Back
Narnala Festival 2025-26 में निविदा गड़बड़ियों पर ब्लैकलिस्ट की मांग
JJJAYESH JAGAD
Feb 17, 2026 17:01:29
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सुरू असलेल्या नरनाळा महोत्सव २०२५-२६ च्या आयोजनात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित कंत्राटदार कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.तक्रारदारांनी या संदर्भात उपवनसंरक्षक (Dy. Conservator of Forests), मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट यांना लेखी निवेदन देत ‘डिजायर (Dzire)’ कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली आहे.तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी २०२५ रोजी ‘Narnala Festival-2025-26’ साठी निविदा प्रक्रिया पार पडली होती.मात्र प्रत्यक्षात निविदेतील तांत्रिक अटी व अटींनुसार आवश्यक उपकरणे व सेवा पुरवण्यात गंभीर त्रुटी राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कार्यक्रमच थेट प्रक्षेपण नागरिकांना दाखवण्यासाठी एलईडी वॉल, प्रोसेसर तसेच ध्वनी व्यवस्था याबाबत निविदेतील नमूद क्षमतेपेक्षा कमी दर्जाची उपकरणे वापरल्याचा आरोप आहे.त्याचप्रमाणे छायाचित्रण, व्हिडिओग्राफी व ब्रॉडकास्टिंग सेवांमध्येही तांत्रिक निकषांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.काही ठिकाणी आवश्यक क्षमतेची साधने न वापरता कमी दर्जाची साधने वापरून काम केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला असून, संबंधित बिलांमधून रक्कम वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.कमी उपकरणे लाऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.तसेच संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करून भविष्यातील निविदांमधून अपात्र ठरवण्याची मागणीही करण्यात आली आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.प्रशासनाकडून या तक्रारीची दखल घेऊन चौकशी सुरू होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
BPBHUPESH PRATAP
FollowFeb 17, 2026 18:31:580
Report
RTRAJ TAKIYA
FollowFeb 17, 2026 18:31:440
Report
BPBHUPESH PRATAP
FollowFeb 17, 2026 18:31:310
Report
NCNITIN CHAWRE
FollowFeb 17, 2026 18:31:200
Report
KSKartar Singh Rajput
FollowFeb 17, 2026 18:30:590
Report
KSKartar Singh Rajput
FollowFeb 17, 2026 18:30:450
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowFeb 17, 2026 18:30:130
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowFeb 17, 2026 18:16:130
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowFeb 17, 2026 18:16:010
Report
MGMOHIT Gomat
FollowFeb 17, 2026 18:15:440
Report
DKDeepesh Kumar
FollowFeb 17, 2026 18:15:290
Report
0
Report
0
Report