाल्याने नदीकाठच्या परिसरात दहशत पसरली आहे.
17
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 01, 2025 09:44:31
Vasai-Virar, Maharashtra:मीरा रोडच्या सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल ला बॉब ने उडवून द्यायची धमकी शाळेच्या ईमेलवर प्राप्त झालेल्या मेलने एकच खळबळ पोलीस, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल अँकर - मीरा रोड येथील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल ला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे साडेहच्या सुमारास स्कूल प्रशासनाला एक संशयास्पद ईमेल प्राप्त झाला. या मेलमध्ये शाळा उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्कूल प्रशासनाने तत्काळ काशिमिरा पोलिसांना माहिती दिली. सूचना मिळताच काशिमिरा पोलीस, बॉंब शोध पथक आणि श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची सुरक्षितता प्राधान्य मानत संपूर्ण शाळा तात्काळ रिकामी करण्यात आली आहे. परिसर सील करण्यात आला असून सर्व कक्ष, करिडॉर, पार्किंग आणि आसपासच्या जागांची सखोल तपासणी सुरू आहे. शाळा प्रशासन व पालकांत मोठी चिंता निर्माण झाली असून, पोलीस कोणतीही जोखीम न घेता अत्यंत सावधगिरीने तपास करत आहेत. बॉ Bomb पथकाने आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी धमकीच्या मेलचा स्त्रोत शोधण्यासाठी सायबर युनिटची मदत घेतली जात आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
32
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 01, 2025 09:44:07
Pimpri-Chinchwad, Maharashtra:तुम्ही सर्वजण खूप नशिबवान आहे तुमच्या पूर्वजांच्या कृपाने त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला आज ही भूमी प्राप्त झाली आहे. आम्ही राज्यात फिरत असताना आम्ही इथली घ्याती सांगत असतो. उद्या तुम्ही यावेळी मतदान करणार आहे कुणाला निवडून आणायचं हा तुमचा अधिकार आहे.पण पुढील पाच वर्ष तुमचे काम व्हायला पाहिजे हे पाहिले पाहिजे. मी अनेकवर्ष तुम्हाचा पालक मंत्री म्हणून काम केले आणि तेव्हा मी पहायचो सर्व आळंदी कराना न्याय मिळवून द्यायचे काम केले. इथे माझ्या अनेक बहिणी उन्हात बसल्या आहेत अनेक भाऊ पण उन्हात बसले आहे काहींच्या डोक्यावर टोपी आहे पण काहींच्या डोक्यावर टोपी नाही ते काम आमच्या सारखे करत आहे आम्ही सहन करतो तर तुम्हीपण करा. उन्ह म्हणत आहे.(लोकांमध्ये हशा) आळंदी मध्ये अनेक काम केली आहे लोकांच्या मागण्या आजही आहे मागण्या कधी संपत नसतात काम वाढले आहे लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे कामाची मागणी होताच असते. इंद्रायणी नदी मध्ये प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न आम्ही करत आहे. लोकांना स्वच्छ पाणी द्यायचे आहे हे आमचे उद्दिष्ट आहे.वारकाऱ्यांसाठी वारकरी भवन अजूनही नाही ते काम करायचे आहे मोठ्या प्रमाणात पार्किंगची गरज आहे मोठ्या प्रमाणात वाहने इथे येत असतात. बारामतीत मी बदल करून दाखवले आहे माझ्या लाडक्या बहिणींनी तुमचे कोणी नातेवाईक असले तर त्यांना विचारा पहाटे पाच पासून स्वच्छता सुरू होते. अनेक जण येतील काही म्हणतील पण मी याच शहरातून आहे माझ्यापुढे काही फाईल आली तर मी आधी माझ्या शहराचा विचार करेल कोणी ठाण्याचा विचार करेल कोणी मुंबईचा करेल कोणी नागपूरचा करेल मी माझा शहराचा विचार करणारच ना...?
59
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 01, 2025 09:37:24
Chakan, Maharashtra:अजित पवार चाकण सभा पॉईंटर - काही वर्षांनी चाकणची महानगरपालिका करावी लागणार आहे. ( अजित पवारांची पुन्हा एकदा घोषणा ) - आम्ही जाती-जातीत तेढ निर्माण करत नाही. शिव-शाहू-फुले- आंबेडकर विचारांवर चालणारे आहोत. त्यामुळं तुमचं बहुमूल्य मत आम्हाला द्या. ( जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्यांवर निशाणा ) - ज्याचं जळतं, त्याला कळतं. आपण पुणेचे, बाहेरच्यांना आपल्या समस्या कळणार नाहीत - मी पण पुणे जिल्ह्याचा अन तुम्ही पण पुणे जिल्ह्याचा. त्यामुळं मला आपल्या प्रश्नांची जाण आहे. आता बाहेरच्या जिल्ह्याचे येतील अन आम्ही हे करु, ते करु म्हणतील. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. - *बारामतीत कसली लाट, फक्त दादा...!* - बारामतीने मला 35 वर्षे निवडून दिलं, त्यामुळं तिथला कायापालट कसा झालाय. हे अख्खा देश पाहतोय. कसली लाट अन कसलं काय. फक्त दादा. तिथं फक्त घड्याळ दिसतं, म्हणून तिथं विकासाची गंगा वाहते. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे
111
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 01, 2025 09:31:31
Nanded, Maharashtra:नांदेड मध्ये प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे तरुणाचा खून झाला. त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिने अंत्यसंस्कारापूर्वी सक्षम ताटे याच्या पार्थिव देहाची विवाह केला. एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी नांदेडला येऊन सक्षम ताटे त्याच्या कुटुंबियांची भेट घेत घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. सक्षम ताटे याची जातीयवादातून क्रूरपणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी जो एफआयआर केला , त्यात अनेक उनिवा आहेत. त्यामुळे फिर्यादी आणि साक्षीदार यांची जबाब घेऊन दुसरा विचार दाखल करण्यात यावा अशी मागणी सदावर्ते यांनी केली. घटनेच्या दिवशी इतवारा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी धीरज کوलमवाड याने आरोपी हिमेश मामीडवार याला हत्येसाठी प्रवृत्त केले. तुझी बहीण लफडे करती , आणि त्याला मार नंतर पोलीस स्टेशनला ये असं पोलीस कर्मचारी धीरज कोमलवाड म्हणाला , त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे .. त्याला खून प्रकरणात आरोपी केल पाहिजे अशी मागणी गुणरत्न सदावर्त यांनी केली. हत्येच्या दिवशी अल्पवयीन आरोपी हिमेश मामीडवार याने आंचलला देखील धमकी दिली. त्याच्यावर देखील दुसरा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सक्षमचे आई-वडील आणि आंचल त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली. या मागण्या मान्य झाल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाणार असल्याचे सदावर्ते म्हणाले. आंचल हीच धाडस आणि प्रेम पवित्र आहे. या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे. सक्षमचे आई-वडील आणि आँचलने मागणी केली तर , एडवोकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील सरकारी वकील म्हणून खटला लढण्यास तयार आहेत , असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
58
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 01, 2025 09:08:08
Oros, Maharashtra:उद्याचा आशीर्वाद जनतेने आम्हाला द्यावा अशी विनंती सावंतवाडी करांना करण्यासाठी आज प्रचार रॅली काढली सावंतवाडी चा इतिहास राजकारणाच्या माध्यमातून घडलेला आहे आता पुढे घडावा त्यासाठीची संधी उद्या चालून आली आहे श्रद्धा ताईंना मतदान म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना मतदान श्रद्धा ताईना मतदान म्हणजे देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण नारायण राणे यांना मतदान आम्हचे सगळे टीम निवडून आल्यानंतर सावंतवाडीसाठी निधी कमी पडू देणार नाही जबाबदारी मी घेतो ही निवडणूक वैयक्तिक हेवेदावे दाखवण्याची नाही कोणी उनिधुनी काढण्याची निवडणूक नाही ज्या राजघराण्याने सावंतवाडीला सुंदर वाडी अशी ओळख निर्माण करून दिली त्याच राजकारणातील एक व्यक्ती तर मागत असेल राजकारण करण्याची वेळ नाही राजकारण करत असताना माणुसकी नजरेसमोर ठेवून काम केलं पाहिजे राजघराणे विकास करण्याची संधी मागते जोड आमची आहे सावंतवाडीचा विकास गतिमान पद्धतीने होईल दीपक केसरकर किती बोलले तरी त्यांचा आशीर्वाद श्रद्धा ताईंनाच आहे तीन तारीख चा गुलाल उधळण्यासाठी दीपक केसरकर आमच्या खांद्याला खांदा लावून असतील ऑन एकनाथ शिंदे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे शेवटची सही मुख्यमंत्र्यांचीच असते हे त्यांना माहित आहे कोणाला निधी द्यायचा कोणाची यादी नक्की करायची हे सगळे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सही ने होतात अजित दादा पवार एका भर सभेत बोलले होते मी अर्थमंत्री असलो निधी बाबतचे अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतात महाराष्ट्रात सबकुछ अगर देवा भाऊ असतील तर दुसऱ्यांना मतदान करण्याचा फायदा काय राज घराण्याने दीपक केसरकर यांना अनेक वेळा साथ दिली आहे याचा विचार दीपक भाईंनी करावा पुन्हा केव्हातरी ही दोन आणि üç तारीख येईल याचा देखील विचार करावा आणखी वेळ गेली नाही आज रात्री दीपक केसरकरांनी आमच्या उमेदवार श्रद्धा ताईंना पाठिंबा जाहीर करावा लँड माफिया म्हणजे कोण नाव घ्यावेत जो बाण आमच्याकडे येत नाही त्याचं उत्तर आम्ही का देऊ आमच्या देशात बाबासाहेबांचे संविधान चालतं नुसते आरोप करून चालत नाही पुरावे द्यायला लागतात मोती तलावावरची केस आमच्या श्रद्धा ताई नगराध्यक्ष झाल्या तर त्या केस मध्ये मदत करणारच ना केसरकर साहेब नकारात्मक विचार का करायला लागले कळत नाही नेहमी श्रद्धा आणि सबुरी बोलणारे आमचे केसरकर साहेब व नाकावर ठेवून विसरकर साहेब अचानक राजकीय चष्म्यातून का बघायला लागले ज्य्या ज्या केसेस आहेत त्या सोडवण्याची ही संधी आहे दीपक केसरकरांसारखा अनुभवी माणूस असे चुकीचे बोट कसे ठेवू शकतो केसरकर साहेबांचं खरंच सावंतवाडी वर प्रेम असतं तर ही संधी सोन्यासारखी वाटली असती केसरकारांचा अंडरग्राउंड सपोर्ट आहे की नाही हे तुम्हाला उद्या समजेल दीपक केसरकर यांनी उद्या कमळासाठी मत मागितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको अंदर की बात शोधण्याचं काम तुमचं राजघराण्यातील व्यक्ती सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदावर बस्ती तेव्हा प्रश्न सुटतील सगळी पद आमच्याकडे आहेत खूप मोठी ताकत असताना कोणते प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत ही सुवर्णसंधी आहे सब जगा कमल ओन राने शिंदे भेट राजकारणा पलीकडे संबंध जोपासणारा आमचा महाराष्ट्र आहे तशीच कालची भेट होती कोण पैसे वाटत आहे असं केसरकर साहेब बोलत असतील तर त्यांनी ते पुरावे द्यावेत राज्य नियोगा आयोगाकडे पुरावे द्यावेत ऑन दीपक केसरकर एक माजी मंत्री स्थानिक आमदार पैसे वाटप होते हे स्वीकारतात ही गंभीर बाब आहे असंच…
118
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 01, 2025 09:07:40
148
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 01, 2025 09:06:50
Dharashiv, Maharashtra:ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्ष, आमदार आणि खासदारांनी नगरपालिकेत केला २५० कोटींचा भ्रष्टाचार शासकीय लेखा परीक्षणातून उघड : भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचा आरोप धाराशिव मागील काळात धाराशिव पालिकेवर ठाकरे सेनेची सत्ता होती. २०१६ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, त्यांचे नेते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी मिळून तब्बल २५० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. नगरपालिकेअंतर्गत अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहाच्या साफसफाईच्या नावाखाली लाखो रुपये हडपले आहेत., एक दोन नव्हे तर वेगवेगळ्या दोनशे प्रकरणांत तब्बल २४२ कोटींपेक्षा अधिक रूपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे शासकीय लेखापरीक्षण अहवालातून समोर आले असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून याला काय प्रत्युत्तर मिळत हे पाहावे लागेल.
94
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 01, 2025 08:12:01
Pandharpur, Maharashtra:सांगोला नगरपालिका मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना धाड सत्र, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे आरोप तर विरोधकांनी सुद्धा दिले जोरदार प्रत्युत्तर सांगोला नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार शहाजी पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार उभे केले आहेत. तर भाजप , शेकाप आणि राष्ट्रवादी यांनी सांगोला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. काल रात्री माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयावर त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरी निवडणूक भरारी पथक, LCB पथक यांनी तपासणी केली. यामुळे शहाजी बापू यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर आरोप केले आहेत. या दोघांचं हे कारस्थान असल्याचे ते म्हणतात. माजी आमदार दीपक साळुंखे यांनी याला जोरदार उत्तर दिले आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू माझ्यामुळे आमदार झाला तेव्हा मी चाललो. शहाजी बापूला आता वेड्याच्या इस्पितळात दाखल करावे लागेल. त्यांचा लबाड बोलण्यात एक नंबर माणूस आहे. कांगावा करण्याची त्यांच्या जुनी सवय आहे. पराभव दिसत असल्याने ते अशी विधाने करून सहानुभूती मिळवत आहेत. आता सत्ता नाही टक्केवारीच राजकारण त्यांनी आमदार असताना केले. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत शेकापचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी शहाजी पाटील यांच्यावर घर फोडण्याचा आरोप केला आहे. बंधू डॉ अनिकेत देशमुख याचे कान भरून गणपतराव देशमुख यांच्या नातवात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. धाड पडल्याचे सहानुभूती मिळवण्यासाठी ते वापर करत आहेत. सांगोला शहरात सर्वच राजकीय कार्यालयाची तपासणी झाली आहे. यात वेगळे काही नाही.
134
comment0
Report
Advertisement
Back to top