Back
महिलेला जागेच्या वादात जबर मारहाण; व्हिडिओ व्हायरल!
ADANIRUDHA DAWALE
Jul 31, 2025 05:47:32
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_MARAMARI एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
जागेच्या वादातुन एका महिलेला जबर मारहाण; वलगाव पोलीस स्टेशन मध्ये चार जणांवर गुन्हे दाखल
अँकर :– अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विर्शी गावात एका महिलेला जागेच्या वादातून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जागेच्या वादातुन एका महिलेला तीन इसमाने व एका महिलेने जबर मारहाण केली आहे. मारहाण करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून एक महिला दुसऱ्या महिलेला काठीने मारहाण करत आहे तर तीन इसम महिलेला तिचे केस धरून लाथा भुक्क्याने मारहाण करत असल्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान वलगाव पोलीस स्टेशन मध्ये चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस पुढील तपास करत आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowAug 01, 2025 02:15:45Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबई उपनगरीय रेल्वेवर वातानुकूलित लोकल चालविल्या जातात. मात्र, सध्या धावत असलेल्या वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड होत असून वातानुकूलित लोकल रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर ओढावली आहे. गुरुवारी मध्य रेल्वेवरील ११ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील प्रवाशांसाठी वातानुकूलित लोकल खूप लाभदायी ठरली आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दी टाळण्यासाठी अनेक प्रवासी वातानुकूलित लोकलला पसंती देत आहेत. त्यामुळे वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. तसेच गर्दीची भिती वाटणाऱ्या प्रवाशांसाठी वातानुकूलित लोकल फायदेशीर ठरत आहे. परंतु, मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होतो. प्रवाशांकडे वातानुकूलित लोकलचा मासिक पास असला तरी त्यांना त्यांच्या इच्छित वातानुकूलित लोकलने प्रवास करता येत नाही. त्यामुळे मध्य रेल्वे विरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त करत आहेत.मध्य रेल्वेच्या ताफ्यात वातानुकूलित लोकलचे ६ रेक होते. यापैकी ५ रेकच्या वातानुकूलित लोकल फेऱ्या धावत होत्या. तर, एका रेकची देखभाल-दुरूस्ती करण्यात येत होती. परंतु, काही महिन्यापूर्वी सातवा रेक मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाला. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात ६६ वातानुकूलित लोकल फेऱ्यांमध्ये १४ वातानुकूलित लोकलच्या जादा फेऱ्या समाविष्ट करण्यात आल्या. त्यामुळे दररोज ८० लोकल फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली.
तर, मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक पर्यायी रेक उपलब्ध झाल्याने, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या रेकचा वापर करता येणे शक्य होते. परंतु, वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द करून, त्यावेळेत सामान्य लोकल चालविण्यात येतात. यामुळे प्रवाशांना गर्दीमय लोकल प्रवास करावा लागतो. तसेच, तिकीट आणि मासिक पासाचे पैसे वाया जात असल्याची खंत प्रवासी व्यक्त करीत आहेत
वारंवार वातानुकूलित लोकल रद्द करण्यात येत आहेत. गुरुवारीही वातानुकूलित लोकल रद्द करण्यात आल्याने मासिक पास असलेल्या प्रवाशांना पासाचे पैसे परत द्यावेत किंवा एक दिवस वाढवून द्यावा, अशी मागणी मुंबई रेल प्रवासी संघाने केली आहे.
या वातानुकूलित लोकल फेऱ्यांऐवजी सामान्य लोकल धावल्या…
सकाळी ९.०३ ठाणे – सीएसएमटी जलद लोकल
सकाळी ९.५१ सीएसएमटी – अंबरनाथ जलद लोकल
सकाळी ११.१७ अंबरनाथ – सीएसएमटी धीमी लोकल
दुपारी १.०६ सीएसएमटी – ठाणे धीमी लोकल
दुपारी २.२२ ठाणे – सीएसएमटी धीमी लोकल
दुपारी ३.२४ सीएसएमटी – डोंबिवली धीमी लोकल
दुपारी ४.५५ डोंबिवली – सीएसएमटी धीमी लोकल
सायंकाळी ६.१८ सीएसएमटी – डोंबिवली धीमी लोकल
सायंकाळी ७.५० डोंबिवली – सीएसएमटी धीमी लोकल
रात्री ९.१६ सीएसएमटी – कल्याण धीमी लोकल
रात्री १०.५६ कल्याण – कुर्ला धीमी लोकल.
मनोज कुळकर्णी
Use file vdo
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 01, 2025 02:15:41Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या पांढरकवडा मार्गावर गोळ्या-व बिस्कीटचे व्यापारी कृष्णा क्षीरसागर यांचे मालवाहू वाहन थांबवून चालक व त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवून त्यांना लुटल्याची घटना घडली. रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी असा ऐवज हिसकावून दरोडेखोर पसार झाले. जखमी व्यापाऱ्याने पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी रमेश पडघणे आणि सुरेश पवार या दोघांना ताब्यात घेतले.त्यांच्या जवळून रोख जप्त केली. 4 दरोडेखोर अद्याप पसार आहेत.
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 01, 2025 02:01:49Akola, Maharashtra:
5 फाईल्स आहेत..AVB
Anchor : अकोला जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे..दिवसाढवळ्या सर्रास गुन्हे घडत आहे.. यावर अंकुश मिळविण्याकरिता अकोला पोलिसांनी गुन्हेगारांची वरात काढत त्यांना नागरिकांची माफी मागायला लावण्याला सुरुवात केली आहे. अशातच जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या परिसरातील आसिफ खान याने दुचाकी वरून अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून पाईपने मारहाण केली असल्याच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी आरोपीचा तपास घेऊन त्याला तात्काळ अटक केली व गुन्हा दाखल केला. भविष्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपीची परिसरात दिंड काढून त्याला नागरिकांची माफी मागायला भाग पाडले. तसेच आणखीन पुरावे गोळा करण्यासंदर्भात तपास सुरू असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले..
Byte : नितीन लेव्हरकर, पोलीस निरीक्षक, जुने शहर पोलीस ठाणे, अकोला..
3
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 01, 2025 02:01:11Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 0108_GON_DEATH_BODY
FILE - 4 IMAGE
नाल्यात वाहून गेल्याने गुराख्याच्या मृत्यू...
घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर मिळाला मृतदेह.
Anchor: आमगाव तालुक्यातील बनगाव येथील गुराखी गुरे चारण्यासाठी गेला असता परिसरात आलेला गणेशघाट नाल्यामध्ये वाहून त्याचा मृत्यूझाला. यादवराव दलपत नेवारे (५९) रा. गणेशटोली बनगाव असे मृतकाचे नाव आहे.
Vo: आमगाव तालुक्यातील बनगाव येथील गुराखी असलेले यादोराव दलपत नेवारे (५९) हा ३० जुलै रोजी १२.३० वाजेच्या सुमारास गाई चारणयाकरीता गेले होता. दरम्यान गणेश घाट नाल्यातील पाण्यामध्ये वाहून गेला. याची माहिती मिळताच आपत्ती निवारण जिल्हा शोध व बचाव पथकामार्फत नाल्यात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सदर इसमाचे मृतदेह घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर मिळाला. या प्रकरणी आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
1
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 01, 2025 02:00:52Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0108_BHA_BHONDEKAR_BYTE
FILE - 1 VIDEO
विधानसभेतील मारहाण प्रकरण आता हक्क भंग समितीकडे.... दोषींवर कारवाई होणार असल्याचं भोंडेकर यांचं वक्तव्य....
Anchor :- विधासभेत गोपीचंद पडळकर व जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. महाराष्ट्र विधानसभेची गरिमा मातीत मिळवली यावर मुख्यमंत्री यांनी देखील नाराजी व्यक्ती केली होती.. आता हा विषय हक्क भंग समिती कडे आला आहे. या विषयी पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. विधानसभेत गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन गदारोड करित आहे हा गंभीर प्रकार आहे. तर दुसरीकडे विधानसभेत येण्यासंदर्भात कुठल्याही व्यक्तींना पास दिली जात होतो हा प्रकार चुकीचा असून आता या प्रकरणात व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सत्य तपासाला जाईल व दोषींवर हक्क भंग समिती कडून कारवाई केली जाणार असल्याचं हक्क भंग समिती अध्यक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे....
BYTE :- नरेंद्र भोंडेकर, अध्यक्ष हक्क भंग समिती
2
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 01, 2025 01:31:32Yeola, Maharashtra:
अँकर:- सतरा वर्षांपूर्वी मालेगाव शहरात भिकू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटाचा निकाल लागला असून सबळ पुराव्या अभावी या गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये याकरता येवला शहरात शहर पोलीस तथा रॅपिड ॲक्शन फोर्स यांच्या वतीने रूटमार्च काढण्यात आला होता याप्रसंगी देवी खुंट आझाद मैदान मेन रोड टिळक चौक या भागातून हा रूटमार्च काढण्यात आला होता
याप्रसंगी येवला शहर व तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
8
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 01, 2025 01:31:25Yeola, Maharashtra:
अँकर:- येवला तालुक्यातील अंदरसुल या ठिकाणी पडेगाव रोड परिसरातील कांतीलाल सोनवणे यांच्या शेतावर मादी बिबट्या व दोन पिले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली तसेच या परिसरामध्ये दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला देखील झाला असून परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला असून याप्रसंगी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
9
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 01, 2025 01:31:18Yeola, Maharashtra:
अँकर:-अनेक दिवसांची प्रतीक्षा संपले असून पुणेगाव दरसवाडी धरणातून डोंगरगाव कालव्यासाठी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते कालव्यामध्ये आवर्तन सोडण्यात आले
7
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 01, 2025 01:31:08Lasalgaon, Maharashtra:
अँकर:- लासलगाव बस आगारातील ढिसाळ नियोजनामुळे शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस न मिळाल्याने येथील विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे या विद्यार्थिनींनी लासलगाव येथील आगारात धडक देत पर्यायी बसची व्यवस्था करून द्यावी अन्यथा एकही बस बाहेर जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला त्याप्रसंगी एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे प्रवाशांनी ही नाराजी व्यक्त केली दरम्यान शालेय व वेळेवर सोडाव्या अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या विद्यार्थिनींनी दिला.
7
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 01, 2025 01:31:01Ambernath, Maharashtra:
ध्वजस्तंभात झालेल्या अनियमिततेची चौकशी न झाल्यास १५ ऑगस्टला आत्मदहन करणार.
पत्रकार प्रकाश जाधव यांचा राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना इशारा.
Murbad flag
Anchor मुरबाडच्या शिवनेरी या शासकीय विश्रामगृहा समोर उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाला १२५ फुटांची मान्यता होती, मात्र सदर ध्वजस्तंभ हा चाळीस फुटच उभारण्यात आलाय , त्यामूळे ध्वजस्तंभात अनियमितता करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर ध्वज संहितेत नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकार प्रकाश जाधव यांनी लोक आयुक्त,मूख्य सचिव, यांचेकडे तक्रारी केल्या.मात्र या गंभीर प्रकरणाची चौकशी केली जात नसल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी मुरबाड तहसीलदार कार्यालया समोर होणाऱ्या ध्वजारोहण प्रसंगी आत्मदहन करुन राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्याचा इशारा राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे
यांनी दिला आहे.
चंद्रशेखर भुयार ,मुरबाड
9
Report
JMJAVED MULANI
FollowJul 31, 2025 16:32:43Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 3107ZT_DAUNDJAGTP
BYTE 1
देश हिंदुराष्ट्र होईपर्यंत थांबायचं नाही आमदार संग्राम जगताप ...
Anchor:-देशातील सर्व बांधवांचे स्वप्न होतं भारत भूमीतील अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र यांचे मंदिर व्हावं ते झालंय..उद्याचं स्वप्न आहे की नकाशा वरती आपला भारत देश उभा राहिला पाहिजे घडला पाहिजे हा हिंदू राष्ट्र आहे आणि तो होईपर्यंत आपल्या सर्वांना काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमातून हे विचार प्रत्येकाच्या मनापर्यंत घेऊन जागृती करण्याची जबाबदारी आपली आहे असे मत अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलेय.. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार बोलत होते...
साऊंड बाईट: आमदार संग्राम जगताप...
14
Report
KPKAILAS PURI
FollowJul 31, 2025 16:04:27Pune, Maharashtra:
पिंपरी चिंचवड
अजित पवार भाषण पॉइंटर
pimpri pawar ajit
kailas puri Pune 31-7-25
feed by 2c
-ट्रस्ट कडून मला आग्रह सुरू होता,*पिंपरी चिंचवड मध्ये कार्यक्रम घ्याचं म्हणलं की सहसा नाही म्हणत नाही*
-मुख्यमंत्र्यांची मीटिंग असताना देखील इथे आलो
-आमदार हेमंत रासने यांनी गणेश उत्सव बाबत काही अपेक्षा व्यक्त केल्या त्यावर राज्य सरकार म्हणून नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल
-कोरोना काळात काही निर्बंध घालण्यात आले होते
-गणेशोत्सव 175 देशात साजरा केला जातो
-हा उत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाईल
-वाहतूक कोंडी सुटावी,गर्दी कमी व्हावी यासाठी रिंगरोड चा काम हाती घेत आहे,ज्यांच्या कुणाच्या शेतातून हा रोड जाणार आहे ते थोडे नाराज होणार आहे,पण पुढच्या 50 वर्षाचा विचार केला जातो
-PMRDA रिंगरोड काम सुरू करतोय कुणाच्या शेतातून जाणार असेल तर नाराज होऊ नका भविष्याचा विचार करून करावं लागणार
-हिंजवडी बाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागतायत ,ते करताना मला समाधान वाटत नाही पण एकूण परिस्थितीचा विचार करता रस्ते रुंदीकरण करावे लागतीलच
-आता पिंपरीचे रस्ते चांगले आहेत असं म्हणतात पण त्यावेळी अनेकांचा वाईट पना घेतला हे माझ मला माहीत
-पण ज्यांची घरे जमीन जातील त्यांना आम्ही रस्त्यावर सोडणार नाही
-सगळे मला म्हणतात पिंपरी चिंचवडचे रस्ते रुंद आहेत पण त्याना काय सांगू मी कितीजणांना बरोबर वाईट घेतलं,आमदार माऊली लांडगे च्या घरापासून पासून सुरुवात केली,त्याच घर रस्त्याच्या मध्ये येत होतं ते पाडलं,लोक म्हणत होती दादा ह्यावेळी निवडणूकीला नको समोरो जायला अशी परिस्थिती निर्माण झाली होती
-पुरंदर चे विमानतळं होणे आवश्यकच आहे
*Imp*
*आता त्यांना तुमचं आवडतं*.....शहर ( हशा)
-आंतरराष्ट्रीय कंपन्यांची पहिलं प्राधान्य पुण्याला आहे
-त्या कंपन्यांना आम्ही इतर ठिकाणी अधिक सोयी सुविधा देतो असं म्हणलं तर ते म्हणतात आम्ही परत जातो,हैदराबाद जातो ,काय करणार सांगा
-आता त्यांना तुमचं आवडतं ... शहर
-गणेश उत्सव काळात पुणे मेट्रो सेवा जास्त काळ सुरू राहील या संदर्भात सूचना देतो पण तुम्ही लोकांनी लवकर घरी जा
सकाळी तर लवकर मेट्रो सुरू होईल सकाळी उठून मलाही कामं करायला आवडतं
बाबांनो ही बंधन आम्ही नाही आणली न्यायालयाने आणली आहे इतक्या काळात 10 वाजता,12 वाजत बंद करण्याचे आदेश आहे,त्यात पण आपण जास्त दिवस आपण गणेशोत्सव साठी जास्त दिवस देत आहोत
-यंदाच्या गणेश उत्सवाला कोणतंही गाल बोट लागू नये अशी अपेक्षा करतो .
-मंडळानी सामाजिक भान ठेवणे गरजेचे
-पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करा
-सामाजिक सलोखा ठेवा
14
Report
JMJAVED MULANI
FollowJul 31, 2025 16:04:22Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 3107ZT_DAUNDGOPIPDLKR
BYTE 1
दौंड_गोपीचंद पडळकर बाईट
*ऑन_दौंड यवत घटना छत्रपती शिवराय मूर्ती विटंबना*
ही घटना अत्यंत संताप जनक
एक दोन लोकांचा ही कृत्य नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आमचे श्वास आमचा प्राण.
हिंदू धर्माच खच्चीकरण करण्याचे हेतून केलेलं हे कृत्य आहे.
अखंड हिंदुस्तानाची हिंदू धर्माची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहे.
त्यांनी फार मोठी ही चूक केली आहे त्यांना त्यांच्या भाषेत कळल असे उत्तर देण्याची तयारी हिंदू समाजाची आहे.
कारवाई करा ज्या आरोपीने हे कृत्य केलं आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करा अशी सरकारकडे मागणी आहे.
याच्या पाठीमागे मोठी टीम असेल त्याचा शोध घेतला पाहिजे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे.
*ऑन_दोघांना ताब्यात*
सोलापूर आणि मुंबईमध्ये 29 तारखेचा रात्री पोलिसांनी छापे टाकले होते.
पोलिसांनी आरोपीचे सीडीआर रेकॉर्ड चेक केलं होतं.
आरोपीने मे महिन्यात हे कार्ड घेतलं होतं म्हणजे कृत्य करण्याच्या हेतूनेच ठरवून केलेल आहे.
पोलिसांनी खोलामध्ये जावं. यवत मध्ये दहा मशिदी आहेत त्याला परवानगी कोणी दिली.
*ऑन_विविध घटना*
या घटना जाणीवपूर्वक आहेत याचा आका कोण आहे शोधलं पाहिजे.
वरवंड गावामध्ये महादेवाचे मंदिराची तोडफोड होते महादेवाच्या मंदिरापर्यंत तुम्ही तोडफोड करता.
मताच्या राजकारणासाठी तुम्ही जे खालच्या लेवला जात आहे ते बंद करा. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत जर कोणास करत असेल तर आपलं सर्वांचं मत एक असलं पाहिजे.
*ऑन_उपाय योजना*
पुण्याचे एस पी कर्तबगार आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांना माझी विनंती आहे.
या जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारच्या जागेत कोणीही जिहादी वृत्तीच्या लोकांनी अतिक्रमण केला असेल बांधकाम केला असेल तात्काळ त्याची यादी काढली पाहिजे. यवत परिसरात अशी किती बांधकामे झाले आहेत ग्रामपंचायतीने परवानगी दिल्या का.
14
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 31, 2025 15:45:35Nashik, Maharashtra:
मालेगाव, नाशिक ब्रेक -
- मालेगावात SRPF च्या जवानांसह पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश
- मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालाचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्यानं गृह विभागाकडून खबरदारी
- १७ वर्षानंतर आज सुनावण्यात आला मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल
- पुराव्याअभावी सर्व आरोपींची करण्यात आली निर्दोष मुक्तता
- निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करणार
14
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 31, 2025 13:34:45Palghar, Maharashtra:
पालघर - पालघरच्या वांद्री धरण प्रकल्प परिसरातील शेकडो खैर जातीच्या झाडांची कत्तल करून तस्करी. रात्रीच्या सुमारास 200 हून अधिक खैर झाडांची बेकायदेशीर तोड करून तस्करी . खैर या महागड्या आणि संरक्षित झाडाची बेकायदेशीर तस्करी रोखण्यात पालघर वन विभागाला अपयश . वांद्री धरण प्रकल्प क्षेत्रातील भाताने , दहिसर या भागातून तस्करी करण्यात आल्याच समोर . वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना हाताशी धरून तस्करी सुरू असल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप.
14
Report