Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

मुंबई पथक का छापा: हरण की कातड़ी तस्करी का बड़ा भंडाफोड़

SKSudarshan Khillare
Sept 20, 2025 02:16:13
Yeola, Maharashtra
अँकर:- मुंबईतील पथकाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मनमाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हरणाच्या कातडी ची तस्करी करणारी एक टोळी येणार असल्याची गुप्त माहिती येवला वन विभागाला मिळाली होती दरम्यान वन विभागाने सापळा रचून दीपक सुरेश चव्हाण, राहणार हेकलवाडी, जिल्हा धुळे, मारुती लक्ष्मण उईके, राहणार धाकुलगाव जिल्हा अमरावती, प्रवीण रमेश बनसोड राहणार वर्धा, आणि अभिलाल अर्जुन पाटील, राहणार सडगाव जिल्हा धुळे या चौकारोपींना ताब्यात घेण्यात आले असून या आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास येवला वनविभाग करत आहेत..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Sept 20, 2025 04:03:13
Kolhapur, Maharashtra:Kop Chori Feed:- 2C Anc:- कोल्हापूर पोलिसांनी न्यू शाहूपुरी मध्ये झालेल्या 55 लाखाच्या घरफोडीचा छडा लावण्यात यश मिळविले आहे.. पोलिसांनी कर्नाटक टोळीला या प्रकरणी अटक जेरबंद केलय. या टोळीकडून 25 तोळे दागिने, डायमंड दागिने आणि चोरीच्या पैशातून घेतलेल्या चार चाकी दुचाकी असा 37 लाखांचा मुद्देमान जप्त करण्यात आलाय. व्यंकटेश रमेश, गिरीश व्यंकटेश, रणजीत रमेश अशी अटक केलेल्या बेंगलोर आणि चलकेरे येथील आरोपींची नावे आहेत. यातील व्यंकटेश रमेश याच्यावर कर्नाटक मध्ये घरफोडीचे 20 गुन्हे दाखल आहेत, व्यंकटेश हा कोणत्याही परिसरात वास्तव करत नाही, त्यामुळे त्याला जेरबंद करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होतं
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 20, 2025 04:02:54
kolhapur, Maharashtra:नागपूर - *जिल्हा परिषदांचे सर्कल नवीन रोटेशन बदलला आव्हान देणाऱ्या चारही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली..* - *त्यामुळे आता निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..* - याचिका गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावल्या आणि राज्य सरकारचा निर्णय अवैध नसल्याचे जाहीर केले. - रोटेशनसाठी ही पहिली निवडणूक ग्राह्य धरली जाणार आहे. नागपूर, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांतील राजकीय कार्यकर्त्यांनी याचिका टाकली होती... - . - याचिकेत केवळ काल्पनिक मुद्दे मांडले आहेत. जागेच्या आरक्षणाबाबत कोणीही कोणताही हक्क सांगू शकत नाही असे निरीक्षण नोंदवत याचिका फेटाळली...
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 20, 2025 03:45:55
Yavatmal, Maharashtra:WKT यवतमाळ जिल्ह्यात झालेला अति पाऊस आणि पुरामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हळद, ऊस अशी प्रमुख पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून असल्याने ही पिके सडली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कुजलेल्या सोयाबीनच्या काड्या दिसत असून शेतशिवारांची अवस्था अतिशय भयानक झाल्याचे दृश्य आहे. मोठे परिश्रम करून आणि खर्च करून शेतकऱ्यांनी लागवड केलेली आणि आता हातातोंडाशी आलेली ही पिके मातीत गेल्याने तसेच शेतजमिनी ही खरडून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 20, 2025 03:31:41
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 20, 2025 03:31:14
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 20, 2025 03:31:06
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn imtiyaj jalil av Use jalil file shots छत्रपती संभाजी नगर च्या साजापूर येथील इनामी जमिनीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले  आहे,  इम्तियाज यांना सोमवारी न्यायालयात हजर राहण्याची त्यांना नोटीस बजावली आहे. याबाबत इम्तियाज यांनी, पोलिस प्रशासनाने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला असला तरी मी लढत राहील, अशी समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी नोटीस देऊनही इम्तियाज जलील चौकशीसाठी हजर झाले नव्हते. आता दोषारोपपत्र दाखल झाले आहे त्यामुळे इम्तियाज यांना कोर्टात हजर राहावे लागेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 20, 2025 03:30:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn water supply av Feed attached नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी  शटडाऊन घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र पावसामुळे जलवाहिनीच्या जोडणीचे काम रखडले आहे. त्यामुळं  शहरातील अनेक भागांतील पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. सोमवारपासून नवरात्रोत्सव सुरु होत असल्यामुळे हा उत्सव संपल्यानंतर पुन्हा शटडाऊन घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे... शहरासाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीच्या जोडणीसाठी नऊशे मिलिमीटर व्यासाच्या पाणी पुरवठा योजनेवर शटडाऊन घेण्याचे नियोजन महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात सलग सहा दिवस शटडाऊन घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु याच दरम्यान पैठण परिसरात मोठ्या पावसाने हजेरी लावली. त्याचा परिणाम शटडाऊनवर झाला. ज्या जलवाहिनीची जोडणी करायची ते काम अजूनही प्रलंबित आहे..  
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 20, 2025 03:17:11
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_APP साताऱ्यातील सोमनाथ जाधव या शिक्षकाने एक खास शैक्षणिक ऍप्लिकेशन तयार केले आहे, ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. या शैक्षणिक ॲपचा शाळा आणि पालकांना उपयोग होणार असून या ॲप चे अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पालकमंत्री कार्यालयात करण्यात आले.. पहिलीपासून ते अगदी कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी हे ऍप्लिकेशन खूप उपयुक्त ठरणार असून. शाळा आणि महाविद्यालयांना या ऍपच्या मदतीने मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल. महत्त्वाचे म्हणजे, मुलांमध्ये दिवसभर होणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती आणि शैक्षणिक माहिती यामुळे पालकांना लगेच मिळणार असल्याची माहिती सोमनाथ जाधव यांनी दिलीये. बाईट: सोमनाथ जाधव (ऍप डेव्हलपर)
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 20, 2025 03:17:01
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ढग फुटी सदृश्य पाऊस सातत्याने होत असून यामुळे लाखो हेक्टर वरील पीक बाधित झाली आहेत. शेतकऱ्यांनी पैश्याची जमवा जमाव करून घेतलेले पीक मातीमोल झाली आहेत. मागील आठ दिवसा पासुन पडत असलेल्या पाऊसामुळे उरली सुरली पिके उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांवर आलेल्या या अस्मानी संकटाला राज्य सरकार व जिल्हा प्रशासन मात्र गांभीर्याने घेतांना दिसत नाही. राज्य सरकारने परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलेली १२८ कोटीची मदत हि अत्येत तुटपुंजी आहे, मागील वर्षी नुकसानीची रक्कम ५४८ कोटी एवढी होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम तुटपुंजी मदत आहे,बदलल्या निकषामुळे पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाहीये,पिकांचे भाव गडगडले असून परिणामी शेतकरी आत्महत्यांचा मार्ग स्वीकारत आहेत. राज्य सरकारने पीक विमा कंपनीच्या नियमात केलेले बदल तात्काळ दुरुस्त करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा व N.D.R.F. च्या निकषा प्रमाणे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
0
comment0
Report
Advertisement
Back to top