415001
सातारा के शिरवळ में सड़क पर गोलीबारी, एक घायल, CCTV रिकॉर्डिंग
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_SHIRVAL_GOLIBAR सातारा - साताऱ्यातील शिरवळ मध्ये एका व्यक्तीवर अज्ञात दोन तरुणांनी भर रस्त्यात गोळीबार केला आहे.ज्या व्यक्तीवर हा गोळीबार करण्यात आला तो व्यक्ती थोडक्यात बचावला असून एक गोळी त्याचा हाताला लागली आहे.पूर्व वैमन्यास्यातून हा गोळीबार झाल्याचे समजते आहे.जखमी वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गोवळकोट में गणेश विसर्जन की सदियों पुरानी परंपरा, नाव से जल विसर्जन भी आकर्षण
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी : गोवळकोटमध्ये अनोखी परंपरा; नदीत रिंगण घालून आणि बोटीतून बाप्पाला निरोप!.. रत्नागिरीच्या चिपळूणमधील गोवळकोट येथे गणेश विसर्जनाची शेकडो वर्षांची अनोखी परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जातेय.. येथे गावातील सर्व गणेशमूर्ती डोक्यावरून नदीपात्रात आणून त्यांचे भव्य रिंगण केले जाते आणि पारंपरिक पद्धतीने नाचवत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो.. तर दुसरीकडे, स्थानिक भोई समाजाकडून गणरायाला बोटीतून नदीच्या खोल पाण्यात नेऊन वाजतगाजत विसर्जन करण्याची आगळीवेगळी पद्धत पाहायला मिळते.. गोवळकोटमधील या दोन्ही विसर्जन परंपरा सध्या भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत..0
0
Report
बंजारा आरक्षण के लिए सात युवकों का उपोषण समाप्त; सरकार से बैठक की मांग
Washim, Maharashtra:वाशिम: सात युवक गेल्या आठ दिनांत वाशिमाच्या पोहरादेवी इथं संत रामराव महाराजांच्या समाधी समोर उपोषण सुरु केलं होतं. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याने बंजारा धर्मगुरू तथा विधान परिषदेचे आमदार बाबूसिंग महाराज यांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुढील १५ दिवसात बैठक लावण्याचं आश्वासन देत उपोषण सोडवलं. यावेळी उपोषणकर्त्यांनी एसटी आरक्षणासंदर्भात सरकारनं नेमलेल्या समितीनं आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती जाहीर करावी अशी भूमिका घेतली असून. मुख्यमंत्रींशी सकारात्मक चर्चा न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.0
0
Report
गंगापुर रोड वृक्षतोड पर बड़ी कार्रवाई; 6 गिरफ्तार, चार दिन की पुलिस कस्टडी
Nashik, Maharashtra:नाशिक गंगापूर रोड वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई; सहा जणांना अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी जाहिराती दिसाव्यात म्हणून झाडांची कत्तल? CCTV नंतर पोलिसांचा दणका; सहा जणांवर कारवाई गंगापूर रोडवरील ५० हून अधिक झाडे तोडल्याप्रकरणी ६ जणांना अटक नम्रता अॅडव्हर्टायझिंगचे संचालक मच्छिंद्र देशमुख यांच्यासह कारवाई सर्व आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी गंगापूर पोलिसांची कारवाई; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप गंगापूर रोडवरील दुभाजकावरील झाडे तोडल्याच्या तक्रारीनंतर गंगापूर पोलिसांनी तपास सुरू केला होता जाहिराती दिसाव्यात या उद्देशाने रात्रीच्या वेळी झाडे तोडल्याच पोलिस तपासात समोर आले आहे, दुभाजकावरील ५० हून अधिक झाडे तोडल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या प्रकरणी अभिमन खैरनार, दिलीप बेंडकुळे, दीपक दाते, रोहिदास खुरखुटे, अर्जुन चारोस्कर आणि नम्रता अॅडव्हर्टायझिंगचे संचालक मच्छिंद्र देशमुख अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने सहाही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात असून, वृक्षतोडीच्या या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलिसांकडून सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणातील पोलीस कारवाई आणि तपासाबाबत नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली आहे. या प्रकरणाला नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे यांनी वाचा फोडत आशा लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे... त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेचे कुठले अधिकारी यामध्ये जर शामिल असेल त्याची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी उपमहापूर विलास शिंदे यांनी केलीये. नाशिकमध्ये तब्बल ५० झाडे तोडल्याच्या प्रकारावरून मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांशी आपले बोलणे झाले असून, संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आता जनतेनेही पुढे आले पाहिजे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र झाडे तोडण्याचे आदेश किंवा सांगणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. महापालिकेतील काही अधिकारी संबंधित लोकांना सांभाळत असल्यामुळेच त्यांच्या दादागिरी वाढत असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला. झाडे तोडण्याच्या प्रकरणात संबंधित व्यक्तींसोबतच जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. गंगापूर रोडवरील झाडतोड प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, झाडतोडीच्या या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील संबंधित जाहिरातदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. मात्र, केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही. शहरातील झाडांची अशाप्रकारे बेकायदेशीर तोड करणाऱ्या मुजोरांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर आणि प्रभावी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपासासोबतच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासन नेमकी कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता लक्ष लागले आहे...0
0
Report
Advertisement
अकोल्यात कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त, किसानों पर असर सवाल
Buldhana, Maharashtra:अकोल्यात कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त... अकोल्यात कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरावती विभागाची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली; मात्र याच बैठकीत काही अधिकारी चक्क मोबाईलमध्ये व्यस्त असल्यांचं पहायला मिळालं... कुणी व्हॉट्सएप किंवा सोशल मीडिया पाहण्यात मग्न असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे... तर एकीकडे पावसाच्या लहरीपणामुळे आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे... दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गांभीर्याने चर्चा होणाऱ्या बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं... त्यामुळे प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत किती गंभीर आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो...0
0
Report
अकोल्याकी बैठक में अधिकारी सोते दिखे, किसानों की त्रस्त स्थिति पर सवाल
Akola, Maharashtra:अमरावती विभागातील पिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अकोल्यातील कृषी विद्यापीठात महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच काही अधिकाऱ्यांना डुलक्या लागल्याचे आणि काही काळ मोबाईल मध्ये रमतांना कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे बैठकीतील अधिकाऱ्यांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, नांदेडच्या बैठकीत काजू-बदाम खात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चर्चेत आलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली. "नांदेडच्या बैठकीत माझ्यासमोर काजू-बदाम आलेच नाहीत," असे वक्तव्य त्यांनी केले. तर अकोल्यातील बैठकीत अधिकारी झोपल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर, फोटो काढताना अधिकाऱ्याचा डोळा लागला असेल, असे म्हणत कृषिमंत्रीांनी अधिकाऱ्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांची परिस्थिती गंभीर बनली आहे. शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना, त्यावर उपाययोजनांसाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीतच अधिकारी डुलक्या घेताना दिसल्याने प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकरीांच्या अडचणी आणि पिकांच्या नुकसानीबाबत सरकार आणि प्रशासन खरोखरच किती गंभीर आहे? असा सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.0
0
Report
कृषि मंत्री भरणे का किसानों के लिए आश्वस्तजनक बयान, मदद के कदम तेज होंगे
Akola, Maharashtra:शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारए कृषी मंत्री दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया नांदेडच्या बैठकीत माझ्या समोर काजू-बदामच आले नाहीत, असं वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय. अमरावती विभागातील ५६ तालुक्यांमध्ये पीक परिस्थिती गंभीर असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, शेतकऱ्यांनी वेगळा विचार करू नये, असं आवाहनही भरणे यांनी केलंय. मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग ज्या ठिकाणी सुरू आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. बैठकीदरम्यान फोटोमध्ये अधिकारी झोपलेला दिसत असल्याच्या मुद्द्यावरही भरणे यांनी स्पष्टीकरण दिलंय. फोटो काढला तेव्हा अधिकाऱ्याचा डोळा लागला असेल, असं ते म्हणाले.अधिकारी आणि सरकार शेतकऱ्यांसोबत असून, अशा बाबींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कशी देता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही भरणे यांनी स्पष्ट केलं. शेतकरी संकटात असल्याची बाब सरकारच्या बैठकीत मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली.0
0
Report
Advertisement
दानवे के अनुसार मंत्री संवेदनहीन, किसान सवालों से जूझते महाराष्ट्र में drought की मांग
Navi Mumbai, Maharashtra:शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नवी मुंबईतील गणरायाचे घेतले दर्शन. राज्यात चांगला पाऊस पडुदे, राज्यात सुरु असलेला अन्याय अत्याचार विरोधात लढायला शिवसैनिकांना ताकद देण्याचे मागितले साकडे. पीक पूर्णपणे संपलेलं आहे, कर्नाटकात दुष्काळ जाहीर झालाय त्याप्रमाणे महाराष्ट्रतही दुष्काळ जाहीर करावा. मंत्री मंडळात बसलेल्यांना जनतेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संवेदना नाही, अश्या संवेदनाहीन लोकांमुळेच राज्यात ईश्वराचा कोप झालाय. बाईट - अंबादास दानवे (नेते शिवसेना ठाकरे गट)0
0
Report
गुहागर-रत्नागिरी के पाचेरी सडा में सड़क नहीं, बारिश में डोली से मरीज पहुँचाने मजबूरी
Ratnagiri, Maharashtra:गुहागर-रत्नागिरी स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही पाचेरी सड्यात रस्ता नाही; जीर्ण साकवामुळे रुग्णांना डोलीतून नेण्याची वेळ.. रत्नागिरीच्या गुहागरमधील पाचेरी सडा गावात आजही पक्का रस्ता नाही.. खोत वठार आणि ब्राह्मणवाडीला जोडणारा लोखंडी साकव जीर्ण झाल्याने पावसाळ्यात पूर येताच गावाचा संपर्क तुटतो.. अशा वेळी रुग्णांना चक्क डोलीतून न्यावे लागत असल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहेत.. रस्ताच नसल्याने गावाकडे परतायचे तरी कसे,असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत असून,प्रशासन याकडे लक्ष देणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत..0
0
Report
सोलापुर में ग्राम विकास मंत्री के गणपति दर्शन पर विपक्षी और अधिकारी भी पहुँचे
Pandharpur, Maharashtra:राज्यातचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडी येथील निवासस्थानी बसवलेल्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या आजी-माजी आमदारांसह अधिकाऱ्यांनीही उपस्थिती लावली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा गणपती हा सेलिब्रेटी झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना केली आहे पहिल्या काही दिवसांनी मतदार संघातील नागरिकांसोबत त्यांनी हा उत्सव साजरा केला यानंतर सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन आमदार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर मनपा आयुक्त हे सुद्धा उपस्थित होते. या निमित्ताने माढा आणि माळशिरस मध्ये राजकीय विरोधक सुद्धा पालकमंत्र्यांच्या गणरायाच्या चरणी नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळालं0
0
Report
Advertisement
नाना पटोले ने सरकार पर हमला, महाराष्ट्र में दुष्काल और कृषि संकट पर निशाना
Bhandara, Maharashtra:भंडारा ब्रेकिंग नाना पटोले बाईट tumhi मरा আমরা ऐश करू.. सरकार ची मानसिकता - नाना पटोलेचा सरकावर घणाघात टिका.. Anchor - हे सरकारच बेशरम झालेली आहे. यांना कुणाचेही भीती राहिली नाही. हे निवडणूक आयोगाची कृपा आहे. यांना लोकांच्या मताची ही गरज नाही अश्या प्रकार ची बेशरम व्यवस्था जे लोकशाही ला काळिमा फासणारी या भाजप युती मध्ये पाहतो आहे. मी स्वतः राज्यपालानां भेटून महाराष्ट्र मध्ये भयावह दुष्काळ ग्रस्त परिस्थिती आहे. अनेक जिल्ह्यात पाऊसच पडला नाही, पीक वाळलेले आहेत पण हे सरकार आपले केंद्रातले नियम सांगतात. कर्नाटक सरकार ने एक दिवसाचं विधिमंडळ अधिवेशन घेऊन दुष्काळ घोषित केलं तर या नरेंद्र और देवेंद्र च सरकार यांना महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांचा आत्महत्या पाहायचे आहेत आणि म्हणून बेशरामासारखे काजू बदाम खाऊन व्हिडीओ येत आहेत. आणि तुम्ही मरा आम्ही ऐश करू अशी बेशरम मानसिकता या सरकारची पाहायला मिळते आहे यांचा आम्ही निषेध करतो. (नांदेडच्या नियोजन भावनातील बैठकीत महायुतीतील नेत्यांचे кाजू बदाम खात दुष्काळावर चर्चा करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे) यावर प्रतिक्रिया बाईट - नाना पटोले -------------------- नाना पटोले on चंद्रशेखर बावनकुळे, संजय जाधव काजू बदाम हे जनतेच्या पैशाचं... शेतकऱ्यांचा जखमेवर मीठ चोळायचं पाप सरकार करत आहे.. नाना पटोले Anchor -ज्या मीटिंग चालल्या होत्या त्या शासकीय होत्या आणि शासकीय बैठका मध्ये येणारा काजू बदाम हे जनतेच्या पैस्याचा असतो हे बावनकुळे नीं समजल पाहिजेत. तुम्ही तुमच्या घरात गर्भ श्रीमंत असाल कालपर्यंत कुणी आटो चालवत होते तिथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही आता सरकार झालात. शासकीय बैठका मध्ये जो काजू बदाम येतो तो जनतेच्या पैस्याचा असतो याची माहिती यांना नसेल आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच जखमेवर मीठ चोळायाच पाप करत असेल तर हे निषेधार्थ आहे0
0
Report
गणेशोत्सव पर शिवकालीन हथियारों का प्रदर्शन इतिहास प्रेमियों को आकर्षित कर रहा है
Sangli, Maharashtra:सांगली में गणेशोत्सव के अवसर पर ओम सम्राट गणेशोत्सव मंडळ के अनुसार शिवकालीन शस्त्र-अस्त्र प्रदर्शन आयोजित किया गया है। शहर के खणभाग स्थित विठ्ठल मंदिर में यह प्रदर्शन आयोजित किया गया है ताकि आज की युवा पीढ़ी को छत्रपती शिवाजी महाराज के पराक्रम का इतिहास और शिवकालीन युद्धकौशल की पहचान हो सके। छत्रपती के काल के विभिन्न प्रकार की तलवारें, शिवकालीन गनिमी काव्य का प्रतीक वाघनखे, बिचवे और कट्यारी, युद्ध-उपयोगी आक्रमक व संरक्षक अस्त्रे, तत्कालीन समृद्ध युद्ध-तंत्र और मराठ्य overs के दैदीप्यमान पराक्रम की जानकारी प्रदर्शन में प्रस्तुत की गयी है, जिसे इतिहास प्रेमी और गणेश भक्तों ने खूब सराहा है।0
0
Report
उद्योग मंत्री उदय सामंत का MIDC परियोजना पर सकारात्मक संकेत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी Industr ies Minister Uday Samant press conference pointers उद्योग मंत्री उदय सामंत पत्रकार परिषद pointers *On वाटद एमआयडीसी* वाटद एमआयडीसीबाबत सकारात्मक पावलं आठवडाभरात वाटद एमआयडीसीचं चित्र स्पष्ट होईल प्रकल्पाला विरोध नाही वाटद एमआयडीसी संघर्ष विरोधी कृती समितीसोबत आमची चर्चा - उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं स्पष्ट लोकांना विश्वासात घेऊन पुढे जाणार प्रकल्पासाठी संवाद यात्रा गावागावात काढणार डिफेन्स क्लस्टर या प्रकल्पामुळे गावकऱ्यांवरती निर्बंध येणार असतील तर या प्रकल्पाचा विचार होईल आठ दिवसात या प्रकल्पासंदर्भात प्रांताधिकारी अहवाल देतील आणि नंतर या संदर्भातील निर्णय होईल *ऑन संकट मोचक* जरांगे यांच्या 12 आंदोलनाचा मी साक्षीदार, obc समाजावर अन्याय न होता आम्ही प्रश्न सोडवणार आम्ही समन्वय साधून सर्व नेत्यांची संपर्क केला सरकारसाठी भूमिका घेतली आणि त्याला यश आलं जरंगे पाटील यांच्यासोबत मी समन्वयाची भूमिका बजवली 90 दिवसा नंतर पुन्हा आंदोलन करायला लागू नये अशी सरकारची भूमिका आहे ऑन् सॅटॅलाइट देशात पाच सॅटेलाईट तयार करत आहोत, 18 महिने यासाठी लागतात त्याचा उपयोग कृषी विभाग आणि उद्योग विभागाला देखील होईल *ऑन रोहित पवार* हे सरकार बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही पंचनामे झाल्यानंतर योग्य ती मदत महाराष्ट्र सरकार नक्की करेल अधिवेशन संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील *ऑन संजय राऊत* कुणाच्याही वैयक्तिक गोष्टीवर मी टीका करत नाही न्यायालयीन बाब आहे त्या संदर्भातील पिटीशन ही दाखल झालेली आहे न्यायालयावरती आमचा सर्वांचा विश्वास न्यायालयीन प्रकरण असताना कुणाच्या संदर्भात बोलू नये ही आम्हाला एकनाथ शिंदे यांनी दिलेली शिकवण आहे समोरचे काही बोलले अशा वेळी आम्ही त्यांना माफ करतो वैयक्तिक पातळीवरती मी आणि माझा पक्ष बोलणार नाही *ऑन ओबीसी आंदोलन* ओबीसी समाजामध्ये काही गैरसमज असतील त्यावर मार्ग काढला जाईल बावनकुळे साहेब त्याचे अध्यक्ष आहेत त्यावरती मार्ग नक्की काढतील ओबीसी प्रश्नांसंदर्भात विस्तृत एक बैठक लावावी अशी मागणी देखील मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे ओबीसी समाजामध्ये जर कोणी गैरसमज पसरवत असेल तर ते दूर करण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांना देखील बैठक घेण्याची विनंती केलेली आहे *ऑन दिशा सालीयन* समोरच्याने गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारत नाही प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्याच्यावरती आम्ही कोणी काही बोलणार नाही0
0
Report
Advertisement
पुणे शिक्षक निर्वाचन क्षेत्र के लिए महायुति में तीन मजबूत दावेदार
Pandharpur, Maharashtra:पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपले आहे. अशातच महायुती मधून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपकडून पंढरपूर मधील स्वेरी शिक्षण समूहाचे प्रमुख शिक्षण तज्ञ डॉक्टर बीपी रोंगे यांनी मागील काही दिवसांपासून मोर्चेबांधणी केली आहे.तसेच मतदारसंघातील प्रचारामध्ये संपर्क ठेवत आघाडी घेतली आहे. याच मतदारसंघातून एकदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रमुख पंढरपूर तालुक्यातील असलेले माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी सुद्धा नुकताच मेळावा घेऊन एखाद्या राजकीय पक्षाकडून आपण उमेदवारी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. अद्याप त्यांनी कोणत्या पक्षाची उमेदवारी मागणार हे जाहीर केलं नसलं तरी त्यांचा कल सत्ताधारी महायुतीकडे असल्याचे दिसत आहे. महायुती घटक पक्ष असलेला शिवसेनेकडून एकनाथ शिक्षक सेनेचे मूळचे करमाळा येथील मंगेश चिवटे हे सुद्धा मागील काही महिन्यांपासून शिवसेनेची उमेदवारी आपल्याला मिळेल या विश्वासाने काम करत आहेत त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीतून सोलापूर जिल्ह्यातीलच तीन प्रबळ दावेदार समोर आल्याचे पाहायला मिळते. आता भारतीय जनता पक्षाच्या वाटणीला हा मतदारसंघ जाणार की शिवसेनेकडे जाणार यावर उमेदवार कोण हे नाव निश्चित होऊ शकते. की सत्ताधारी आणखी नवाच चेहरा समोर आणतात हे पहावे लागेल0
0
Report
भरणे के नांदेड वीडियो पर बयानबाजी, अकोला में कृषि विभाग की समीक्षा बैठक सावधानी से
Akola, Maharashtra:राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा नांदेड दौरा चांगलाच चर्चेत आला होता. बैठकीदरम्यान मंत्र्यांनी काजू-बदामावर ताव मारल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावरून मोठी टीका करण्यात आली होती. दरम्यान, आज अकोल्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मात्र, नांदेडच्या बैठकीत झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी यावेळी विशेष दक्षता घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं. बैठकीला उपस्थित मंत्र्यांसाठी यावेळी केवळ चहा आणि पाण्याचीच व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे नांदेडच्या काजू-बदाम प्रकरणानंतर अकोल्यातील बैठकीत प्रशासनाने घेतलेली ही खबरदारी चर्चेचा विषय ठरली आहे.0
0
Report
नाशिक पर्यटन स्थल पर यात्रियों से दबंगई, पुलिस ने तीन आरोपियों को पकड़ा
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे... जव्हार जवळील अंबी गावात ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांना स्थानिक तरुणांनी घेरून दादागिरी करत पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. दुचाकीला कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या या वादात चार ते पाच तरुणांनी पर्यटकांना धमकवल्याचा आरोप आहे....नेमका काय आहे हा प्रकार? पाहुयात हा विशेष रिपोर्ट...0
0
Report
Advertisement
