Back
अकोला महापालिका चुनाव में भाजपा को बगावत का बड़ा झटका, टिकट न मिलने से नाराज उम्मीदवार सामने
JJJAYESH JAGAD
Dec 31, 2025 06:25:25
Akola, Maharashtra
अकोला महापालिका निवडणुकीत भाजपला बंडखोरीचा सर्वाधिक फटका बसण्याची चिन्ह आहेत. पक्षविरोधी कारवाई केलेल्या पदाधिकाऱ्यांची घरवापसी मोठ्या प्रमाणात करून भाजपने बंड शांत करण्यात यश जरी मिळवलं असलं तरीही भाजपचा तिकीट न मिळाल्याने नाराजांचा मोठा आव्हान भाजपच्या समोर उभा आहे, काहीशी परिस्थिती काँग्रेसची सुद्धा अशीच आहे. भाजपने अकोल्यातील महापालिका निवडणूक करिता मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे , त्याप्रमाणे भाजप 66 जागांवर ही निवडणूक लढणार आहे. तिकीट वाटपाच्या कामात भाजपला सर्वाधिक कसरत करावी लागली आहे. महापालिकेच्या 80 जागांसाठी भाजपकडे सुमारे 1250 नामांकन अर्ज दाखल झाले होते. 2017 च्या निवडणुकीत 48 नगरसेवकांची संख्याबळ असलेल्या भाजपने यंदाच्या निवडणुकांत 60% नवीन चेहरे देत 40% नगरसेवकांची तिकीट कापली आहे. सुमारे 21 नगरसेवकांची तिकीट कापण्यात आली आहे, यापैकी काहींची मनधरणी करण्यात भाजपाला यश आला आहे तर तिकीट कापल्याने नाराज असलेल्या अधिकतर उमेदवारांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून उमेदवारी दाखल केली आहे. माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे भाजपा नगरसेवक आशिष पवित्रकार यांच्या घरवासीचे प्रयत्न सुरू होते मात्र तसं न झाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उबाठाच्या नगरसेविका मंजुषा शेळके यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. तिकीट न मिळालेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे दिवंगत नेते आमदार गोवर्धन शर्मा यांच्या समर्थकांची संख्या अधिक असल्याची ही चर्चा आहे. निष्ठावंतांना डावलून इतरांना तिकीट देण्याचा आरोप काहींनी केला आहे, मात्र प्रत्येकाला तिकीट देणे शक्य नसल्याच भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी म्हंटल आहे. वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपल्या एका नगरसेविकेचा पत्ता कट केला आहे. काहीशी हीच परिस्थिती काँग्रेसची सुद्धा आहे काँग्रेसने दोन नगरसेवकांच्या तिकीट कापल्या तर या दोन्ही उमेदवारांनी एमआयएम पक्षातून नामांकन अर्ज दाखल करत काँग्रेसला आव्हान दिलं आहे. काँग्रेस आमदाराने पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप या नगरसेवकानी केला आहे. तर नगरसेवकाच्या समर्थकांनी आमदाराच्या फोटोला काळ सुद्धा फासलं. सर्वच पक्ष काही प्रमाणात बंडखोरीने चांगलेच ग्रासले आहे. मात्र इतर पक्षांपेक्षा अकोल्यात बंडखोरीचा सर्वाधिक फटका बसण्याची चिन्ह आहेत ते म्हणजे 'पार्टी विथ डिफरन्स' अशी ओळख मिरवणाऱ्या भाजपला.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
ASAVNISH SINGH
FollowDec 31, 2025 08:09:140
Report
0
Report
ASAVNISH SINGH
FollowDec 31, 2025 08:08:400
Report
0
Report
VSVaibhav Sharma
FollowDec 31, 2025 08:08:170
Report
0
Report
VSVaibhav Sharma
FollowDec 31, 2025 08:07:160
Report
DBDEVENDRA BISHT
FollowDec 31, 2025 08:06:480
Report
RKRaushan Kumar
FollowDec 31, 2025 08:06:210
Report
SNSUNIL NAGPAL
FollowDec 31, 2025 08:04:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 31, 2025 08:04:130
Report
ASAVNISH SINGH
FollowDec 31, 2025 08:03:440
Report
ASAVNISH SINGH
FollowDec 31, 2025 08:03:280
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowDec 31, 2025 08:02:590
Report