Back
साताऱ्यातील हॉटेलमध्ये टोळक्याची तोडफोड, दगडफेकामुळे तणाव!
TTTUSHAR TAPASE
FollowJul 12, 2025 03:00:58
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_TODFOD
साताऱ्यातील शनिवार चौक परिसरात एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या टोळक्याने बिलावरून हॉटेल मालकाशी वाद घालत हॉटेलची तोडफोड केली... यावेळी या टोळक्याने बाहेर जाऊन या परिसरात दगडफेक केल्यामुळे काही वेळासाठी या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते... यानंतर हे टोळके त्या ठिकाणाहून प्रसार झाले दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन यामधील दोन जणांना अटक केली असून. दगडफेकीदरम्यान रस्त्यावरील चार जण जखमी झाले आहेत... याप्रकरणी अज्ञात टोळक्यावर पोलिसांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
6
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowJul 12, 2025 08:03:49Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर..
अर्धनग्न करून केलेल्या अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू....
अंगावरील कपडे काढून तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केल्याचा पोलिसांना संशय...
मृत तरुणाच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे व्रण...
अर्जुन प्रधान असे मृत कंपनी कामगाराचे नाव आहे. कालच त्याचा पगार झाला होता अशी माहिती आहे...
आज मृतदेह आढळल्यानंतर नातेवाईकांनी हंबरडा फोडला...
या प्रकरणी एम.आय. डी.सी.वाळूज पोलिसात आज्ञात विरोधात हत्येचा गुन्हा दाखल.
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 12, 2025 07:36:11Kalyan, Maharashtra:
डोंबिवली पश्चिम परिसरात MMRDAच्या ठेकेदाराचा भ्रष्ट कारभार कॅमेरात कैद.
गटारात पाणी असताना सुरू आहे गटाराचे काँक्रीटीकरणाचे काम.
व्हिडियो व्हायरल
Anchor :- डोंबिवली पश्चिम परिसरात एमएमआरडीएच्या ठेकेदाराचा गंठण कारभार मोबाईलच्या कॅमेरात कैद झालाय . डोंबिवली पश्चिम परिसरात गटाराच्या काँक्रिटीकरणाचे काम हे एम एम आर डी ए च्या माध्यमातून हाती घेण्यात आले मात्र या गटारात पाणी असतानाच गटारात काँक्रीट टाकण्याचे काम सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होतोय . या व्हिडिओमुळे या कामाच्या दर्जाबाबतच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले संबंधित अधिकारी या ठेकेदारावर काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे
1
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 12, 2025 07:33:55Washim, Maharashtra:
वाशिम :
File:1207ZT_WSM_CROP_DAMAGE
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: जून महिन्यात पावसाने दिलेला खंड आणि नंतर जुलैमधील अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.शासकीय आकडेवारीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत 3.62 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली असून त्यातील 13,152 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.रिसोड तालुक्यात सर्वाधिक 9,450 हेक्टरवर, मालेगावमध्ये 2,380 हेक्टरवर, वाशिम तालुक्यात 700 हेक्टरवर तर मंगरूळपीरमध्ये 590 हेक्टरवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. 25-26 जूनला झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव आणि रिसोडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जुलैमध्येही जोरदार पावसामुळे ही परिस्थिती गंभीर बनली आहे.त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.
3
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 12, 2025 07:33:36Pandharpur, Maharashtra:
12072025
Slug - PPR_CURRENT_IN_QUE
feed on 2c
file 04
-----
Anchor - विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील अनर्थ टळला, गर्दी कमी झाली आणि वायर तुटल्याने रांगेत उतरला विद्युत प्रवाह, तीन श्वानाचा दुर्दैवी मृत्यू
विठ्ठल रुक्मिणी दर्शन रांगेत वायर तुटल्याने पंचमुखी मारुती मंदिराजवळ विद्युत प्रवाह सुरू झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या तीन श्वानाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अवघ्या काही वेळ आधी त्या भागातून दर्शन रांग पुढे गेली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या ढिसाळ कार्यपद्धतीचा नमुना समोर आला आहे.
----
byte - मनोज श्रोत्री, व्यवस्थापक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
4
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 12, 2025 07:30:11Yeola, Maharashtra:
अँकर :- येवला तालुक्यातील धामोडा येथील पैठणी विणकर असलेला सागर वाल्मीक भड हा तरुण नाशिक संभाजीनगर महामार्गावर जळगाव नेऊर येथून घराकडे परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या घटनेची नोंद येवला तालुका पोलिसात करण्यात आली असून शोकाकुल वातावरणात सागर भड यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 12, 2025 07:04:58Shirdi, Maharashtra:
Rahata News Flash
*राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात हिंदुत्ववादी संघटनांचा भव्य मोर्चा...*
चिकन विक्रेत्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक...
चिकनविक्रेता चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यात लघुशंका करत असल्याचा आरोप...
*आरोपीवर कठोर कारवाईसह दुकानावर तोडक कारवाईची मागणी...*
हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चाला सुरुवात...
मोर्चात साधू महंत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि किन्नर प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी...
लोणी पोलिस ठाण्यावर धडकणार मोर्चा...
WKT_kunal jamdade
11
Share
Report
UPUmesh Parab
FollowJul 12, 2025 07:02:53Oros, Maharashtra:
अँकर --- महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 11 किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलाय. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला तर देवगड येथील विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. या दोन्ही किल्ल्याचा समावेश झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवप्रेमीनी आंनदोस्तव साजरा केला. ढोल ताशाचा गजर करत व फटाके वाजवत शिवप्रेमीनी जल्लोष केलाय. युनिस्कोच्या जागतिक वासरा यादीत समावेश झाल्याने किल्ल्याचे संवर्धन होईल असा विश्वास शिवप्रेमीनी व्यक्त केलाय. याचा विजयदुर्ग किल्ल्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी.
Wkt ( 121 ) --- उमेश परब, सिंधुदुर्ग
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 12, 2025 06:33:37Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कर्नाटक व महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी द्यावी,यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे थेट कृष्णा नदीला साकडे..
अँकर - अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात सांगलीमध्ये कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीकडून आंदोलन करण्यात आले आहे.
कर्नाटक व महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी द्यावी,यासाठी थेट कृष्णा नदीला साकडे घालण्यात आले आहे.कृष्णा नदीची ओटी भरत राज्य सरकारने अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात ठोस भूमिका घ्यावी,अशी मागणी देखील करण्यात आली आहे.अलमट्टी धरणाच्या उंची वाढीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा धोका निर्माण होणार आहे,त्यामुळे राज्य सरकारने याबाबतीतल्या उपायोजना व अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात भूमिका व उपाययोजना करण्यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्यावतीने थेट कृष्णा नदीला आज साकडे घालण्यात आले,यावेळी कृष्णा नदीचे पूजन करत अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
बाईट - सर्जेराव पाटील - अध्यक्ष ,कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समिती- सांगली.
6
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 12, 2025 06:31:40Pune, Maharashtra:
pimpri notice
kailas puri Pune 12-7-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून 26 कनिष्ठ अभियंता रस्त्यावरील खड्ड्यांच्या संदर्भात कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. शहरात जुन्या मुंबई पुणे महामार्ग सह अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांच्या तक्रारींचं निवारण केले नसल्याने 17 कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. खड्ड्यान संदर्भात आलेल्या तक्रारींवर मानक प्रक्रियेनुसार अर्थात स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नुसार कारवाई न केल्याने सात कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
3
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 12, 2025 06:30:54Pune, Maharashtra:
मित्राच्या वाढदिवसाला वाजवायला फटाके नसल्याने बंदुकीतून दोन राउंड फायर करत साजरा केला वाढदिवस
pune firing
kailas puri Pune 12-7-25
feed by 2c
मित्राच्या वाढदिवसाला वाजवायला फटाके नसल्याने बंदुकीतून दोन राउंड फायर करत साजरा केला वाढदिवस
बावधन परिसरातील वृंदावन फार्म हाऊस सुसगाव येथील घटना
-दोन राउंड फायर करत केला मित्रांचा वाढदिवस साजरा
-कुमार खळदकर यांचा वाढदिवस साजरा होत होता त्यावेळी त्याचा आरोपी मित्र दिनेश सिंग ज्या ठिकाणी वाढदिवस सुरू होता त्या ठिकाणी आला त्यानंतर दिनेश सिंग याला या वाढदिवसाला फटाके नसल्याचे समजले आरोपी दिनेश सिंग ने तत्काळ आपलं रिवाल्वर काढत दोन फायर राऊंड करत वाढदिवस साजरा केला
या प्रकरणी दिनेश सिंग याला बावधन पोलिसांनी तात्काळ अटक केलं
0
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 12, 2025 06:00:39Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_R1_MURDER
आर्थिक देवाण घेवाणीतुन किडन्याप करत अमानुष मारहाणीत 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मयत व्यक्तीच्या संपुर्ण अंगावर मारहानीचे जबर वण अंग पडले काळे निळे
धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील 55 वर्षीय मधुकर चंदर कोळगे असे मयत व्यक्तीचे नाव
मारहाण करून प्रेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणून टाकत आरोपी झाले पसार
मधुकर चंदर कोळगे यांना बेदम मारहाण केल्याचा नातेवाईकाचा आरोप, आरोपीवर कठोर कारवाईची नातेवाईकांची मागणी
60 हजार रुपये आर्थिक देण्याच्या बदल्यात कोळगे यांना एका व्यक्तीने गेल्या 7 ते 8 महिन्यापासुन शेतात डांबून ठेवल्याचा नातेवाईकांचा आरोप
व्याज आणि रक्कम वसुल करुनही पैसे वसुल करण्यासाठी शेतात मजुरीचे काम करुन घेतले जात असल्याचा मुलगा मारुती कोळगेचा आरोप
मारहाण करुन एकाने रुग्णालयात आणुन टाकले व तुमचे वडील आजारी असल्याने शासकीय रुग्णालयात या म्हणत केला फोन
बाईट- सुन आणि मुलगा
2
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 12, 2025 06:00:10Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Karde Leopard Dog
File:02
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc:शिरूर तालुक्यातील करडे गावात रात्रीच्या सुमारास घरासमोर बसलेल्या कुत्र्याला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडलीय, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय,या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याला जेरबंद करण्याच मोठ आव्हान आता वनविभागापुढे असणार आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
1
Share
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 12, 2025 05:31:46Mira Bhayandar, Maharashtra:
Date-12july2025
Rep-prathamesh tawade
Loc-bhayander
Slug-BHAYANDER CRIME
Feed send by 2c
Type-AVB
Slug- मीरा-भाईंदर शहरात खुलेआम विकला जातोय ड्रग्ज
अँकर - काशीमीरा येथील हाटकेश परिसरात राहणाऱ्या एका जागरूक युवकाने ड्रग्ज विकणाऱ्या एका तरुणाला पकडून काशिगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.सदर युवकाने पेडलरकडून तब्बल ४० ड्रग्जच्या पुड्यांची जप्ती केली होती.मात्र, काशिगाव पोलिसांनी या पेडलरवर कोणतीही कठोर कारवाई न करता त्याला पुन्हा सोडून दिले.
या ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीने "ब्लड १०७ गँग" असे नाव घेऊन परिसरातील भिंतींवर नशेची जाहिरात सुरू केली आहे.
"ब्लड १०७ गँग" या टोळीने दररोज नशा करण्यासाठी तरुणांना प्रेरित करणारे संदेश भिंतींवर लिहले असून, पोलिसांचा अपमान करत पोलिसांचे चित्र काढून बंदूक दाखवून खुलेआमपणे पोलिसांना आव्हान दिलं आहे....
जागरूक युवकाच्या म्हणण्यानुसार, काशीमीरा हाटकेश भागात सलमान कुरेशी नावाच्या टोळीचे गुंड खुलेआम ड्रग्ज विक्री करत आहेत.मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने आरोपी सलमान कुरेशी याला तडीपार केलेले आहे. असे असताना देखील ड्रग्स विक्रीचा व्यवसाय मीरा-भाईंदर मध्ये तेजीत सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे..
बाईट- जागरूक युवक
5
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 12, 2025 05:04:31Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत शाळेत जाण्यासाठी सोय नसल्यामुळे घोड्याचा आधार, नववीत शिकणाऱ्या मुलाची अनोखी शक्कल
Anc : ग्रामीण भागात शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी एसटी किंवा स्कूल बस याचा वापर आपण पाहत असतो. मात्र अनेक ग्रामीण भागातील शाळकरी मुलांना दुर्गम भागातून शाळेची वाटचाल खडतर पणाने पार करावी लागते. मात्र बार्शी तालुक्यातील एका शाळकरी विद्यार्थ्यांनी शाळेची वाट सुखकर व्हावी यासाठी घोड्यावरून शाळेची वाट धरली आहे. वस्तीवरून शाळेपर्यंत जाण्यासाठी एसटी आणि इतर वाहनांची सोय नसल्यामुळे अनोखी शक्कल लढवली आहे.. शिक्षणाची जिद्द कायम ठेवत रोज शाळेला जाण्यासाठी घोड्यावरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची जोरदार चर्चा आहे. आदेश साळुंखे असं घोड्यावरून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांचे नाव आहे.
आदेश हा वैराग येथील साधना विद्यालयात इयत्ता नववीचे शिक्षण घेत आहे. वैराग जवळील लाडोळे वस्तीवर आदेश राहतो. लाडोळे ते वैराग चार किलोमीटरचे अंतर तो घोड्यावरून पार करत असतो.. वैराग परिसरातील अनेक वस्त्यांवर एसटीची सोय नसल्यामुळे शाळकरी मुलांची गैरसोय होते. मात्र या सर्वांवर मात करत शिक्षणाची जिद्द आणि चिकाटी असलेल्या आदेशाने घोड्यावरून शाळा गाठत विद्येचे ज्ञान घेताना दिसत आहे.. घोड्यावरून आल्यावर घोडा हा शाळेजवळील चिंचेचा झाडाला बांधतो. दिवसभर शाळेत गेल्यानंतर तो घोडा त्या झाडालाच बांधून असतो. शाळा सुटली की परत वैराग वरून वस्तीकडे घोड्यावरूनच जातो.
आदेश याचे आजोबा हे शेतात शेतीपालना बरोबर घोडे पाडले आहे.. आजोबा प्रभाकर साळुंखे यांच्याकडे दीडशे शेळ्या आणि सात घोडे आहेत. आदेश याला लहानपणीच आजोबांनी घोडेस्वारी शिकवली आहे. आदेश हा आजोबांसोबत घोड्याची देखभाल ही करतो. आदेश हा अभ्यासात हुशार असल्याचेही शिक्षकांकडून सांगण्यात आलं आहे. आदेश हा घोड्यावरून शाळेत येत असताना त्याचा आनंद मोठा असतो. मात्र अशा अनोख्या शक्कलमुळे आदेशची घोडेस्वारी मात्र चांगलीच चर्चेत आली आहे.
Byte : आदेश साळुंखे, घोडेस्वार विद्यार्थी
Byte : शिक्षक..
8
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 12, 2025 05:04:18Yavatmal, Maharashtra:
Anchor : भाजपच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वावर सडकून टीका करत निघालेल्या बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेत यवतमाळच्या केळापूर चे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया तोडसाम सहभागी झाल्या.
दिग्रस च्या धानोरा येथे प्रिया तोडसाम यांनी पदयात्रेत सहभागी होत बच्चू कडू ना पाठिंबा दर्शविला. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. प्रिया तोडसाम ह्या आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नी असून त्या राजकीय मंचावर व भाजप पक्षीय संघटनेत सक्रिय असतात. सध्या भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या बच्चू कडूंच्या पद यात्रेत प्रिया तोडसाम यांनी एन्ट्री केल्याने त्यांच्या मतदारसंघात कुजबुज वाढली आहे.
4
Share
Report