icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
SRSHRIKANT RAUT16 Sept 2025, 12:38 pm

AVB संकेत: बंजारा को ST आरक्षण चाहिए, मुंबई-नागपूर धड़ा देंगे महाराज

Yavatmal, Maharashtra:AVB ज्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं, त्याचप्रमाणे बंजारा समाजालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, त्यासाठी बंजारा समाज मुंबई आणि नागपूर मध्ये देखील धडक देतील असा इशारा पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी दिला आहे. बंजारा आणि वंजारी समाज भाऊ भाऊ आहे. मराठवाड्यात बंजारा समाजाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारले होते त्यामुळे वंजारी बंजारा मध्ये अतूट नाते आहे. मात्र दोन्ही समाज वेगवेगळे आहेत. दोन्ही समाज आरक्षणाच्या दृष्टीतूनही वेगळे आहेत. दोन्ही समाजाला वेगवेगळे आरक्षण आहे. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण पाहिजे आहे. वंजारी समाज आदिवासी प्रवर्गात बसत असेल तर त्यांनाही आरक्षण द्यावं, त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा असल्याचे महंत जितेंद्र महाराज यांनी म्हटले आहे. बाईट : जितेंद्र महाराज
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

केतन हत्या: आरोपपत्र अभी नहीं मिला, पिता का बड़ा दावा, परिवार पर सवाल

Varsoli, Maharashtra:(यात तिसरा आरोपी रितेश हंगे याचा फोटो जोडला आहे. तसेच विशाल अग्रवाल बाईट, cutaways, सिया गोयलच्या भावाचे visuals जोडले आहेत... सिया गोयल, तिचे आईवडील यांचे file फुटेज वापरावेत..) HEADLINE : केतन हत्या प्रकरणात आरोपपत्रावरून वडिलांचा मोठा दावा सियाच्या कुटुंबीयांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी ANCHOR : लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात केतनचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आरोपपत्रावरून मोठा दावा केलाय. आरोपपत्राची प्रत अद्याप मिळाली नसून, त्यासाठी न्यायालयात अर्ज केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, सियाच्या कुटुंबीयांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय. VO केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता आरोपपत्राची प्रत समोर येण्यापूर्वीच केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत. आरोपपत्र मिळाल्यानंतरच या प्रकरणात नेमके किती आरोपी आहेत आणि रितेश हांगे हा मुख्य आरोपी आहे की नाही, हे स्पष्ट होईल, असं विशाल अग्रवाल यांनी म्हटलंय. BYTE : विशाल अग्रवाल – केतनचे वडील (FILE NO. 05) VO दरम्यान, sिया आणि चेतनचं आधीच लग्न झाल्याची माहिती माध्यमांतून समजल्याचा दावा विशाल अग्रवाल यांनी केलाय.सियाच्या कुटुंबातील प्रवीण गोयल, पूजा गोयल, साहिल गोयल, रेणू मित्तल आणि नरेंद्र मित्तल यांना याबाबत माहिती होती का? माहिती असताना केतनसोबत सियाचं लग्न का जुळवण्यात आलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या व्यक्तींचीही केतन हत्या प्रकरणातील कथित भूमिकेच्या अनुषंगाने चौकशी करावी, अशी मागणी विशाल अग्रवाल यांनी केलीय. End VO आता आरोपपत्रातून नेमकं काय समोर येतं, रितेश हांगेची भूमिका काय आहे आणि सियाच्या कुटुंबीयांच्या भूमिकेबाबत तपासात काय निष्पन्न होतं, हेच पाहणं महत्वाच ठरणार आहे. चैत्राली राजापूरकर, झी 24 तास, मावळ.
0
0
Report

बार्शी वैराग में घर की दीवार ढहने से मावशी-भाची की दर्दनाक मौत

SShyam1h ago
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीतील वैराग मध्ये घराचे भिंत कोसळून मावशी - भाचीचा दुर्दैवी मृत्यू \n\n- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर \n- वैराग मधील खेंदाड गल्लीत पहाटेच्या सुमारास कमकुवत घराची भिंत कोसळून मावशी - भाचीचा दुर्दैवी मृत्यू \n- मीनल गुलाब ठोंबरे, सुमन महादेव पारदे असे मृत्यू झालेल्या दोन्ही महिलांची नावे \n- ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने ढीगार्‍याखाली अडकलेल्या दोन्ही महिलांना बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच केले मृत घोषित \n- सदर घटनेची नोंद वैराग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येतेय\n\nबाईट - \n\nग्रामस्थ
0
0
Report

अकोला में किसानों का आक्रोश मोर्चा; नितीन देशमुख के भाषण पर विवाद

SShyam1h ago
Akola, Maharashtra:कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अकोल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवसेना उपनेते आणि बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि त्यांच्या आमदारांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सत्तेसाठी गेलेल्या आमदारांवर निशाणा साधताना, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकही आमदार रस्त्यावर उतरत नसल्याची टीका नितीन देशमुख यांनी केली. मात्र, ही टीका करताना नितीन देशमुख यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.
0
0
Report
Advertisement

वाशिम के गायरान अतिक्रमण के खिलाफ ग्रामस्थों का अनिश्चितकालीन उपोषण

SShyam1h ago
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशिम तालुक्यातील गणेशपूर परिसरातील गुरांच्या चराईसाठी असलेल्या सार्वजनिक गायरान जमिनीवर काही ग्रामस्थांनी बेकायदेशीर अतिक्रमण करत नांगरणी केली आहे.या अतिक्रमण धारकांवर ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई केली नसल्याने मोठ्या प्रमाणात गायरान जमीन बळकावली आहे.या अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्या ऐवजी ग्रामस्थांवरच खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.त्यामुळे तात्काळ हे गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवून गायरान जमीन मोकळी करावी, ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेत दोषींवर कठोर कारवाई करावी या मुख्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
0
0
Report

वाशीम में कारंजा के दो मज़दूरों के विवाद पर हत्या; शव खेत में दफन

SShyam1h ago
Washim, Maharashtra:वाशीम: दोन मजुरांतील वाद टोकाला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.खेर्डा गावाजवळील अनई फाट्याजवळ एका मजुराचा खून करून त्याचा मृतदेह शेतातील खड्ड्यात पुरण्यात आला.या प्रकरणी कारंजा पोलिसांनी आरोपी मजुराला अटक केली आहे. शेतमालक संतोष तिडके यांच्या शेतात मध्य प्रदेशातील दोन मजूर कामावर होते.दोघांमध्ये झालेल्या वादातून एका मजुराने सहकाऱ्याचा खून केला आणि मृतदेह शेतात खड्डा करके पुरला.घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. मात्र, कारंजा पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत.
0
0
Report

अकोला में सूखा घोषित कर किसानों को तुरंत मदद दें, विपक्ष आक्रामक

SShyam1h ago
Akola, Maharashtra:राज्यात अनेक भागांत पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात सापडला आहे... खरीप पिके हातातून जाण्याची भीती निर्माण झाली असून, कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी आता विरोधक आक्रमक झाले आहेत. अकोल्यात काँग्रेसकडून गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू असतानाच, आज ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही सरकारविरोधात रणशिंग फुंकलं. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अकोल्यात भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढत ठाकरे गट रस्त्यावर उतरला. शिवसेना नेते आणि बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य भवन येथून हा मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. पावसाचा दीर्घ खंड, सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान आणि वाढतं आर्थिक संकट... या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा कोरड्या दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांनी सरकारला थेट ५ ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीपर्यंत शेतकऱ्यांसाठी ठोस मदत जाहीर झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. ५ ऑक्टोबरनंतर शेतकऱ्यांसह समृद्धी महामार्ग बंद पाडू, असा इशाराच नितीन देशमुख यांनी सरकारला दिला आहे.
0
0
Report
Advertisement

सेझ प्रकल्प रद्द: 45 गांवों के किसानों का आक्रोश पेण में धडक मोर्चा

SShyam1h ago
Chendhare, Maharashtra: ४५ गावांतील शेतकऱ्यांचा धडक मोर्चा ....... ‘जमीन आमच्या हक्काची’; ७/१२ कोरा करा ........ सेझच्या नोंदी हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी ...... पेण प्रांत कार्यालयावर शेतकाऱ्यांचा आक्रोश अँकर - महामुंबई सेझ प्रकल्प रद्द झाल्यानंतरही जमिनीवरील सेझच्या नोंदी कायम असल्याने पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील ४५ गावांतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ‘जमीन आमच्या हक्काची, सातबारा कोरा करा’ या मागणीसाठी शेतकाऱ्यांनी पेण प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सेझसाठी दिलेल्या जमिनी मूळ मालकांना परत कराव्यात, सातबारा उताऱ्यावरील सेझच्या नोंदी तातडीने हटवाव्यात आणि शेतकऱ्यांचा जमिनीवरील हक्क पूर्ववत करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. जर उद्योगांना दिलेल्या जमिने परत घेण्याची मोहीम सरकार राबवत असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी परत का करत नाही असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
0
0
Report

लसलगाव क्षेत्र में एक घंटे की बारिश से गर्मी मिटे, किसानों को मिली राहत

Lasalgaon, Maharashtra:लासलगाव परिसरात गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळापासून पावसाने दडी मारली होती त्यामुळे वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते, तर पावसाअभावी मका, सोयाबीन, बाजरी, भेंडी यासह विविध खरीप पिके करपू लागली होती अशातच आज दुपाराच्या सुमारास लासलगाव परिसरात सुमारे एक तासाभर दमदार पावसाने हजेरी लावली अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला तर पिकांना पाण्याची नितांत गरज असताना झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे
0
0
Report
Advertisement

संगमनेर के किसानों ने जिला कार्यालय में घुसकर प्रशासन के खिलाफ प्रदर्शन तेज किया

Shirdi, Maharashtra:संगमनेरमध्ये संतप्त शेतकरी थेट प्रांत कार्यालयात घुसले. निवेदन घेण्यासाठी प्रांत अधिकारी न आल्याने शेतकरी आक्रमक. पोलिसांचा विरोध झुगारुन शेतकरी थेट प्रांत कार्यालयात घुसले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेरमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. विजेच्या प्रश्नावरून आक्रोश मोर्चा. प्रांत कार्यालयाच्या दारात शेतकऱ्यांनी मांडला ठिय्या. शेतकऱ्यांचा शासन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी.
0
0
Report

कोल्हापुर के खिद्रापूर ब्रांच में 40 लाख के गबन की आंतरिक जांच शुरू

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खिद्रापूर शाखेत सुमारे 40 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. बँक कर्मचाऱ्यांनी खातेधारकांच्या खात्यातील रक्कम परस्पर स्वतःच्या आणि पत्नीच्या खात्यावर वळवल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याचबरोबर शाखाधिकारी राजकुमार चौगुले यांच्या लॉगिनचा वापर करून ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेव पावत्या मोडल्याचाही संशय आहे. या कथित गैरव्यवहारानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने खिद्रापूर शाखेतील व्यवहारांची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे… या प्रकरणात शाखेतील इतर कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे… दरम्यान, या कथित गैरव्यवहाराशी संबंधित एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे… त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणि नेमका गैरव्यवहार किती रुपयांचा आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे. बँकेचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीदरम्यान संबंधितांकडून आतापर्यंत 23 लाख रुपये वसूल करण्यात आल्याचे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. खातेधारकांच्या रकमेचा परस्पर वापर झाला का ? ठेव पावत्या नेमक्या कशा मोडण्यात आल्या ? शाखाधिकारी यांच्या लॉगिनचा वापर कोणी केला? आणि या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे? या सर्व बाबींचा तपास बँकेच्या अंतर्गत चौकशीत केला जात आहे. पण दुसरीकडे बँक निरीक्षक ए एस पाटील आणि शाखाधिकारी राजकुमार चौगुले यांच्यामधील फोनचा संवाद सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यामुळे या अपहर प्रकरणाची कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

काजू- अक्रोड- बदाम के लाडू स्पीड पोस्ट से कृषिमंत्री को भेजे गए विरोध का संकेत

Shirdi, Maharashtra:मराठवाड्यात झालेल्या आढावा बैठकीत मंत्री आमदार खासदार काजू खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटले... अकोले तालुक्यातील उबाठाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने याचा निषेध नोंदवत कृषीमंत्र्यांना काजू बदाम अक्रोडचे शेणाचे लाडू स्पीड पोस्टाने थेट पार्सलच पाठवले... विशेष म्हणजे या पार्सल मध्ये शेणाचे लाडू तयार करून त्यावर काजू अक्रोड व बदाम लावण्यात आले आहेत.. अकोले तालुक्यातील उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पीड पोस्ट ने हे पार्सल कृषिमंत्र्यांसाठी रवाना केले... Byte - पदाधिकारी
0
0
Report

जालना के किसानों पर सूखे का खतरा: ठिंबक-तुषार सिंचनों से फसल बचाने की जद्दोजहद

Jalna, Maharashtra:जालना : खरीप पिकांचा तुषार,ठिंबक सिंचनावर आधार,पावसाअभावी शेतकरी बेजार व्हिओ : ०१: अर्ध सोयाबीन पावसाअभावी पिवळं पडलं. मक्याच्या कणसात दाणे भरण्याआधीच वाळून गेली. पावसाअभावी मिरची पिकांवर रोगराई पसरली. हजारो शेतकऱ्यांच्या कपाशी पीकानं माना टाकल्या. ही परिस्थिती आहे जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची. सध्या अर्धी पिकं हिरवी तर अर्धी करपली असं चित्र सध्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत पाहायला मिळतं.त्याच कारण आहे.ठिंबक आणि तुषार सिंचनाचा वापर. सुरुवातीला झालेल्या पावसानं विहिरीत पाणी आलं.मात्र नंतर पाऊस पडला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी विहिरीत होतं नव्हतं ते पाणी तुषार आणि ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून पिकांना देण्यास सुरुवात केली.आणि पिकं आतापर्यंत जगवली.पण आता विहिरीनीच तळ गाठलाय. त्यामुळे सध्या दिसणारं हिरवगार पीकही दुष्काळाच्या गर्तेत सापडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागलीय. व्हिओ:०२:आता ही कपाशी पहा .आतापर्यंत पावसाभावी फक्त या कपाशीची वाढ खुंटली.कैऱ्या बऱ्यापैकी आहे.ठिंबक सिंचनावर असल्यानं एक दोन तास पाणी देऊन ही कपाशी वाचवण्यात आली. पण आता विहिरींनीच तळ गाठलाय त्यामुळे यापुढे ही कपाशी कधीपर्यंत जगेल याचाच विश्वास शेतकऱ्यांना राहिला नाही.त्यामुळे सरकारने आता तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय, व्हिओ:३: आता दुसऱ्या आणखी एका कपाशीची अवस्था पहा. पावसच नसल्यानं या कपाशीने माना टाकायला सुरुवात केलीय.विहिरीतच पाणी नाही तर कपाशीला पाणी देण्यासाठी कोठुन आणणार अशी परिस्थिती शेतकऱ्याची झालीय.ऐन दुपारच्या वेळी पावसाच्या प्रतीक्षेत असलेली पिकं माना टाकतात तसा शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय. व्हिओ:०४: शेतकऱ्यांनी विहिरीत होतं नव्हतं ते सगळं पाणी काटकसरीने वापरून ठिंबक आणि तुषार सिंचनाचा वापर करून पिकांना देण्याचा अतोनात प्रयत्न केला पण आता विहिरीतीलच पाणीसाठा तळाला गेलाय त्यामुळे वाचवलेली पिकंही हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागलीय.त्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा आता सरकार दुष्काळ कधी जाहीर करत याकडे लागल्या आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top