Nagpur, Maharashtra:फोटो असाइन्मेंट नंबर वर व्हाट्सअप केला आहे
---
*एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल येथे प्लास्टिक सर्जरीद्वारे लिंगाची पुनर्रचना*
• 9.5 तासांची यशस्वी शस्त्रक्रिया.
लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर येथे प्लास्टिक सर्जनच्या चमूने मध्यभारतात पहिल्यांदाच राजस्थानमधील एका तरुणाचे (वय 40) संपूर्ण लिंग एकाच टप्प्यात पुन्हा तयार करून एक दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. या रुग्णाला 8 वर्षांपूर्वी कर्करोगामुळे लिंग गमवावे लागले होते.
लिंगाच्या रचनेसाठी, रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट आणि मूत्रमार्ग (मूत्रमार्गाची नळी) पुनर्बांधणी करण्यात आली आणि नंतर जघन भागात लावण्यात आले. लिंगात रक्तपुरवठा करणे, नसांमध्ये पूर्ण संवेदना प्रदान करणे आणि एक कार्यशील अवयव निर्माण करण्यासाठी सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे या बाबींचा समावेश या शस्त्रक्रियेमध्ये होता. ही संपूर्ण शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या चमूला पूर्ण करण्यासाठी 9.5 तास लागले.
अशा शस्त्रक्रियांना मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रिया म्हणतात. यासाठी आवश्यक असलेला अत्याधुनिक ऑपरेटिव्ह मायक्रोस्कोप लता मंगेशकर हॉस्पीटल येथे उपलब्ध आहे. कर्करोगाव्यतिरिक्त अशा पुनर्रचनात्मक प्रक्रिया, ट्रॉमाटिक (अपघाती) लिंग विच्छेदन आणि लिंग पुष्टीकरण शस्त्रक्रिया (लिंग बदल शस्त्रक्रिया) असलेल्या रुग्णांसाठी या सुविधा फायदेशीर ठरू शकतात.
अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या कार्याचे कौतुक केले आणि प्लास्टिक सर्जरी विभागाच्या वैद्यकीय चमूचे अभिनंदन केले. डॉ. जितेंद्र मेहता, डॉ. समीर महाकाळकर, डॉ. अश्विनी पंडितराव, डॉ. देव पटेल, डॉ.अभिराम मुंडले, डॉ. कंवरबीर, डॉ. पल्लवी या चमूने ही कामगिरी पार पाडली. डॉ. अंजली भुरे, डॉ. मधुश्री शहा, डॉ. केतकी मारोडकर, डॉ. रचना नैताम, डॉ. गुंजन यांनी या प्रक्रियेसाठी बधिरीकरणाचे काम केले. वैद्यकीय अधिक्षक व उपअधिष्ठाता डॉ. नितीन देवस्थळे यांनी सर्व लॉजिस्टिक सपोर्ट प्रदान केला. शस्त्रक्रियेतून रुग्ण पूर्ण बरा झाला आहे.
-----
असाइन्मेंट नंबर वर व्हाट्सअप ला फोटो पाठवला आहे
तर हॉस्पिटल चा व्हिडिओ 2cला जोडला आहे