Back
शिक्षिकेने तिसऱ्या विद्यार्थ्याला दिले जळते मेणबत्तीचे चटके!
MKManoj Kulkarni
Jul 30, 2025 15:45:59
Mumbai, Maharashtra
अँकर -- खराब हस्ताक्षर काढल्याने खाजगी शिकवणीतील शिक्षिकेने तिसरीच्या विद्यार्थ्याच्या हातावर दिले जळते मेणबत्तीचे चटके,यामुळे
पालकांनी संताप व्यक्त केला असून पोलीस कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईच्या मालाड पूर्व येथील फिल्मसिटी रोडवरील गोकुळधाम परिसरात घडलेली ही घटना प्रत्येक संवेदनशील नागरिकाच्या मनात संताप आणणारी आहे. एका खासगी शिकवणीत तिसरीत शिकणाऱ्या चिमुरड्याला फक्त हस्ताक्षर नीट काढता येत नाही म्हणून शिक्षिकेने जळत्या मेणबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटलेल्या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात सदर शिक्षिका विरोधक तक्रार दिली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करून कारवाई सुरू झाली आहे.आरोपी शिक्षिकेचे नाव राजश्री राठोड असल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील चौकशी करत असल्याचे स्पष्ट केले.
No byte
मनोज कुळकर्णी
पोलिस स्टेशन vdo २C
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HPHARSHAD PATIL
FollowJul 31, 2025 13:34:45Palghar, Maharashtra:
पालघर - पालघरच्या वांद्री धरण प्रकल्प परिसरातील शेकडो खैर जातीच्या झाडांची कत्तल करून तस्करी. रात्रीच्या सुमारास 200 हून अधिक खैर झाडांची बेकायदेशीर तोड करून तस्करी . खैर या महागड्या आणि संरक्षित झाडाची बेकायदेशीर तस्करी रोखण्यात पालघर वन विभागाला अपयश . वांद्री धरण प्रकल्प क्षेत्रातील भाताने , दहिसर या भागातून तस्करी करण्यात आल्याच समोर . वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना हाताशी धरून तस्करी सुरू असल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप.
2
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 31, 2025 13:16:02Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jayakwadi dam wkt
Feed by I've u , drone shots पण पाठवले आहेत...
जायकवाडी धरणातून 18 दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले आहे, धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. यामधून दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलाय, . जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता जायकवाडीच्या पाण्याचे पूजन केले आणि त्यानंतर पाणी सोडण्यात आले, १९७९ नंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात जायकवाडीचे पाणी सोडण्यात येत आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी...
इतर माहिती
जायकवाडी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा १९५६ दलघमी तर एकूण पाणीसाठा २६९४ दलघमी इतका आहे. हे प्रमाण ९०.१३ टक्के इतके आहे. सध्या जायकवाडी धरणात १६२३० क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू आहे.
8
Report
PNPratap Naik1
FollowJul 31, 2025 13:04:49Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop Raju Shetty Byte
Feed :- Live U
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीन परत यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पदयात्रा काढली जाणार आहे. एक रविवार महादेवी हत्तीनीसाठी ही मोहीम आखली जात असून महादेवी हत्तीन परत करा यासाठी येत्या रविवारी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय असा 45 किलोमीटर पायी पदयात्रा काढली जाणार आहे अशी माहिती राजू शेट्टीनी पत्रकार बैठकीत दिलीय. राजू शेट्टीनी या पत्रकार बैठकीत पेटाच्या भूमिके संदर्भात आक्षेप नोंदविला आहे.. पेटाने महादेवी हत्तीनीला गुजरातलाच पाठवा असे का सांगितले असा सवाल उपस्थित करुन सर्व देवस्थान मधील हत्ती पेटा गुजरातच्या वनतारा मध्ये पाठवण्यासाठी षडयंत्ररचत असल्याचा आरोप देखील राजू शेट्टीनी केलाय.
Byte :- राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना
6
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 31, 2025 13:04:04Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Manchar Tatkare
File:01
Rep: Hemant Chapude(Manchar)
*मंचर/पुणे*
*अदिती तटकरे महिला बालविकास मंत्री*
- या सक्षमीकरण मेळाव्यातून महिला सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून महिला सहभागी होतील
- राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलाना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा मिळेल
*ऑन लाडकी बहीण सरकारी महिला कर्मचारी*
- सरकारी कर्मचारी करणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेताना आढळल्या त्यापैकी बऱ्याच जणींनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडून घेतलेला लाभ पुन्हा दिला आहे
- आता सरकारी नोकरी करणाऱ्या महिला आहे त्याची योग्य ती कारवाई करणार येणार आहे त्याच्याकडून घेतलेला लाभ हा वसूल केला जात आहे
- राज्य शासनाने ही योजना आणली याचे नियम आणि निकष सुरुवातीपासून स्पष्ट केलेले आहेत
- ज्या पात्र महिला आहेत त्या या योजनेपासून केव्हाही वंचित राहणार नाही
- चुकीच्या पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे यांच्यावर शासन योग्य ती कारवाई केली जाणार
- लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून या योजनेवर सर्वांनी लक्ष केंद्रीत केले
- विरोधकांचे जास्त लक्ष राहिले
- ही योजना एक महत्त्वपूर्ण योजना आहे जी सर्वांना माहिती आहे
- म्हणून महायुतीचे हे कामकाज आणि विधानसभेतील यश यावरून या योजनेला टारगेट केलं जात
*ऑन मालेगाव बॉम्बस्फोट*
- मुख्यमंत्री यांनी शासनाच्या वतीने भूमिका मांडली
- न्यायालयीन प्रविष्ट बाबीवर आम्ही भाष्य करत नाही
- अनेकांनी आपले निश्वाप जीव गमावलाय
- न्यायालयाने हा निकाल दिला आहे
- जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होणे याबाबत दुमत नाही
Byte: आदिती तटकरे (मंत्री महिला बालविकास)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया मंचर पुणे...
2
Report
SKShubham Koli
FollowJul 31, 2025 12:46:21Thane, Maharashtra:
Thane flash
जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यानंतर ठाणे जिल्हाधकारी पदी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती..
पांचाळ यांनी आजपासूनच स्वीकारला ठाणे जिल्हाधिकारी चा पदभार..
*ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ
byte pointers*
* ठाणे जिल्हा भौगोलिक दृष्ट्या त्याच पद्धतीने विविध आव्हानात्मक गोष्टी ठाणे जिल्ह्यात आहेत शहरी भाग त्याचप्रमाणे ग्रामीण भाग देखील आहे
* शासनाचे काही महत्त्वकांक्षी प्रकल्प जे ठाणे जिल्ह्यात होत आहेत सर्व विषयांवर काम करण्याचा प्रयत्न असेल
* ज्या इथल्या गरजा असतील त्यानुसार नवीन प्रकल्प हाती घेणे
* माझा जो मागचा अनुभव आहे त्या अनुभवानुसार मी उपक्रम हाती घेईन
* इथल्या ज्या आवश्यकता आणि निकड आहेत त्यानुसार उपक्रम हाती घेण्यात येईल
* जे जे प्रश्न त्या भागाचे आहेत त्या पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न असेल
* ही शासनाने दिलेली मला संधी आहे
* जबाबदारी पार पडण्याकरता सर्वोतपरी प्रयत्न करीन
* पारदर्शक प्रशासन देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल
* जालन्यामध्ये मागच्या दोन वर्ष मी जिल्हाधिकारी म्हणून काम केलेला आहे तिथला अनुभव घेऊन प्रशासन चांगलं प्रकारे काम करेल इथल्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा असतील त्यानुसार काम असेल
* धरण आणि गावांचा आढावा घेऊन त्या पद्धतीने उपाययोजना केल्या जातील
* एकतर प्रशासन त्यांना बघायला मिळावं ही इच्छा असेल
* जिल्ह्याचे काम आधीपासून चांगला आहे
* लोकांचे प्रश्न लोकांचे समस्या तत्परतेने मार्गी लावणे हा माझा प्रयत्न असेल
10
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 31, 2025 12:37:23Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3107ZT_CHP_GHUGGUS_BRIDGE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील घग्गुस शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाण पुलामुळे नागरिक त्रस्त, 16 ऑगस्टपासून त्रस्त महिला व नागरिकांनी रेल रोको करण्याचा दिलाय इशारा
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस एक औद्योगिक शहर आहे. कोळसा, वीज, रेल्वेवाहतुक यामुळे शहरात वाहनांची आणी त्यातही अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाण पुलामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेले चार वर्षापासून राजीव रतन रुग्णालयापाशी रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपूल बांधकाम सुरू आहे. सततचे अपघात आणि वारंवार फाटक बंद राहत असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नागरिक आंदोलक झाल्यानंतर प्रशासनाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून आंदोलकांनी रेल रोको तात्पुरते स्थगित केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आता 16 ऑगस्ट पासून त्रस्त महिला व नागरिकांनी रेल रोको करण्याचा इशारा दिलाय.
बाईट १) माला मेश्राम, आंदोलक महिला
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
7
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 31, 2025 12:37:06Jalna, Maharashtra:
FEED NAME | 3107ZT_JALNA_KHOTKAR_BYTE(2 FILES)
जालना : गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशावर खोतकर यांची प्रतिक्रिया
मला गद्दार म्हणाला होता आता तोच गद्दार निघाला
अगोदर याचे या लोकांशी अनैतिक संबंध होते, आता याने घरोबा केला
महापालिकेत याने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे ,ही चौकशी लपवण्यासाठी याने हा डाव टाकला
एकटं लढण्याची घोषणा याने केली आमचीही तयारी आहे
दानवे,गोरंटयाल यांची तुलना केली खाटीक आणि बोकडाशी
गोरंटयाल यांच्या भाजप पक्षप्रवेशात नावं घेतलेले दोन जण माझ्यासोबत आहे,खोटा प्रचार करण्याची यांची सवय -खोतकर
अँकर | गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशावर खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मला शिवसेना प्रवेशावेळी गद्दार म्हणाला होता आता तोच गद्दार निघाला अशा शब्दांत खोतकर यांनी गोरंटयाल यांचा समाचार घेतला आहे.अगोदरच याचे या लोकांशी अनैतिक संबंध होते, आता याने त्यांच्याशी घरोबा केला अशी टीकाही खोतकर यांनी भाजप आणि गोरंटयाल यांच्यावर केली.महापालिकेत याने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे ,ही चौकशी लपवण्यासाठी याने हा डाव टाकला असल्याचं खोतकर म्हणाले.
एकटं लढण्याची घोषणा याने केली आमचीही तयारी आहे अस म्हणत खोतकर यांनीही महापालिका निवडणुकीत एकला चलो रे चे संकेत दिलेत.रावसाहेब दानवे आणि गोरंटयाल यांची तुलना खोतकर यांनी खाटीक आणि बोकडाशी केली असून खाटिक आधी बोकडाला आणतो.नंतर खाऊ घालतो आणि नंतर कापतो असं म्हटलं आहे.गोरंटयाल यांच्या भाजप पक्षप्रवेशात नावं घेतलेले दोन जण माझ्यासोबत आहे,खोटा प्रचार करण्याची यांची सवय असल्याचा निशाणा खोतकर यांनी गोरंटयाल यांच्यावर लावला आहे.
बाईट अर्जुन खोतकर
6
Report
KJKunal Jamdade
FollowJul 31, 2025 12:34:54Shirdi, Maharashtra:
Anc - नाशिक येथे होणा-या 2027 च्या कुंभमेळ्यात शिर्डी साईबाबांच्या नावाने नवीन आखाडा सुरु होणार असल्याची मोठी घोषणा उत्तरखंड येथिल जोगेश्वरधामचे महंत महादेव दास महाराज यांनी शिर्डीत केलीये.. सध्या देशात तेरा आखाडे प्रचलित आहेत.. यात आता शिर्डी साईबाबांच्या नावाने नवीन आखाडा सुरु केला जाणार असून याच काम अंतिम टप्प्यात आल्याच मंहत महादेव महाराज यांनी म्हटलंय.गेल्या काही दशकांपासून शिर्डीच्या साईबाबा बाबत हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करणा-यासाठी ही मोठी चपराकच असणार आहे.मंहत महादेव महाराज यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांच्या पुजाविधी तसेच दैनंदिन कार्यबद्दल कौतूक करत येत्या कुंभमेळ्यात शिर्डी साईबाबा नावाने नवीन आखाडा सुरु केला जाणार असून याबाबतचे कार्य अंतिम टप्प्यात असल्याच स्पष्ट केलय..
Bite - मंहत महादेव दास , जोगेश्वरधाम उत्तराखंड
13
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 31, 2025 12:34:22Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_kirrit_sommya
*नाशिक : किरीट सोमय्या byte point*
- ऑन भोंगे
- भोंगा मुक्त मुंबई झाली आता भोंगा मुक्त महाराष्ट्र होणार
- सकाळी संभाजी नगर येथे गेलो होतो आता उर्वरित ठिकाणी जाऊन भेट घेणार
- नाशिक पोलिसांनी सांगितलं सर्व भोंग्यांवर प्रतिबंध लावला आहे
- नाशिकमध्ये बॉंगेवरून आवाज बंद झाला आहे
- काही आठवड्यात पुढील भोंगे काढणार आहेत
- पुढच्या आठवड्यात नाशिक भोंगे मुक्त होणार
- देशात ध्वनी प्रदूषण कायदा आहे रात्री अकरा ते सकाळी ६ पर्यंत भोंगे वापरता येत नाही
- कायदा आणि सुव्यवस्थेसाठी चालेल मात्र त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे
- राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी यातून धडा घेतला पाहिजे
- निकाल लागल्यानंतर टीका केल्याचे धाडस करत आहे
- आज निकाल आला आहे
- खरे आरोपी कोण होतेब्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला नाही
- काँग्रेसने हे हिंदू आतंकवाद म्हणून ही दृश्य उभे केले होते त्यांना अजून पश्चात्ताप नाही झालेला
- कधी तरी कोणी तरी गांधी परिवाराला आणि सरकारच्या एजनसीला प्रश्न विचारता
- त्यांनी जे लव्ह जिहाद केले लेंड जिहाद केले त्याची किंमत त्यांना विधानसभा निवडणुकीत दिसून आली
9
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 31, 2025 12:33:37Palghar, Maharashtra:
पालघर - पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी . विरार वरून डहाणूसाठी सुटलेल्या 3:45 च्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी. वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानका दरम्यानची घटना . सफाळे आणि पालघर येथील प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती. ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्याने हाणामारी झाल्याची माहिती .
5
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 31, 2025 11:48:52Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका अंतर्गत असलेल्या वाडेगाव येथे एका लाल तोंडाच्या माकडाने गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून धुमाकूळ घातला होता, या लाल तोंडाच्या माकडाने गावातील अनेक नागरिकांना चावा घेत त्यांना गंभीर जखमी सुद्धा केले होते..या घटनेबाबत गावकऱ्यांनी माहिती अकोला वन विभागाला माहिती देताच अकोला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने वाडेगाव येथे पोहोचून सदर उपद्रव घालणाऱ्या लाल माकडाला ट्रँक्युलाईज करून बेशुद्ध केले व त्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले..
14
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 31, 2025 11:47:33Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत आज्ञातांकडून वाहने जाळण्याचा प्रयत्न, आमदार रोहित पवार यांचा फेसबुक पोस्टद्वारे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या सुपुत्रावर आरोप
- बार्शीत ओबीसी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांचे दोन वाहन जाळण्याचा प्रकार.
- राजकीय सुडातून माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र रणवीर राऊत यांच्यावर आमदार रोहित पवार यांचे फेसबुक पोस्टद्वारे आरोप
- 'जहागिरी गेली मात्र फुगिरी गेली नाही' असे म्हणत राजेंद्र राऊत यांनी विधानसभेत पराभूत झाल्यानंतर राजकीय द्वेषा पोटातून शांताराम जाधव यांच्या गाड्या जाण्याचा आरोप.
- रणवीर राऊत यांनी एक महिना अगोदर शांताराम जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ आला होता समोर.
- जाधव यांची गाडी कोणी जाळी याचे उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं, असे म्हणत रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची केली मागणी..
- बार्शी शहरात शांताराम जाधव यांच्या दोन गाड्या जाळल्या, अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग आली विझवण्यात
- बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल.
12
Report
AKAMAR KANE
FollowJul 31, 2025 11:47:25kolhapur, Maharashtra:
नागपूर
Ngp Divya Deshmukh Pc
live u ने फीड मिळेल
-------
फीडे वुमेन्स वर्ल्ड कप 2025 मध्ये विजेती ठरलेली वर्ल्ड चॅम्पियन बुद्धीबळपटू दिव्या देशमुखची प्रेस कॉन्फरन्स होतेय
live फ्रेम दिलीय
13
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 31, 2025 11:34:31Nashik, Maharashtra:
feed send by 2c and mozo
reporter-sagar gaikwad
slug-nsk_kirrit_somya
नाशिक ब्रेकिंग...
- *माजी खासदार किरीट सोमय्या आज घेत आहे नाशिक पोलीस आयुक्तांची भेट...*
- किरीट सोमय्या नाशिक पोलीस आयुक्तालयात दाखल
- नाशिक मधील भोंग्यांच्या प्रकरणी सोमय्या पोलीस आयुक्तांशी करणार चर्चा...
- पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर माजी खासदार किरीट सोमय्या माध्यमांशी संवाद साधणार...
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 31, 2025 11:16:13Ambernath, Maharashtra:
चोरीला गेलेल्या दोन दुचाकीसह तीन आरोपींना अटक !
अंबरनाथ पोलिसांची कामगिरी
Amb bike theft
Anchor अंबरनाथमधून चोरीला गेलेल्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत करत तीन आरोपीना अटक केली आहे. हितेश शंकरलाल मालविया, जाहिद हुसेन मेहबूब अली, दानेश अवन्वर हळदे शेख अश्या या तीन आरोपींची नाव आहेत.
अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 25 जुलै रोजी फॉरेस्ट नाका येथून दुचाकी चोरीला गेली होती. यासंदर्भात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस आरोपींचा शोध घेत होते. पोलीस शिपाई राजकुमार राठोड आणि वसुदेव दराडे यांनी सीसीटीव्हीच्या आधारे पाठपुरावा सुरू असतानाच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून हा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपी हितेश शंकरलाल मालविया, जाहिद हुसेन मेहबूब अली आणि दानेश अवन्वर हळदे शेख याची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सुझुकी कंपनीची ॲक्सेस 125 आणि गुन्ह्यांत वापरलेले दुचाकी बजाज प्लसर गाडी क्र अशा दोन गाड्या जप्त करण्यात आहेत.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
14
Report