Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीडच्या खाकीतला अधिकारी: चोरीच्या गुन्ह्यात पकडला गेला!

MMMahendrakumar Mudholkar
Jul 09, 2025 09:40:05
Beed, Maharashtra
बीड: खाकीतला चोर "अधिकारी"; पोलिस दलाची प्रतिमा डागाळली...! Anc- अत्यंत विनम्र आणि संयमी म्हणून त्या अधिकाऱ्याची ओळख होती. मात्र तो चोरीच्या भूमिकेत आढळल्याने अनेक पोलीस अधिकारांच्या भवया उंचावल्या आहेत. ऑनलाइन गेम चा नादात कर्जबाजारी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यानेच चक्क चोरीचा मार्ग पत्करला... मात्र म्हणतात ना पोलिसांचे हात चार हात पुढे त्याच प्रमाणे स्वतः पोलीस अधिकारी असून देखील स्वतःच्याच डिपार्टमेंटला चकवा देण्यात तो अपयशी ठरला. पाहुयात बीडच्या एका अधिकाऱ्याचा चोरटा प्रवास....!! Vo 1 ----- खाकी वर्दीत फोटो दिसणारा हा अधिकारी बीड पोलीस दलाच्या तांत्रिक विभागात asi पदावर आहे... अत्यंत संयमी आणि विनम्र असा स्वभाव असलेल्या या अधिकाऱ्याच्या हातात बीड पोलिसांनीच बेड्या ठोकल्या आहेत. अमित सुतार असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. .. ऑनलाइन गेम खेळण्यात तो कर्जबाजारी झाला आणि त्याने चोरीचा मार्ग पत्करला .. कर्ज फेडण्यासाठी त्याने चक्क दुचाकी चोरीला सुरुवात केली. बीड परिसरात स्वस्त दराने दुचाकी विकली जात असल्याची खबर बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रंगेहात दुचाकी विकताना आरोपीसह समान पकडले. त्यांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. सदर गाड्या या इस्मानी नाही तर बीडमधल्या तांत्रिक पदावर असलेल्या अमित सुतार या अधिकाऱ्याने चोरले असल्याचे समोर आले. बाईट: शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक बीड Vo 2 ------ आरोपी अमित सुतार याचा दुचाकी चोरण्याचा हा पहिलाच गुन्हा नाही. तर या आधीही अमित सुतारने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तांत्रिक विभागातील तब्बल आठ बॅटऱ्या चोरून विक्री केल्या होत्या. याप्रकरणी त्याला बीड पोलिसांनी अटक देखील केली होती. त्याचे निलंबन ही झाले होते. अशातच आर्थिक परिस्थिती ढासळल्याने अमित सुताऱ याने पुन्हा एकदा चोरीचा मार्ग अवलंबला. पोलिसांनी आता त्याला बेड्या ठोकले आहेत. अमित सुतार आणि त्याचे दोन सहकारी सध्या बीड पोलिसांच्या कोठडीत आहेत. अमित सुतार याने आणखीन किती चोऱ्या केल्यात याचा तपास आता बीड पोलीस करत आहेत... बाईट: शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक बीड Vo 3 ----- सर्वसामान्यांना न्याय मिळावा आणि पोलिसांची प्रतिमा पारदर्शक व्हावी यासाठी बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी अनेक संकल्पना राबवून पोलीस दल पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे त्यांच्याच दलातील पोलीस अधिकारी आरोपीच्या कठड्यात उभा आहे. एखाद्या व्यक्तीला जुगाराचे व्यसन लागल्यानंतर तो गुन्ह्याची वाट कशी धरतो हे पोलिस अधिकारी अमित सुतार याच्याकडे पाहिले असता लक्षात येईल. त्यामुळे जुगारासारखे व्यसन किती घातक असते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे... END PTC MAHENDRAKUMAR MUDHOLKAR, BEED
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top