Back
जळगाव-जामनेर: अजितदादांच्या गटाची पवारांसोबत चर्चा, मंत्रिमंडळ बदलीची शक्यता
WJWalmik Joshi
Jan 30, 2026 08:16:51
Jalgaon, Maharashtra
जळगाव जामनेर
मंत्री गिरीश महाजन ऑन सुषमा अंधारे
अजित दादा यांच्या जीवनाला दोनच दिवस झाले आहे त्यामुळे कृपा करून यावर राजकारण करू नका.
चौकशीचा भाग आहे चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यातले त्यात ते बाहेर येतीलच.
काहीतरी संशय व्यक्त करायचा.काहीतरी राजकीय बोलायचं.. बोलताना गांभीर्याने बोललं पाहिजे.
एवढ्या मोठ्या गंभीर विषयावर मला वाटतं सर्वांनीच सांभाळून बोललं पाहिजे.
ऑन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र , विलीनीकरण होईल
अजित दादांचा गट असेल तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा गट असेल हा या दोन्ही राष्ट्रवादीचा विषय आहे.
मला वाटत यासंदर्भात पुढे हालचाली होतील, पण त्यासाठी एक ते दोन दिवस तरी जाऊ द्यावे लागतील..
ऑन सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद
मला वाटतं हा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा प्रश्न आहे यावर आम्ही टीकाटिप्पणी करणे मला वाटतं योग्य होणार नाही.
त्यांचे जे आमदार आहेत दुसऱ्या फाईल नेते आहेत ते याबद्दल विचार करतील आणि निर्णय घेतील.
ऑन संजय राऊत
मला वाटतं या विषयावर कोणीही राजकारण करू नये.
दुसरा दिवस आहे आणि आपण काय काय बोलतो आहोत.. बोलताना आपण नियंत्रण ठेवल पाहिजे.
दोन-चार-पाच दिवस जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला.
सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण केलंच पाहिजे का ?आणि राजकारण करण्यासाठी काही काळ वेळ असते की नाही हा माझा प्रश्न आहे
ऑन मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतील?
आज ते सांगणं कठीण आहे आणि अधिवेशनाला सुद्धा वेळ आहे.
मला वाटतं आता पुढच्या काळात आणखी काय घडामोडी गळतात मंत्रिमंडळाची रचना नेमकी कशी होते..
अजित दादांकडे जी खाते होती ती नेमकी कुणाकडे जातात याबाबत राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत ते ठरवतील.
ऑन लाडकी बहीण योजनेमध्ये राज्याची आर्थिक स्थिती बिघडली केंद्रीय सर्वेक्षणात बाब समोर
लाडक्या बहिणींना आपण दर महिन्याला पंधराशे रुपये देतो आहेत त्यामुळे एवढे पैसे तिकडे गेल्यामुळे थोडाफार परत निश्चितच पडतो आहे.
थोडाफार परत पडत असेल मात्र त्यातूनच आपल्या गरीब भगिनींचा विकासच होतो आहे. त्यामुळे तो पैसा कुठे वाया जातो आहे? तो सुद्धा विकासच है..
माननीय मुख्यमंत्री कुशल आहेत त्यामुळे यात जे गॅप पडलेले आहेत ते भरून काढतील..
त्यामुळे त्याचा विकासावर काही फरक पडेल असं मला वाटत नाही.
ऑन अजितदादा अपघात सीआयडी चौकशी सुरू
मला वाटतं हा अपघात नेमका कसा झाला ये समोर येण्यासाठी सीआयडी असो की सीबीआय सर्व चौकशी होऊ द्या.
आम्हाला सुद्धा या अपघाताचा आश्चर्य आहे की हा अपघात नेमका झालाच कसा. मी सुद्धा काल त्या ठिकाणी जाऊन धावपट्टी बघायची.
नेमकं काय झालं हे समोर आलं पाहिजे.. यात चूक कोणाची आहे आणि चूक असले तर तो नेमके चुकला काय..
त्यामुळे अपघाता संदर्भातला सर्व समोर आला पाहिजे आणि पुढच्या वेळेस असा अपघात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे..
ऑन अजितदादा ज्यावेळी भाजपवर आरोप करायचे
जेव्हा दादा भाजपवर आरोप करायचे त्यावेळी मी त्यांना त्यांची समजूत करायचो की दादा थोडा थांबला पाहिजे, काही बोलायला नको.
दादा माझ्यावर कॅबिनेटमध्ये बोलल्याशिवाय दादांची कॅबिनेटची बैठकच पूर्ण होत नव्हती.
विरोधात असताना देखील आणि शक्यता असताना देखील दादा माझ्याबद्दल काय काय बोलले आहे तुम्ही ते टीव्हीवर दाखवलेला आहे.
मागच्यावेळी दादा जेंव्हा फाईल बद्दल बोलले त्यावेळी मी दादांना बोललो की दादा असं बोलू नका..
आपण सोबत आहोत असं बोलू नका कारण बोलल्यानंतर उगाच विषयाला विषय वाढतो असं मी त्यांना सांगायचं..
त्यामुळे दादांचे माझे खूप चांगले संबंध होते हे सर्वांनाच माहिती आहे.
दादा सभागृहात नाहीत याबद्दल कल्पना देखील आम्हाला करवत नाही..
अजित दादा मला अंकल , काका असे म्हणायचे, पुढे काय म्हणायचं हे मी सांगत नाही..ते तुम्ही tv वर दाखवलेले आहे
दादा मोकळ्या मनाचे देखील होते मैत्री करताना ते कुठेच कसर सोडत नव्हते..
मला त्यांनी मी भेटले की माझे बायशेप ते बघायचे आणि म्हणायचे बघा या वयात हे गिरीश कसा धावतो व्यायाम करतो.. असं कौतुक करायला देखील दादा कधी विसरत नव्हते..माझी तारीफ देखील ते तेवढीच करायचे.
दादांबद्दलच्या खुप आठवणी आहेत त्यामुळे ते गेल्याच्या मनाला खूप वेदना देखील आहेत. दादा दिलदार माणूस होता..
ऑन जळगाव महापौर कोण आणि फॉर्म्युला कसा
या संदर्भातच भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे आणि मी आम्ही तिघे आज बसून निर्णय घेऊ...
आमच्या मध्ये कुठेही दुमत नाहीये एकमताने आम्ही महापौर कोण होणार त्याचं नाव ठरवू...
नाशिकचे महापौर पदाबद्दल देखील आज उद्या मध्ये निर्णय होईल..
नव्या, जुन्या , किती वर्ष झालेल्यांना हा आजच विषय नाही.. याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ..
पुढच्या एक ते दोन दिवसात याबाबतचा निर्णय होईल...
ऑन बारामती विमान अपघातानंतर इतर ठिकाणच्या विमानतळांवरील विस्ताराचा प्रश्न समोर
विमानतळाचा विस्तारा झालाच पाहिजे..
पुढच्या महिन्यामध्ये जळगावच्या विमानतळाच्या संदर्भातला उद्घाटन होईल..
कारण जळगावला फार मोठी वाईट अवस्था आहे एक विमान उडल्यानंतर दुसऱ्याला उतरता येत नाही.
नाशिकला कुंभमेळा असल्याने त्या ठिकाणच्या कामांचा देखील वेग वाढला आहे
जळगावचे धावपट्टी आपण वाढवत आहोत जेणेकरून मोठे विमान आहेत त्यांना देखील उतरता येईल..
बाईट _मंत्री गिरीश महाजन...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RKRajesh Kumar Sharma
FollowJan 30, 2026 09:32:250
Report
PGPARAS GOYAL
FollowJan 30, 2026 09:32:020
Report
DKDAVESH KUMAR
FollowJan 30, 2026 09:31:440
Report
AAAteek Ahmed
FollowJan 30, 2026 09:31:360
Report
KSKartar Singh Rajput
FollowJan 30, 2026 09:31:210
Report
AAAteek Ahmed
FollowJan 30, 2026 09:31:130
Report
PCPUSHKAR CHAUDHARY
FollowJan 30, 2026 09:30:580
Report
RSRahul shukla
FollowJan 30, 2026 09:30:470
Report
PGPARAS GOYAL
FollowJan 30, 2026 09:30:240
Report
0
Report
65
Report
0
Report
0
Report
RSRavi sharma
FollowJan 30, 2026 09:18:210
Report
SKSandeep Kumar
FollowJan 30, 2026 09:18:130
Report