Back
अकोला नगरपालिका चुनाव: 719 अर्ज वैध, शिवसेना शिंदे गट के कई उम्मीदवार अयोग्य
JJJAYESH JAGAD
Jan 01, 2026 09:28:33
Akola, Maharashtra
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी पार पडली. या प्रक्रियेत एकूण 777 अर्जांपैकी 719 अर्ज वैध ठरले आहेत, तर विविध तांत्रिक कारणांमुळे 58 उमेदवारी अर्ज अवैध घोषित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या अर्ज छाननी प्रक्रियेत विविध कारणांमुळे सर्वाधिक फटका शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील उमेदवारांना बसला आहे. प्रभाग क्रमांक 8 'ब'मध्ये शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार सचिन उज्जैनर यांचा अर्ज कंत्राटदार असल्याच्या कारणावरून बाद करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सचिन उज्जैनकर हे महापालिकेचे अधिकृत कंत्राटदार असल्याचे छाननीत आढळून आले. नियमानुसार उमेदवाराने 'मी कंत्राटदार नाही' असे शपथपत्र जोडणे बंधनकारक असते, मात्र कंत्राटदार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला आहे. त्याच प्रमाणे प्रभाग 3 मधील शिवसेनेच्या उमेदवार स्वानंदी पांडे आणि संगीता शुक्ला यांनी ए बी फॉर्म चुकवल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजय वानखडे यांची पावती तांत्रिक कारणामुळे उशिरा प्राप्त झाल्याने त्यांचाही उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 14 च्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सोनल दुर्गे यांचा अर्ज ही तांत्रिक कारणाने बाद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे काही अपक्ष उमेदवारांनी दोन प्रभागात अर्ज भरल्याने देखील अनेक अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. अर्ज बाद झाल्याने अनेक उमेदवारांचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न तांत्रिक चुकांमुळे दुभंगले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
KJKunal Jamdade
FollowJan 01, 2026 10:56:010
Report
NJNaynee Jain
FollowJan 01, 2026 10:55:02Noida, Uttar Pradesh:A railway worker stands guard over a deer resting beside the tracks, ensuring its safety as a train passes.
0
Report
SSSUNIL SINGH
FollowJan 01, 2026 10:54:510
Report
RSRAKESH SINGH
FollowJan 01, 2026 10:54:130
Report
RZRajnish zee
FollowJan 01, 2026 10:53:230
Report
0
Report
YSYatnesh Sen
FollowJan 01, 2026 10:52:110
Report
VAVINEET AGARWAL
FollowJan 01, 2026 10:52:000
Report
OSONKAR SINGH
FollowJan 01, 2026 10:51:330
Report
SPSatya Prakash
FollowJan 01, 2026 10:49:540
Report
0
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 01, 2026 10:49:440
Report