Back
तळीयेतील दरडग्रस्त कुटुंबांची परवड: सरकारला आमच्या मरणाची वाट पाहण्याची इच्छा आहे?
Raigad, Maharashtra
स्लग – भय इथले संपत नाही ....... तळीये दरडग्रस्तांची आजही परवड सुरूच ........ चार वर्षानंतर पुनर्वसन अर्ध्यावरच .......... दरडग्रस्त गावाला पुनर्वसनाची प्रतिक्षा ....... घरे उभारण्याचे काम संथ गतीने सुरू ........... सरकार आमच्या मरणाची वाट पाहतंय का ? ......... तळीयेतील दरडग्रस्त कुटुंबांचा आर्त सवाल ..........
अँकर – महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला चार वर्षे होत आली. दुर्घटनेनंतर गावाच्या पुनर्वसनाचा निर्णय सरकारने घेतला. परंतु आजही इथल्या ग्रामस्थांची परवड सुरूच आहे. दरडींची टांगती तलवार डोक्यावर घेवून इथले ग्रामस्थ जगताहेत. काय आहेत इथल्या ग्रामस्थांच्या व्यथा पाहूयात झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट
व्हिओ 1 – 22 जुलै 2021 रोजी महाडच्या तळीये गावावर दरड कोसळली. गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. तळीयेच्या कोंडाळकर वाडीतील 66 घरे दरडीखाली गाडली गेली. गावातील 87 जणांना निसर्गाने आपल्या कुशीत सामावून घेतले. या दुर्घटनेनंतर संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या घटनेला चार वर्षे पूर्ण झाली परंतु अद्याप पुनर्वसनाचे काम पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत केवळ 66 कुटुंबांचेच पुनर्वसन झालंय. पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेले गामस्थ अतिवृष्टी झाली की सुरक्षित आसरा शोधतात.
बाईट 1 – शोभा पांडे, ग्रामस्थ महिला
व्हिओ 2 – तळीयेतील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचं घोंगडं आजही भिजत पडलंय. वर्षानुवर्षे डोंगरदरयांमध्ये खेळणारया या ग्रामस्थांमध्ये दरडीची भीती कायम घर करून राहिली आहे. अतिवृष्टी सुरू झाली की इथल्या ग्रामस्थांच्या मनात भीतीचा थरकाप उडतो. सरकारी यंत्रणा स्थलांतर करायला सांगते पण जायचं कुठं असा प्रश्न या ग्रामस्थांसमोर आहे. काही दरडग्रस्त कुटुंबांनी दोन वर्षे कंटेनरमध्ये काढली. 271 पैकी केवळ 110 घरांची कामं पूर्ण झालीत. 66 कुटुंबांना घरांचा ताबा दिलाय. परंतु सुविधांचा अभाव असल्याने अनेक कुटुंब तिथं रहात नाहीत. चार वर्षे होत आली तरी सरकार आमच्याकडे पहायला तयार नाही. सरकार आमच्या मरणाची वाट पाहतंय का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय.
बाईट – बाजीराव शिंदे, ग्रामस्थ (उभ्या रेषांचा शर्ट)
बाईट – संजय शिंदे, ग्रामस्थ, (सफेद टी शर्ट)
व्हिओ 3 – म्हाडाच्या माध्यमातून हे पुनर्वसनाचं काम सुरू आहे. अगदी सुरूवातीपासूनच हे काम वादाच्या भोवरयात सापडलं होतं. कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या गेल्या. आता कामाच्या वेगाबाबत नाराजी व्यक्त केली गेलीय. काम अतिशय संथ गतीने सुरू असून सध्या हे काम ठप्प असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. ठेकेदाराचे या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय.
बाईट – संपत तांदळेकर, सरपंच ( चिखलात मळलेले कपडे)
फायनल व्हिओ - दरडग्रस्त कुटुंब नवीन घरात यायला आतुर आहेत. परंतु घरांची कामं रखडल्यानं त्यांना आजही आपल्या मूळ घरात रहावं लागतंय. सरकार आमच्याही मृत्यूची वाट पाहतंय का असा सवाल ही करीत आहेत.
प्रफुल्ल पवार झी 24 तास रायगड
......
किंवा end ptc वापरावा.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement