Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

तिवसा में पती-पत्नी के वाद से मची खलबली: बेटे को नदी में फेंकने की कोशिश

ADANIRUDHA DAWALE
Sept 19, 2025 05:17:56
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_TIWASA_MOHTER एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 पती-पत्नीच्या वादातून पत्नी उठली होती मुलाच्या जीवावर; मुलाला नदीत टाकण्यासाठी पत्नी पोहचली होती नदीवर अँकर :– अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातील एका कुटुंबातील पती-पत्नीचा वाद टोकाला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रोज रोज पती-पत्नीचे होणारे वाद आणि रागाच्या भरातून पत्नी पोटच्या मुलाच्या जीवावर उठली असल्याचे पाहायला मिळाले आहे. पत्नी आपल्या मुलाला नदीत टाकण्यासाठी चक्क गावातील पिंगळा नदीवर पोहचली असून नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेने चिमुकल्याचा जीव वाचला आहे. जवळपास 20 मिनिट पुलाच्या कठळ्यावर आईने मुलाला उभे केले होते त्यामुळे पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वारंवार पती-पत्नीत वाद होत असल्याने पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे.
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Sept 19, 2025 07:22:29
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - गोपीचंद पडळकरांच्या टिकेवर जयंत पाटलांनी उत्तर देणे टाळलं,हात जोडून जयंत पाटलांनी बाळगले मौन.. अँकर - आमदार गोपीचंद पडळकर यांनी अभियंतेच्या आत्महत्येवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांच्या वर खालच्या पातळीवर टीका केली आहे. पडळकरांच्या टिकेनंतर जिल्ह्यातलं राजकारण चांगलं तापलं आहे.पडळकर यांच्या टिके बाबत जयंत पाटील काय बोलतात,याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिला आहे.मात्र पडळकर यांच्या टीकेवर जयंत पाटील यांनी बोलणं टाळले आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या एका कार्यक्रमासाठी जयंत पाटील हे उपस्थित होते, यावेळी पडळकरांच्या टीकेबाबत विचाराल्यानंतर जयंत पाटलांनी हात जोडत मौन बाळगणं पसंत केले.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 19, 2025 07:02:14
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात जत मध्ये निघणाऱ्या मोर्चासाठी इस्लामपूर शेकडो जयंत पाटील समर्थक रवाना.. अँकर - सांगलीच्या जत मधील अभियंता प्रकरणावरून गोपीचंद पडळकर विरोध जयंत पाटील असा संघर्ष निर्माण झाला आहे गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या जहरी टिकेच्या निषेधार्थ जत मध्ये राष्ट्रवादी आणि जयंत पाटील समर्थकांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चासाठी जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते जत साठी रवाना होत आहेत. तत्पूर्वी इस्लामपूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्रित येत गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि फलक झळकवत संताप व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आज जत मध्ये देखील परळकरांच्या विरोधात निघणाऱ्या मोर्चासाठी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमा होत आहेत.जत पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता आत्महत्या प्रकरणावरून आमदार गोपीचंद पडळकरंकडून जयंत पाटलांवर अर्वाच्य भाषेत व खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली होती.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 19, 2025 07:02:03
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_BULET_CHORI एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावतीत बुलेट विकताना अटक अट्टल बाईक चोर जेरबंद; ११ दुचाकी जप्त, ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत अँकर :– अमरावती शहरातील कॅम्प परिसरात चोरीची बुलेट विकताना एक अट्टल बाईक चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेत ११ चोरीच्या दुचाकींसह ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चोरीप्रकरणी तिवसा तालुक्यातील शहजादखाँ शब्बीरखाँ यांची बुलेट क्लासिक ३५० चोरली गेल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी झिरो डिग्रीजवळ चोरीची बुलेट विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाई केली. चौकशीत आरोपीने एकूण २३ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून त्यातील ११ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित दुचाकींचे सुटे भाग विकून गाड्यांची विल्हेवाट लावल्याची माहितीही समोर आली. आरोपी मोटारसायकल मेकॅनिक असून पूर्वीपासूनच वाहन चोरीप्रकरणी रेकॉर्डवर आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 19, 2025 07:01:27
Beed, Maharashtra:बीड: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यासोबत खास बातचीत.... 121 anc- ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आज पुन्हा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ओबीसी आरक्षण बचावासाठी त्यांचे सर्वात जास्त आंदोलने आणि सभा ह्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. दिवसभरात त्यांची दिनचर्या कशीं असते... ते नेमके डाएट कसे करतात यांसह त्यांच्यासोबत राजकीय प्रश्नावर बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी... लक्ष्मण हाके 121 pointers - नाश्तामध्ये पोहे, आणि गोड शिरा मिळतोय.. रात्री दोन वाजतात झोपायला.. दहा वाजता रॅली संपते. मी कुठल्याही हॉटेलमध्ये राहत नाही. कोणत्याही कार्यकर्त्याच्या घरी मी मुक्काम करतो. - उपोषण केल्यानंतर 15 किलो वजन घटले, ते कधीच वाढले नाही. - माझी व्हील पॉवर स्ट्राँग आहे. त्यामुळे मला कुठलाही आजार नाही - जरांगे पाटील यांचीही व्हील पॉवर स्ट्राँग असू शकते... आम्हाला खासगी जीवनच नाही. - खासदार बजरंग सोनावणे यांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला आहे. - भुजबळ साहेब काल बोलले, आम्ही आंदोलन सुरू झाल्यापासून बोलतो.. जरांगेच्या आंदोलनाला शरद पवारांचे प्रतिनिधी प्रमोट करतात. - जरांगे यांनी देशातील लोकसंखेमध्ये मराठा किती टक्का आहे ते सांगावा... जरांगेचे ज्ञान अगाध आहे. जरांगे याने आधी ABCD शिकावी, त्यानंतर त्याने रिझर्वेशन चे स्पेलिंग लिहावे. जरांगेचं काम दिल्लीत नाही तर कॅनडा, युएस, ब्रिटन या देशात खरी गरज आहे अशा महान व्यक्ती महत्त्वाची... दिल्लीत जाऊन काय करणार आहे.. - मला ओबीसीचा आरक्षण वाचवायचा आहे.मला कुठलेही राजकारण करायचं नाही. - मी धनगर समाजाचा आहे. मात्र मला सध्या 18 पगड जातीतील झोपडं वाचवायचा आहे. - मी कायद्याचा आदर करतो.. राजश्री शाहू महाराजांचं एक विधान मी बोलून दाखवले होते. मला कुठल्याही समाजातील माता बहिणींचा अपमान करायचा नव्हता. 96 कुळी म्हणून घेणाऱ्या लोकांना कधीही शाहू महाराजांचे तत्व कळणार नाहीत. - गेवराई ते अजून देसाई आहे त्यामुळेच ओबीसीच्या मनात दहशत आहे. त्यामुळे प्रतिकात्मक आंदोलन मी उभा केला आहे. आता दंड थोपटले तर भविष्यात आम्हाला दांडका मोर्चा काढावा लागेल. -
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 19, 2025 07:00:35
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 19, 2025 06:57:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra: PKG Sng_padlakar_patil स्लग - अभियंत्याची आत्महत्या,पण संघर्ष जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर मध्ये.. अँकर - भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यातला संघर्ष सर्वपरिचित आहे.मात्र गोपीचंद पडळकर यांच्या मतदारसंघातल्या एका अभियंतेच्या आत्महत्येवरून आमदार जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. व्ही वो - आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जयंत पाटील यांच्यातला वैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. पडळकरांकडून शरद पवारांबरोबर जयंत पाटलांवर नेहमीच घणाघाती टीका करण्यात आली आहे.सांगली जिल्ह्याच्या राजकारणात जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर,असा राजकीय संघर्ष राहिला आहे.आता हा संघर्ष जत मधल्या पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांच्या आत्महत्येनंतर उफाळून येऊ लागला आहे.अभियंता वडार याच्या आत्महत्येला आमदार गोपीचंद पडळकर यांचा संबंधित जबाबदार असल्याचा आरोप वडार कुटुंबाकडून करण्यात आला. बाईट - बाईट - हेमंत वडार - मृत अवधुतचा चुलत भाऊ - व्ही वो - अवधूत वडार यांना टेंडरची बिल काढण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर व त्यांचे स्वीय सहाय्यक, जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्याकडून वारंवार त्रास देण्यात येत होता,यातून आमदार पडळकर यांनी अवधूतला त्यांच्या कार्यालयात नेऊन दमदाटी देखील केली होती.त्यामुळे मानसिक छळाला कंटाळुन अवधुतने आत्महत्या केल्याचा आरोप वडार यांच्या कुटुंबाकडुन करत आमदार गोपीचंद पडळकर त्यांचे स्वीय सहाय्यक जिल्हा परिषदेचे एक सदस्य आणि जिल्हा परिषदेचे नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीतील कर्मचारी व अधिकारयांना जबाबदार धरत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वडार कुटुंबाने सांगली शहर पोलीस ठाण्याला थेट आत्मदहनाचा इशारा देखील दिलाय. बाईट - रविना वडार - बहीण - मृत अभियंत. व्ही वो - मात्र गोपीचंद पडळकरंकडून सर्व आरोप फेटाळत,अभियंतेच्या आत्महत्या प्रकरणी आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र आमदार जयंत पाटलांकडून रचण्यात आल्याचा आरोप करत जत मध्ये थेट जयंत पाटलांच्या निषेधार्थ मोर्चा काढत,अभियंता अवधूत वडारच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली,पण ही मागणी करताना पडळकरंकडून जयंत पाटलांवर अर्वाच्य व खालच्या भाषेत जहरी टीका करण्यात आली आहे. साऊंड बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार -भाजपा. व्ही वो - गोपीचंद पडळकररांकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या टिकेनंतर सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि जयंत समर्थक आक्रमक झाले आहेत. यातून गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मोर्चे आंदोलन करण्यात येत आहेत. व्ही वो - जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात गेल्या काही वर्षांपासून आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. पडळकरांकडून सातत्याने जयंत पाटलांवर वेगवेगळ्या पद्धतीने टीका करण्यात येते.मात्र जयंत पाटलांकडून नेहमीच संयम बाळगणं पसंत करण्यात आले आहे.मात्र आता गोपीचंद पडळकरांकडून करण्यात आलेल्या जहरी टीका नंतर जयंत पाटील कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे,मात्र जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांचातील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे,हे नक्की..
1
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 19, 2025 06:52:11
Shirdi, Maharashtra:Anc - आई-वडील विभक्त झाल्याने दूरच्या नातेवाईकांकडे सांभाळ करण्यासाठी दिलेल्या सख्ख्या 4 बहिणींवर पालनकर्त्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झालाय.. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे.. गेल्या पाच वर्षांपासून मुलींवर लैंगिक अत्याचार सुरू होते असे फिर्यादीत म्हटलं आहे.. V/O - राहुरी तालुक्यात सख्ख्या 4 बहिणींवर नातेवाईकानेच वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.. चारही पीडित मुली नाशिक जिल्ह्यातील असून त्यातील एक मुलगी सज्ञान तर इतर 3 मुली अल्पवयीन आहेत.. सज्ञान झालेल्या मुलीचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला.. ती बहिणींना भेटण्यासाठी राहुरी तालुक्यात आल्यानंतर पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यात आला.. अल्पवयीन मुलींपैकी एक 16, दुसरी 14 आणि तिसरी 10 वर्षांची आहे.. मोठ्या बहिणीच्या फिर्यादीवरून आरोपी बजरंग कारभारी साळुंखे, इतर दोन पुरुष आणि एक महिला अशा चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. पोलिसांनी आरोपी बजरंग कारभारी साळुंखे याला तत्काळ ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. या घडलेल्या प्रकाराबाबत पोलिस दुपारी प्रेस घेऊन माहिती देणार आहेत...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 19, 2025 05:03:56
Washim, Maharashtra:वाशिम: File:1909ZT_WSM_FARM_ACCE_ROAD रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील लाडेगाव येथील संत्रा उत्पादक शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहेत. गावातील शेतकऱ्यांनी पिकवलेला माल बाजारपेठेत नेण्यासाठी योग्य पांदण रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.लाडेगाव ते हिवरा शिवार या पांदण रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून,रस्त्यावर सर्वत्र खड्डे व चिखल असल्यामुळे शेतमाल बाहेर काढणे अशक्य झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांना शेतातच माल रस्त्यालगत ठेवावा लागत असून, त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.शेतकरी अमोल विध्वंस यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संत्रा पिक गावापर्यंत आणण्यासाठी अक्षरशः धावपळ करावी लागते.प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा,अशी मागणी त्यांनी केली.गावातील इतर शेतकऱ्यांनीही हीच मागणी पुढे मांडली असून, रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
1
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 19, 2025 05:03:30
2
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 19, 2025 05:03:15
kolhapur, Maharashtra:Ngp radison Bharane live u ने फीड पाठवले --------* नागपूर दत्ता भरणे, कृषी मंत्री (on अतिवृष्टी नुकसान) राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे... हवामान बदलमुळे एकाच वेळेस मोठा पाऊस होतोय.. शेती पिकांचे मोठे नुकसान.. आतापर्यंत 30 जिल्ह्यात 195 तालुक्यात.. 654 महसूल मंडळमध्ये 62 लाख,17,हजार 540 एकर क्षेत्रात शेती पिकाचे नुकसान झालेय सरकारचे लक्ष आहे... जिल्ह्याचे पालकमंत्री ,अधिकारी पाहणी करताय.... ज्यांचे नुकसान झाले त्याबाबत पंचनामा करण्याचे आदेश दिलेय....नुकसान झालेल्याना शासन मदत करेल ----------------- (on ओला दुष्काळ) परिस्थिचा अंदाज घेऊन..... अजून पाऊस सुरुच आहे, सगळा विचार करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील (on मराठा आरक्षण दुमत.. राष्ट्रवादीत) राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणावरही अन्याय करणार नाही जे योग्य आहे तो निर्णय घेतील (on ताई -दादा बॅनर) ते पहिले नाही त्यावर बोलणे योग्य नाही (on पडळकर) याबाबत मला माहित नाही..कोणी वैयक्तिक टीका करू नये (on भुजबळ ) याबाबत भुजबळ यांना विचारा (on ओला दुष्काळ) अंदाज घेऊन सरकार विचार करेल... हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 19, 2025 04:52:41
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 19, 2025 04:31:26
Nashik, Maharashtra:Nashik breaking - *कुंभमेळा नियोजन संदर्भात होत असलेल्या बैठकांना बोलवत नसल्याने पुन्हा खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली नाराजी* - गेल्या एक ते दीड वर्षात कुंभ नियोजन संदर्भात झालेल्या बैठकांना बोलावले नाही - मागच्या कुंभ मध्ये मी सिन्नरच आमदार असलो तरी मला सर्व बैठकांना बोलवण्यात येत होते - *मला वैयक्तिक सातत्याने डावलण्यात येत असल्याचे देखील खासदार राजाभाऊ वाजे यांचे गंभीर आरोप* - कुंभ नाशिक मध्ये होतो मी नाशिकचा खासदार असताना देखील मला डावलण्यात येत असल्याचे याआधी देखील खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले होते आरोप - मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या कार्यक्रमाला देखील मला बोलवण्यात आले नाही - लोकप्रतिनिधी म्हणून मला बोलावले तर मी लोकांच्या सूचना मांडेन - कुंभमेळा कामाचे टेंडर कोणाला देता यात मला इंटरेस्ट नाही लोकांचा प्रतिनिधी म्हणून मला जर यापुढे बोलवले तर मी जाईल Byte- राजाभाऊ वाजे खासदार नाशिक
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 19, 2025 04:30:39
Washim, Maharashtra:वाशिम: File:1909ZT_WSM_SEARCH_EXPEDITION रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यातील अडाण नदीत वाहून गेलेल्या एका अनोळखी पुरुषाचा मागील तीन दिवसापासून शोध सुरू आहे.16 सप्टेंबर रोजी शिवणी गावाजवळील पुलावरून मृतदेह वाहून जाताना दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर संत गाडगेबाबा मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे पथक शोधकार्यात सहभागी झाले.मात्र नदीला पूर, जोरदार प्रवाह, भोवरे, बंधारे आणि दाट झुडपे यामुळे अडचणी येत आहेत.मृतदेह नदीपात्रात कुठेतरी अडकून राहिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.पहिल्या दिवशी खडी धामणी, दुसऱ्या दिवशी अडाण धरण ते शिवणी गाव परिसरात शोध घेण्यात आला, पण काहीही निष्पन्न झाले नाही.तिसऱ्या दिवशी दिवसभर शोधमोहीम राबवूनही यश मिळाले नाही.आज चौथ्या दिवशीही सकाळपासून शोधमोहीम सुरू राहणार आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 19, 2025 04:30:21
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1909ZT_CHP_UTSAV_PUJAA ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात श्री माता महाकाली महोत्सवाचे पार पडले मंडप पूजन, २७ सप्टेंबरपासून होणार भक्तिभावात महोत्सवाची सुरुवात, यंदाचे असेल सलग चौथे वर्ष अँकर:---२७ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त श्री माता महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मंडप पूजन करण्यात आले. माता महाकाली पटांगणात आयोजित या महोत्सवात पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रात श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून ३० सप्टेंबरला नगर प्रदक्षिणा व पालखी काढण्यात येणार आहे. महोत्सवाची तयारी उत्साहात सुरू असून आज मंदिर परिसरात विधीवतरीत्या मंडप पूजन करण्यात आले. शारदीय नवरात्राच्या पावन पर्वावर आयोजित श्री माता महाकाली महोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम ठरणार आहे. महोत्सव संयोजक  आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून येथील व्यवस्थेचा आढावा घेतला. दरवर्षी प्रशासनाकडून महोत्सवाला मोठे सहकार्य मिळत असते. यंदाही महोत्सव समितीसोबत समन्वय साधून उत्तम नियोजन करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. बाईट १) आ. किशोर जोरगेवार, संयोजक, महाकाली महोत्सव बाईट २) ईश्वर कातकडे, अपर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
1
comment0
Report
Advertisement
Back to top