Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

बार्शीत वाहने जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न, आमदार रोहित पवारचे आरोप!

AAABHISHEK ADEPPA
Jul 31, 2025 11:47:33
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत आज्ञातांकडून वाहने जाळण्याचा प्रयत्न, आमदार रोहित पवार यांचा फेसबुक पोस्टद्वारे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या सुपुत्रावर आरोप - बार्शीत ओबीसी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांचे दोन वाहन जाळण्याचा प्रकार. - राजकीय सुडातून माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र रणवीर राऊत यांच्यावर आमदार रोहित पवार यांचे फेसबुक पोस्टद्वारे आरोप - 'जहागिरी गेली मात्र फुगिरी गेली नाही' असे म्हणत राजेंद्र राऊत यांनी विधानसभेत पराभूत झाल्यानंतर राजकीय द्वेषा पोटातून शांताराम जाधव यांच्या गाड्या जाण्याचा आरोप. - रणवीर राऊत यांनी एक महिना अगोदर शांताराम जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ आला होता समोर. - जाधव यांची गाडी कोणी जाळी याचे उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं, असे म्हणत रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची केली मागणी.. - बार्शी शहरात शांताराम जाधव यांच्या दोन गाड्या जाळल्या, अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग आली विझवण्यात - बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Aug 01, 2025 08:34:42
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0108ZT_JALNA_PIKPANI(2 FILES) जालना : पावसाची उघडीप,शेती कामांना वेग फवारणी, खुरपणीच्या कामांना वेग,अनेक ठिकाणी खतांच्या मात्रा देण्याचही काम सुरु अँकर | जालना जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली आहे.कालपासून जिल्ह्यातील पाऊस थांबला आहे.पावसानं विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यातील खरीप पिकांमध्ये मशागतीला वेग आला आहे.पिकांवर फवारणी, खत टाकण्याचं काम वेगाने सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
4
Report
GMGANESH MOHALE
Aug 01, 2025 08:19:23
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0108ZT_WSM_GOAT_DEATH रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा मार्गवरील कुपटा घाटात वेगाने येणाऱ्या ट्रक रस्त्यावरून जात असलेल्या बकऱ्यांना जोरदार धडक दिली.या अपघातात चार बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून,एक बकरी गंभीर जखमी झाली आहे.मृत बकऱ्या मानोरा येथील माजी सैनिक आणि शेतकरी रशिद खान यांच्या मालकीच्या होत्या.या दुर्घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेअसून,परिसरातील शेतकरी आणि पशुपालक वर्गात संतापाची भावना आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अपघातग्रस्त रस्त्यांवर योग्य ती वाहतूक नियंत्रणाची उपाययोजना करण्याची मागणी केली जातं आहे.
6
Report
MAMILIND ANDE
Aug 01, 2025 08:19:14
Wardha, Maharashtra:
*वर्धा ब्रेकिंग* SLUG- 0108_WARDHA_AATMDAHAN वर्ध्यात हॉकर्स युनियनच्या अध्यक्षाने अंगावर डिझेल घेत केला आत्मदहनाचा केला प्रयत्न वर्धा नगर परिषद कार्यालयात घडला धक्कादायक प्रकार अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात व्यक्त केला संताप अँकर - वर्धा शहरात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात वर्धा हॉकर्स युनियन अध्यक्ष आसिफ खान याने नगर परिषद कार्यालयात अंगावर डिझेल घेऊन आत्मदाहानाचा प्रयत्न केलाय. गेल्या काही दिवसापासून वर्धा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरु आहे. पण या मोहिमेत भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात आलाय. सामान्य माणसाचे अतिक्रमण हटविण्यात आले तर श्रीमंताचे अतिक्रमण तसेच ठेऊन भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आलाय. संतापलेल्या अतिक्रमण धारकांनी आज नगर परिषद गाठली, दरम्यान हॉकर्स युनियनचे अध्यक्ष आसिफ खान यांनी अंगावर डिझेल घेतआत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अतिक्रमनाचा विरोध करीत नारेबाजी देखील करण्यात आली आहेय. सदर आसिफ याने एक दिवसापूर्वीच परिवारासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला असल्याची माहिती आहे.
2
Report
PNPratap Naik1
Aug 01, 2025 08:16:15
Kolhapur, Maharashtra:
Kop Keshavrao Bhosale Feed :- Live U Anc :- कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 8 ऑगस्ट 2024 रोजी आगीच्या भक्षस्थानी पडलं होत. या घटनेला येत्या काही दिवसात एक वर्ष पूर्ण होणार आहे. तत्पूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे कामाला गती आली आहे. नाट्यगृहाच्या स्टेजवरील छताचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील झपाट्याने सुरू आहे. राज्य सरकारने केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 25 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्या निधीच्या माध्यमातून चार टप्प्यात केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम सुरू आहे. पहिला टप्पा सात कोटीचा असून त्यामध्ये भिंती रेस्टोरेशन, ग्राऊटिंग, छत उभारणीच्या कामाचा समावेश आहे.. Anc :- इतर तीन टप्यातील कामे कशा पद्धतीने होणार आहेत, त्यावर एक नजर टाकूया. GFX In दुसऱ्या टप्पा 3.20 कोटींचा आहे, त्यामध्ये नाट्यगृह इंटिरियर, सजावट, खुर्च्या याचा समावेश आहे. तिसऱ्या टप्पा 11.20 कोटींचा असून स्टेज, लाईटिंग, वातानुकूलन या कामाचा समावेश आहे. तर चौथ्या टप्यासाठी 4 कोटींचा निधी उपलब्ध असून त्यामध्ये रस्ते, ड्रेनेज, लिविंग रूम, कलादालन याचा समावेश आहे. GFX Out
3
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 01, 2025 08:15:21
Beed, Maharashtra:
बीड: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्साह; साहित्य दिंडीने अण्णाभाऊंना अभिवादन Anc:बीडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. चांदणे वाडा ते अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत साहित्य दिंडी काढण्यात आली. यावेळी साहित्यरत्न रथ देखील बनवण्यात आला होता. या रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर दिंडीत कर्नाटकातील वाजंत्री पथकाने आपली कला सादर केली. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी मागणी देखील यादरम्यान करण्यात आली. जयंती निमित्त शहरातील नागरिकांनी हजेरी लावली होती.
4
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 01, 2025 08:07:34
Solapur, Maharashtra:
सोलापुर ब्रेकिंग - मालेगांव बम विस्फोट में तत्कालीन एटीएस अधिकारी महबूब मुजावर के बड़े खुलासे ( 1 to 1 ) - मालेगांव बम विस्फोट में तत्कालीन एटीएस अधिकारी महबूब मुजावर के बड़े खुलासे - आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत को हिरासत मे लेने का आदेश था - तत्कालीन अधिकारियों ने मालेगांव विस्फोट की जाँच के दौरान कई सुविधाएँ भी प्रदान की थीं। - इस मामले में मेरे खिलाफ झूठे आरोप लगाए गए थे। ईसी के बारे मे पुर्व एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर इनके साथ बात की है हमारे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा ने..... (1 to 1 ) 121 : मेहबूब मुजावर, तत्कालीन एटीएस वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रतिनिधी - अभिषेक आदेप्पा, सोलापूर, महाराष्ट्र
8
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 01, 2025 07:51:58
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Shirur Bot Blasting File'02 Rep: Hemant Chapude(SHIRUR) Anc :- महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला शिरुरच्या चिंचणी गावाजवळील घोड धरणात महसूल व पोलिस प्रशासनाने वाळूमाफियांवर मोठी कारवाई करत दोन यांत्रिक बोटी आणि दोन फायबर स्फोटकांच्या सहाय्याने उडवून दिल्या. Vo :- शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली २५ जणांचे विशेष पथक या कारवाईसाठी उतरवण्यात आले होते.या पथकाना तीन ठिकाणी नदीपात्रात उतरवले आणि बोटींवर थेट कारवाई केली.शिरुर आणि श्रीगोंदा महसूल व पोलिस प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
8
Report
GMGANESH MOHALE
Aug 01, 2025 07:48:47
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0108ZT_WSM_DILAPIDATED_WATER_TANK रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा गावाजवळ उभा असलेला चाळीस वर्षांपूर्वीचा जीर्ण जलकुंभ सध्या अपघातास निमंत्रण देतो आहे.जिल्हा परिषद शाळेला लागून असलेल्या या जलकुंभाची स्थिती अत्यंत धोकादायक असून, तो कधीही कोसळू शकतो.१९८५ मध्ये गावासाठी तयार करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचा हा भाग असलेला जलकुंभ, जलस्त्रोत निकामी झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय आहे तो प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, शाळा आणि शेतरस्त्याच्या अगदी जवळ आहे.या मार्गावर नागरिक, शेतकरी व विद्यार्थी यांची दैनंदिन वर्दळ असते.ग्रामस्थांनी या धोकादायक जलकुंभाचे त्वरित निर्लेखन करण्याची मागणी केली आहे.
8
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 01, 2025 07:48:23
Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडच्या काशीद किनारी सापडले चरस ...... 56 लाखांचा चरसचा बेकायदा साठा जप्त ......... अँकर - रायगडच्या काशीद समुद्र किनारी चरस सारख्या अमली पदार्थाचा साठा बेवारस स्थितीत आढळून आला आहे. प्लास्टिकच्या गोणीमध्ये 11 किलो वजनाचे हे चरस भरून ठेवण्यात आले होते. त्याची किंमत 55 लाख 74 हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी हा चरसचा साठा ताब्यात घेतला आहे. हे चरस काशीद किनाऱ्यावर आले कसे याचा शोध पोलिस घेत आहेत. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे रायगडच्या वेगवेगळ्या किनाऱ्यांवर चरसची पाकिटे समुद्रातून वाहत आली होती त्याच्याशी याचा काही संबंध आहे का हे देखील तपासून पाहिले जात आहे.
10
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 01, 2025 07:34:17
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0108ZT_JALNA_JARANGE(2 FILES) जालना :महादेव मुंडे प्रकरणातील एकही आरोपी राहणार नाही... मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया... खून करणारे चालू आहेत, ते दुसऱ्याला त्यात गुंतवतात; जरांगे यांचा धनंजय मुंडेंचं यांच्यावर नाव न घेता निशाणा... महादेव मुंडे प्रकरणातील खरे आरोपी आत जाणार: जरांगे *Anchor*: महादेव मुंडे प्रकरणातील एकही आरोपी राहणार नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीय. खून करणारे चालू आहेत, ते दुसऱ्याला त्यात गुंतवतात असा निशाणा जरांगे यांनी आमदार धनंजय मुंडेंवर नाव न घेता साधलाय. जरांगे आज बीड दौऱ्यावर असून आज बीड मध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी जरांगे बैठक घेणार आहेत. या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महादेव मुंडे प्रकरणातील खरे आरोपी आत जाणार असं जरांगे म्हणालेत. आरोपी जागीरदारांचे पूर्ण असलं किंवा मंत्र्याचं असलं तरी तो जेलमध्ये जाणार असं जरांगे यांनी म्हटलंय. Byte मनोज जरांगे, मराठा आंदोलक
9
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 01, 2025 07:34:10
Vasai-Virar, Maharashtra:
Date-1aug2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI Ghost Feed send by 2c Type-AV सलग - स्मशानभूमीत खेळणी लावणाऱ्या पालिका प्रशासनाचे भूतांनी मानले आभार वसई महापालिकेचा अजब गजब कारभार अँकर - वसईच्या बेनापट्टी स्मशानभूमी महानगरपालिकेने खेळणी नागरिकांच्या विरोधानंतर काढली खरी , मात्र स्थानिक नागरिकांनी भुतांच्या वेशात जाऊन स्मशानभूमीत खेळणी लावणाऱ्या अधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले आहेत.. वसई विरार महानगरपालिकेने दहा दिवसांपूर्वी वसईच्या बेनापट्टी गावातील स्मशानभूमीत लहान मुलांसाठी खेळणी बसवली होती... मुळात खेळणी बसवण्यासाठी स्मशानभूमी ही योग्य जागा नसल्याने स्थानिक नागरिकांनी त्याचा विरोध केला.. परिणामी पालिकेने स्मशानभूमीत बसवलेली खेळणी पुन्हा काढून घडलेल्या प्रकारावर सारवा सराव करायचा प्रयत्न केला.. मात्र स्थानिक नागरिकांनी गावातील काही तरुणांना भुताचा वेश करून पालिका प्रशासनाचे मेलेल्या माणसांसाठी खेळणी लावल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.. वसईत या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत असून पालिका प्रशासनाला आपण काय करतोय ? याचे भानही राहिले नसल्याचे दिसून येत आहे..
8
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 01, 2025 07:33:39
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथ मध्ये डिजिटल वीजचे मीटर विरोधात नागरिक आक्रमक विनापरवानगी मीटर बदलण्याचं काम रहिवाशांनी पडले बंद  260 डिजिटल मीटर बसवण्याचा होत काम सुरू  Amb light miter  Anchor अंबरनाथच्या पाले गावात पटेल झिऑन या 260 सदनिका असलेल्या गृह संकुलात डिजिटल मीटर बसवण्याचं काम रहिवाशांनी बंद पाडलं , सोसायटीची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत रित्या सदर काम सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. Vo रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास डिजिटल मीटर बसवण्याचं काम सुरू असल्याची माहिती रहिवाशांना  मिळाली, त्यानंतर या रहिवाशांनी हे मीटर बसवणाऱ्या दोन इसमांना पकडून त्यांना  विचारणा करत त्यांच्या कडे कागद पत्र मागितली मात्र त्यांच्याकडे असे कोणतेही अधिकृत कागद पत्र नव्हती, त्यानंतर या दोन इसमांना सोसायटीतील रहिवाशांनी पकडून पोलिसाच्या ताब्यात दिले , सदर डिजिटल मीटर बसवण्याचं काम करणाऱ्या  ठेकेदाराला याबाबत विचारणा केली असता त्याबाबत कोणतेही उत्तर मिळाले नाही, सोसायटीची परवानगी न घेता अशा प्रकारे डिजिटल मीटर बसवण्याचं काम चोरून अनधिकृतरित्या सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. Byte रहिवासी चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
10
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 01, 2025 07:33:28
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0108ZT_JALNA_FIRE(10 FILES) जालना : जूना जालना भागात मध्यरात्री गोळीबार; तरुणाच्या जबड्यातून गोळी आरपार, उपचार सुरू पोलिसांकडून तपास सुरू अँकर |  जालना शहरातील जूना जालना भागात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबाराची थरारक घटना घडलीय. डॉ. बद्रुदिन यांच्या निवासस्थानासमोर घडलेल्या या घटनेत 31 वर्षीय अकबर खान बाबर खान हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या गोळीबाराचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी चेहऱ्यावर मास्क घातले होते. त्यांनी आधी औरंगाबाद चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्याची विचारणा केली आणि तात्काळ जवळून गोळीबार केला. आरोपींनी डोक्यावर गोळी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमीने प्रसंगावधान राखून हालचाल केल्यामुळे गोळी जबड्यातून आरपार गेली. आरोपींनी दुसरा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असता आजूबाजूच्या तरुणांनी आरडा-ओरड केल्यामुळे आरोपी तेथून दुचाकीवरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान या प्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पोलीस ठाण्याचे दोन पथक आरोपीचा शोध घेत आहेत. बाईट : अनंत कुलकर्णी (उपविभागीय पोलीस अधिकारी,जालना)
13
Report
AKAMAR KANE
Aug 01, 2025 07:30:48
kolhapur, Maharashtra:
Ngp fadanvis byte live u ने फीड पाठवले ------ नागपूर ( मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाईट मराठी आणि हिंदी ) On मालेगाव आणि rss विरोधातील कट - मालेगावच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने हिंदू आतंकवाद किंवा भगवा आतंकवाद असा प्रकारचा नरेटिव्ह तयार केला होता.. तो पूर्णपणे बस्ट झाला आहे.. 1990 च्या दशकाच्या शेवटी 2000 च्या सुरुवाती च्या वर्षात संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी घटना घडल्या.. अनेक घटनांची धागेददोरे पाकिस्तान पर्यंत होते. त्यामुळे इस्लामिक दहशतवाद असा नरेटिव्ह जगभर निर्माण झाला होता, तो काही भारताने निर्माण केलेला नव्हता.. मात्र या नरेटीव चा आपल्या व्होट बँक वर विपरीत परिणाम होत आहे, हे काँग्रेसच्या लक्षात आलं.. सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं गेलं नव्हता.. तरी देखील सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरिता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं, यूपीएने हे षडयंत्र रचलं.. आणि हिंदू आतंकवाद असा शब्द निर्माण करून अनेकांना अटक केली गेली.. प्रयत्न सुरू करून एका यंत्रणेवर दबाव आणून हिंदुत्ववादी संघटना खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे पदाधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे भगवा आतंकवादामध्ये शामील आहे अशा पद्धतीचा षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला.. मात्र त्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाही.. त्यानंतर पुराव्या अभावी सुद्धा कारवाई करा असा दबाव पोलीस यंत्रणेवर होता.. पोलीस यंत्रणेतील अनेक अधिकारी त्या दबावाला बळी पडले नाही. त्यामुळे पुढची कारवाई होऊ शकली नाही.. अन्यथा हा खूप खोल रूतलेला षड्यंत्र होता... आता त्याचा पडदाफाश झाला आहे.. हळूहळू यातील सर्व घटना बाहेर येतील आणि त्या वेळच्या भारतातील आणि राज्यातील सरकारने हिंदूंना दहशतवादी ठरवून हिंदू संघटनांना संपवण्याकरता, त्यांच्यावर बंदी घालण्याकरिता एक प्रयत्न उभा केला होता हेच त्याच्यातून समोर आलं आहे... On पृथ्वीराज चव्हाण आरोप - आधी पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगावं, कारण ज्या मनमोहन सिंह सरकारमध्ये ते होते आणि पीएमओ सांभाळत होते, त्याच सरकारने याला भगवा दहशतवाद म्हटलं होतं. तेव्हा आठवलं नाही की हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा आहे... भगवा असेल, हिंदू असेल किंवा सनातन असेल यांच्यात कुठलाही भेद नाही, हे सर्व एक आहे आणि हे सर्व राष्ट्र प्रेमी, राष्ट्रवादी व राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आहे.. On मंत्रिमंडळ खांदेपालट - जी घटना घडली त्या संदर्भात मोठा रोष होता. त्या संदर्भात अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी मिळून चर्चा केली आणि चर्चाअंति हा निर्णय घेतलेला आहे.. त्यामुळे कोकाटे यांचा खाते बदलले आहे, त्यांना दुसरा खात देण्यात आला आहे आणि कृषी खात मामा भरणे यांना देण्यात आला आहे... आता तरी कुठला दुसरा बदल होईल अशी कोणतीही चर्चा नाही.. On मंत्र्यांना निर्देश - आता या प्रकारे कोणीही बेशिस्त वर्तणूक करेल, तर त्यांना सर्वांना सांगितलं आहे की आम्ही हे खपवून घेणार नाही, कारवाई केली जाईल.. सर्वांसाठी संकेत आहे.. जनतेच्या सेवेसाठी आम्ही आलो आहोत. मात्र त्यावेळेस आपण काय बोलतो, कसं वागतो, आमचा व्यवहार कसा आहे, हे सर्व जनता पाहत असते. त्यामुळे त्यावर अंकुश राहिलाच पाहिजे.. On धनंजय मुंडे भेट - तुमची माहिती अर्धवट आहे, त्यांनी तीन वेळेला माझी भेट घेतली आहे, ती वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे, कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झाली नाही.. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या पातळीवर होत नाही, मंत्रिमंडळाची चर्चा मी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर होते..
12
Report
MAMILIND ANDE
Aug 01, 2025 07:30:40
Wardha, Maharashtra:
*वर्धा ब्रेकिंग* SLUG- 0108_WARDHA_NCP_PROTEST - वर्ध्याच्या हिंगणघाटात राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम - हिंगणघाटात राष्ट्रवादी शरद पवार गटांचे आंदोलन - कलोडे चौकातील अतिक्रमण धारकांना पक्के घरपट्टे देण्याच्या मागणीसाठी आंदोलन - कलोडे चौकात असलेल्या झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याची मागणी -  घरपट्ट्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकही रस्त्यावर - नागपूर-हैद्राबाद महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त - राष्ट्रवादीची सरकारच्या विरोधात करीत जिल्हा प्रशासनाचा निषेध - राष्ट्रवादीच्या चक्काजाम आंदोलनामुळे वाहतुकीस अडथडा - 1 तासापासून नागपूर-हैद्राबाद महामार्ग बंद - हिंगणघाटात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक
13
Report
Advertisement
Back to top