Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्ध्यातील महिला रुग्णालयाचा धक्कादायक खुलासा: 71 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, रुग्णालय कुलूपबंद!

MAMILIND ANDE
Jul 16, 2025 06:03:01
Wardha, Maharashtra
*वर्धा ब्रेकिंग* SLUG- 1607_WARDHA_HOS_UPDATE (अधिवेशन असल्यामुळं बातमी महत्वाची) - वर्ध्यातील धक्कादायक बातमी - वर्ध्यात कुलूपबंद महिला रुग्णालयासाठी पदभरती - महिला रुग्णालय सुरू होण्याआधीच अधिकारी, कर्मचाऱ्यांची करण्यात आली नियुक्ती - एकूण 97 पदापैकी 19 नियमित तर 52 कंत्राटी अशी एकूण 71 भरलीय पदे - सन 2023 मध्ये त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आली पद भरती - नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वेतनाचा शासनाला बसतोय भुर्दंड - सन 2021 मध्ये महिला रुग्णालयाला मिळाल्यात 5 रुग्णवाहिका - महिला रुग्णालयाच्या रुग्णवाहिका कार्यरत दिसत नसल्याचं आलंय वास्तव पुढे - रुग्णालयाची इमारत हस्तांतरित न झाल्यामुळं उपकरणे स्थापित केले नसल्याचे पुढे केले कारण - सिरिनज पंप, आयसीयू बेड, आयसीयू मॉनिटर,ऑक्सिजन सिलेंडर, ईसीजी मशीन, व्हेंटिलेटर अशी विविध 24 प्रकारची लाखो रुपयांची मिळालेली उपकरणे गेली तरी कुठे.... - दोन वर्षांपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनही अदा; वर्ध्यातील गंभीर धक्कादायक प्रकार उघड अँकर - चार वर्षांपूर्वी २१ कोटी रुपयांचा खर्च करून वर्धा शहरात महिला रुग्णालय उभारण्यात आले. अजूनही हे रुग्णालय कुलूपबंद असताना या रुग्णालयासाठी दोन वर्षांपूर्वीच ७१ आरोग्य कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली. त्यांना वेतनही अदा केले जात आहे. यासोबतच पाच रुग्णवाहिका आणि २४ प्रकारची विविध उपकरणेदेखील खरेदी करण्यात आल्याची समोर आली आहेय. राज्यात रत्नागिरी, वर्धा, जळगाव आणि यवतमाळ या चार जिल्ह्यात जानेवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसार महिला रुग्णालयाची उभारणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. २०१४ मध्ये राज्यात आघाडीचे सरकार बदलून भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. नव्या सरकारमध्ये रुग्णालयाचे काम रेंगाळले.  चार वर्षांपूर्वी रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले. पण, अजूनही हे महिला रुग्णालय वर्ध्यात सुरू झाले नाही. यवतमाळसह इतर जिल्ह्यांत हे रुग्णालय तीन वर्षांपूर्वीच सुरू झाल्याची माहिती आहे. २००१ मध्ये या महिला रुग्णालयाला पाच रुग्णवाहिकादेखील प्राप्त झाल्यात. पण, हे साहित्य कुठे आहेत असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. विवो - वर्ध्यात 21 कोटींचा खर्च करून रुग्णालय तयार करण्यात आले...उपकरणे,अंबुलन्स देखील मिळाल्या,महिला रुग्णालयासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहेय..एकीकडे रुग्णालय बंद आहेय अजून पर्यंत लोकार्पण झाले नाही..जिल्ह्यातले आमदार सेवाग्राम हॉस्पिटल बद्दल विधानसभेत बोलतात मात्र महिला रुग्णालयाबद्दल बोलत नाही..महिला रुग्णालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता शिवसेना उबाठा गटाकडुन केला जात आहेय..त्याची चौकशी करा अन्यथा महिलांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख निहाल पांडे यांनी दिला आहेय.. बाईट- निहाल पांडे,उपजिल्हा प्रमुख,वर्धा विवो - महिला रुग्णालयाचे काही काम बाकी आहेय.. रुग्णालयात महिलांना सेवा देण्याचे काम सुरू असून गरोदर माता यांच्यावर उपचार केले जात आहेय..नियुक्ती केलेले कर्मचारी सामान्य रुग्णालयात काम करत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुमंत वाघ यांनी दिली आहेय... बाईट- सुमंत वाघ,जिल्हा शल्य चिकित्सक,वर्धा
6
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top