Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में बारिश ने किसानों के सपने डुबो दिए; खेत पानी में

GMGANESH MOHALE
Sept 12, 2025 12:04:17
Washim, Maharashtra
वाशिम: File:1209ZT_WSM_RAIN_12SUPTEBER रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांचा अल्पविराम घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे.वाशिम, मानोरा आणि मालेगाव तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून ग्रामीण भागातील जनजीवनावर त्याचा परिणाम होत आहे.मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन यांसह इतर खरीप पिकांवर पावसाचा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे.अनेक शेतांमध्ये पिके उभी असतानाच पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.दरम्यान, या बदलत्या वातावरणामुळे साथीचे आजार डोके वर काढत असून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Sept 12, 2025 13:46:53
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोली जिल्ह्यात आज जोरदार मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झालीय, कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे असणाऱ्या खटकाळीच्या ओढ्यावर कमी उंचीचा पूल असल्यामुळे पाणी पुलाच्या वरून वाहत आहे. यामुळे सोडेगाव सावंगी कडे जाणाऱ्या नागरिकांचा कळमनुरीशी संपर्क तुटलाय. या ओढ्यावर नवीन उंचीचा पूल उभारावा अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. खटकाळी ओढ्यावर पूरस्थिती : अपूर्ण पुलामुळे गावकऱ्यांमध्ये संताप सोडेगाव प्रतिनिधी : गावाजवळील खटकाळी ओढ्यावर आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून ओढ्यावरच्या पुलावर पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.साधारण पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे. ग्रामस्थांनी यापूर्वीच या ठिकाणी योग्य पुलाचे काम करावे अशी मागणी केली होती. परंतु संबंधित रस्त्याच्या ठेकेदाराला व काही स्थानिक नेत्यांच्या हितसंबंधामुळे अपुरा पूल मंजूर करून दिला गेला. त्यामुळे सोडेगाव-सावंगी रस्ता पूर्ण करण्यात आला असला तरी गावातील सुमारे अर्धा किलोमीटरचे काम अद्याप अपूर्ण आहे. आजच्या पुरस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, ग्रामस्थांनी चेतावणी दिली आहे की भविष्यात जर अशा प्रकारच्या पुरामुळे जीवित किंवा आर्थिक हानी झाली, तर त्याची थेट जबाबदारी ठेकेदार आणि कामाला संमती देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व नेत्यांवर राहील. गावकऱ्यांनी शासन व प्रशासनाकडे तातडीने ओढ्यावर सक्षम व सुरक्षित असा नवा पूल तातडीने उभारण्यात यावा अशी मागणी केली आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 12, 2025 13:17:26
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- राधाकृष्ण विखे फीड 2C राधाकृष्ण विखे on कर्नाटक शिवाजीनगर स्थानक Anc :- कर्नाटकातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी करण्याची मागणी समोर आल्याने यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसवर निशाणा साधतं प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसची भूमिका निशाणकालीन विपरीत बुद्धी राहिलेली आहे म्हणून आज त्यांची ही अवस्था आहे.खरंतर शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहे आणि त्यांच नाव बदल्यांच पाप जर काँग्रेस करणार असेल तर या राज्यातील जणता त्यांना कधी माफ करणार नाही खरंतर त्यांचे राष्ट्रीय नेते त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांना ही भूमिका मान्य आहे कां असा प्रश्न करत विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे... बाईट:- राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ऑन पंकजा मुंडे Anc:- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ नये असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं यावर मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हैदराबाद गॅजेट संदर्भात याचिका दाखल झाली आहे त्यावर देखील विखेंनी मत व्यक्त केला आहे. सध्या ही न्यायप्रविष्ठ बाब असून ओबीसी बांधवांचा गैरसमज दूर करू असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला आहे. तर व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र दिले जाणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केला आहे. कुणाला चुकीचे आणि खोटे प्रमाणपत्र मिळणार नाही अस राधाकृष्ण विखे पाटील स्पष्ट केला आहे. बाईट:- राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री
3
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 12, 2025 13:17:13
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात मेघगर्जनेसह पुन्हा पावसाला सुरुवात, जिल्ह्यातील अनेक तालुक्यात नदी, नाले, ओढे, तुडुंब - सोलापुरात मेघगर्जनेसह पुन्हा पावसाला सुरुवात, जिल्ह्यातील अनेक तालुक्यात नदी, नाले, ओढे, तुडुंब - दक्षिण सोलापूर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरून वाहू लागले - होटगी तलावातील मासे पाण्यासह रस्त्यावर आल्याने स्थानिक नागरिक मासेमारीचा आनंद घेतला - दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर पाणी आलेय - होटगी तलावात मोठ्याप्रमाणात मासे असल्याने पाण्यासोबत ते देखील रस्त्यावर आले - त्यामुळे या पाण्यात चिमुकल्यासह मोठ्यांची मासे पकडण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली
3
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 12, 2025 13:15:19
Yavatmal, Maharashtra:AVB कापसावरील ११ टक्के आयातशुल्क भारत सरकारने माफ करून शेतकऱ्यांच्या छातीवर तलवार चालविली आहे असा घणाघात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला आहे. यवतमाळच्या नेर येथे त्यांनी शेतकरी शेतमजूर हक्कयात्रा निमित्त आयोजित सभेमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर प्रहार केला. नेपाळ मध्ये तरुणाईचा आगडोंब उसळला आहे, भारतातील शेतकऱ्यांवर जुलूम केल्यास सत्ताधाऱ्यांची खैर नाही असाही इशारा कडूंनी दिला. आयातशुल्क माफ केल्यामुळे कापूस सहा हजारातही विकल्या जाणार नाही अशी अवस्था छप्पन इंच छाती वाल्याने करून ठेवली आहे. देशात अन्नदात्या शेतकऱ्यांबद्दल विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व नेते जाती धर्माच्या गोष्टी करताहेत, मात्र सर्व जातीत असलेल्या शेतकऱ्याला कुणीही किंमत देत नाही अशी खंत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केली. बाईट : बच्चू कडू : अध्यक्ष प्रहार
2
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Sept 12, 2025 13:04:03
Palghar, Maharashtra:Anchor पालघर _ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कासा येथील चिंचपाडा परिसरात आज एक भीषण अपघात घडला. मुंबईकडून गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा एक मोठा कंटेनर अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या नदीमध्ये कोसळला. या अपघातात कंटेनर पलटी झाल्याने वाहनाचा चक्काचूर झाला असून, चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर अत्यंत वेगात असावा व त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट पुलाच्या कठड्याला धडकून नदीत जाऊन पडले. अपघात इतका भीषण होता की कंटेनर पूर्णतः उलटला असून त्याचे पुढील व मागील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने चालकाला बाहेर काढण्यात आले असून, त्याला गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, कंटेनर मध्ये नेमके काय माल होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
4
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 12, 2025 12:46:30
Akola, Maharashtra:Anchor : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू झालीय अकोला जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेय. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेत आहे. दिवाळीनंतर या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदांसाठी आरक्षणाची यादी नुकतीच जाहीर केली आहे.या यादीनुसार, एकूण 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष पदांसाठी आरक्षण ठरवण्यात आले असून, अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आता अनुसूचित जमातीतील महिला विराजमान होणार, हे निश्चित झाले आहे.अकोला हा प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे या जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.आगामी निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला यश मिळते आणि कोणत्या नेत्याची ताकद सिद्ध होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
8
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 12, 2025 12:31:25
Akola, Maharashtra:Anchor : शिवसेना यूबीटीचे खासदार संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर टीका करत भाजपवर निशाणा साधला आहे. "भाजपला रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर भाजप खासदार व विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.आम्ही पाकिस्तानसोबतचं शत्रुत्व कायम ठेवणारच आहोत, मात्र मैदानात चांगले खेळाडू म्हणून वागत आहोत. पाकिस्तानच्या कुरापती आम्ही कधीच विसरणार नाही तर त्यांच्या प्रत्येक कुरापतीला आम्ही उत्तर दिलं असल्याच ते म्हणाले.लोकांना क्रिकेट आवडतं, आणि पाकिस्तानला मैदानात हरवण्याचा जो आनंद आहे, तो काही वेगळाच असतो.त्यामुळे याकडे राजकीय दृष्टीने नव्हे तर खेळाडू वृत्तीने पहाव असा सल्लाही त्यांनी दिलाय.. Byte : उज्वल निकम, खासदार तथा विशेष सरकारी वकील
8
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 12, 2025 12:21:11
8
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 12, 2025 12:03:41
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - विविध नागरी प्रश्नांवरून खा.प्रणिती शिंदेनी महापालिका आयुक्तांना धरले धारेवर - विविध नागरी प्रश्नांवरून खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त सचिन ओंबासेंना धरले धारेवर - महापालिका आयुक्तांची सत्ताधाऱ्यांची मिली भगत असल्याचा केला आरोप - सोलापूर शहराचे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत महापालिका आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल - केंद्राच्या निधी वाटपात खासदारांचा विचार होत नसल्याचा केला आरोप - जोपर्यंत प्रश्नांचे उत्तर मिळणार नाही तोपर्यंत आयुक्तालनातून उठणार नसल्याचा खा. प्रणिती शिंदे यांचा इशारा बाईट - खा. प्रणिती शिंदे
11
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 12, 2025 11:50:56
Beed, Maharashtra:बीड: सरपंचाचा वाढदिवस; येअरगन मधून गोळीबार, जुना व्हिडिओ व्हायरल Anc- वाढदिवसानिमित्त सरपंचानेच हवेत एअरगन मधून बार उडवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गेवराई तालुक्यातील रुई गावातील ही घटना आहे. व्हिडिओ पाच वर्षापूर्वीचा आहे. मात्र आता व्हायरल झाला आहे. रुई गाव हे रेशम उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहे. शेतात अनेक वन्यजीव सतत येतात. त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी एअरगन वापरले जाते. परंतु वाढदिवसानिमित्त मौज म्हणून या बंदुकीचा वापर केल्याचे या व्हिडिओमधून दिसत आहे. बार उडवल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला असून पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
12
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 12, 2025 11:37:41
Mumbai, Maharashtra:वर्षा गायकवाड १२१ पूर्वीपासून जे मतदार संघ होते त्याप्रमाणेच असले पाहिजे बाहेरच्या ठिकाणी त बिल्डिंग टाकण्यात आले आहे मुंबई महापालिका निवडणुकीत जे मागील काळजाला ते होणार नाही अशी अपेक्षा आहेत सोयीस्कर रित्या आपला निवडून येणार  ऑन पोलखोल मुंबईकरांची पाणी समस्यांची होते आहे त्या पाईपलाईन साठी गेल्या वर्षी दोन हजार कोटीचा टेंडर होतं ते यावर्षी 3000 कोटीचा टेंडर निघालं काही मंडळीसाठी हे टेंडर निर्माण केले जात आहे. पैशाची वाढ मोठ्या प्रमाणात आहे दोन ते तीन लोकांसाठी अटी टाकल्या जातात. याला जे आक्षेप घेतले जातात ते काही लोकांसाठी पेटला जाते.  ऑन मनसे यूबीटी युती  यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील मागील काळात निर्णय घेताना खूप गोष्टीचा विचार करून घेतला होता संविधानाला धरून धागा असेल  १२१ वर्षा गायकवाड  मनोज कुळकर्णी  Feed send TVU ४८ Slug -- Varsha Gaykwad १२१
13
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 12, 2025 11:37:35
kolhapur, Maharashtra:नागपूर सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते. On अपघात जखमींना मदत - अपघात मदत आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात येतो तेव्हा यासाठी, आंदोलन किंवा उपोषणाला कोण बसले नाही.. आम्ही स्वखुशीने जनतेचे उत्तम मांडता येईल आणि न्याय देण्याच्या भावनेने काम केलं पाहिजे.... उत्तमातील उत्तम काम करण्याचं मी नेहमी प्रयत्न करतो.. On ठाकरे बंधू एकत्र - *ते दोघेही सख्खे मावस भाऊ आहेत.. ते एवढे दिवस का लावत आहेत हेच कळत नाही.. त्यांचे विचार एक आहे.. परीस असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा स्पर्श त्यांना झालाय.. एकतर यायला कोणाचा आक्षेप नाही.. आमच्या त्यांना शुभेच्या... पितृपक्षात त्यांची चर्चा सुरू आहे.. नवरात्र पर्यंत कायमस्वरूपी एकत्र येऊन जनतेच आवाज बनाव..* - *निवडणुका जिंकायच्या असतील तर भूमिका बदलवून लोकहिताचे काम करावे लागेल.. फक्त मोदीचा विरोध करून फायदा नाही..35 मार्क घेणारा विद्यार्थी मेरीट मध्ये येत नाही त्याला अभ्यास करावा लागतो...* On ओबीसी मराठा आरक्षण - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला दूरदूरपर्यंत धक्का पोहचवू शकत नाही... जेव्हा काँग्रेस नेते मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले तेव्हा यांच्या पक्षातील काही नेत्यांनी ओबीसी मधून देण्याची मागणी केली होती.. त्यांच्या लक्षात आल्यावर देऊ नये अशी मागणी करत आहेत... - ओबीसी किंवा मराठा कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही.. On छगन भुजबळ डबल नीती - छगन भुजबळ ओबीसी समाजासाठी ते नेहमी कॅबिनेट मध्ये आग्रही भूमिका मांडतात. आता त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर तेच अधिक स्पष्ट बोलतील.. On zp निवडणूक लांबणीवर याचिका - *हा कोर्टाचा निर्णय आहे.. मात्र मला व्यक्तिक वाटत या निवडणुका लांबणीवर पडू नयेत.. याच खूप नुकसान महाराष्ट्राने सहन केलं आहे... केंद्राचे वित्त आयोगाचे साडे तीन हजार कोटी अडकले.. आम्ही आर्थिक अडचणीत आहोत.. अनेकांच्या मजुरी द्यायला पैसे नाही.. अनेक नगर पंचायत चे बिल प्रलंबित आहेत...* - *अर्थ मंत्रालयाशी विचारणा केली.. त्यांनी थेट सांगितल जो पर्यंत तुमच्या निवडणुका नाही.. तो पर्यंत निधी नाही अशी जाचक अट सांगितली.. माझ्या जिल्ह्यातील नगर पंचायत, परिषद यांची आज कटोरा घेऊन फिरण्याची वेळ आहे... त्यामुळे आता निवडणुका थांबता कामा नये..* On शेतीसाठी युरिया तूट - शेतकऱ्याच्या पिकाला निवेदन देऊन चालणार नाही.. याच नियोजन केलं पाहिजे... योग्य वेळी त्यांना युरिया लागणार.. शेतकऱ्याची ही थट्टा आहे.. अडीच लाख कोटी आपण पगारावर खर्च करतो..8 हजार कोटी व्याज भरतो.. तरी अशी अवस्था निर्माण असेल तर याची काळजी घेण्याची गरज... म्हणुन मी आज माझ्या मतदार संघात शेतकऱ्यांना युरियाच टंचाई निर्माण झाली नाही पाहिजे.. - *पहिले युरिया द्यायचं मग तत्त्वज्ञान द्यायचं.. युरियामुळे फार फरक पडत नाही. फक्त शेती हिरवी दिसते.. तुमचं शेतीचं ज्ञान तुमच्या खिशात ठेवा पहिले युरिया द्या... नंतर गोष्टी करा..* On ओबीसी तरुण आत्महत्या - आत्महत्या कोणीही करू नये... आईच्या गर्भात आपण 9 महिने राहतो याची जाणीव ठेवली पाहिजे... संघर्ष करा आत्महत्या करणे योग्य नाही...
13
comment0
Report
Advertisement
Back to top