Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापुर में मेघगर्जना के साथ बारिश, कई तालुकों में पानी

AAABHISHEK ADEPPA
Sept 12, 2025 13:17:13
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात मेघगर्जनेसह पुन्हा पावसाला सुरुवात, जिल्ह्यातील अनेक तालुक्यात नदी, नाले, ओढे, तुडुंब - सोलापुरात मेघगर्जनेसह पुन्हा पावसाला सुरुवात, जिल्ह्यातील अनेक तालुक्यात नदी, नाले, ओढे, तुडुंब - दक्षिण सोलापूर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरून वाहू लागले - होटगी तलावातील मासे पाण्यासह रस्त्यावर आल्याने स्थानिक नागरिक मासेमारीचा आनंद घेतला - दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर पाणी आलेय - होटगी तलावात मोठ्याप्रमाणात मासे असल्याने पाण्यासोबत ते देखील रस्त्यावर आले - त्यामुळे या पाण्यात चिमुकल्यासह मोठ्यांची मासे पकडण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली
7
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Sept 12, 2025 14:48:35
Yavatmal, Maharashtra:AVB मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ मध्ये येत आहेत ते धार्मिक कार्यक्रमासाठी येत असले तरी येथील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या सावटात सापडला असल्याने त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. अति पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, शेतात पूर्णतः चिखल झाला असून, पिकं उध्वस्त झाली आहेत. आश्वासन देऊन महायुतीने कर्जमाफी केली नाही, प्रशासनही शेतकऱ्यांना साथ देत नाही. शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ येऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली. बाईट : चंद्रकांत खैरे
6
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 12, 2025 14:34:48
kolhapur, Maharashtra:Ngp CM Gadkari program live u ने फीड पाठवले ------- नागपूर शहराला आणि नागपूरकरांना लवकरच आणखी एक नवीन उड्डाणपूल मिळणार आहे... अमरावती महामार्गावर बोले पेट्रोल पंप चौकापासून नागपूर विद्यापीठ कॅम्पस गेट पर्यंत"चा 2.85 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल आता तयार झाला असून लवकरच. या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले जात आहे.. या पुलाला ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचे नाव देण्यात आलेय. *या उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित आहे* . या उड्डाणपुलामुळे नागपूर वरून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना तीव्र गतीने लॉ कॉलेज चौक, रवी नगर चौक, भरत नगर चौक आणि फुटाळा तलावाजवळ ची गर्दी टाळून थेट वाडी आणि पुढे अमरावतीचे दिशेने जाणे सोयीस्कर ठरणार आहे.. Gfx In नव्या उड्डाणपुलाची वैशिष्ट्य काय * नवीन उड्डाणपूल 2.85 किलोमीटर लांबीचा, 4 लेन चा. . * राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्ग डिव्हिजनने हे उड्डाणपूल बांधले आहे. * या उड्डाणपुलासाठी 191 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.. * हा उड्डाणपूल नागपूर अमरावती महामार्ग ट्रॅफिक इम्प्रूमेंट प्रोग्राम अंतर्गत तयार करण्यात आला आहे.. ---- या कार्यक्रमाची live फ्रेम दिलीय
3
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 12, 2025 14:33:59
Pimpri-Chinchwad, Maharashtra:नरहरी झिरवाळ ऑन बंजारा समाज आरक्षण.... pimpri zirvalh kailas puri Pune 12-9-25 feed by 2c Avb * न्यायदेवता हे संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे, त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही...... * सामाजिक हेवे आणि एकमेकांविषयीचा गैरसमज तो तसा खूपच वाईट तो तसा शासन म्हणून शासनाचा अधीन नाही काही झाले तरी त्याला संविधानाचा आधार आहे ...... * म्हणून बंजारा समाजाबाबतचे काय सांगितले जाते महाराष्ट्र भारत आपणही का गप्प बसायचं मला आदिवासी म्हणून सांगितलं जातं तेव्हा मी तेच सांगतो.... * आता संविधानाने आपल्याला जी सूची ठरवून दिले आहे त्याच्यात बंजारा समाजाचा संबंध नाही त्यात आपल्याला घाबरायचं कारण आहे परंतु जसजशी वेळ येईल तसं आपण त्याला आपण कायदेशीर उत्तर देऊ.....
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 12, 2025 14:15:15
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1209ZT_CHP_ROAD_CLOSE ( single file sent on 2C)  टायटल:-- सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मार्ग बंद, शेगाव येथील दुकान चाळीत शिरले पाणी      अँकर:-- गेले चार दिवस चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे . सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मार्ग बंद झालेत. शेगाव येथील दुकान चाळीत पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच तालुक्यातील चारगाव धरण ओवरफ्लो झाले असून निमढेला तलाव ओसंडून वाहत असल्याने अडचणीत भर पडली आहे. पाणी निघण्यासाठी मार्ग नसल्याने पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
4
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 12, 2025 13:46:53
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोली जिल्ह्यात आज जोरदार मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झालीय, कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे असणाऱ्या खटकाळीच्या ओढ्यावर कमी उंचीचा पूल असल्यामुळे पाणी पुलाच्या वरून वाहत आहे. यामुळे सोडेगाव सावंगी कडे जाणाऱ्या नागरिकांचा कळमनुरीशी संपर्क तुटलाय. या ओढ्यावर नवीन उंचीचा पूल उभारावा अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. खटकाळी ओढ्यावर पूरस्थिती : अपूर्ण पुलामुळे गावकऱ्यांमध्ये संताप सोडेगाव प्रतिनिधी : गावाजवळील खटकाळी ओढ्यावर आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून ओढ्यावरच्या पुलावर पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.साधारण पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे. ग्रामस्थांनी यापूर्वीच या ठिकाणी योग्य पुलाचे काम करावे अशी मागणी केली होती. परंतु संबंधित रस्त्याच्या ठेकेदाराला व काही स्थानिक नेत्यांच्या हितसंबंधामुळे अपुरा पूल मंजूर करून दिला गेला. त्यामुळे सोडेगाव-सावंगी रस्ता पूर्ण करण्यात आला असला तरी गावातील सुमारे अर्धा किलोमीटरचे काम अद्याप अपूर्ण आहे. आजच्या पुरस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, ग्रामस्थांनी चेतावणी दिली आहे की भविष्यात जर अशा प्रकारच्या पुरामुळे जीवित किंवा आर्थिक हानी झाली, तर त्याची थेट जबाबदारी ठेकेदार आणि कामाला संमती देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व नेत्यांवर राहील. गावकऱ्यांनी शासन व प्रशासनाकडे तातडीने ओढ्यावर सक्षम व सुरक्षित असा नवा पूल तातडीने उभारण्यात यावा अशी मागणी केली आहे.
7
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 12, 2025 13:17:26
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- राधाकृष्ण विखे फीड 2C राधाकृष्ण विखे on कर्नाटक शिवाजीनगर स्थानक Anc :- कर्नाटकातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी करण्याची मागणी समोर आल्याने यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसवर निशाणा साधतं प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसची भूमिका निशाणकालीन विपरीत बुद्धी राहिलेली आहे म्हणून आज त्यांची ही अवस्था आहे.खरंतर शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहे आणि त्यांच नाव बदल्यांच पाप जर काँग्रेस करणार असेल तर या राज्यातील जणता त्यांना कधी माफ करणार नाही खरंतर त्यांचे राष्ट्रीय नेते त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांना ही भूमिका मान्य आहे कां असा प्रश्न करत विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे... बाईट:- राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ऑन पंकजा मुंडे Anc:- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ नये असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं यावर मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हैदराबाद गॅजेट संदर्भात याचिका दाखल झाली आहे त्यावर देखील विखेंनी मत व्यक्त केला आहे. सध्या ही न्यायप्रविष्ठ बाब असून ओबीसी बांधवांचा गैरसमज दूर करू असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला आहे. तर व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र दिले जाणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केला आहे. कुणाला चुकीचे आणि खोटे प्रमाणपत्र मिळणार नाही अस राधाकृष्ण विखे पाटील स्पष्ट केला आहे. बाईट:- राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री
5
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 12, 2025 13:15:19
Yavatmal, Maharashtra:AVB कापसावरील ११ टक्के आयातशुल्क भारत सरकारने माफ करून शेतकऱ्यांच्या छातीवर तलवार चालविली आहे असा घणाघात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला आहे. यवतमाळच्या नेर येथे त्यांनी शेतकरी शेतमजूर हक्कयात्रा निमित्त आयोजित सभेमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर प्रहार केला. नेपाळ मध्ये तरुणाईचा आगडोंब उसळला आहे, भारतातील शेतकऱ्यांवर जुलूम केल्यास सत्ताधाऱ्यांची खैर नाही असाही इशारा कडूंनी दिला. आयातशुल्क माफ केल्यामुळे कापूस सहा हजारातही विकल्या जाणार नाही अशी अवस्था छप्पन इंच छाती वाल्याने करून ठेवली आहे. देशात अन्नदात्या शेतकऱ्यांबद्दल विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व नेते जाती धर्माच्या गोष्टी करताहेत, मात्र सर्व जातीत असलेल्या शेतकऱ्याला कुणीही किंमत देत नाही अशी खंत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केली. बाईट : बच्चू कडू : अध्यक्ष प्रहार
9
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Sept 12, 2025 13:04:03
Palghar, Maharashtra:Anchor पालघर _ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कासा येथील चिंचपाडा परिसरात आज एक भीषण अपघात घडला. मुंबईकडून गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा एक मोठा कंटेनर अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या नदीमध्ये कोसळला. या अपघातात कंटेनर पलटी झाल्याने वाहनाचा चक्काचूर झाला असून, चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर अत्यंत वेगात असावा व त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट पुलाच्या कठड्याला धडकून नदीत जाऊन पडले. अपघात इतका भीषण होता की कंटेनर पूर्णतः उलटला असून त्याचे पुढील व मागील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने चालकाला बाहेर काढण्यात आले असून, त्याला गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, कंटेनर मध्ये नेमके काय माल होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
7
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 12, 2025 12:46:30
Akola, Maharashtra:Anchor : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू झालीय अकोला जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेय. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेत आहे. दिवाळीनंतर या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदांसाठी आरक्षणाची यादी नुकतीच जाहीर केली आहे.या यादीनुसार, एकूण 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष पदांसाठी आरक्षण ठरवण्यात आले असून, अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आता अनुसूचित जमातीतील महिला विराजमान होणार, हे निश्चित झाले आहे.अकोला हा प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे या जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.आगामी निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला यश मिळते आणि कोणत्या नेत्याची ताकद सिद्ध होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
12
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 12, 2025 12:31:25
Akola, Maharashtra:Anchor : शिवसेना यूबीटीचे खासदार संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर टीका करत भाजपवर निशाणा साधला आहे. "भाजपला रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर भाजप खासदार व विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.आम्ही पाकिस्तानसोबतचं शत्रुत्व कायम ठेवणारच आहोत, मात्र मैदानात चांगले खेळाडू म्हणून वागत आहोत. पाकिस्तानच्या कुरापती आम्ही कधीच विसरणार नाही तर त्यांच्या प्रत्येक कुरापतीला आम्ही उत्तर दिलं असल्याच ते म्हणाले.लोकांना क्रिकेट आवडतं, आणि पाकिस्तानला मैदानात हरवण्याचा जो आनंद आहे, तो काही वेगळाच असतो.त्यामुळे याकडे राजकीय दृष्टीने नव्हे तर खेळाडू वृत्तीने पहाव असा सल्लाही त्यांनी दिलाय.. Byte : उज्वल निकम, खासदार तथा विशेष सरकारी वकील
14
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 12, 2025 12:21:11
11
comment0
Report
Advertisement
Back to top