Back
वर्ध्यातील पांढरा हत्ती: महिला रुग्णालय चार वर्षांपासून बंद!
MAMILIND ANDE
FollowJul 15, 2025 04:33:58
Wardha, Maharashtra
*वर्धा डे-प्लॅन स्टोरी*
SLUG - 1507_WARDHA_HOSP_STORY
- वर्ध्यात इमारत होऊन चार वर्षे झालीय पण महिला रुग्णालयाला सुरुवात नाही
- महिला रुग्णालयाची इमारत ठरतेय पांढरा हत्ती
- चार वर्षांपासून इमारत बांधून पूर्ण; वर्ध्यातील रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित
अँकर : वर्धा जिल्ह्यातील महिलांना आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महिला रुग्णालयाचे बांधकाम करण्यात आले. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला. मात्र चार वर्षांपासून रुग्णालय बांधून पूर्ण झाल्यानंतरही लोकार्पण करण्यात आले नाहीए. सध्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून इमारत बंद ठेवण्यात येते आहेय. इमारत परिसरात झाडीझुडपे वाढलेली असताना हक्काच्या रुग्णालयासाठी महिला अजूनही प्रतीक्षेत आहेय. अधिवेशनात मात्र वर्ध्याच्या एकाही आमदाराकडून या रुग्णालयाबाबत चकार शब्दही निघाला नाहीए..
विवो : वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागच्या भागात महिला रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. २०१७ मध्ये या इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सुमारे १४ कोटींच्या प्रस्तावित निधीसोबत वेळोवेळी वाढीव मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली. त्यामुळे आतापर्यत एकूण 21 कोटींचा खर्च इमारतीवर झाला आहेय. मोठे हॉल आणि शंभरावर खोल्या असलेल्या या महिला रुग्णालयात तब्बल दोनशे खाटांची क्षमता आहे. पण अजूनही हे रुग्णालयाची इमरत धुळखात पडली आहेय.
बाईट - सुमंत वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा
बाईट - अमर काळे, खासदार
विवो : महिलांचा निधी महिलांच्या कामांसाठीच खर्च व्हायला हवा. इमारत तयार असताना रुग्णालय सेवेत आणण्यात अडचण काय आहे? ग्रामीण महिला खाजगी रुग्णालयात जाऊ शकत नाहीत. तेथील शुल्क सामान्य घरातील महिलांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे हे महिला रुग्णालय महिलांच्या फायद्याचे ठरणारे आहे. विधानसभेत सेवाग्राम येथील रुग्णालयाबद्दल आवाज उठविणाऱ्या लोकप्रतिनिधींनी महिला रुग्णालयाबद्दल प्रश्न का उपस्थित केला नाही,’ असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.
बाईट - WKT, मिलिंद आंडे
विवो - वर्ध्यात महिला रुग्णालयाचे काम जवळपास पूर्ण झालें आहेय..ग्रामीण भागातील महिला मोफत उपचार मिळावा यासाठी महिला रुग्णालय सुरु करावे महिलांची समस्या महिला डॉक्टरला व्यवस्थित सांगता येईल..सुरु असलेल्या अधिवेशनात एकही आमदार या रुग्णालयाबदल बोलले नाहीय.. भव्यदिव्य बांधण्यात आलेलं महिला रुग्णालय सुरु करा अन्यथा JCB नी पाडून टाका अशी संतापजनक प्रतिक्रिया महिलांकडून दिल्या जात आहेय..
बाईट - महिलांचा चौपाल
फायनल विवो - 21 कोटींचा बांधण्यात आलेल्या या पांढरा हत्तीला तात्काळ सुरु केलं तर अनेक महिलांना मोफत उपचार घेता येईल..पालकमंत्री पंकज भोयर यांनी याकडे लक्ष देऊन महिलांना दिलासा देईल का हे पाहणे महत्वाचे आहे....
मिलिंद आंडे, ZEE 24 तास,वर्धा
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement