Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

चंद्रपूर आंदोलन: हंसराज अहीरने घेतली जनसुनावणी, प्रशासनावर आरोप!

AAASHISH AMBADE
Jul 16, 2025 13:38:35
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1607ZT_CHP_AHIR_VISIT_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील अरबिंदो कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, आंदोलनस्थळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहीर यांनी घेतली जनसुनावणी, नियमभंग करणाऱ्या कंपनी प्रशासनाची काढली खरडपट्टी अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या टाकळी, जेना, बेलोरा, पानवडाळा, डोंगरगाव (खडी), किलोनी, कान्सा, शिरपूर अशा गावांमधील अनेक शेतकरी अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीच्या कोळसा खाण प्रकल्पामुळे प्रभावित झाले आहेत. प्रकल्पग्रस्तांचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे, या आंदोलन ठिकाणी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांनी जनसुनावणी केली.  राज्याच्या भूमी अधिग्रहण व पुनर्वसन कायद्याचे पालन न करता, तसेच प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन आणि भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता, कोणताही मोबदला किंवा जमिनीचा दर निश्चित न करता प्रशासनाने कंपनीला उत्खननाची परवानगी दिली आहे. २४ जून २०२४ रोजी झालेल्या बैठकीत खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र, हा आदेश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या शपथपत्रावर आधारित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे, या प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त आणि न्यायालयाची दिशाभूल झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जमीन अधिग्रहण व मोबदला त्वरीत निश्चित करावा, एकमुश्त अधिग्रहण करून रोजगार (नोकऱ्या) देण्याचे करार व्हावेत, सर्व निर्णय प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन घ्यावेत आणि सरकारच्या अधिनियमाची संपूर्ण अंमलबजावणी न होईपर्यंत उत्खनन थांबवावे—या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.  सरकारने कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी झाल्याशिवाय कोळसा उत्खनन परवानगी तात्काळ रद्द करावी अशी मागणी पुढे रेटण्यात आली आहे. बाईट १) हंसराज अहीर, अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top