Back
तोरणमाळ महोत्सव से पर्यटन को बढ़ावा, नंदुरबार में रोजगार के अवसर
PPPRASHANT PARDESHI
Jan 09, 2026 03:07:09
Dhule, Maharashtra
तोरणमाळ महोत्सवाच्या आयोजनाची घोषणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. सातपुड्यातील रोजगारवाढीच्या उद्देशाने हा महोत्सव घेतला जात असून, तोरणमाळच्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तोरणमाळ हे राज्यातील महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण असल्याने महाराष्ट्रासह शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. मात्र, अपेक्षित सुविधा उपलब्ध नसल्याने अलीकडच्या काळात पर्यटकांची संख्या काहीशी घटताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी आणि तोरणमाळ पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे आणण्यासाठी तोरणमाळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आदिवासी संस्कृती, पारंपरिक कला, लोकनृत्य, हस्तकला आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्यासोबतच स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. येत्या ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत दोन दिवसांसाठी तोरणमाळ महोत्सव होणार असून, हा महोत्सव दरवर्षी नियमितपणे आयोजित करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे आगामी काळात तोरणमाळ पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक विकासाला मोठी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 19:00:400
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 19:00:130
Report
0
Report
0
Report
0
Report
VSVishnu Sharma
FollowJan 09, 2026 18:46:230
Report
MJManoj Jain
FollowJan 09, 2026 18:46:020
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 18:45:310
Report
0
Report
सोनभद्र: जीवन देने वाले ने ही छीन ली सांसे, प्रेम प्रसंग से नाराज थे मां बाप,आरोप प्रेमी पर डाल दिया
0
Report
RSRakesh Singh Thaku
FollowJan 09, 2026 18:32:040
Report
DDDeepak Dwivedi
FollowJan 09, 2026 18:31:510
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 18:31:40Durg, Chhattisgarh:दुर्ग पुलिस कुर्सी पार टैबलेट और भिलाई में चिट्टा बेचने फरार आरोपियों को गिरफ्तार
0
Report
KRKishore Roy
FollowJan 09, 2026 18:31:120
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 18:30:180
Report