Back
Palghar के चिंचपाडा में कंटेनर नदी में गिरा, चालक गंभीर घायल
HPHARSHAD PATIL
Sept 12, 2025 13:04:03
Palghar, Maharashtra
Anchor
पालघर _
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कासा येथील चिंचपाडा परिसरात आज एक भीषण अपघात घडला. मुंबईकडून गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा एक मोठा कंटेनर अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या नदीमध्ये कोसळला. या अपघातात कंटेनर पलटी झाल्याने वाहनाचा चक्काचूर झाला असून, चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर अत्यंत वेगात असावा व त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट पुलाच्या कठड्याला धडकून नदीत जाऊन पडले. अपघात इतका भीषण होता की कंटेनर पूर्णतः उलटला असून त्याचे पुढील व मागील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने चालकाला बाहेर काढण्यात आले असून, त्याला गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, कंटेनर मध्ये नेमके काय माल होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 12, 2025 14:48:356
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 14:34:483
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 14:34:111
Report
KPKAILAS PURI
FollowSept 12, 2025 14:33:592
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 12, 2025 14:33:423
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 12, 2025 14:32:232
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 12, 2025 14:15:154
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 12, 2025 13:46:537
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 12, 2025 13:17:265
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 12, 2025 13:17:137
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 12, 2025 13:15:199
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 12:46:3012
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 12:31:2514
Report
ABATISH BHOIR
FollowSept 12, 2025 12:21:1111
Report