Back
तळोदा के हिडिंबा देवी मंदिर: महाभारत से जुड़ी ऐतिहासिक यात्रा
PPPRASHANT PARDESHI
Jan 06, 2026 03:45:34
Dhule, Maharashtra
तळोदा शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर हिडिंबा वनात हिडिंबा देवीचे ऐतिहासिक प्रसिद्ध मंदिर आहे. पांडव अज्ञातवासात असताना सातपुड्याच्या घनदाट जंगलात वास्तव्याला असल्याच्या उल्लेख आढळून येते. सातपुड्याच्या पर्वत रांगेतील अश्वस्थामा च्या शिखर भिमकुंड या ठिकाणी भीमाने आंघोळ केली. ते स्थळ शुलपाणेश्वर मंदिरातील पांडवांचे वास्तव्य आधी अनेक बाबी या परिसरात महाभारताच्या पाऊल खुणा सांगून जातात. पांडव जंगलात अज्ञातवासात असताना हिडिंबसुर दानव क्षत्रिय राजा यांची कन्या हिडिंबा यांचे वनात भेट झाली. या भेटीत दोघांच्या मनात प्रेम भावना निर्माण होऊन त्यांच्याविवाह झाला. या वनाला अस्तित्वात असताना हिडिंबा वन असे नाव पडले. या वनात ऐतिहासिक हिडिंबा देवीचे मंदिर आहे. या परिसरातील नागरीक हिडिंबा देवी आराध्य दैवत मानले जाते. मंदिरात मनोभावे आजही पूजा अर्चा करतात. आपल्या मनातील इच्छा देवीपुढे व्यक्त करून नवस करतात. भाविकांची मनोरथ पूर्ण होतात, असे मानले जात असल्याने, मोठ्या प्रमाणात भाविक हिडिंबा देवी मंदिरात नेहमी दर्शनासाठी येत असतात. या परिसरात सुंदर रोपवन तयार केले असल्याने हा परिसर निसर्गरम्य बनला आहे. भारतात फक्त दोन ठिकाणी हिडिंबा देवीचे मंदिर आहे. हे विशेष तळोदा तालुक्यात रोझवा गावाजवळ हीडिंबा वनात तर दुसरे हिमाचल प्रदेशात कुलू मनाली घाटीत आहे. कुलू मनाली येथे हिडिंबा देवीची लाकडी मंदिर आहे. मूर्तीही लाकडाची आहे. तर तळोदा तालुक्यात प्राचीन हिडींबा देवीची शिलाची (मूर्ती) असून संगमरवरी मूर्ती आहे. कुलू मनाली घाटीत हीडिंबाला देवी मानण्यात येते. या मंदिरात दरवर्षी मोठा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. या मंदिर परिसरात आजूबाजूच्या परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हाडंबा परिसरात मोठे घनदाट जंगल होते. १९३८ च्या पूर्वी या वनात हिडींबा देवीचा शीलाकोण या वनात आढळला. हळूहळू १९५३ ला छोटेसे मंदिर नंतर १९९४ ला हिडींबा देवीची मूर्ती जीर्णोद्धार करत नागरिकांचे आराध्य दैवत म्हणून उदयास आले. हिडिंबा देवीची श्री शामादादा महाराजांनी सेवा बजावली. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील भाविकांनी मदतीने मंदिर तयार झाले. पौष पौर्णिमाला परिसरातील गावकऱ्यांच्या मदतीने गेल्या अनेक वर्षापासून तीन दिवस यात्रा भरते. छोटे, मोठे, व्यावसायिक आपली दुकाने, खेळणी, विविध शृंगार, पाळणे आदी दुकाने थाटतात. दोन दिवस सोंगाळ्या पार्टी कार्यक्रम आयोजन होत असतात. हिडिंबा देवी मंदिराचा तीर्थ क्षेत्रात समावेश व्हावा व परिसराचा विकास व्हावा अशी अपेक्षा भाविक व्यक्त केली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
RKRishikesh Kumar
FollowJan 07, 2026 15:02:540
Report
0
Report
PKPrakash Kumar Sinha
FollowJan 07, 2026 15:01:250
Report
HBHemang Barua
FollowJan 07, 2026 15:00:440
Report
1
Report
HBHemang Barua
FollowJan 07, 2026 15:00:230
Report
SPSanjay Prakash
FollowJan 07, 2026 15:00:080
Report
BKBIMAL KUMAR
FollowJan 07, 2026 14:59:540
Report
1
Report
VBVIJAY BHARDWAJ
FollowJan 07, 2026 14:58:240
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowJan 07, 2026 14:57:210
Report
0
Report
MSManish Shanker
FollowJan 07, 2026 14:56:520
Report
ASARVINDER SINGH
FollowJan 07, 2026 14:54:250
Report