Back
ठाण्यात छत्री आंदोलन: कंत्राटदारांची थकीत बिले अद्याप का?
SKShubham Koli
FollowJul 04, 2025 11:03:20
Thane, Maharashtra
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने आज छत्री आंदोलन करण्यात आले. मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या विशेष सवलतींविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.
वर्षानुवर्षे काम करूनही कंत्राटदारांची ₹९०,००० कोटींची बिले थकीत असताना नव्याने उगम पावलेल्या इन्फ्रा कंपन्यांना तत्काळ बिले अदा केली जात आहेत. याविरोधात आंदोलकांनी पाऊस नसतानाही छत्र्या उघडून प्रतीकात्मक आंदोलन केले.
आंदोलनात राज्य सरकारने नियमबाह्य पद्धतीने कामे वाटल्याचा आरोप करत थकीत बिले त्वरीत अदा करावीत, विकासकामांसाठी आर्थिक तरतूद निश्चित करूनच मंजुरी द्यावी, कंत्राटदारांना संरक्षण देणारा कायदा करावा, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या
bYT:- मंगेश आवळे कंत्राटदार
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowJul 20, 2025 04:04:06Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn airport av
Feed attached
देशभरातील ६० विमानतळांवर करण्यात आलेल्या प्रवासी समाधान सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने बाजी मारत आठवे स्थान पटकावले. विमानतळावर देण्यात आलेल्या नवीन सुविधांमुळे १३ व्या स्थानावरून पहिल्या १० मध्ये येण्याचा मान या विमानतळाने मिळवला आहे.
देशभरातील विमानतळांवर विमानतळ प्राधिकरणातर्फे दरवर्षी हे सर्वेक्षण करण्यात येते. चिकलठाणा विमानतळाच्या टर्मिनल इमारतीमध्ये नव्याने वाढवण्यात आलेली ८ प्रवेशद्वार, पार्किंग परिसरात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन, लहान मुलांसाठी खेळणी व त्यांच्यासाठी जागा, ११ स्वच्छतागृहे, ८०० वरून २८५० पर्यंत प्रवाशांची क्षमता वाढवण्यात आली आहे.
0
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 20, 2025 04:03:47Pune, Maharashtra:
पिंपरी चिंचवड शहरात गेल्या पाच दिवसांपासून स्वस्त धान्य वाटप ठप्प
pimpri ration
kailas puri Pune 20-7-25
feed by 2c
Anchor -शहरातील शिधापत्रिकाधारकांसाठी धान्यवाटपाचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. ई-पॉस यंत्रामधील निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांमुळे गेल्या सहा दिवसांपासून धान्य वाटप काही ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाले आहेपरिणामी, साडेतीन लाख शिधापत्रिकाधारकांचे हाल होत असून,अडीचशेच्यावर स्वस्त धान्य दुकानदारांना शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तर राज्यभरातूनच ही समस्या निर्माण झाली असून, दोन दिवसांत प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती अधिकारी देत आहेत. सरकारने जून ते ऑगस्ट या कालावधीत तीन महिन्यांचे धान्य एकत्र करून वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात दोनच महिन्यांचे धान्य दुकानांमध्ये पोचले आहे. ते वाटप करत असतानाच ई-पॉस यंत्रात पुन्हा अडथळे आल्याने शिधापत्रिकाधारकाना गैरसोय होत आहे.
1
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 20, 2025 04:03:39Kalyan, Maharashtra:
KDMC मुख्यालयाबाहेर ‘मृत्यूचा सेल’ बॅनर! खड्डे आणि गर्डर्सवरून पालिकेच्या ढिसाळ कारभारावर संतप्त नागरिकांचा उपरोधिक बॅनर.
Anc...कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करण्यासाठी एका जागरूक नागरिकाने शहरात एक उपहासात्मक बॅनर लावले आहे. यात, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर "शासनाकडून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याची सुवर्णसंधी" अशी खोचक घोषणा करत, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे किंवा स्टेशन परिसरातील धोकादायक लोखंडी गर्डर्समुळे मृत्यू झाल्यास मिळणाऱ्या योजनेची माहिती दिली आहे. या बॅनरबाजीने पालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणावर तीव्र ताशेरे ओढले आहेत.
Vio:- "खूष खबर! सेल! सेल!" म्हणत पालिका प्रशासनावर हल्लाबोल जागरूक नागरिक अशोक शेलार यांनी लावलेल्या या बॅनरवर "खूष खबर! खूष खबर! खूष खबर!! सेल! सेल! सेल!!" असे आकर्षक मथळे आहेत. यात नागरिकांना " त्वरा करा " असे आवाहन करत, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पडून किंवा स्टेशन परिसरातील भल्यामोठ्या लोखंडी गर्डर्सखाली चिरडून मृत्यू झाल्यास, शासनाकडून मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळेल अशी उपहासात्मक माहिती दिली आहे. ही योजना केवळ पावसाळा संपेपर्यंतच मर्यादित असल्याचे सांगत, पालिकेच्या ढिसाळ कारभारावर अधिक प्रकाश टाकला आहे. बॅनरमध्ये "संबंधित अधिकारी कार्यवाही करीत नसल्यामुळेच दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून" पालिकेनेच स्वतः या योजनेचे जाहीर आवाहन करावे अशी मागणी केली आहे.बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी या बॅनरमधून अशोक शेलार यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ज्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एखाद्या कुटुंबातील सदस्याचा जीव जातो, त्याच अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यासोबतही तसेच घडले पाहिजे, तरच असे बेजबाबदार अधिकारी वठणीवर येतील. २००५ मध्ये आधारवाडी चौकात झालेल्या अपघातात तीन जणांचा बळी गेला होता आणि त्यावेळी आपण स्वतः संबंधित अधिकाऱ्याला धडा शिकवला होता, तसेच त्यानंतर कायदेशीर लढाईही लढली होती, असे त्यांनी नमूद केले आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत असे काही घडल्यास, त्याच पद्धतीने उत्तर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.या बॅनरबाजीमुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिक समस्यांकडे अधिक गंभीरपणे पालिकेने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. या बॅनरसंदर्भात अधिक प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नागरिकांना ९७६९२८३१६१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 20, 2025 04:03:30Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn police action av
Feed attched
ध्वनि मर्यादेबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याबद्दल पोलिसांनी प्रार्थनास्थळांवरील भोंगे काढण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरू आहे. गस्तीदरम्यान पोलिस प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांमधून येणाऱ्या आवाजाची तीव्रता मोजतात. ध्वनिमयदिचे उल्लंघन होत असल्याचे दिसल्यास
अथवा भोंग्याला परवानगी नसल्यास संबंधित विश्वस्तांना समज दिली जाते. त्यानंतरही नियमांचे पालन होत नसेल तर भोंगे काढण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय...
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 20, 2025 04:03:16Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn maha palika tax av
Feed attached
घरगुती मालमत्ता कराच्या तुलनेत व्यावसायिक कर १४० पट जास्त दराने महानगरपालिका व्यापाऱ्यांकडून वसूल करत आहे, असा व्यापारी संघटनांचा आरोप आहे ,व्यवसाय सुरू करताना व्यावसायिकांना जीएसटी, शॉप अॅक्ट आणि इतर शासकीय कर भरावे लागतात. असे असताना पुन्हा महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी आस्थापना कर वसूल करण्यात येणार आहे. याला जिल्हा व्यापारी संघाने पूर्णपणे विरोध केला आहे. हा अतिरिक्त जाचक कर आम्ही भरणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, नोटिसा मिळालेल्या व्यापाऱ्यांनी कराचा भरणा करू नये, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.
आस्थापना कर भरण्यासाठी चर्चेतून मार्ग काढू, असे आश्वासन व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला मनपा कडून देण्यात आले होते, मात्र याबाबत काहीही हालचाली झाल्या नाही उलट व्यापाऱ्यांना नोटीस यायला लागल्यास व्यापारींचे म्हणणं आहे...
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 20, 2025 04:03:05Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn maha palika prabhag av
Feed attached
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या
सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात होणार असून, त्यासाठी प्रशासनाच्या निवडणूक विभागाने चार वॉर्डाचा एक प्रभाग, यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचे काम पूर्ण केल्याचे सूत्रांनी सांगितले. आता प्रशासनाला एससी, एसटीचे आरक्षण किती ठेवायचे, याबाबत राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. ती माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव शासनाला सादर करील, असेही कळतंय, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगरविकास विभागाने महापालिकेला प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले. पहिल्या आदेशात वेळापत्रक नव्हते, दुसऱ्या सुधारित आदेशातील वेळापत्रकानुसार पालिकेने प्रारूप प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात केली. आणि पूर्णही केले..
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 20, 2025 04:02:55Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2007_BHA_SNAKE
FILE - 2 VIDEO
मुलींच्या स्वच्छतागृहात आढळला नाग सापाचा पिल्लु.... सर्पमित्रांनी दांडेगाव जंगलात सोडून दिले जीवनदान
Anchor : - शालेय विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेल्या असता त्यांना दरवाजा जवळच नाग सापाचा पिल्लू आढळून आला. त्यांनी या घटनेची माहिती शाळेतील महिला शिक्षकांसह प्राचार्यांना दिली. प्राचार्यांनी घटनेची गंभीर दखल घेत स्वच्छतागृहाकडे जाणाऱ्या मुलींना थांबविले. सर्पमित्राला पाचारण केले. सर्पमित्र सुशिल शिल यांनी मोठ्या शिताफिने नाग सापाच्या पिल्लाला जिवंत पकडून दांडेगाव येथील जंगलात सोडून जीवनदान दिल्याची घटना घडली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात घडली. एकंदरीतच सध्या पावसाळ्याचे दिवस असून मोठ्या प्रमाणात साप निघतात मात्र विद्यार्थ्यांनी ही बाब शाळा प्रशासनाला सांगताच प्राचार्यांच्या समयसूचकतेने अनुचित घटना टळली असून सापाला जिवंत पकडून जीवनदान देण्यात आले आहे. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून शाळा प्रशासनाच्या वतीने योग्य पावले उचलण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 20, 2025 04:02:51Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्या दोन शाळकरी मुलींच्या कुटुंबीयांना मिळाला प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत
Anchor - शहरातील जगजीवनराम झोपडपट्टी भागात काही दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पीडित कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. धनादेश स्वीकारताना पीडित कुटुंबीयांना आपल्या अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला दुःखद प्रसंगात सरकारने मदतीचा हात दिला असून यामधून पीडित कुटुंबांना आधार मिळेल अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली.
0
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 20, 2025 03:33:36Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_nmc
कचरा विलगीकरणासाठी मनपा ॲक्शन मोड'वर
अँकर
केंद्र सरकारमार्फत देशभरात ओला कचरा स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षण राबविण्यात येते. याअंतर्गत दरवर्षी स्वच्छ शहर स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाचे या स्पर्धेचे नववे वर्षे होते. 'स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक'ची बिरुदावली मिरवणारे नाशिक शहर या स्पर्धेत देशभरातील पहिल्या दहा शहरांमध्ये यावे, ही नाशिककरांची इच्छा आहे. मात्र, यापूर्वीच्या आठ स्पर्धामध्ये हुलकावणी देणारे यश यंदाही नाशिक महापालिकेच्या हाती लागू शकले नाही. नाशिकला २२ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. देशभरातील पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिकचा समावेश झाला नसण्यामागे पर्याप्त विलगीकरण न होणे, जनतेकडून फीडबॅक न मिळणे ही काही कारणे आहेत. त्यामुळे आयुक्त खत्री यांनी आगामी स्वच्छ शहर स्पर्धेसाठी आतापासूनच तयारी करण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरात ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण बंधनकारक करताना कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी जनजागृती आराखडा तयार केला जाणार असून, सल्लागार संस्थेमार्फत या आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलीये...
11
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 20, 2025 03:33:21Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn encroachment av
Feed attached
कुठलीही पूर्वकल्पना न देता किंवा पडलेल्या मालमत्तांचे पंचनामे न करता मनपाने रस्ता रुंदीकरणाचा धडाका लावला होता. या बाबत प्रचंड टीकाही सुरू होती, याबाबत मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी शनिवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना या पडलल्या मालमत्तांचे पंचनामे करा व त्यांना प्रमाणपत्र द्या, कारवाईपूर्वी नोटीस द्या, अशा सूचना दिल्या. नियमानुसार असलेल्या बांधकामांनाच भरपाई देण्यात येणार आहे. नियमानुसार बांधलेल्या मालमत्ता रस्ता रुंदीकरणात पडत आहेत. त्यांना मोबदला देण्याबाबत चर्चा करण्यात आली. हा मोबदला प्रामुख्याने टीडीआर स्वरूपात देण्यात यावा, असा पर्याय पुढे आला. टीडीआर नको असेल तर त्यांच्याकडून तशा पद्धतीने लिहून घ्यावे. टीडीआरचे दर वाढवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना १.१ एफएसआय वापरल्यानंतर प्रीमियम वापरता येणार नाही. त्यांना टीडीआरच वापरावा लागेल. टीडीआर वापरून आणखी गरज पडेल असेल तर पैसे भरून प्रीमियम दिला जाईल. बांधकाम परवानगी असलेल्या मालमत्ता पाडू नका. त्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
3
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 20, 2025 03:33:07Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकींग - सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळाले नाही हे पाप त्यांच्यामुळेच झाले आहे, मंत्री जयकुमार गोरे यांचा खा. धैर्यशील मोहिते पाटलांना खोचक प्रतिउत्तर
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बाईट पॉईंटर
ऑन धैर्यशील मोहिते-पाटील
काहींना शिंगं फुटली आणि जिल्ह्याच्या राजकारणाची गणित फिस्कटली असं वक्तव्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं होतं याला उत्तर देताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की ते स्वतःबद्दल बोलले असावेत.
सोलापूर जिल्ह्याचे दुर्दैव आहे की जिल्ह्याला स्वतःचा पालकमंत्री नाही असं वक्तव्य खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं होतं त्याला उत्तर देताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की-"ते पाप त्यांच्यामुळेच झालं आहे."
साऊंड बाईट -
खासदार धैर्यशील मोहिते पाटील
बाईट -
जयकुमार गोरे ( पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री )
0
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 20, 2025 03:32:57Yavatmal, Maharashtra:
AVB
शक्तीपीठ महामार्ग समर्थक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून काही मागण्या केल्या आहेत. आमचे शक्तिपीठ महामार्गाला समर्थन आहे, मात्र संपादित भूमीला बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्यात यावा, शेतीचे दोन तुकडे झाल्यास उर्वरित 20 गुंठ्यापर्यंत शेतीचे भसंपादन शासनाने करावे, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला 12 फुटांचा सर्व्हिस रोड देण्यात यावा, पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याची व्यवस्था करण्यात यावी. अशा मागण्यां शेतकऱ्यांनी केल्या आहे.
बाईट : सचिन माहुरे
0
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 20, 2025 03:31:28Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_bike_chor
चोरीच्या महागड्या दुचाकी विक्री करणारी टोळी अटक
अँकर
नाशिक शहरातून चोरी केलेल्या दुचाकी ग्रामीण भागात कमी किमतीमध्ये विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यात आलीये... गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने निलगिरी बाग, छत्रपती संभाजीनगर रोडवर ही कारवाई केलीये.... सत्यम उर्फ देवा मिलिंद गरुड, साहिल आझाद शेख , विकास बन्सीलाल कुमावत असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. टोळीकडून चोरीच्या १५ दुचाकी जप्त केल्या. गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली... एकजण चोरीच्या दुचाकीचा वापर करत आहे... पथकाने सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत गरुड नाव सांगितले. अधिक चौकशी केली असता शेख, कुमावत आणि एक अल्पवयीन मुलाच्या मदतीने शहरात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. दुचाकी, निफाड, पिंपळगावला विक्री केल्याची कबुली दिलीये.... ही टोळी चोरी केलेली महागडी दुचाकी ग्रामीण भागात अवघ्या १० ते १२ हजारांत विक्री करत होती. कागदपत्रे आणून देतो असे सांगून मिळेल ती रक्कम घेऊन संशयित दुचाकी विक्री करत होते. चोरीच्या दुचाकीचा नंबर बदली करून वापर करत होते. चोरीच्या दुचाकीच्या नंबरप्लेट काढून त्याची अदलाबदल करत दिशाभूल करत होते. चोरीची दुचाकी विक्री करण्याकरिता संशयित आई, आणि कुटुंबातील अन्य व्यक्ती आजारी असल्याचे सांगून पैशांची गरज असल्याने गाडीचा व्यवहार करायचे. असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे....
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 20, 2025 03:30:36Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणारा दीपक काटे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता
- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणारा दीपक काटे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता
- दीपक काटेचा जामीन झाल्यानंतर आपली भूमिका मांडण्यासाठी आज सोलापूर शहरात येण्याची शक्यता
- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक हल्ला प्रकरण काहीसे निवळले असताना पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा वादाचा भडका उडण्याची शक्यता
- दीपक काटे पत्रकार परिषद घेण्यासाठी सोलापुरात आला तर पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड आणि दीपक काटे यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता
- त्यामुळे दीपक काटे आज सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार का?
- दीपक काटेच्या पत्रकार परिषद झालीच तर त्यानंतर आणखी कोणते पडसाद उमटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 20, 2025 03:03:03Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Alefata Theft Open
File:03
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc: जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुश्क्या आवळण्यात आळेफाटा पोलिसांना आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून पोलिसांनी पाच आरोपींना जेरबंद केलंय तर अद्यापही पाच आरोपी फरार आहेत अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सध्या आळेफाटा पोलीस करत आहेत
Byte: रविंद्र चौधर (उपविभागीय पोलिस अधिकारी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report