Back
सांगोला नगरपालिका चुनाव से पहले पुलिस दबिश पर शहाजी पाटील का आरोप, विरोधी पलटवार
SKSACHIN KASABE
Dec 01, 2025 08:12:01
Pandharpur, Maharashtra
सांगोला नगरपालिका मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना धाड सत्र, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे आरोप तर विरोधकांनी सुद्धा दिले जोरदार प्रत्युत्तर
सांगोला नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार शहाजी पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार उभे केले आहेत. तर भाजप , शेकाप आणि राष्ट्रवादी यांनी सांगोला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत.
काल रात्री माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयावर त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरी निवडणूक भरारी पथक, LCB पथक यांनी तपासणी केली. यामुळे शहाजी बापू यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर आरोप केले आहेत. या दोघांचं हे कारस्थान असल्याचे ते म्हणतात.
माजी आमदार दीपक साळुंखे यांनी याला जोरदार उत्तर दिले आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू माझ्यामुळे आमदार झाला तेव्हा मी चाललो. शहाजी बापूला आता वेड्याच्या इस्पितळात दाखल करावे लागेल. त्यांचा लबाड बोलण्यात एक नंबर माणूस आहे. कांगावा करण्याची त्यांच्या जुनी सवय आहे. पराभव दिसत असल्याने ते अशी विधाने करून सहानुभूती मिळवत आहेत. आता सत्ता नाही टक्केवारीच राजकारण त्यांनी आमदार असताना केले. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत
शेकापचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी शहाजी पाटील यांच्यावर घर फोडण्याचा आरोप केला आहे. बंधू डॉ अनिकेत देशमुख याचे कान भरून गणपतराव देशमुख यांच्या नातवात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
धाड पडल्याचे सहानुभूती मिळवण्यासाठी ते वापर करत आहेत. सांगोला शहरात सर्वच राजकीय कार्यालयाची तपासणी झाली आहे. यात वेगळे काही नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 10, 2026 05:20:290
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 10, 2026 04:47:250
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 10, 2026 04:32:450
Report
AKAMAR KANE
FollowMar 10, 2026 04:32:180
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 10, 2026 04:31:230
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 10, 2026 04:17:220
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 10, 2026 04:17:090
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 10, 2026 04:16:510
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 10, 2026 04:16:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 10, 2026 04:03:220
Report
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 03:45:380
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 03:34:580
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 10, 2026 03:30:550
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 10, 2026 03:30:370
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 10, 2026 03:18:100
Report