Back
५० लाख के बीमा फर्जीवाड़े का खुलासा; डॉक्टर-पुलिस समेत नौ आरोपी गिरफ्तार
WJWalmik Joshi
Mar 09, 2026 14:30:32
Jalgaon, Maharashtra
जळगाव
गुन्हेगार आरोपी पोलीस डॉक्टर यांना एसी कार वाहनातून कोर्टात आणण्यात आले व इतर आपण आरोपींना सर्वसामान्य गाडीत असा आदर सत्कार का?
‘दृश्यम’लाही लाजवेल असा कट उघड; ५० लाखांच्या विम्यासाठी मृत्यूचा बनाव, डॉक्टर-पोलिसांसह नऊ जण अटकेत
विमा कंपनीने खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सी मार्फत केलेल्या तपासात समोर आले धक्कादायक षडयंत्र
Anchor:
पैशाच्या मोहाने विवेकाला पडदा पडला की वास्तवही चित्रपटाला मागे टाकते, याचा प्रत्यय जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आला आहे. ५० लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवण्यासाठी मृत्यूचा बनाव रचत एका कुटुंबाने आणि काही अधिकाऱ्यांनी असा कट रचला की तो थेट एखाद्या थरारपटालाही लाजवेल. मात्र सत्याचा दिवा कितीही अंधारात लपवला तरी एक दिवस उजेडात येतोच, आणि तसेच या प्रकरणातही झाले.
VO
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा बनाव रचून ५० लाख रुपयांच्या पर्सनल एक्सीडेंट विम्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात मृत व्यक्तीचे कुटुंबीय, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर तसेच मेहुनबारे पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
VO विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथित अपघाती मृत्यूबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाख रुपयांचा विमा दावा त्यांच्या पत्नी अरुणा जाधव यांनी केला होता. १९ एप्रिल २०२५ रोजी रात्री दहिवद येथून मालेगावकडे जात असताना मोटरसायकलला काळ्या रंगाच्या थार वाहनाने धडक दिल्याने जाधव गंभीर जखमी झाले आणि चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे कागदोपत्री नमूद करण्यात आले होते.
VO परंतु या कथित अपघातामागील सत्य मात्र वेगळेच होते. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी मृतदेह न पाहताच प्राथमिक अहवाल आणि पोस्टमार्टम रिपोर्ट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या आधारे मेहुनबारे पोलिस ठाण्यात एफआयआर क्र. ८६/२०२५ अशी नोंदही करण्यात आली होती.
मात्र विमा कंपनीने खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीमार्फत तपास सुरू केला आणि या बनावट कथानकातील धागेदोरे एकामागोमाग उलगडत गेले. तपासात समोर आले की राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या गंभीर आजाराने झाला होता. त्यांच्या घरात लावलेल्या फोटोवरही हीच तारीख नमूद असल्याचे आढळले. इतकेच नव्हे तर ग्रामपंचायत मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्ये त्यांची नोंद नसल्याचेही माहिती अधिकारातून स्पष्ट झाले.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मृताच्या नावावर विविध विमा कंपन्यांकडून जवळपास दहा पॉलिसी घेतल्या गेल्या होत्या. म्हणजेच केवळ ५० लाख नव्हे, तर विविध कंपन्यांकडून तब्बल साडेसात कोटी रुपयांची रक्कम हडपण्याचा डाव रचण्यात आला होता.
या प्रकरणात अरुणा राजेंद्र जाधव, संभाजी जाधव, थार वाहनाचा चालक-मालक, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर, मेहुनबारे आणि चाळीसगाव पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, सुनील निकम, रविन्द्र बत्तीसे, सचिन निकम तसेच विमा एजंट प्रवीण पाटील, प्रेम पाटील आणि मयताचा भाऊ मिथुन जाधव यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, पैशाच्या हव्यासापोटी रचलेला हा बनावट अपघाताचा डाव उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कायद्याच्या चौकटीत सत्य उभे राहतेच, याचा हा आणखी एक प्रत्यय असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. तर दुसरीकडे आरोपींना काय शिक्षा होईल हे बघावे लागेल
बाईट_डॉ. महेश्वर रेड्डी
पोलीस अधीक्षक, जळगाव.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RZRajnish zee
FollowMar 09, 2026 17:02:500
Report
SJSantosh Jaiswal
FollowMar 09, 2026 17:02:320
Report
PKPradeep Kumar
FollowMar 09, 2026 17:02:180
Report
ADAnup Das
FollowMar 09, 2026 17:00:460
Report
EGE GOPI
FollowMar 09, 2026 17:00:350
Report
0
Report
0
Report
PTPawan Tiwari
FollowMar 09, 2026 16:46:340
Report
MPMahesh Pareek
FollowMar 09, 2026 16:46:150
Report
ASAshutosh Sharma1
FollowMar 09, 2026 16:45:390
Report
AMAsheesh Maheshwari
FollowMar 09, 2026 16:45:260
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowMar 09, 2026 16:32:170
Report
0
Report
AKAshok Kumar sharma
FollowMar 09, 2026 16:31:530
Report
AMAnkit Mittal
FollowMar 09, 2026 16:31:160
Report