Back
फटाक्यांच्या अभावी मित्राच्या वाढदिवसाला बंदुकीतून फायरिंग!
KPKAILAS PURI
FollowJul 12, 2025 06:30:54
Pune, Maharashtra
मित्राच्या वाढदिवसाला वाजवायला फटाके नसल्याने बंदुकीतून दोन राउंड फायर करत साजरा केला वाढदिवस
pune firing
kailas puri Pune 12-7-25
feed by 2c
मित्राच्या वाढदिवसाला वाजवायला फटाके नसल्याने बंदुकीतून दोन राउंड फायर करत साजरा केला वाढदिवस
बावधन परिसरातील वृंदावन फार्म हाऊस सुसगाव येथील घटना
-दोन राउंड फायर करत केला मित्रांचा वाढदिवस साजरा
-कुमार खळदकर यांचा वाढदिवस साजरा होत होता त्यावेळी त्याचा आरोपी मित्र दिनेश सिंग ज्या ठिकाणी वाढदिवस सुरू होता त्या ठिकाणी आला त्यानंतर दिनेश सिंग याला या वाढदिवसाला फटाके नसल्याचे समजले आरोपी दिनेश सिंग ने तत्काळ आपलं रिवाल्वर काढत दोन फायर राऊंड करत वाढदिवस साजरा केला
या प्रकरणी दिनेश सिंग याला बावधन पोलिसांनी तात्काळ अटक केलं
5
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowJul 12, 2025 11:07:41Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1207ZT_CHP_GANESH_MEET
( single file sent on 2C)
टायटल:--- पीओपी मूर्तींना अटींसह परवानगी, चंद्रपुरात गणेशोत्सवापूर्वी मनपाची मूर्तिकारांसोबत बैठक
अँकर:--- राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. येत्या काही आठवड्यांत घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं स्वागत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेनंही गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. महानगरपालिकेच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि मूर्तिकारांसोबत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सव काळात पाळावयाचे नियम, सार्वजनिक सुरक्षेपासून ते पर्यावरण, ध्वनीप्रदूषण आणि वाहतूक व्यवस्थेपर्यंत अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. शासन निर्णयानुसार काही अटी व शर्तींसह पीओपी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून पीओपी मूर्तींवर बंदी होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानुसार पर्यावरणीय अटींचे पालन केल्यास अशा मूर्तींची विक्री शक्य असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी मूर्ती विक्रेत्यांना सूचना केल्या आहे. दुकानासमोर पीओपी मूर्ती म्हणून बोर्ड असावा या सोबतच पावती देत असताना त्या पावतीवर पीओपी मूर्ती म्हणून नमूद करावे अन्यथा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची ताकीद दिली आहे.
बाईट १) विपिन पालीवाल,आयुक्त, मनपा चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 12, 2025 11:07:24Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RANA_VS_THAKARE दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
ठाकरे बंधू स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी व हिंदी मराठी मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहे – नवनीत राणा
अँकर :- ठाकरे बंधू यांनी घेतलेल्या मराठीच्या मुद्द्यावर माजी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे. ठाकरे बंधू स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी व हिंदी मराठी मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहे असे नवनीत राणा म्हणाल्या आहे. मला शेवटच्या श्वासापर्यंत मराठीचा अभिमान राहील कारण मी या महाराष्ट्रात जन्माला आली. ज्या राज्यात तुम्ही राहतात ती भाषा सगळ्यात पहिली असते माझी जन्मभूमी व कर्मभूमीची भाषा मराठी असल्याने मी तिला समोर ठेवणार आहे. पण ज्या हिंदुस्तानात मी राहते त्या हिंदी भाषेला सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर ठेवतो व आम्ही त्या भाषेचा सन्मान करतो. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरिता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात तर मराठी व हिंदी भाषेत तेढ निर्माण करण्याचं काम करतात त्यांनी हे सांगाव की तुमचे मुलं मराठी शाळेत शिकले की हिंदी भाषेत शिकले असा सवाल भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये ठाकरे बंधूंना केला. तर बरेच नेते हे हिंदी आणि मराठी भाषेमध्ये वाद घालून महापालिकेची पोळी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. असेही नवनीत राणा म्हणाल्या आहे.
साउंड बाईट :- नवनीत राणा, माजी खासदार भाजपा
0
Share
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 12, 2025 11:06:59Buldhana, Maharashtra:
पैंनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना विषबाधा...
उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा
Anchor - बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना काल रात्री कडी आणि भात खाल्ल्याने विषबाधा झाली, अचानक मुलींना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करून रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे....आणि सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे..
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 12, 2025 11:06:53Yeola, Maharashtra:
अँकर:-
येवला तालुक्यातील अंदरसुल येथील नागेश्वर मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारत अंदाजे चार ते पाच हजाराची रोकड लंपास केल्याची घटना घडली असून ३ चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी या दानपेटीत दान टाकले होते.तीच संधी साधत चोरट्यांनी दान पेटी फोडली असावी. तीन चोरटे चोरी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असून ह्या चोट्यांचा शोध पोलीस घेत आहे.
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 12, 2025 11:05:50Raigad, Maharashtra:
स्लग - किल्ले रायगडावर शिवप्रेमींचा जल्लोष ...... युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाल्याचा आनंद ...... जल्लोषात अधिकाऱ्यांचाही सहभाग ......
अँकर - किल्ले रायगडासह स्वराज्यातील 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाल्याचा आनंद आज साजरा करण्यात आला. किल्ले रायगडावर शासकिय अधिकारी आणि शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला. लेझिम खेळत विद्यार्थ्यांनी मिरवणुक काढली. नगारखान्याचे पुजन , छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करीत पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. भगवे झेंडे, फेटे यामुळे वातावरण शिवमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषाने अवघा रायगड दुमदुमून गेला होता. शिवप्रेमींसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी , कर्मचारी, पोलिस या आनंदात सहभागी झाले होते.
बाईट 1 - नितीन पावले, शिवप्रेमी
बाईट 2 - शिवप्रेमी
2
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 12, 2025 10:36:15Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचे स्थलांतरण थांबण्यासाठी आणि स्थानिक स्तरावर त्यांना रोजगार मिळावा यासाठी दुभती जनावर वाटपाचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला. मात्र या कार्यक्रमाचेही तीन तेरा वाचवण्याच काम प्रशासन आणि ठेकेदारांनी केल्याचा दिसून येत आहे. शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा करता यावे यासाठी शासनाकडून ७८ कोटी रुपये खर्च केले, गायी वाटल्या पण यां गायी आजारी आणि कमी दूध देत असल्याचा आरोप आहे.
VO - गोरख गांगुर्डे.. आदिवासी शेतकरी... नंदुरबार जिल्ह्याततील गोरख यांना जोडधाण्यासाठी गाय देण्यात आली मात्र ही गाय पुरेसं दूध देत नाही.. त्यामुळे तिच्या उत्पन्न पेक्षा त्या सांभाळायचा खर्च अधिक आहे. तीच आजारपण गोरख यांना डोईजड जातं आहे, त्यामुळे ते शासनाच्या यां योजनेचा लाभ घेऊन पस्तावत आहेत.
byte - गोरख गांगुर्डे, लाभार्थी
vo - नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प आणि शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना दुधाळ गायांचे वाटप करण्यात आले होते. यांतर्गत शासनाचे ७८ कोटी १९ लाख ५८१० रुपये खर्च करून जिल्ह्यात १० हजार ४३० गायींचे वाटप करण्यात आले. या गायांच्या वाटप करण्याच्या वेळेस प्रत्येक गाई १० लिटर दूध देणार असल्याचे महामंडळातर्फे दावा करण्यात आला होता. मात्र अनेक गाई २ ते ३ लिटरपर्यंतच दूध देत आहेत. काही गायी आजारी आहेत, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना शेतीसोबत जोडधंदा करता यावे यासाठी आदिवासी विभागाकडून गाईंचे वाटप करण्यात आले होते मात्र आता याच गाई या आदिवासी बांधवांसाठी डोकेदुखी बनल्या आहेत. ऐका गाई मागे शेतकऱ्यांना दररोज 300 ते 400 रुपये पर्यंत खर्च करावा लागत आहे, यासह गाईंच्या औषध्यावर मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे आणि बदल्यात एक गायीकडून त्यांना दोन ते तीन लिटर दूध मिळत आहे शेती काम सोडून शेतकऱ्यांना या गायांनाच्या देखभाल साठी धावपळ करावी लागत आहे.
Byt - जयेंद्र गांगुर्डे, लाभार्थी
Byt - ज्योतीराम चौरे, लाभार्थी
vo - अनेक लाभार्थी योजनेबद्दल तक्रारी करत असले तरी काही शेतकरी याबाबत समाधान देखील आहेत. आपल्या आवडीप्रमाणे गाय निवडता आल्याचा आणि त्या चांगल्या असल्याचा दावा काही लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे. योजनाला बदनाम करण्यासाठी हा आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू असल्याचाही दावा काही शेतकऱ्यांनी केला आहे.
byte - लाभार्थी शेतकरी
vo - एकंदरीत योजनाच्या लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना आता आपल्या शेती व घर परिवारासोबत या गायींच्या भरणपोषण करण एक मोठी अडचण निर्माण होत आहे. तरी काहींना नवा रोजगार मिळाला आहे.
gfx in
- आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि शबरी महामंडळाची योजना
- 5215 लाभार्थी
- 78 कोटींचा खर्च
- 10430 गायीचे वाटप
- आजारी, कमी दूध देणाऱ्या गायी वाटपाचा आरोप
- लाभार्थीचे दोन गट काही शासनाच्या बाजूने तर काही विरोधात
gfx out
vo -
राज्य सरकार गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करीत असतो. मात्र शेवटपर्यंतच्या लाभार्थी योजना खर्च लाभाची ठरली का? याचा अभयास होतं नाही. शासनाच्या अनेक योजना प्रमाणे याही योजनेचा फज्जा तर उडाला नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 12, 2025 10:35:50Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:-खासदार लंके उपोषण सुरू
फीड 2C
Anchor
अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाच रखडलेले काम तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केल आहे गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडले आहे काम सुरू झाल्यानंतर काही महिन्यातच ठेकेदार हे काम सोडून जात असल्याने या महामार्गाचा प्रश्न सुटलेला नाही दरम्यान यावर्षी या महामार्गाची नव्याने निविदा काढून महामार्गाच्या प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश काढून अडीच महिने उलटले आहेत तरी देखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही जोपर्यंत ठेकेदाराने निविदा भरतांना ज्या क्षमतेने काम करणार असल्याचे सांगितले आहे त्या क्षमतेने काम सुरू होत नाही तोपर्यंत आपला उपोषण थांबणार नाही असं त्यांनी स्पष्ट केला आहे
बाईट:- निलेश लंके, खासदार राष्ट्रवादी SP
3
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 12, 2025 10:31:54Kolhapur, Maharashtra:
Story:- Mantri Mushrip Program
Feed:- 2C
Anc:- मंत्री हसन मुश्रीफ यानी कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगावमध्ये विद्यार्थ्यांचा क्लास घेतलाय. गुरुपौर्णिमेनिमित्त कसबा सांगावमधील वसंतराव चौगुले सहकारी पतसंस्था संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हसन मुश्रीफ यांनी बालचमूना धडे दिले आहेत. यावेळी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करत असताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आचरणात आणा असा साला दिला, त्याचबरोबर अब्राहम लिंकन यांनी हेड मास्तरांना लिहिलेल्या पत्राचा अन्वयार्थ विद्यार्थ्यांना सांगितला.
2
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 12, 2025 10:31:45Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- संग्राम जगताप
फीड 2C
संग्राम जगताप ऑन लोणी इशू
Anchor
अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात हिंदुत्ववादी संघटनांनी भव्य मोर्चा काढला आहे... चिकन विक्रेता चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यात लघुशंका करत असल्याच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोविड काळानंतर अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळाल्या असून ही प्रवृत्ती भारतामध्ये उदयास येत असल्याचे पाहायला मिळत असल्याचे संग्राम जगताप यांनी म्हटलंय. तर अशा लोकांकडून खरेदी करायची की नाही असा प्रश्न निर्माण होत असून याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली आहे.
बाईट:- संग्राम जगताप, आमदार राष्ट्रवादी AP
संग्राम जगताप ऑन जयंत पाटील
Anchor
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे...जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नसताना अनेक वेळा त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असायची...मात्र ते प्रदेशाध्यक्ष झाल्यावर ते थांबले... जयंत पाटील हे राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत असं बोललं जायचं...अस्वस्थपणामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा...ते वेगळ्या पक्षात जातील अशीही चर्चा सुरू असल्याबाबत संग्राम जगताप यांना विचारले असता ते जर राष्ट्रवादी अजित पवार गटात आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचे स्वागतच करतील असं आमदार जगताप यांनी म्हंटले आहे.
बाईट:- संग्राम जगताप, आमदार राष्ट्रवादी AP
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 12, 2025 10:31:31Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - करगणीतील लैंगिक अत्याचार व आत्महत्या प्रकरणी शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचं रस्ता रोको आंदोलन.
अँकर - सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणी मधील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणी करगणी ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे.संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीसाठी आटपाडी-भिवघाट मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. करगणी ग्रामस्थांचं शालेय विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता रस्त्यावर ठिय्या मारत जोरदार निदर्शने करण्यात आली. सुमारे तासभर या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला,त्यामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली होती
0
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 12, 2025 10:06:33Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- निलेश लंके ऑन जयंत पाटील
फीड 2C
Anchor
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया...
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्याबाबत मला माध्यमांकडून माहिती समजली...
राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमातच जयंत पाटील यांनी राजीनामा देण्याबाबत स्वतः केला होता...
प्रदेशाध्यक्ष पदाबाबतचा सर्वस्वी अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचा आहे...
बाईट-निलेश लंके, खासदार राष्ट्रवादी SP
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 12, 2025 10:03:49Kalyan, Maharashtra:
डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात
नळाला "गढूळ" पाणी
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Anchor :- डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात रहिवाशांच्या घरात गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .शुक्रवार दुपार पासून मिलापनगर मधील श्री वसंत छेडा आणि इतर काही बंगलो मध्ये गढूळ, अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचे दिसल्यावर काहींनी
याबाबत एम आय डी सी कडे तक्रारी केल्या .कल्याण डोंबिवलीत डेंगू, मलेरिया, टायफॉईड, कावीळ इत्यादी साथीच्या आजारानी डोके वर काढल्याने या गढूळ पाण्यामुळे नागरिक भयभीत झालेत . एमआयडीसी निवासी भागात नाले ,गटारांची भूमिगट सांडपाणी वाहिन्यांची रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. याकामा दरम्यान अनेकदा खोदकाम करताना निष्काळजीपणामुळे पाण्याच्या पाईपलाईन फुटतात मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने गढूळ पाणी या पाईपलाईन मध्ये मिसळत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्यात याबाबत अनेकदा एमआयडीसी कडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय .
2
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 12, 2025 10:02:23Shirdi, Maharashtra:
Anc - शनिशिंगणापूर देवस्थानातील ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी विश्वस्त मंडळ बरखास्त करुन विश्वस्तांच्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.शनिशिंगणापूर देवस्थानामध्ये कर्मचारी , पुजारी आणि विश्वस्तांनी मिळून ऑनलाइन पद्धतीने पूजा करण्यासाठी भक्तांचे बनावट ॲप, क्युआर कोडवर पैसे घेऊन आणि २४४७ कर्मचाऱ्यांचा बोगस कर्मचारी घोटाळा करून तब्बल ५०० कोटींचा घोटाळा केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले असून शनि शिंगणापूर देवस्थान भ्रष्टाचाराबाबत पाठपुरावा करणारे भाजप नेते ऋषिकेश शेटे यांनी गंभीर आरोप केलं असून शनिशिंगणापूर भ्रष्टाचारा मध्ये ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख हेच मुख्य 'आका' असल्याचा गंभीर आरोप ऋषिकेश शेटे यांनी केलाय...नेमका शनी शिंगणापूर देवस्थानचा घोटाळा काय...? याबाबत पाठपुरावा केलेल्या ऋषिकेश शेटे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी....
Tiktak kunal jamdade with rushikesh shete
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 12, 2025 10:01:36Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn shirsath statement av
feed attached
पैश्याच्या बॅगेवरून संजय शिरसाट यांचं नवीन वक्तव्य
पैशांची चिंता करू नका : शिरसाट
पैशासाठी काही अडलं नाही, पैसे देणारे आम्हीच आहोत : शिरसाट
पैशाची चिंता नाही एखादी बॅग तुम्हाला पाठवून देऊ : शिरसाट
छत्रपती संभाजीनगरच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बोलतांना शिरसाटांचे वक्तव्य
शिरसाट यांचा मिश्किल वक्तव्य चर्चेत
1
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 12, 2025 08:36:42Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_FORT_PRATIKRUTI
सातारा – युनेस्कोने नुकतीच भारतातील महाराष्ट्र राज्यातील 11 आणि तमिळनाडूतील 1 अशा एकूण 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. या ऐतिहासिक निर्णया नंतर राज्यात आनंदाचे वातावरण आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात करण्यात आला असून, या सर्व 12 गडकिल्ल्यांच्या हुबेहूब, भव्य अशा प्रतिकृती संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत.युनेस्कोच्या टीमने साताऱ्यातील या संग्रहालयाला नुकतीच भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी प्रत्यक्ष प्रतिकृती पाहून त्याची बारकाईने पाहणी केली तसेच गडकिल्ल्यांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. ऐतिहासिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून या प्रतिकृती अत्यंत महत्त्वाच्या आहेत.संग्रहालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रतिकृती लवकरच सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. त्यामुळे इतिहासप्रेमींना एकाच ठिकाणी जागतिक वारसा मिळवलेल्या सर्व गडकिल्ल्यांचे दर्शन घेता येणार आहे.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
Wkt..
संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे
1
Share
Report