Back
छत्रपती मंदिर में शिवराजे भोसले टीम का ताजा दर्शन, श्रद्धालुओं की भारी भीड़
UJUmesh Jadhav
Oct 25, 2025 12:05:25
Thane, Maharashtra
छत्रपतींच्या मंदिरावर सिनेकलाकारांची गर्दी....
पुन्हा शिवाजी राजे भोसलेची टीम छत्रपतींच्या मंदिरावर...
शिवाजीराजांना नतमस्तक होत केला मानाचा मुजरा...
"पुन्हा शिवराजे भोसले" हा बळीराजाच्या जिवनावर आधारीत असणाऱ्या या चित्रपटाची संपूर्ण टीम आज भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील छत्रपतींच्या मंदिरात दाखल होत महाराजांचा मानाचा मुजरा करत नतमस्तक झाली. यावेळी मराठी कलाकार मंडळीनी शिव गर्जना करत छत्रपतींच्या नावाचा जयघोष केला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर, सिध्दार्थ जाधव व इतर सर्व कलाकार मंडळी उपस्थित होती. याप्रसंगी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, कल्याण, वाडा आदी तालुक्यातील शिव भक्त व सिने रसिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी महेश मांजरेकर म्हणाले की,
हा चित्रपट खरंतर बळीराजासाठी निर्माण केला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत आहेत. आजच वर्धा मध्ये सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, हे कधी थांबणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा या चित्रपटाचा खरा उद्देश आहे. सर्वसामान्य नागरिकांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे, सरकारला जे काही करायचं आहे ते करेल. परंतु आपण सर्व सामान्य नागरिकांनी जर बळीराजासाठी हातभार लावला तर माझा सिनेमा बनवण्याचा जो उद्देश्य होता तो पूर्ण होईल. आपण जे जेवण जेवतो त्या जेवणाच्या घासाच्या मागे एखाद्या बळीराजाची आत्महत्या असेल हा विचार करणे गरजेचे आहे. प्रशासनावर अवलंबून न राहता देशातील जनतेने बळीराजाच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे. बळीराजाचा आयुष्य कसे आनंदित करता येईल हा विचार करायला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एवढे ताकत आहे की एकही शेतकऱ्याला आत्महत्या करून देणार नाही. शेतकऱ्यांना आवाहन करताना महेश मांजरेकर यांनी सांगितले की त्यांनी आत्महत्या करताना आज न करता त्याने उद्या करावी, आज त्यांनी विचार करावे, बोलावे आणि व्यक्त व्हावे. प्रशासनाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे आपण शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो त्यासाठी प्रयत्न करावे. यामुळेच मी हा चित्रपट निर्माण केला आहे, जेणेकरून जनजागृती व्हावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातील पहिलं व्हील मंदिर येथे येऊन जर महाराजांच्या दर्शन घेतला नसता तर या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये कुठेतरी कमी राहिले असती. त्यामुळे या चित्रपटातील संपूर्ण टीमने या ठिकाणी येऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत मानाचा मुजरा केला आहे.
बाईट-महेश मांजरेकर
2
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
11
Report
नक्सल नेता रुपेश को अपनी ही पार्टी का 'गद्दार' बुलावा, क्यों हुआ विचलित? Naxal Leader Rupesh Disturb
6
Report
अंबिकापुर में छठ पर्व से पहले सड़क की बदहाली, शंकर घाट जाने वाली सड़क की मरम्मत की मांग वायरल वीडियो
6
Report
Orai, Uttar Pradesh:जालौन के थाना कुठौन्द पुलिस द्वारा आवेदक/शिकायतकर्ता की फ्राड हुयी धनराशि वापस कराकर के चेहरे पर लौटाई मुस्कान ।
7
Report
7
Report
Jhansi, Uttar Pradesh:झाँसी के रक्सा थाना क्षेत्र की है, जहाँ 24 अक्टूबर की अर्धरात्रि को रक्सा टोल प्लाज़ा पर चेन्नई - तमिलनाडु, की रहने वाली एक महिला प्रिया भटकती हुई मिली।
10
Report
10
Report
12
Report
SKSandeep Kumar
FollowOct 25, 2025 19:05:4511
Report
AMALI MUKTA
FollowOct 25, 2025 19:05:3410
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowOct 25, 2025 19:05:163
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowOct 25, 2025 19:05:060
Report
SPSANDIP PRAMANIK
FollowOct 25, 2025 19:02:580
Report
BSBidhan Sarkar
FollowOct 25, 2025 19:01:540
Report
PSPrasenjit Sardar
FollowOct 25, 2025 19:00:440
Report
