Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली फलों के महोत्सव में इन फलों का बेमिसाल स्वाद

SMSarfaraj Musa
Sept 20, 2025 01:16:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - सांगलीत फळ महोत्सवाचे आयोजन, जिल्ह्यात पिकणाऱ्या फळांचं प्रदर्शन. अँकर - सांगलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन मंडळाकडून फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील स्थानिक फळांना मार्केट उपलब्ध व्हावे,तसेच नागरिकांना जिल्ह्यात पिकणाऱ्या फळांची माहिती आणि ओळख व्हावी या उद्देशाने या फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आला असून या फळ महोत्सवामध्ये सांगलीत फिरणाऱ्या डाळिंब पेरू,सिताफळ ,ड्रॅगनफ्रुट ,केळी आणि अँपल बोर सारख्या फळांचा प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून 21 सप्टेंबर पर्यंत हे फळ महोत्सव सुरू राहणारा असून या निमित्ताने सांगलीकरांना जिल्ह्यातील पिकणाऱ्या फळांचा आस्वाद घेण्याची पर्वणी मिळणार आहे.
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Sept 20, 2025 03:17:11
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_APP साताऱ्यातील सोमनाथ जाधव या शिक्षकाने एक खास शैक्षणिक ऍप्लिकेशन तयार केले आहे, ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. या शैक्षणिक ॲपचा शाळा आणि पालकांना उपयोग होणार असून या ॲप चे अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पालकमंत्री कार्यालयात करण्यात आले.. पहिलीपासून ते अगदी कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी हे ऍप्लिकेशन खूप उपयुक्त ठरणार असून. शाळा आणि महाविद्यालयांना या ऍपच्या मदतीने मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल. महत्त्वाचे म्हणजे, मुलांमध्ये दिवसभर होणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती आणि शैक्षणिक माहिती यामुळे पालकांना लगेच मिळणार असल्याची माहिती सोमनाथ जाधव यांनी दिलीये. बाईट: सोमनाथ जाधव (ऍप डेव्हलपर)
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 20, 2025 03:17:01
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ढग फुटी सदृश्य पाऊस सातत्याने होत असून यामुळे लाखो हेक्टर वरील पीक बाधित झाली आहेत. शेतकऱ्यांनी पैश्याची जमवा जमाव करून घेतलेले पीक मातीमोल झाली आहेत. मागील आठ दिवसा पासुन पडत असलेल्या पाऊसामुळे उरली सुरली पिके उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांवर आलेल्या या अस्मानी संकटाला राज्य सरकार व जिल्हा प्रशासन मात्र गांभीर्याने घेतांना दिसत नाही. राज्य सरकारने परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलेली १२८ कोटीची मदत हि अत्येत तुटपुंजी आहे, मागील वर्षी नुकसानीची रक्कम ५४८ कोटी एवढी होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम तुटपुंजी मदत आहे,बदलल्या निकषामुळे पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाहीये,पिकांचे भाव गडगडले असून परिणामी शेतकरी आत्महत्यांचा मार्ग स्वीकारत आहेत. राज्य सरकारने पीक विमा कंपनीच्या नियमात केलेले बदल तात्काळ दुरुस्त करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा व N.D.R.F. च्या निकषा प्रमाणे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 03:01:03
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 02:47:24
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूरकरांसाठी खुशखबर, सोलापूर ते मुंबई आणि बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून सुरु होणार, आजपासून तिकीट बुकिंगला सुरवात - सोलापूरकरांसाठी खुशखबर, सोलापूर ते मुंबई आणि बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून सुरु होणार - मुख्यमंत्री फडणवीस देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला - आ. देवेंद्र कोठे, आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार - मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढला - बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून होणार सुरु - केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती - 15 ऑक्टोबर पासून दुपारी 12.55 मिनिटांनी सोलापूर-मुंबई आणि दुपारी 2.45 मुंबई-सोलापूर विमानसेवेस प्रारंभ - तर सकाळी 11.10 वाजता बंगळूरू-सोलापूर आणि दुपारी 4.15 वाजता सोलापूर-बंगळूरू असणार विमानसेवा - या दोन्ही शहरासाठी 20 सप्टेंबरपासून नागरिकांना विमान तिकीट बुकिंग करता येणार आहे - काही दिवसांपूर्वीच सोलापूर-गोवा विमानसेवा सुरु झालीय, ज्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय - त्यानंतर आता मुंबई आणि बंगळूरू साठी देखील विमानसेवा सुरु होतं असल्याने सोलापूरकरामध्ये आनंद पाहायला मिळतोय Byte : देवेंद्र कोठे ( भाजप आमदार, सोलापूर मध्य)
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 20, 2025 02:32:54
Hingoli, Maharashtra: अँकर- बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी काल हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा बांधवांनी मोर्चा काढला. यावेळी बंजारा समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याचे बघायला मिळालं.आम्ही रोडवरचे आंदोलन करतोय,मोर्चे काढतोय,निवेदन देतोय,तरी सुद्धा सरकार आम्हाला आमच्या हक्काचं एसटी प्रवर्गातील आरक्षण देत नसेल तर मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे,शिवाय मी मंत्रीसंजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक,भाजपचे आमदार तुषार राठोड,धर्मगुरू तथा विधानपरिषद सदस्य बाबू सिंग राठोड यांना ही राजीनामा देण्याचं आवाहन केलय, बंजारा समाजासाठी त्यांचं आणि माझं तेवढंच कर्तव्य आहे. उद्या जर बंजारा समाजाला आदिवासींचे प्रमाणपत्र नाही मिळाले तर लोक आम्हाला रस्त्यावर फिरू देतील का, समाजाच आमच्यावर प्रेशर आहे. मी राजीनामा देतोय म्हटल्यावर इतरांना सुद्धा राजीनामा द्यावा लागेल म्हणत काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांनी सरकारला ईशारा दिलाय, त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी 121 राजेश राठोड- विधान परिषद सदस्य (आमदार)
3
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 20, 2025 02:32:24
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 20, 2025 02:32:03
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यात किसान ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. किसान ब्रिगेड च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात देशातील आणि राज्यातील अनेक शेतकरी नेत्यांचा मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या शेतकरी नेत्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत उद्भवणाऱ्या समस्या आणि भविष्यात येणाऱ्या समस्यांवर मात करण्याकरिता मार्गदर्शन केले. या बैठकीत शेतकऱ्यांचा मोठा आंदोलन उभारणार असल्याचा सूर दिसून आला.सरकारच्या धोरणांवर टीका करताना राकेश टिकैत म्हणाले, सरकारची पॉलिसीच शेतकऱ्यांचं नुकसान करण्याची आहे.या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाचा सूर देशभरात घुमण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 20, 2025 02:31:38
Yeola, Maharashtra:अँकर:- नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातल्या गारखेडा गावात. जिल्हा परिषद शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र शाळेत जाण्याचा रस्ता चिखलमय झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.गारखेडा ते गवंडगाव रस्ता गेल्या 15 वर्षांपासून दुर्लक्षित असून या रस्त्यावर खड्ड्यांच साम्राज्य पसरला आहे.पावसाळ्यात चिखल साचून पायी चालणे देखील मुश्किल होत आहे त्यात गारखेडा गावच्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न शिक्षणात अडथळा ठरत आहे. त्यामुळे गारखेडा ते गवंडगाव हा रस्ता दुरुस्त न झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे .प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. बाईट 3:-पालक, गारखेडा बाईट:2-विद्यार्थी, गारखेडा
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 20, 2025 02:17:31
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_R4_DIMAGE भूम मधील पाझर तलाव फुटला दीडशे हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान. जमीन खरडून गेली. जमिनीत दगड गोट्यांचा खच, पाईपलाईन उघड्या पडल्या, विहिरी बुजल्या व पीक मातीवर निकृष्ट कामामुळे पाझरतला फुटला ,ग्रामस्थांचा आरोप. Anchor धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अक्षरशा जमीन खरडून गेली असून दीडशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकं वाहून गेली आहेत. तलाव फुटल्याने जमिनीत दगड गोट्यांचा खच निर्माण झाला आहे. पाईपलाईन उघड्या पडल्या आहेत. अनेक विहिरी गाळाने बुजल्या आहेत. शेतकऱ्यांचं उभं पीक मातीमोल झालं आहे. दरम्यान या पाझर तलावाच्या कामात निकृष्ट दर्जा ठेवण्यात आल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. तलाव फुटीची चौकशी स्वतंत्र समितीमार्फत व्हावी अशी मागणी होत आहे. Byte ग्रामस्थ
2
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 20, 2025 02:16:26
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 2009_BHA_FARMER_PUJA FILE - 3 VIDEO, 4 IMAGE धान पिकावरील खोडकिडा हाकलण्यासाठी भंडाऱ्याच्या बाम्हणीत मध्यरात्री मांत्रिकाकडून उतारा.....विज्ञानयुगातही अंधश्रद्धेचा बाजार.....शेतकऱ्यांनी गाव बंद करून उरकला विधी..... ANCHOR :- विज्ञानाच्या युगात आताही शेतकरी बुवाबाजीत अडकला आहे. धान पिकावरील रोग औषधीने नाही तर अघोरी पूजेने जाणार त्यासाठी तुमसर तालुक्यातील बामणी गावातील नागरिकांनी रात्रीच्या सुमारास गावातील मंदिरात पूजा केली.... आता ही चर्चा संपूर्ण जिल्हाभर पोहचल्याने प्रशासनाने देखील गावाला भेट दिली आहे... Vo :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मागील काही दिवसांपासून धान पिकावर खोडकिड्यांने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या बाम्हणी येथील शेतकऱ्यांनी मध्यरात्री गावातील मंदिरात मांत्रिकाकडून विशेष पूजन करवून उतारा करून घेतल्याची माहिती मिळतात सर्वत्र खळबळ उडाली. या पूजेत बाधा येऊ नये, यासाठी गावाचे दोन्ही रस्ते पूजाकर्म होईपर्यंत जवळपास तासभर बंद करून ठेवले होते. विज्ञानयुगात वावरणाऱ्या गावकऱ्यांच्या या कृत्याची वार्ता दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीत पसरल्याने एकच खळबळ माजली आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे १,७०० असून ४५० शेतकरी कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे खोडकिडीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने गावकऱ्यांनी फवारणी आणि कीडनाशकाचा वापर करण्याचा मार्ग सोडून, असा अघोरीप्रकार केला. या पूजेसाठी गावकऱ्यांनी सामूहिकरीत्या वर्गणी सुद्धा गोळा केली होती. बाहेरगावाहून मांत्रिकाला पाचारण केले. त्याला मानधन देऊन मंदिरात मध्यरात्री मंत्रोच्चारासह पूजन केले. या पूजेनंतर मांत्रिकाने, लवकरच कीड नष्ट होईल असे गावकऱ्यांना वाटले. पण या संदर्भात तालुक्यात वार्ता पसरल्याने प्रशासन खडबडून जागा झाला. तहसीलदार, उप विभागीय अधिकारी गावात पोहचत नागरिकांना योग्य मार्गदर्शन केलं जर असा प्रकारे अंध श्रद्धेमुळे पूजा केली असेल तर नक्की कारवाई केली जाणार असल्याचं तहसीलदार यांनी सांगितलं आहे.... BYTE :- गणेश दिघे, तहसीलदार तुमसर
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 20, 2025 02:16:13
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 20, 2025 02:16:04
Washim, Maharashtra:वाशिम: File:2009ZT_WSM_EKBURJI_DAM रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशीम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात मृत जनावर आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच हा प्रकार समोर आला.त्यामुळे परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे.सांडव पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक गर्दी करतात.याच दरम्यान काही पर्यटकांना काठावर मृत जनावर दिसले.त्यांनी छायाचित्रे काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने हा प्रकार उघडकीस आला.नागरिकां च्या तक्रारीनंतर प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून मृत जनावर हटवले.तरीदेखील पाणीपुरवठ्या च्या स्वच्छतेवर परिणाम होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. अशा घटना टाळण्यासाठी धरण परिसराची नियमित स्वच्छता करावी आणि योग्य देखरेख ठेवावी,अशी मागणी नागरिक व पर्यटकांकडून नगरपालिका प्रशासनाकडे होत आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 20, 2025 02:15:35
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 2009_BHA_CATTLE FILE - 1 VIDEO, 3 IMAGE गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांची ट्रकला धडक....चालक फरार तर गोवंशाची सुटका..मध्यरात्री चालकांच्या वादातून पुढे आले गोतस्करीचे प्रकरण.... Anchor : छत्तीसगड वरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या तीन महिंद्रा पिकअप वाहन ट्रॅकला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला जबर धडक दिली असून बोलेरो वाहन चालक व ट्रक चालक यांच्या कडाक्याचे भांडण झाले असतांना याची माहिती गावातील युवकांना होताच गावातील युवक तात्काळ रस्त्यावर आले व तिन्ही बोलेरो गाड्यांची पाहणी केली असता यात तिन वाहनामध्ये 13 गोवंश असे ऐकून तब्बल 40 गोवंश आढळून आले.आणि याबाबतची माहिती जवाहरनगर पोलिसांना देण्यात आली.. मात्र युवकांच्या रोष बघून पोलिसांनी कारवाई करत या जनावरांना गराडा येथील गोशाळेत पाठविले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top