Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

कंटेनर ने दुचाकी को धक्का दिया; वृद्ध महिला की मौत नामपूर में

YKYOGESH KHARE
Sept 16, 2025 12:22:13
Nashik, Maharashtra
nsk_axcidnet feed by 2C image 2 vidoe 1 *विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )* - कंटेनर दुचाकी अपघातात वृद्ध महिला ठार ... - सटाण्याच्या नामपूर येथील घटना... Anc:- कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिंधुबाई वसंत शिंदे ही वृद्ध महिला जागीच ठार झाल्याची घटना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील नामपूरमध्ये घडली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.कंटेनर चालकाविरुद्ध जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Sept 16, 2025 14:15:37
Nashik, Maharashtra: नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्याची दुरवस्था! 2 ते 3 वर्षांत जवळपास 35 हून अधिक जीव गेले व 150 अपघात या रस्त्यावर झाले तरी प्रशासन झोपलेले! नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत तब्बल ३० ते ३५ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तरीही प्रशासनाला जाग येताना दिसत नाही. या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी काल सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून रस्त्याची बिकट अवस्था समोर आणली. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व त्र्यंबकेश्वर मधील युवकांतर्फे त्र्यंबकेश्वर येथे एक अनोखे आंदोलन करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या लोकांना सामूहिक काव घास कार्यक्रम घेण्यात आला आणि रस्त्यांवरील खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या खड्ड्यांमुळे अनेकांना मान आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास देखील सहन करावा लागत आहे. तरीही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. येत्या काळात नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन होणार असताना या रस्त्यांची अशी दुर्दशा पाहून नाशिककरांची नाचक्की होत आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेपर्वाईवर आता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरते
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 16, 2025 14:00:58
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_River_Drone Feed on - 2C --------------------------- Anchor - जयकवाडी सह इतर धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला पुर आलाय. पाण्याची आवक वाढल्यामूळे नांदेड मधील विष्णूपुरी धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 1 लाख 9 हजार क्यूसेस प्रती सेकंद इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सूरू आहे. मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सूरूअसल्याने गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे. विष्णूपुरी धरण आणि गोदावरी नदीच्या पाण्याचे ड्रोन कॅमेऱ्यातील विहंगम दृश्य खास झी 24 तासच्या दर्शकासाठी. नांदेड जिल्ह्यात मोठा पाऊस नाही, मात्र वरील भागात मुसळधार पाऊस होत असल्याने आणि जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पुर आलाय. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. -----------------------
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 16, 2025 14:00:38
Akola, Maharashtra:Anchor : राज्य सरकारची थिंक टँक म्हणून ओळख असलेल्या मित्रा संस्थेच्या मानद पदावर अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अ . प ) आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे अप्रत्यक्षरित्या खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये मिटकरी यांनी – “प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते” असे म्हटले असून, कुणाचंही नाव न घेता शुभेच्छा दिल्याचा उल्लेख केला आहे. यासोबतच त्यांनी अंजली दमानिया यांना उद्देशून “शेतकरी पुत्राची अक्कल काढण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या” असा सल्ला दिला आहे. यामुळे दमानिया दांपत्याच्या नियुक्तीवरून आणि मिटकरी यांच्या प्रतिक्रियेवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. Byte : अमोल मिटकरी , आमदार , राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प )
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 16, 2025 13:04:28
Nashik, Maharashtra:*मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकींग...* .. Anchor - बनावट जन्म दाखला आदेश प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २६९ संशयित आरोपींचे दोषारोपपत्र आज मालेगाव येथील न्यायालयात दाखल करण्यात आले यावेळी संशयीत आरोपींच्या स्वाक्षऱ्या नोंदविण्यात आल्या.यापूर्वी न्यायालयाने कलम पस्तीस तीन प्रमाणे संशयितांना नोटीस बजावल्या होत्या..त्यानुसार आज मा.न्यायालयापुढे २६९ संशयितांना हजर करण्यात आले.. एकूण १ हजार ४४ संशयितांवर बनावट जन्म दाखल्याप्रकरणी किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे..माजी खा.किरीट सोमैया यांनी नुकताच मालेगाव दौरा केला होता..या दौऱ्यादरम्यान ५०० लोकांवर गुन्हा दाखल होईल असा दावा त्यांनी केला होता..
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 16, 2025 13:03:25
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव ब्रेकिंग DHARA_THEATER अखेर तुळजाई कला केंद्रावर कारवाई कला केंद्राच्या नावाखाली शेतकऱ्यांची पोरं वाम मार्गाला लागत असतील तर अशी सगळी कला केंद्र बंद करा लोककला जिवंत राहिली पाहिजे मात्र त्याच्या नावाखाली इतर धंदे नको पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून जिल्हा प्रशासनाला सक्त सूचना धाराशिव च्या तुळजाई कला केंद्रांचा प्रस्ताव रद्द करावा हा पोलीस विभागाचा अहवाल तुळजाई कला केंद्र प्रमाणे इतर कला केंद्रातही चुकीचे प्रकार चालत असतील तर प्रस्ताव रद्द करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना कलाकेंद्रातील नर्तकीच्या नादी लागून आत्महत्या केलेल्या गोविंद बर्गे प्रकरणानंतर सर्वत्र टीका जराशीच्या धाराशिवच्या पारगाव येथील तुळजाई कला केंद्रात मर्द की पूजा गायकवाड करत होती काम लोककला जिवंत ठेवत कला केंद्राचा प्रश्न हाताळण्याच्या पालकमंत्र्याच्या सूचना Byte प्रताप सरनाईक पालकमंत्री धाराशिव
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 16, 2025 12:38:10
Yavatmal, Maharashtra:AVB ज्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं, त्याचप्रमाणे बंजारा समाजालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, त्यासाठी बंजारा समाज मुंबई आणि नागपूर मध्ये देखील धडक देतील असा इशारा पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी दिला आहे. बंजारा आणि वंजारी समाज भाऊ भाऊ आहे. मराठवाड्यात बंजारा समाजाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारले होते त्यामुळे वंजारी बंजारा मध्ये अतूट नाते आहे. मात्र दोन्ही समाज वेगवेगळे आहेत. दोन्ही समाज आरक्षणाच्या दृष्टीतूनही वेगळे आहेत. दोन्ही समाजाला वेगवेगळे आरक्षण आहे. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण पाहिजे आहे. वंजारी समाज आदिवासी प्रवर्गात बसत असेल तर त्यांनाही आरक्षण द्यावं, त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा असल्याचे महंत जितेंद्र महाराज यांनी म्हटले आहे. बाईट : जितेंद्र महाराज
2
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 16, 2025 12:22:24
Wardha, Maharashtra:वर्धा SLUG-1609_WARDHA_JALJIVAN वर्धा जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या योजना रखडल्या कामे सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका पाणीपुरवठा योजना रखडल्याने संतापले आमदार जलजीवन मिशन बैठकीत आमदार समीर कुणावार संतापले अँकर  : वर्धा जिल्ह्यात जलजीवन मिशन  योजनेची असंख्य कामे गेल्या चार वर्षापासून रखडलीय. या योजना का रखडल्या याचा शोध घेण्यासाठी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील आमदार समीर कुणावार यांनी तडकाफडकी अधिकारी व कंत्राटदारांची बैठक बोलावली. जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण आणि आमदार समीर कुणावार उपस्थित होते. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील अर्ध्याअधिक पाणीपुरवठा योजना रखडल्याने गावाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याची बोंब आहे. ज्या कंत्राटदारांनी कामाला सुरुवातच केली नाही त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश आमदार समीर कुणावार यांनी दिलेय. विवो : आमदार समीर कुणावार यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकारी देऊ शकत नसल्याने कुणावार यांनी संताप व्यक्त केला.  हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात विविध गावात एकूण 224 पाणीपुरवठा योजनापैकी केवळ 62 योजना पूर्ण होऊ शकल्या आहे. हिंगणघाट मध्ये  162 कामे रखडली असून  जिल्ह्यात इतर तालुक्यातील योजनाचा आकडा मोठा आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या इतक्या योजना रखडल्या असताना अधिकारी करतात तरी काय? असा संतप्त सवाल आमदार समीर कुणावार यांनी बैठकीत उपस्थित केला आहे. जिल्हा परिषदेत नव्याने रुजू झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी देखील पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे. बाईट : समीर कुणावार, आमदार,हिंगणघाट
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 16, 2025 12:21:59
Wardha, Maharashtra:वर्धा SLUG- 1609_WARDHA_BUS - वर्ध्यात बस थांब्याकरीता आगार प्रमुखाना विद्यार्थ्यांचा घेराव - आंजी, खरांगणा इथं बस थांबविण्याची केली मागणी - विद्यार्थ्यांसह सुनील गफाट यांनी आगार प्रमुखांकडे केली तक्रार अँकर : वर्ध्याच्या आंजी आणि खरांगना या गावात बसला थांबा असतानाही महामंडळाचे चालक आणि वाहक बस थांबवत नाही. शाळा महाविद्यालयात येजा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट यांनी आगार प्रमुखांची भेट घेतलीय. आर्वीला जाणाऱ्या गाड्या आंजी आणि खरांगना येथे थांबविणे बंधनकारक करा अशी मागणी करण्यात आलीय. यावेळी विद्यार्थी  उपस्थित होते. येत्या तीन दिवसात गाड्या आंजी आणि खरांगना येथे थांबल्या नाही तर रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलाय.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 16, 2025 12:15:34
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेत जागेच्या वाद चिघळला – परिसरात तणाव" Anc..कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथील ओम सीता निवास इमारतीत सांगळे आणि दुबे कुटुंबाचा जागेचा वाद तापला आहे.सुशील दुबे याचा मुलगा निलेश दुबे याने सांगळे कुटुंबाचे दुकान अनधिकृत असल्याचा आरोप करत गेल्या नऊ दिवसांपासून पालिका मुख्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले आहे.आज सकाळी पालिका अधिकारी आणि पोलीस या इमारतीत मोजणीसाठी दाखल झाले. यावेळी मनसेचे पदाधिकारीही ठिकाणी पोहोचले. इमारतीतील सर्व घरांची मोजणी करण्यात आली, मात्र दुबे यांच्या घराची मोजणी करण्यासाठी प्रशासनाने परवानगी मागितली. दुबे यांनी "नोटीस दिलेली नाही, परवानगी नाही" असा युक्तिवाद करत मोजणीस विरोध केला.यावरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि "आधी दुबे यांच्या घराची मोजणी करा, मगच सांगळेंचं घर मोजा" असा पवित्रा घेत अधिकाऱ्यांना घेराव घातला.दरम्यान, दुबे यांच्या मुलीने मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तिची आणि महिला पोलिसांची झटापट झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चावा घेतला, त्यामुळे संतप्त पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते.या संपूर्ण गोंधळानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. Byte तक्रारदार सुशील दुबे Byte विवेक सांगळे, राशन दुकान मालक Byte मनसेचे उपशहराध्यक्ष योगेश गव्हाणे Byte :- पालिकेचे उपायुक्त समीर भूमकर
0
comment0
Report
Advertisement
Back to top